Wednesday, December 19, 2018

ज्ञानदीपचे नवे आयफोन अॅप - संस्कृत-व्याकरण iOS App



 ज्ञानदीपचे नवे आयफोन अॅप -   संस्कृत-व्याकरण सौ. सुमेधा गोगटे (अमेरिका) यांनी विकसित केले असून त्यात ज्ञानदीपच्या माजी संचालिका  व संस्कृत शिक्षिका कै. सौ. शुभांगी रानडे यांच्या आवाजातील ध्वनीफितीँचा समावेश केला आहे.

   ज्ञानदीपचे नवे आयफोन अॅप -   संस्कृत-व्याकरण iOS App






संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी नाम, सर्वनाम यांची विभक्तीरूपे आणि धातूंची कालार्थ रुपे यांचा अभ्यास आवश्यक असतो. प्रत्येक नाम विभक्तीत एकवचन, द्विवचन व बहुवचन अशी प्रथमा ते संबोधन पर्यंत २४ रुपे असतात. नामांचे स्वरान्त व व्यंजनान्त असे अनेक प्रकार असून पुंलिंगी, स्त्रीलिंगी व नपु. लिंगी रुपे वेगवेगळीआहेत. सर्वनामांच्या बाबतीत प्रथमा पासून सप्तमीपर्यंत २१ रुपे असतात.

संस्कृत धातू दहा गणात विभागले असून त्यांची एकूण संख्या सुमारे २००० आहे, या धातूंची वर्तमानकाळ, प्रथम भूतकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थ अशी कालार्थ रुपे तीन वचनात व प्रथम पुरूष, द्वितीय पुरूष व तृतीय पुरूष अशा प्रकारात वेगवेगळी असतात.

शब्दरूपे करण्याचे नियम असले तरी अ्शी रुपे पाठ करणे अधिक सोयीस्कर असते. त्यांचे उच्चार समजणेही गरजेचे असते. या ऍपमध्ये सर्व प्रमुख नामे, सर्वनामे व धातू यांची रूपे ध्वनीफितींसह दिलेली आहेत,
हवा तो शब्द वा धातू निवडण्याची सोय यात केली आहे.
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, निवडण्याची सोय यात केली आहे.
Other_iOS_apps_of_Dnyandeep


Saturday, December 8, 2018

Illusion of endless city view with WebGL


This WebGL experiment is an attempt to create a procedural city that feels alive and is fun to watch.

First,  a finite grid of random city blocks is generated. Then, using some tricks, the viewpoint wraps around this grid, which creates the illusion of an endless cityscape.

Made with: Three.js, Blender, Unity. Models by VenCreations.
    ( Ref: Website: https://demos.littleworkshop.fr/)




Tuesday, December 4, 2018

Innovation Center Progress and list of my blogs

The Innovation Center Movement has gathered a momentum and many members from diverse fields have joined the group.

The list of  members as per newsletter is as follows
Founder Members
  Dr. S. V. Ranade
  Prof. B. D. Kelkar
  Dr. Ravindra Vora
  Prof. Satish Ramchandre
  Shri. Tanajirao More
  Shri. Arvind Yadav
  Shri. Ashok Bhosle
  Dr. Suhas Khambe
  Dr. Girish Kulkarni
  Shri. Arvind Deshpande 
  Dr. Yashvant Toro
  Dr. A. B. Kulkarni
  
 Consultant
 Dr. Leena Mehendale
 Dr. Uday Naik
 Shri. Madan Kulkarni
 Shrimati Ushatai Kulkarni
 Prof. Prashant P. Deshpande
 Shri. Narayanrao Deshpande
 Prin. Bhaskar Tamhankar

 Members
 Dr. P. A. Kulkarni
 Shri. Mahesh Pagnis
 Dr. Santosh Mane
 Dr. Devayani Kulkarni
 Dr. Dada Nade
 Shri. Vinayak Rajadhyaksha
 Prof. Sanjivani Apte
 Prof. Narayan Marathe
 Shri. Prasanna Kulkarni,
 Prof. Sunil Tamhankar

 This is tentative list and all are cordially invited to join the group.

The constitution for the center is being formulated. Dnyandeep Foundation has offered to act as the interim organization for membership registration and financial transactions. It is decided to design a website for the center.

I have created a public accessible folder titled Innovation Center  for sharing documents and communication.

I give below list of my blogs concerning Innovation Center
There are many more blogs on teachers of schools and retired professors of Walchand College which form the basis of starting this movement.

I appeal all to participate in this ambitious project and lead the future generation on path of Innovation and Entrepreneurship.

Thursday, November 29, 2018

Inspiring Paper Star fighter animation through CSS

I came across a very nice animation of paper star fighter developed by Yusuke Nakaya using only CSS.


This will encourage students to study CSS animation and create new presentations.

Please visit the following link to see the animation.

ONLY CSS : STARFOX Arwing

( Ref: Codepen  ---Codevember 2017 #1 Galaxy: STARFOX A-Wing !!
This Pen is a fork of Yusuke Nakaya's Pen Only CSS: Codevember #1 STARFOX.

Friday, November 23, 2018

Star

Saturday, November 17, 2018

Use of SVG for image design

SVG coding can be used to design editable vector image which can be zoomed to any level without distortion.

I have designed a sample image as shown below ( after conversion to jpg format)


The html file containing code is shown below.

Thursday, November 15, 2018

वालचंद कालेज - कै. प्रा. म. वा. जोगळेकर

मी  १९६३-६५ या काळात कराडला एफई, एसई करून  १९६५ मध्ये वालचंद कॉलेजमध्ये बी. ई.च्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी आम्हाला प्रा. ब्रह्मनाळकर, सखदेव, संतपूर, रानडे, एम.डी. भाटे, छापखाने विविध विषय शिकवीत.  कॉलेजमध्ये नव्यानेच दाखल झालेले प्रा. एम. व्ही. जोगळेकर पब्लिक हेल्थ प्राॅजेक्टसाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांच्या  कोणताही विषय सोपा करून सांगण्याच्या वैशिष्ठ्यपूर्ण पद्धती व मैत्रीपूर्ण वागणुकीने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

बी.ई. झाल्यावर लगेचच मी कॉलेजवर नोकरीस लागल्याने  मी त्यांच्या अधिक संपर्कात आलो. १९६७ नंतर पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी सुरू झाल्याने व त्यांची खोली त्याजवळच असल्याने आमची चांगली मैत्री जमली. त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाल्याने ते अंतर्यामी दु:खी होते पण त्यांनी ते कधी दर्शविले नाही. ते नेहमी आनंदी वाटायचे.
प्रा. जोगळेकर अतिशय मनमोकळे,  बोलके  व विलक्षण बुद्धीमान होते. त्यांची खोली सर्वांसाठी सतत उघडी असे. तेथे अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी मी व इतर प्राध्यापकही बिनदिक्कत जात व प्रत्येक विषयावर त्यांचा मौलिक सल्ला घेत.

हायड्रॉलिक्स लॅबच्या वरच्या मजल्याचे बांधकाम करताना त्यांनी वीट बांधकामाचे वेगवेगळे नमुने  विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वापरले होते. अनेक नव्या कॉलेजसाठी मिनी हायड्रॉलिक्स लॅब एआरईतर्फे तयार करऩ्याची कल्पना त्यांचीच.

