Friday, October 27, 2017

संस्कृत वर्णमालेचा जन्म भगवान शंकराच्या डमरू ध्वनींतून

नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम्। 
उद्धर्त्तुकामो सनकादिसिद्धानेतद्विमर्शे शिवसूत्रजालम्॥ 

भगवान शंकराच्या (नटराजाच्या) तांडव नृत्यानंतर सनक व इतर ऋषींच्या तपश्र्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांच्या इच्छापूर्तीसाठी श्री शंकराने आपला डमरू चौदा वेळा वाजवून विशिष्ठ दैवी ध्वनी निर्माण केले होते. या ध्वनींना माहेश्र्वर(शिव) सूत्रे असे म्हटले जाते. असा पुराणांत उल्लेख आहे.

ही  चौदा माहेश्र्वर सूत्रे खालीलप्रमाणे आहेत.

॥ " माहेश्वर सूत्र " ||
१. अ इ उ ण्।
२. ॠ ॡ क्।
३. ए ओ ङ्।
४. ऐ औ च्।
५. ह य व र ट्।
६. ल ण्
७. ञ म ङ ण न म्।
८. झ भ ञ्।
९. घ ढ ध ष्।
१०. ज ब ग ड द श्।
११. ख फ छ ठ थ च ट त व्।
१२. क प य्।
१३. श ष स र्।
१४. ह ल्।

या ध्वनीवर आधारित संस्कृत भाषेच्या वर्णमालेचा जन्म झाला असे समजले जाते. त्यामुळे संस्कृत वर्णमाला व व्याकरण यांचा मूळ निर्माता भगवान नटराज वा देवाधिदेव श्री शंकराला मानले जाते.

महर्षि पाणिनीला श्री शंकराच्या कृपेने माहेश्र्वरी सूत्रे प्राप्त झाली व त्यांच्या आधारे त्याने संस्कृत वर्णमाला व व्याकरणाची खालीलप्रमाणे रचना केली.

स्वर :- सूत्र  १ - ४

अ इ उ ण् ।
 ऋ लृ क् ।
ए ओ ङ् ।
ऐ औ च् ।
वरील सूत्रातील ण्, क्, ङ् आणि च् वगळले की
पुढील स्वर मिळतात. जसे अ इ उ ऋ लृ ए ऐ ओ औ
-----------------
व्यञ्जन :- सूत्र ५ -६
ह य व र ट् ।
ल ण् ।
वरील सूत्रातील ट् आणि ण् वगळले की
ह य व र ल ही व्यंजने मिळतात.
---------
व्यञ्जन :- सूत्र  ७
ञ म ङ ण न म् ।
वरील सूत्रातील  म् वगळला की ञ म ङ ण न ही व्यंजने मिळतात.
-------
व्यञ्जन :- सूत्र  ८ -९
झ भ ञ् ।
घ ढ ध ष् ।
वरील सूत्रातील ञ् आणि ष् वगळले की झ भ घ ढ ध  ही व्यंजने मिळतात.
-------
व्यञ्जन :- सूत्र  १०
ज ब ग ड द श् ।
वरील सूत्रातील  श् वगळला की ज ब ग ड द ही व्यंजने मिळतात.
---------
व्यञ्जन :- सूत्र  ११ -१२
ख फ छ ठ थ च ट त व् ।
क प य् ।
वरील सूत्रातील व् आणि  य् वगळले की ख फ छ ठ थ च ट त क प ही व्यंजने मिळतात.
------
व्यञ्जन :- सूत्र  १३ -१४
श ष स र् ।
ह ल् ।
 वरील सूत्रातील र्  आणि  ल्  वगळले की  श ष स ह ही व्यंजने मिळतात.
-------
वरील सर्व व्यंजनात ह दोनवेळा आलेला दिसतो. 'महाभाष्य'  या टीकेत हलन्त्यम् सूत्रामध्ये याविषयी अधिक स्पष्टीकरण आहे.

वरील स्वर आणि व्यंजने यंची फेररचना करून ध्वनीचे अक्षरांत रूपांतर करताना पाणिनीने  व्यंजनउच्चाराचे वेगळेपण कायम राखून त्यांना स्वरांचा जोड देऊन शब्द तयार करण्याची अनोखी पण अत्यंत समर्पक पद्धत विकसित करुन अक्षरे लिहिणे सोपे केले.
त्यापुढे जाऊन मूळ धातूंची ( क्रियापादांची) यादी करून त्यापासून संस्कृत भाषेतील सर्व  इतर शब्द तयार करण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धती विकसित केल्यामुळे संस्कृत भाषेला एक नियमबद्ध व आधुनिक संगणकीय कार्यप्रणालीस उपयुक्त भाषेचा दर्जा दिला ही गोष्ट अभिमानास्पद आहे.



No comments:

Post a Comment