Monday, September 4, 2017

संस्कृत संधि - एक झलक

संस्कृत संधि हे एक संस्कृत भाषेचे आगळेवेगळे वैशिष्ठ्य आहे. प्राचीन संस्कृत साहित्यात संधिचा उपयोग करून लिहिलेले श्र्लोक  पाहिले की याची प्रचिती येते . संस्कृतदीपिका या ज्ञानदीपच्या वेबसाईटवर  देव स्तुती आणि इतर धार्मिक साहित्त्याशिवाय इतर ज्ञानशाखांतील संस्कृत ग्रंथांची माहिती घालण्यासाठी शोध घेत असताना मला 'संस्कृत संधि' चे एक उत्तम उदाहरण मिळाले.

भारतीय प्राचीन वैज्ञानिक वराहमिहिर यांनी लिहिलेल्या ज्योतिषशास्त्रावरील ' बृहत्संहिता ' या ग्रंथातील  ग्रहगोचराध्यायः प्रकरणातील १०३ व्या श्र्लोकात  एक ओळ खालीलप्रमाणे  आहे. संस्कृत संधि आणि समास यांचा उपयोग करून अनेक शब्द एकत्र जोडून त्यांचा एकच शब्द तयार करण्याचे कसब यात दिसून येते.

कारयेद्धेमताम्राश्वकाष्ठास्थिचर्माउर्णिकाद्रिद्रुमत्वग्नखव्यालचौरऽयुधीयाटवीक्रूरराजोपसेवाभिषेकाउषधक्षौमपण्यादिगोपालकान्तारवैद्याश्मकूटावदाताभिविख्यातशूरऽहवश्लाघ्य*याय्य्*अग्निकर्माणि सिद्ध्यन्ति लग्नस्थिते वा रवौ ।

असे शब्द एकत्र जोडण्याची सोय संस्कृत भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेत नााही.


No comments:

Post a Comment