बी. ई. सिव्हील विद्यार्थ्यांच्या उत्तर भारत सहलीसाठी मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. त्यावेळी मला त्यांचे मॅनेजमेंट कौशल्य प्रत्यक्ष  बघायला मिळाले.

एका रेल्वे स्टेशनवर आमची बोगी रात्रीच्या मुक्कामासाठी वेगळी केली होती. आम्ही दोघे एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो तेव्हड्यात काही मुले धावत तेथे आली आणि त्यांनी सांगितले की आपली बोगी ट्रेनला जोडून पुढे गेली आहे. लगेच काहीतरी करा. मी  घाबरलो आमि झटकन उठलो. जोगळेकर शांत होते. ते म्हणाले खाली बैस. मुलांना त्यांनी परत पाठविले  व मला म्हणाले तू काय गाडीमागे पळत जाणार आहेस काय. शांतपणे जेवण कर नंतर बघू. जेवण केल्यावर आम्ही स्टेशनवर गेलो व स्टेशनमास्तरची गाठ घेतली. त्यांनी सांगितले चुकून बोगी जोडली गेली  मी पुढच्या स्टेशनवर बोगी थांबवायला सांगितले आहे.  तुम्हा सर्वांना पुढच्या गाडीने तेथपर्यंत सोडायची व्यवस्था करतो.
एका ठिकाणी आम्ही भाड्याने घेतलेल्या खासगी बसच्या ड्रायव्हरने जादा पैशांची मागणी केली जोगळेकरांनी त्याच्या मालकालाच भेटायचे टरविले. आम्ही दोघेच टांग्याने त्यांच्या अड्ड्यावर गेलो. विद्यार्थ्यांच्या ट्रीपसाठी जादा पैशांऐवजी आणखी कन्सेशन द्यावे असे मालकाला पटवून दिले.

ते मॅनेजमेंटमध्ये गुरू होते. सर्व टीचिंग स्टाफही त्यांना बॉश ( बॉस ) म्हणून संबोधत. पर्ट, सीपीएम, टीक्यूएम या विषयांवर त्यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजने अनेक कोर्स घेतले. त्यांच्याबरोबर हैदराबादच्या स्टाफ कॉलेजमध्ये तसेच मुंबईच्या इरिगेशन डिझाईन अॉफिसमध्ये प्रा. संतपूर, पी.ए. कुलकर्णी यांचेसमवेत मला शिकवायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.

धोंडुमामा साठे व एम. टी. ई. सोसायटीच्या स्थापनेपासूनच्या सर्व घटनांची त्यांना इत्थंभूत माहिती होती. वालचंद परिसरातील जमिनीवर त्याच्या पूर्वजांची मालकी होती असा त्यांचा दावा होता. याच इर्षेतून त्यांनी एम. टी. ई. सोसायटीच्या कॉलेजवरील मालकीसाठी कागदोपत्री संघर्ष सुरू केला.
 पुढे कॉलेज सोडून राजारामबापू कॉलेजमध्ये प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी त्या कॉलेजच्या प्रगतीत सर्व लक्ष घालून ते कॉलेज नावारुपाला आणले.

मराठीतून विज्ञानप्रसार हा आम्हा दोघांचा आवडीचा विषय होता. १९८१ साली सांगलीत मराठी विज्ञान प्रबोधिनी स्थापन करण्यात त्यानी मला प्रोत्साहन दिले. मराठी विज्ञान प्रबोधिनीचे पहिले अध्यक्ष तेच  होते.  १९८३ साली सांगलीतील अखिल भारतीय विज्ञान संमेलन वेलणकर सभागृहात आम्ही आयोजित केले. नंतर ते इस्लामपूरला प्राचार्य असताना १९८९ साली तेथे असेच भव्य संमेलन त्यांच्या सर्वंकष प्रयत्नातून साकार झाले.

 तेथून रिटायर झाल्यानंतर देखील एम. टी. ई. सोसायटीच्या कार्यात मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपले तन, मन, धन खर्च केले.

 त्याविषयी आणखी खूप काही लिहिता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपले दु:ख विसरून इतरांच्या आनंदात सहभागी होऊन सतत विधायक कार्यात मन गुंतवून  समाधान कसे मिळवायचे हे त्यांनीच मला सिकविले.

 त्यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन !

Tuesday, November 6, 2018

इनोव्हेशन सेँटरच्या पहिल्या वार्तापत्राचे प्रकाशन

दिनांक १ नोव्हेंबर २०१८ रोजी विलिंग्डन कॉलेज, सांगली येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर यांच्या शुभहस्ते इनोव्हेशन सेँटरच्या पहिल्या वार्तापत्राचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी. विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ.  भास्कर ताम्हणकर, श्री. तानाजीराव मोरे, श्री. अशोकराव भोसले, डॉ. रविंद्र व्हॊरा, श्री. अरविंद यादव, डॉ. उदय नाईक सर उपस्थित होते.

इनोव्हेशन सेँटर प्रकल्पात माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या समन्वयातून शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षणाला नवनिर्मिती व उद्योजगतेची जोड देण्यासाठी  विविध प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय आहे.
मराठी विज्ञान प्रबोधिनी सांगली, ज्ञानदीप फौंडेशन, निसर्ग प्रतिष्ठान, निखिल लॅब व आविष्कार लॅब या संस्थांच्या संयुक्त सहभागातून इनोव्हेशन सेँटरची कल्पना साकार झाली असून वालचंद कॉलेजचे माजी प्रा. भालबा केळकर याचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. 


विष्णुदास भावे, ग. दि. माडगूळकर, वसंतदादा पाटील, वि. स. पागे यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी सांगलीत नवनिर्माण केले. सांगलीच्या मातीतच नवनिर्माणाची परंपरा आहे. अनेक दिग्गज लोकांनी येथील परंपरा समृद्ध केली आहे. त्यांच्या पश्चात नव्या पिढीने नवनिर्माणाच्या वाटेवरून अधिक गतीने पुढे गेले पाहिजे, असे  डॉ. माशेलकर यांनी  सांगितले. तसेच इनोव्हेशन सेंटरच्या स्थापनेबाबत समाधान व्यक्त केले.




नवसंशोधनाचे महत्व पटलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि उद्योजक यांनी या इनोव्हेशनच्या कार्यात सहभागी व्हावे व भारताच्या नवनिर्माण योजनेत आपले योगदान द्यावे ही विनंती.

Saturday, November 3, 2018

पलूसकर विद्यालयात आकाशकंदील बनविण्याचे प्रशिक्षण

सांगलीतील नवनिर्मिती चळवळीचे समन्वयक वालचंद कॉलेजचे निवृत्त ज्येष्ठ प्राध्यापक भालबा केळकर यांनी पलूसकर विद्यालयात आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेऊन अनेक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील करायला शिकविले.

दिवाळी आली की मुलांना सुट्टी असते. पूर्वी अशावेळी रोषणाई,आकाशकंदील, किल्ला अशा विविध गोष्टीत मुले रममाण होत. आता या सर्व गोष्टी बाजारात मिळत असल्याने पालकांचा ओढा अशा वस्तू विकत घेण्याकडे असतो.  घरात कचरा करायला त्यांना आवडत नाही व मुलांबरोबर अशा कामात सहभागी होण्यास त्यांना वेळ नसतो. साहजिकच मुलांच्या उपक्रमशीलतेला वाव मिळत नाही.


