Happy Diwali to you all
Diwali refreshes my memories of Diwali celebrations of the past, the detailed description of which, I have given in my last year's blog on Diwali. Today I reproduce the poems written by Shubhangi.
All these poems are now available with audio-clips in iOS app Kavyadeep which contains all three poem books of Shubhangi viz. Kavyadeep, Sangava and Say. There are separate apps of these three poem books on Android. All these apps are FREE to download. They provide a large resource of poems on almost every topic in simple words expressing the feelings of a sensitive mind.

दिवाळीची महती
|
दिवाळीचा किल्ला
|
---|---|
आली हसत दिवाळी दारी सजते रांगोळी तिच्या स्वागताला सारी झाली सज्ज घरीदारी - - - १ अंधराचा नायनाट मंद प्रकाश दारात पणतीने उजळते झूंजूमुंजू ती पहाट - - - २ स्नानलेपनादि कामे करताती आनंदाने सुवासिक अत्तराने भरताती तनमने - - - ३ भरजरी ती वसने मनमोहक दागिने देवदर्शना जाती ते सारे मिळूनी गोडीने - - - ४ लाडू चिवडा करंजी चकलीची स्वारी खाशी शंकरपाळे अनारशाने ताटे भरती हौसेने - - - ५ गप्पागोष्टी करण्यात सारे दंग फराळात जुन्या गोड आठवणी रमता ये डोळा पाणी - - - ६ दिवाळीचे चार दिन जाती सुखात बुडून दृढ करी नाती-गोती ऎसी दिवाळीची महती - - - ७ | दीपावलीचा सणही आला आकाशकंदील दारी लावला पणत्या त्याही येती साथीला मंगलमय तो प्रकाश पडला मंगलमय तो प्रकाश पडला . . . १ मातीचा तो किल्ला केला हळीव मोहरी गहू पेरला हरित तृणांनी बहरून आला हिरवा शेला जणू ल्यायिला हिरवा शेला जणू ल्यायिला . . . २ वळणावळणाच्या वाटेला रंग विटकरी हळूच भरला खडू रोवुनी कडेकडेला सुंदरसा तो रस्ता सजला सुंदरसा तो रस्ता सजला . . . ३ पायथ्याशी ती नगरी वसली छोटी_मोठी घरे लाविली तळेही केले बदके आली शोभा आली त्या नगरीला शोभा आली त्या नगरीला . . . ४ किल्ल्यावरती बुरुज लाविला सिंहासनी तो शिवबा बसला उभे मावळे सभोवतीला रक्षण करण्या त्या किल्ल्याला रक्षण करण्या त्या किल्ल्याला . . . ५ बाजुस एका गुहाही केली वाघोबाची स्वारी लपली सर्व मंडळी खूष जाहली पाहून ऎशा सजावटीला पाहून ऎशा सजावटीला . . . ६ |
No comments:
Post a Comment