प्रा. केळकरांनी नेमकी हीच गोष्ट ओळखून हा अभिनव उपक्रम केला. मुलांचा उत्साह, कृतीशीलता व आनंद या फोटोत स्पष्ट दिसत आहे.


प्रसारमाध्यमांनी याची दखल घेऊन हा अभिनंदनीय उपक्रम प्रकाशात आणला आहे. पलूसच्या शाळेप्रमाणे इतर शाळांनीही सांगलीत सुरू झालेल्या नवनिर्मिती चळवळीत सहभागी व्हावे असे वाटते.

Tuesday, October 30, 2018

वालचंद कालेज - कै. प्राचार्य स. द. फाटक सर

एक अलौकिक व्यक्तिमत्व - फाटक सर

कै. प्राचार्य स. द. फाटक
वालचंद कॉलेजमध्ये शिकत असताना, मला विशेष न कळणार्‍या विषयातले एक तज्ञ व ज्येष्ठ प्राध्यापक एवढाच परिचय माझा फाटकसरांशी झाला होता. त्यांचा पांढरा शुभ्र पेहराव व भारदस्त चालणे यामुळे त्यांचे वेगळेपण लगेच जाणवे. त्यांची अध्यात्माची आवड, साधेपणा आणि शिस्तीचा आग्रह यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षकांतही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती.
मी कॉलेजात नोकरीस लागल्यानंतर, माझे जेष्ठ सहकारी ज्या ‘नानासाहेब’ या सलगीच्या नावाने त्यांच्याशी बोलत असत तेवढ्या सलगीने वा मोकळेपनाने त्यांचेसी बोलणे मला जमत नसे. कारण माझ्या दृष्टीने ते ‘सर’ होते. मात्र त्यांच्याशी अधिक परिचय झाल्यावर मात्र त्यांच्या मित्रत्वाच्या व मिष्किलपणे बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी मला केव्हा आपलेसे केले हे कळलेच नाही. प्राचार्य झाल्यानंतरही त्यांनी ती जवळीक तशीच कायम राखली. पुढे प्राचार्यांच्या बंगल्याशेजारी मेनगेटजवळ मी राहणेस आलो आणि त्यांचेशी माझा शेजारी म्हणून अधिक संपर्क आला. प्रा. सुब्बाराव, संतपूर, जोगळेकर यांचेकडे ते बर्‍याच वेळा गप्पा मारण्यास येत तेव्हा मीही नकळत त्यांत सामील होत असे. त्यातूनच मला त्यांच्या स्वभावातील मनमिळाऊपणा, प्रसन्नवृत्ति आणि कोणासही त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्याची वृत्ती यांचे दर्शन झाले.
त्यांच्या बोलण्याची पद्धत मोठी आकर्षक होती. ते एखादेच वाक्य बोलत. पण त्यातून हास्याची लहर उमटवीत. त्या वाक्यात थट्टा असे. पण उपरोध वा बोचरेपणाचा अंशही नसे. त्यांच्या बोलण्यावर हसता हसता आपल्याला आपली चूक उमजे, नवीन मार्गदर्शन मिळे. स्फूर्ति येई. ए. आर. ई.मधील उद्योजक मंडळींसमवेत चर्चा करताना मी त्यांना पाहिले होते. त्यांत संयमी श्रोत्याची भूमिका घेऊन ते सर्वांच्या कल्पना ऎकून घेत व नंतर अप्रत्यक्षपणे नेहमीच्या बोलण्यातून ते मार्गदर्शन करीत. तेही अशारीतीने की, इतरांच्या विचारांना चालना मिळावी व त्यांच्याकडून नव्या कल्पना याव्यात. यात स्वत: अलिप्त राहून इतरांच्या सृजनशक्तीला वाव देणे व वळण लावणे हा त्यांचा उद्देश असे.
‘अरे आता प्रत्यक्ष कामाला लागा. आपल्याला राष्ट्रवाद किती जमतो हे आपण कृतीने दाखवू या. गप्पा मारून काय मिळणार? आजपासून गप्पा बंद करा, भारतात काय घडावे हे तुम्ही सांगू नका. तुम्ही एकत्रितपणे काय करू शकता हे दाखवून द्या. तुम्ही तरूण आहात. आव्हान पेलून दाखवा. टीका करू नका, काम करा. काही नवीन डिझाईन, उत्पादन करून संशोधकवृतीला वाट करून द्या. त्यातून उद्योगधंदा उभा राहू द्या.’
‘आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इकडे तिकडे विखुरले आहेत, विखुरणार आहेत. मोठमोठी कामे करणार, मानाच्या जागा मिळविणार. हीच आपली प्रतिष्ठा. शेवटी प्रतिष्ठा म्हणून बोलणारे नि मोजणारे हेच लोक. म्हणजे आपलेच विद्यार्थी आणि त्यांची प्रतिष्ठा म्हणजेच पर्यायाने आपली प्रतिष्ठा. जसे हे विद्यार्थी वाढतील मोठे होतील तशी पर्यायाने कॉलेजची व विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढेल. प्रत्येक विद्यार्थ्याने हीच जाण ठेवली पाहिजे.

शिक्षकाची गुणवत्ता ठरविण्याचा निकष -
(कै. प्राचार्य स द. फाटक स्मृति-विशेषांक वरून)
आज विद्यार्थी काय म्हणतो यापेक्षा पुढं वीस वर्षांनी तो आपणाविषयी काय म्हणेल याचा शिक्षकाने विचार केला पाहिजे. कारण आज विद्यार्थी अपरिपक्व असतो व आज न आवडलेला शिक्षक कदाचित वीस वर्षांनी समजतो व चांगला ठरतो” - प्राचार्य स द. फाटक


प्रा फाटक इ. स. १९५६ मध्ये वालचंद कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १५ जुलै १९७५ रोजी प्राचार्य गो. चिं. कानिटकर निवृत्त झाल्यावर प्रा. फाटक यानी प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. ए. आर. ई. उद्योगाचे ते मुख्य प्रेरणास्रोत होते.९ आक्टोबर १९८१ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे दुख:द निधन झाले.
-------------
आमच्या वालचंद इनोव्हेशन सेंटर मूळ प्रेरणास्रोत कै. प्राचार्य फाटक सर पवित्र स्मृतीला माझे विनम्र अभिवादन .
---- सु. वि. रानडे

Saturday, October 27, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - ३

प्रा. तलाठी
प्रा. तलाठी बिल्डींग कन्स्ट्रक्शन शिकवायचे. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. त्त्यांनी कॉलेजमध्ये चुना तयार करण्यची भट्टी बांधली होती.

प्रा. संतपूर
 ( मध्यभागी प्रा. संतपूर - प्रा. अभ्यंकर यांचे संग्रहातून साभार) 
गोरेपान उंचेपुरे व खंबीर व्यक्तिमत्वाचे प्रा. संतपूर सर बोलण्यात रोखठोक पण उदार मनाचे होते. आम्हा ज्युनिअर मंडळीना त्यांचा भीतीयुक्त आदर वाटे. प्रत्येक काम वेळच्यावेळी व व्यवस्थित होण्यासाठी ते आग्रही असत. कामात चालढकल किंवा गुळमुळीत उत्तरे त्यांना अजिबात खपत नसत. त्त्यामुळे नीट विचार करून व पूर्वतयारी करून मीटींगला जाण्याची सवय मला त्यांचेमुळे लागली. प्रशासनातील या कौशल्यामुळे वारणानगर येथील इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रिंन्सिपॉल म्हणून गेल्यावर त्यांनी चांगलाच नावलौकीक मिळविला होता.

आय.आय. टी. मुंबई येथे डॉ. सौंदलगेकर यांचेकडे त्यांनी ओपन चॅनल फ्लो या विषयात पी. एच. डी. केली होती. प्रा. सखदेव यांचे बरोबरीने इरिगेशनच्या प्रॉजेक्ट्समध्ये त्यांनी बाकी स्टाफचे नेतृत्व केले. प्रा. संतपूर, प्रा. करंदीकर, प्रा शिरहट्टी असे तिघेजण हायड्रॉलिक्स व फ्लुईड मेकॅनिक्स शिकवायचे. त्या तिघांनी हायड्रॉलिक्स प्रयोगशाळेची उभारणी केली. या प्रयोगशाळेतील अवाढव्य टिल्टींग फ्ल्यूम, उंच पाण्याची टाकी, पंप व चॅनल या सोयींमुळे आमच्या सिव्हील डिपार्टमेंटला मोठे महत्व प्राप्त झाले. कराड व बुधगाव येथील कॉलेजचे विद्यार्थी येथे प्रॅक्टिकलसाठी येत असत. शिवाय पंप व व्हॉव कॅलिब्रेशनची कामे मिळत असत.


प्रा शिरहट्टी
प्रा शिरहट्टी यांनी नदी, नाला वा कालव्यातील प्रवाह मोजण्यासाठी उपयोगात येणा-या पार्शल फ्लूमवर एम. ई. केले होते. ते स्वभावाने शांत व अभ्यासू वृत्तीचे होते. काही थोडी वर्षेच ते डिपार्टमेंटमध्ये होते.

प्रा. श्रीधर करंदीकर
प्रा. श्रीधर करंदीकर माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे. आम्ही ६१ साली सांगलीत गावभागात रहायला आल्यापासूनच माझी त्यांच्याशी ओळख होती. प्रा. संतपूर यांचेप्रमाऩेच ते शिस्तीचे भोक्ते. ते मुळचे नागपूरचे. १९६८ साली NEERI मध्ये टेस्टींग शिकण्यासाठी त्यांच्या नागपूरच्या घरी दोन महिने कुटुंबातील सदस्याप्रमाऩे राहिलो होतो. त्यामुळे तेव्हापासूनच आमची घनिष्ठ मैत्री आहे. त्यांनी आय.आय.टी. मुंबई येथे पीएचडी केले. समुद्रकिनारी जमिनीतील गोड्या पाण्यात समुद्राचे खारे पाणी मिसळू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत त्यांचे संशोधन होते. विभागप्रमुख म्हणून काम केल्यावर कॉलेजमधून निवृत्ती घेऊन के. आय.टी. कोल्हापूर येथे प्राचार्यपद स्वीकारले.
त्यांची व माझी मुलगी वीस वर्षांपूर्वीच अमेरिकेत स्थायिक झाल्याने तसेच आमचे कौटुबिक संबंध जवळचे असल्याने सुखदुखात  आजही मला त्यांचा थोरल्या भावासारखा आधार वाटतो.

Tuesday, October 23, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - २

आमच्या सिव्हील डिपार्टमेंटमध्ये रुजू झालेले बहुतेक प्राध्यापक बाहेर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन आले होते. आमचे विभागप्रमुख प्रा. म. अ. ब्रह्मनाळकर पूर्वी गुजराथमधील उकाई धरणावर इंजिनिअर होते.  प्रा. बर्वे व  प्रा. गोळे मिलिटरीतून, प्रा. सखदेव आणि प्रा. तलाठी इरिगेशन डिपार्टमेंटमधून, प्रा. शिरहट्टी पुण्याच्या cwprs मधून, प्रा. रानडे व जोगळेकर कंस्ट्रक्शन क्षेत्रातून आले होते. साहजिकच त्यांच्या अनुबवाचा फायदा विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हा अननुभवी शिक्षकांनाही होत असे. दुपारचा डबा खाण्यासाठी आम्ही एकत्र बसत असू. त्यावेळी मेकॅनिकलचे प्रा बाम व इलेक्ट्रिकलचे प्रा. सी. जी. जोशीही येत. त्यांच्या गप्पा ऐकताना आम्हाला बाहेरच्या प्रत्यक्ष कामांची माहिती कळे.

 प्रा. बर्वे होस्टेलचे रेक्टर असल्याने सतत फार कामात असत. सर्व्हे प्रॉजेक्टच्यावेळी मात्र   त्यांच्याशी संवाद होत असे. त्यांनी सांगली रेल्वे स्टेशनपासून कॉलेजमधील धोंडुमामा साठे पुतळ्यानजिकच्या पायरीपर्यंत स्थान उंची नोंद (समुद्रसपाटीपासूनची उंची) आणून तेथे खोदून ठेवली होती. व्हरांड्यामध्येदेखील चेनची लांबी तपासण्यासाठी खुणा केल्या होत्या. सर्व्हे डिपार्टमेंटमधीत सत्तू भोसले  सर्व्हेचे सर्वेसर्वा होता. लेव्हल मशीन न वापरताही  केवळ नजरेने  लेव्हल वा अंतराचे त्याचे अंदाज  बरोबर यायचे. श्री कावरे  तसेच सॉईलमधले गोडबोले इन्स्ट्रुमेंट रिपे्रीमध्ये वाकबदार होते.

१९६७ साली डिसेंबरमध्ये कोयनानगर येथे भूकंप झाला. त्यायेळी कोयनेचे धरण फुटले तर महापूर येऊन सारे सांगली शहर वाहून जाईल अशी भीती सहळीकडे पसरली होती. त्यावेळी कॉलेजमधील प्रा. भाटे, प्रा. सखदेव व प्रा संतपूर यांनी गावातील चौकात खुल्या सभा घेऊन लोकांच्या भीतीचे निरसन केले होते.

प्रा. ब्रह्मनाळकर बुद्धीमान, तत्वचिंतक व कवीमनाचे होते. त्यांच्या खोलीत गेले की ते आमच्यासारख्या ज्युनिअरांना देखील ते आपले विचार व  उकाई प्रॉजेक्टमधील अनुभव सांगत. त्यांनी केलेल्या कविता ऐकवत. सॉईल मेकॅनिक्सचे  महत्व त्यांना कळले होते. या विषयातील प्रयोगशाळा सुरू करून त्यांनी तेथे शास्त्रज्ञ टेरझागी यांचा फोटो लावला होता.  कॉलेजच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दोन कविता खाली देत आहे.
तर असे होते ब्रह्मनाळकर, तत्वज्ञानी पण त्याचबरोबर रसिकही.

 प्रा. सखदेव इरिगेशनच्या डिझाईनमध्ये एक्स्पर्ट होते. कराडपासून सांगलीपर्यंतच्या सर्व साखरकारखान्यांच्या इरिगेसन स्कीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील स्टाफने  प्रत्यक्ष सर्व्हेसह डिझाईन केल्या. रिटायर झाल्यावरही डिझाईन व सल्ला देण्याचे त्यांचे काम शेवटपर्यंत चालू होते. त्यांनी आमच्या शिल्प चिंतामणी सोसायटीची स्थापना केली. प्लॉट पाडून ते मंजूर करून घेतले. इ. स. २००१ मध्ये सोसायटीतील  त्यांच्या बंगल्यातच मी ज्ञानदीपच्या नेट-कॅफेचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते केले होते.
प्रा. मकरंद जोगळेकर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. त्यांचा माझेशी कॉलेजप्रमाणेच इतरही अनेक कामात निकटचा संबंध होता.  त्यांच्या कार्याची नुसती वरवर ओळख करून देण्यासाठी मला वेगळा लेख लिहावा लागणार आहे.

माझ्या नोकरीतील पहिल्या काही वर्षात बर्वे सरांचा विठ्ठल, ब्रह्मनाळकरांचा बाळू साखळीकर, अप्लाईड मेकमधील वाय. आर. माने, जिमखाना विभागाचा आनंदा मोहिते  व अशाच इतर डिपार्टमेंटमधीलही अनेक  विश्वासू  सेवकवर्गाने त्यांच्या कामातून मला प्रभावित केले होते. त्यांची  नावे वालचंदच्या इतिहासात कायमची कोरून  ठेवणे आवश्यक आहे.

Monday, October 22, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - १

 मी १९६६ मध्ये वालचंद कॉलेजमधून बी.ई. पास झाल्यावर लगेचच असिस्टंट लेक्चरर म्हणून नोकरीस लागलो. सर्व्हे डिपार्टमेंटला त्याकाळी मानाचे स्थान होते कारण सर्व विद्यार्थ्यांना तो विषय प्रॅक्टिकलसह असल्याने तेथे जास्त प्राध्यापकांची गरज असे. साहजिकच माझी नेमणूक सर्व्हे डिपार्टमेंटमध्ये झाली. प्रा. बर्वे सर विभाग प्रमुख असले तरी  एम. डी. व के आर. पटवर्धन हे सर्व्हे तॅबचे मुख्य आधारस्तंभ होते. पाच सहा जणांच्या तेथल्या ग्रुपमध्ये त्यांनी लहान भावासारखे मला सामावून घेतले.

प्रा. एम. डी. पटवर्धन भारताच्या फाळणीपूर्वी कराचीत इंजिनिअरिंग कॉलेजवर नोकरीस होते. मोजके पण महत्वाचे बोलणारे असल्यामुळे त्यांना बोलते करून मी त्यांचेकडून कॉलेजच्या स्थापनेविषयी बरीच माहिती मिळविली अनेकांच्या त्यागातून सुरू झालेल्या या कॉलेजमध्ये मला नोकरी करण्यास मिळाली याचा मला अभिमान वाटला.

एकत्रपणे चर्चा करताना सर्व्हे या विषयातील खाचाखोचा व कसे शिकवायचे या गोष्टी समजल्याच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे  जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे याचेही  ज्ञान नकळत मिळाले.

 त्यावेळी सगळ्यानाच पगार फार कमी होते. मात्र प्रा. के.आर. पटवर्धन कायम उत्साही व हसतमुख असायचे. त्यांचे थोरले भाऊ विलिंग्डन कॉलेजवर प्रोफेसर होते. त्यांच्या मानाने आपल्याला कमी पगार मिळतो म्हणून त्यानी कधी वाईट वाटून घेतले नाही. ते   म्हणायचे प्रत्येकाने आपला पगार आहे त्यापेक्षा दोन इन्क्रिमेंट कमी आहे असे मानून घरखर्च भागवला तर तो कायम सुखी राहतो.  मी विजयनगरमध्ये रहात असलो तरी  सांगलीतल्या आमच्या स्नेहदीपमधील फ्लॅटशेजारीच ते रहायचे.  रिटायर झाल्यावर गच्चीत बसून रस्त्यावरची ट्रॅफिक पहाण्यात ते आनंद मानायचे.  डायबेटिसच्या आजाराने त्रस्त असतानाही त्यांची समाधानी वृत्ती  तशीच होती. आपले आवडते कुत्रे अचानक मेल्यावर असे दुख पुन्हा आयुष्यात भोगावे लागू नये म्हणून त्यांनी चक्क दीर्घायुषी कासव घरात पाळले होते. त्यांच्या  ऑपरेशनच्यावेळी तर त्यांनी डॉक्टरनाच शुभेच्छा देऊन चकित केले होते.

सांगलीतील नामवंत आर्किटेक्ट श्री,  नरगुंदे  अमच्या डिपार्टमेंटचे भूषण होते.  त्यांच्याकडे बिल्डिंग ड्राईंग हा विषय होता. गावात त्यांच्या शब्दाला मान असला तरी येथे  वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचना ते तंतोतंत पाळत.
कॉलेजवर आलो की मी आर्किटेक्ट व्यावसायिकतेचा कोट काढून ठेवतो असे ते म्हणायचे.

प्रा. रा. त्र्यं रानडे हे आमच्या डिपार्टमेंटमधील ज्येष्ठ व आदर्श प्राध्यापक होते. आपल्या विषयाच्या सविस्तर नोट्स ते आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहीत व प्रत्येक लेक्चरनंतर त्यात अधिक माहिती नोंदवून ठेवीत. बहुरंगी करमणूक या त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या तीन पुस्तकांमुळे त्यांचे नाव घराघरात पोचले होते. त्यासाठी होस्टेलच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अॉक्सिडेशन पॉंड  बांधून  डॉ. सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम. ई. केले. दुर्दैवाने १९७२ मध्ये ब्रेन हॅमरेजने त्यांचे अकाली निधन झाले.


आज ही थोर मंडळी आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्याबद्दलच्या माझ्या काही आठवणी मी आपणापुढे मांडल्या आहेत. क्रमाक्रमाने इतर प्राध्यापकांबद्दल मला आठवत असलेली माहिती मी सादर करेन.

अशाच अनेक आठवणी आपल्याकडेही असतील. आपण त्या शब्दबद्ध केल्या तर आजच्या व माजी विद्यार्थ्यांना वालचंदच्या प्रगतीत पायाभूत काम करणार्या प्राध्यापकांची माहिती होईल. या प्राध्यापकांचे फोटो तसेच इतर सर्व माहिती संकलित करण्याचा माझा मनोदय आहे.

आपले सहकार्य मिळाले तर कालांतराने का होईना पण ते शक्य होईल असे मला वाटते.


Saturday, October 20, 2018

मायसिलिकॉन व्हॅली - प्रस्तावित नवी वेबसाईट



( Ref: https://en.wikipedia.org/wiki/San_Francisco_Bay_Area)

अमेरिकेच्या पश्चिम कडेला  कॅलिफोर्निया स्टेट आहे. तेथे सॅन फ्रान्सिस्को शहराच्या दक्षिणेला असलेल्या बे एरिया ( खाडीमुळे तयार झालेले खोरे) प्रदेशाला सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. कारण येथे सिलिकॉन चिपवर आधारित संगणक क्रांतीला प्रारंभ झाला. इ. स. २००० च्या सुमारास येथे अनेक संगणक कंपन्या उदयास आल्या. एच. पी,, इंटेल, य़ाहू, गुगल, फेसबुक, आय.बी.एम., मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अडोब, ओरॅकल या व अशा कंपन्यांचे आश्रयस्थान असणारी ही सिलिकॉन व्हॅली आजही  संपूर्ण जगभरातील तरुण आयटी कर्मचारी आणि व्यावसायिक उद्योजकांचे स्वप्नस्थान बनले आहे. परंतु बहुतेक लोकांना  या स्थानाबद्दल फारच त्रोटक माहिती असते.

ज्ञानदीप फाऊंडेशनने www.mysangli.com आणि www.mykolhapur.net यासारख्या स्थानिक माहिती मराठीतून देण्यासाठी वेबसाईट डिझाईन केल्या. त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मी स्वत: आता या सिलिकॉन व्हॅलीत कायमचा राहण्यास आलो असल्याने या भागासाठीही अशी बहुभाषिक वेबसाईठ करण्याचे ज्ञानदीपने ठरविले आहे.

वेबसाईटच्या नावाला my हा प्रत्यय जोडण्यामागे  एक विशेष अर्थ  अभिप्रेत आहे जे सिलिकॉन व्हॅलीचे रहिवासी झाले आहेत वा होणार आहेत त्यांना स्थानिक रहिवाशांप्रमाणेच या जागेबद्दल आत्मियता निर्माण व्हावी अभिमान वाटावा असा उद्देश मायसिलिकॉनव्हॅली या नावात आहे.

बे एरियाबद्दलची  माहिती संकलित करणे ही कल्पना आहे. येथे लोकप्रिय असलेल्या बहुतेक वेबसाईट आयटी आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित आहेत. त्यांच्याकडे व्यवसाय आणि व्यावसायिक उपक्रम आणि संस्थांची भरपूर माहिती आहे. काही साईट धार्मिक किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक गटांमध्ये विभाजित असलेल्या वा विशिष्ट देशांसाठी आहेत.

व्याप्ती -  आयटी आणि व्यवसाय यांच्या  माहितीशिवाय येथील पर्यावरण आणि संस्कृतीची  ओळख येथे येणार्या वा येऊ इच्छिणार्या लोकांना  होण्यासाठी  स्थलांतरित लोकसंख्येवर विशेष लक्ष देऊन बे एरियाच्या सर्व बाह्य रहिवाशांना आवश्यक माहिती त्यांच्या भाषेतून नेटद्वारे मिळविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे. सुरवातीच्या काळात इंग्रजी भाषेत सर्व माहिती दिली जाईल . नंतर टप्याटप्याने प्रतिसाद पाहून इतर भाषातून माहिती दिली जाईल .

उद्देश -


१. बे एरियामधील सर्व स्थलांतरितांचा जलद गतीने स्थानिक रहिवाशांमध्ये समावेश व्हावा यासाठी पोषक वातावरण तयार करणे. जेणेकरुन त्यांना स्थानिक रहिवाशांचा दर्जा मिळेल,

2. स्थलांतरितांना रोजच्या जीवनात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे. तसेच इतिहास, भूगोल, पर्यावरण, प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या सुविधांबद्दल त्यांना माहिती देणे.

वेबसाइटचे प्रस्तावित मुख्य विभाग


 1. अमेरिका, कॅलिफोर्निया, बे क्षेत्र आणि त्याची सिलिकॉन व्हॅली ओळख इतिहास आणि भौगोलिक माहिती - स्थान, आकारमान, लोकसंख्या इत्यादी
2. भूगर्भ रचना, पाणी, माती, हवामान, पर्यावरण आणि बदलणारे ऋतू
3. वनस्पती आणि झाडे, वन्य प्राणी
4. रस्ते आणि इमारती, वाहतूक व्यवस्था
5. काउंटी (शहरसमूह) आणि त्यांचे प्रशासन
6. पाणी पुरवठा, घनकचरा, विद्युतपुरवठा
7. रुग्णालये, शाळा, ग्रंथालये, शासकीय. कार्यालये, मनोरंजन केंद्रे, दुकाने आणि मॉल
8. स्थानिक आणि क्षेत्रीय समस्या.
9. अभिप्राय आणि अभ्यागत मंच

मी वरील मुद्द्यांविषयी काही मूलभूत माहिती संकलित केली आहे,  (त्यावर  येथे इंग्रजी भाषेत ब्लॉगही पूर्वी प्रसिद्ध केले आहेत.) परंतु प्रस्तावित वेबसाईटच्या व्याप्ती आणि उपयुक्ततेबद्दल  सूचना आणि माहिती अवश्य कळवावी.

मला आशा आहे की या वेबसाईटने ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फाऊंडेशनच्या प्रगती आणि सहकार्यासाठी नवीन कार्यक्षेत्र खुले होईल.

Thursday, October 18, 2018

वालचंदची गौरवशाली परंपरा आणि स्वायत्ततेचे आव्हान

वालचंद हेरिटेज आणि इनोव्हेशन या ज्ञानदीपच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून मी १९७० ते २००० या काळातील वालचंद कॉलेजमधील संशोधनाचा आढावा घेतला. कॉलेजच्या वार्षिक मासिकांतून मला त्या काळात विविध विभागातील  प्राध्यापकांनी केलेल्या  संशोधनाची तसेच भारतात उद्योग व प्रकल्पांसाठी जे योगदान दिले त्याची माहिती झाली. सुमारे २२ मासिकांतून मिळालेल्या माहितीचे गुगलवर शोध घेता येईल अशा  टेक्स्टमध्ये रुपांतर करून   www.walchandalumni.com  या वेबसाईटवर ही सर्व माहिती प्रसिद्ध केली आहे.

मी स्वत: त्या काळात कॉलेजवर नोकरी करत होतो तरी मला इतर विभागात होत असलेल्या संशोधनाची फारच कमी माहिती होती हे माझ्या ध्यानात आले. त्या काळात अमेरिकेतील प्रथितयश जर्नलमध्ये प्रबंध सादर करणे, जपान, सिंगापूर, इंग्लंड, थायलंड येथे भेटी देऊन तेथे चर्चासत्रे आयोजित करणे, भाभा अणुकेंद्र वा उपग्रह संशोघनात साहाय्य, भारतातील प्रमुख उद्योगांशी संबंधित संशोधन आणि त्याचबरोरर सांगली परिसरातील उद्योगांना तांत्रिक सल्ला देणे हे सर्व कार्य केवळ सिव्हील मेकसारख्या मोठ्या विभागांबरोबरीने फिजिक्स, मॅथ्ससारख्या छोट्या विभागातील प्राध्यापकही करीत होते.

गेल्या सहा महिन्यात कॉलेजवर मी अनेकवेळा गेलो. निरनिराळ्या विभागांना भेटी दिल्या. मात्र सर्व ज्येष्ठ प्राध्यापक सांख्यिकी विष्लेषण, कागदपत्रांची पूर्तता व वारंवार वेगवेगळ्या मीटींगच्या कामात गर्क असल्याचे मला दिसले. त्यांना त्यांच्या विषयाचा अभ्यास करायला, संशोधन करायला, विद्यार्थ्यांशी संवाद साधायला वेळच नव्हता. मग बाहेरच्या उद्योगांशी संपर्क साधून त्यांना सल्ला देण्याला वेळ कुठला मिळणार. मला वाईट वाटले. पूर्वीचा काळ आठवला.

त्यावेळी प्रत्येक शिक्षकाचे बाहेरच्या उद्योग व व्यावसायिक जगाशी जवळचे संबंध होते. विद्यार्थ्यांना कारखान्यात वा प्रकल्पावर जाऊन काम करण्याची संधी मिळे. प्राध्यापकही गटागटाने काम करीत. पर्यावरण क्षेत्रात डॉ. सुब्बाराव, मी व प्रा. गाडगीळ तर  स्ट्रक्चरमध्ये डॉ. कृष्णस्वामी, घारपुरे व     डॉ. ए. बी. कुलकर्णी आणि इतर विभागातही असे ग्रुप होते. सर्वांच्या खोल्या विद्यार्थ्यांसाठी सदैव उघड्या असत. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही एकत्रितपणे काम करीत.
त्याच स्फूर्तिदायी वातावरणात शिकलेले प्राध्यापक आजही कॉलेजमध्ये मानाच्या पदावर विराजमान आहेत. मात्र स्वायत्ततेबरोरर आलेल्या जबाबदार्यांनी त्यांना शिक्षण, संशोधन वा नवनिर्मितीच्या कार्यासाठी फारच कमी वेळ मिळतो.  प्रत्येकजण आपल्या व्यापात एवढा गुंतलेला असतो की एकमेकांशी चर्चा करायला वेळ नसतो. आय. आय.टी. मध्ये जसे प्राध्यापक स्वयंभू असतात व वागतात तशीच संस्कृती स्वायत्ततेमुळे वालचंद कॉलेजमध्ये येऊ लागली आहे. पूर्वीचे  खेळीमेळीचे व उत्हाहाचे वातावरण हळुहळू लोप पावत चालले आहे.

शिक्षक  हा व्यवस्थापक झाला की त्याच्यातील शिक्षक हरवला जातो. "No man can serve two masters " या उक्तीप्रमाणे शिक्षक हा शिक्षकच राहिला पाहिजे.

त्या काळात सर्व संशोधन भारतातील उद्योगांच्या प्रत्यक्ष समस्यांवर होत होते. मात्र या संशोधन प्रकत्पांची माहिती नेटवर न येता छापील स्वरुपात राहिल्याने सध्याच्या नेटसेव्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलेच नाही याची जाणीव झाली.
 त्या काळात सर्व संशोधन भारतातील उद्योगांच्या प्रत्यक्ष समस्यांवर होत होते. मात्र या संशोधन प्रकत्पांची माहिती नेटवर न येता छापील स्वरुपात राहिल्याने सध्याच्या नेटसेव्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलेच नाही याची जाणीव झाली.
अजूनही वेळ गेलेली नाही. वालचंद कॉलेजने यात लक्ष घालून आतापर्यंत कॉलेजच्या प्राध्यापकांनी केलेले संशोधन प्रकत्प व प्रबंधांचे संगणकीकरण करावे. ज्ञानदीप ही जबाबदारी आनंदाने स्वीकारेल.

 नव्या संगणक युगात वालचंद कॉलेजने सांगली परिसरात मोलाचे पायाभूत काम केले आहे. स्वायत्तता मिळवून नवा आधुनिक अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धतीचा अवलंब कॉलेजने सुरू केला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.

 मात्र स्वायत्ततेबरोबर येणारी व्यवस्थापनाची जबाबरारी समर्थपणे पेलण्यासाठी स्वतंत्र नेमणुका न करता कॉलेजमधीलच व्यासंगी, अनुभवसंपन्न प्राध्यापकांवर ही जबाबदारी टाकल्याने शिक्षण व संशोधन दोन्हींचे मोठे नुकसान होत आहे असे मला वाटते.

या विषयावर फार पूर्वी मी एक लेख (Dark side of Autonomy ) लिहिला होता त्याची आठवण झाली.

विद्यापीठाचे महत्वाचे कार्य म्हणजे अभ्यासक्रम ठरविणे व परिक्षा घेणे. या दोन कामांसाठी  फार मोठी प्रशासकीय  यंत्रणा  तेथे कार्यरत असते. अनेक अधिकारी, व ऑफिस कर्मचारी  तसेच सेवा सुविधा असल्याने त्यांच्या कार्यात सुसूत्रता असते. या सर्व सोयी स्वायत्तता मिळालेल्या कॉलेजला आहे त्या टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफने करणे अपेक्षित असते. साहजिकच त्याचा ताण सर्व शिक्षण प्रक्रियेवर पडतो.

याशिवाय नव्या शिक्षणपद्धतीत उपस्थिती, विद्यार्थ्यांची प्रगती व शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक नोंदी करण्याचे काम शिक्षकांना करावे लागते.

 वस्तुत: शासनाने यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था तसेच अधिकार्यांची नियुक्ती करावयास हवी.स्वायत्तता मिळालेल्या कॉलेजानी याबाबत आवाज उठविण्याची गरज आहे. कारण तज्ज्ञ प्राध्यापक या कामात गुरफटले तर त्याचा परिणाम शिक्षण व संशोधनावर फार विपरीत होईल. बरेच चांगले प्राध्यापक संस्था सोडतील. मग स्वायत्तता हे भूषण न वाटता ते एक मुद्दाम ओढवून घेतलेले संकट वाटेल. शिवाय यामुळे विद्यार्थ्यांचे फार नुकसान होईल आणि संशोधन व नवनिर्मितीच्या प्रयत्नांना खीळ बसेल.

वालचंद कॉलेजच्या व्यवस्थापनाने यावर योग्य ती उपाययोजना करावी  व तज्ज्ञ प्राध्यापकांना त्यांच्या संशोधन व शिक्षणाच्या कार्यासाठी व्यवस्थापन जबाबदारीतून मुक्त करावे असे मला वाटते.

Tuesday, October 2, 2018

प्राचार्य बापूसाहेब कानिटकर




प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांच्या ’मधुघट’ या लेखसंग्रहातील लेख मायमराठी डॉट कॉम या वेबसाईटवर  त्यांच्या  स्मृतिदिनी प्रसिद्ध झाला होता तो खाली देत आहे.
-------------
प्राचार्य बापूसाहेब कानिटकर

सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य गो. चिं. उर्फ बापूसाहेब कानिटकर यांचा सात फेब्रुवारी हा पहिला स्मृतिदिन! पाहता पाहता त्यांना जाऊन एक वर्ष झाले. यावर माझा अजूनही विश्र्वास बसत नाही. कै. बापूसाहेबांची पत्नी ’शरयू’ ही माझी किर्लोस्करवाडीतली जीवाभावाची बालमैत्रीण! त्यामुळे कानिटकर कुटुंबाशी माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा असा भावबंध! अर्धशतकापेक्षा अधिक काळाचा! त्यामुळेच आज हा लेख लिहिताना तीर्थरुप बापूसाहेबांच्या अनेक आठवणींनी मनात एकच गर्दी केली आहे!

 मागच्या वर्षी एक नोव्हेंबरला बापूसाहेबांना नव्वदाव्वे वर्ष लागले. त्या प्रीत्यर्थ त्यांचे अभिष्टचिंतन-अभिनंदन करावे म्हणून सकाळी जरा लवकरच मी त्यांच्या बंगल्यावर गेले. आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ मोठ्या भक्तिभावाने त्यांनी आपल्या बंगल्याचे नाव ’चंद्रमणी’ असे ठेवले होते. मी गेले तेव्हा ते नेहमीप्रमाणेच व्यवस्थित पोशाख घालून दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचीत बसले होते. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या लख्ख, गोर्‍या आणि भव्य कपाळावर कुंकू लावले आणि दोन गुलाबाची सुंदर फुले आणि एक सुबकशी छोटी वस्तु भेट म्हणून त्यांच्या हातात दिली. त्यांनी प्रसन्नपणे हसून त्याचा स्वीकार केला. नंतर मी त्यांना म्हटले, ’तुम्ही टेनिस खेळता हे मला माहिती आहे, क्रिकेटमध्येही खूप ’रन्स’ काढत होतात हे पण मी ऐकले आहे, आता जीवनाच्या खेळातले धावांचे शतक तुम्ही पूर्ण करणार, याबद्दल मला खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, मी आणि माझी कुटुंबीय मंडळी यांच्यातर्फे!’ त्यावर पुन्हा एकवार शांतपणे त्यांनी स्मित केलं आणि माझ्या मस्तकाला स्पर्श करुन मला आशीर्वाद दिला. पण नियतीला माझी ही प्रार्थना मान्य नसावी. कारण या घटनेला दोन महिने होतात न होतात तोच त्यांना देवाघरचे आमंत्रण आले ! तेही पहाटे पहाटेच !

समाजाला कै. बापूसाहेबांची ओळख आहे ती ते वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्रथम प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून ! तेथून ते सेवानिवृत्त झाल्यावर बुधगावच्या वसंतदादा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. त्या संस्थेचा परिसर विस्तृत असा त्यांनी एकदा जातीने हिंडून आम्हा मंडळींना दाखवला होता, सर्व माहिती तपशीलवार सांगितली होती. जयसिंगपूरच्या डॊ. मगदूम इंजिनिअरिंग महाविद्यालयातही प्राचार्याचीच जबाबदारी त्यांच्यावर होती. ते मेकॆनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा दोन्ही शाखांचे उत्तम इंजिनिअर होते. बनारस, बेंगलोर अशा नामवंत शहरात राहून त्यांनी या पदव्या मिळविल्या होत्या. त्यांचे या इंजिनिअरिंग क्षेत्रातले योगदान महत्वपूर्ण व मोलाचे होते. त्यामुळे त्यांच्या सल्लामसलतीसाठी, मार्गदर्शनासाठी दूरदूरहून माणसे येत असत.

बापूसाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले एक स्नेही म्हणाले, ’मालतीबाई, स्वर्गात गेल्यावरही बापूसाहेब स्वस्थ बसणार नाहीत. तिथेही ते एखादे इंजिनिअरिंग कॊलेज काढतील बघा!’

बापूसाहेबांमधला जातीवंत शिक्षक सदैव जागा असायचा. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर विश्रामबागेत राहणार्‍या मुलांना (व अर्थात जवळपासच्या परिसरातल्या मुलांनाही) शिक्षणासाठी सांगली-मिरजेला जायला लागू नये, गोरगरीब मुलांची इथे जवळच सोय व्हावी म्हणून त्यांनी १९७३ च्या सुमारास काही सहकार्‍यांच्या मदतीने ’विश्रामबाग शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. तिच्यामार्फत प्राथमिक-माध्यमिक शाळा सुरु केल्या. त्या शाळांतून आज पंचवीस वर्षांनंतर दोन हजारापेक्षा जास्त मुले-मुली शिकत आहेत. भिन्न भिन्न विचारसरणीच्या तसेच स्वतंत्र मते असलेल्या लोकांना एकत्रित करुन आर्थिकदृष्ट्या अवघड असा उपक्रम राबविणे हे काम काय सोपे थोडेच असेल? पण ते त्यांनी यशस्वीरितीने पार पाडले. या संस्थेवर त्यांचे अपत्यनिर्विशेष प्रेम होते. ही शिक्षणसंस्था माझ्यामते कै. बापूसाहेबांचे चिरस्मरणीय आणि स्फूर्तिदायक असे स्मारकच म्हणायला हवे!

एकूणच पाहता त्यांना शिक्षणप्रमाणेच विधायक आणि सर्जनशील अशा कामांत मनापासून रस होता. सांगली अर्बन को-ऒप. बॆंकेचे ते संचालक होते. विविध संस्थांच्या सभांना ते न चुकता हजर राहात, चर्चेत भाग घेत, आवश्यक तेव्हा आणि आवश्यक तिथे सला देत, मार्गदर्शन करीत. आपल्या संपन्न आणि सुदीर्घकाळाच्या अनुभवांचा त्यांनी अखेरपर्यंत समाजाच्या कल्याणासाठी उपयोग केला. अशा कार्यमग्नतेमुळेच सेवानिवृत्तीनंतरचाही त्यांचा काळ समाधानात, आनंदात गेला.

            विश्रामबागेतील ज्येष्ठ नागरिकांची सभा बर्‍याचवेळा बापूसाहेबांच्या ’चंद्रमणी’ बंगल्यात भरत असे. त्या बंगल्यातल्या प्रशस्त, हवेशीर, देखण्या दिवाणखान्यात अनेक व्यवसायातील मंडळी जमून काव्यशास्त्र विनोदात रंगून जात. अशा सभांची गोडी आमच्या प्रिय शरयूने केलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या, सुरळीच्या वड्या किंवा अशाच अन्य रुचकर पदार्थांनी आणखीनच वाढायची.

प्रिय शरयूप्रमाणेच (तिचे सासरचे नाव ’प्रतिभा’ आहे. पण मी तिच्या माहेरची! त्यामुळे मी तिला तिकडच्या नावानेच संबोधते) कै. बापूसाहेबांनी नियतीने देखणे, रुबाबदार व्यक्तिमत्व बहाल केले होते. त्यांची उंची बेताची व अंगलट काहीशी स्थूल होती. वर्णाने ते चांगले गोरेपान होते. भारतीय आणि पाश्चात्य दोन्हीही पोशाखात प्रथमदर्शनीच पाहणार्‍याच्या मनावर त्यांचा प्रभाव पडे. ते मितभाषी आणि शिस्तप्रिय होते. अधिकारपदस्थ माणसांना मग ते कुटुंबातले असोत की संस्थेतले असो, प्रसंगी कठोर वा उग्रही बनावे लागते. त्यामुळे त्यांचा थोडा धाक आणि दराराही वाटे. पण अंतर्यामी ते खूप हळवे होते, मृदु होते. गौरी, गुड्डू (ही मी त्यांच्या नातवंडांची ठेवलेली नावं) किंवा घरातले अन्य कोणी यांना दोन दिवस साधा थंडीवार्‍याचा ताप आला, तरी आतून ते फार अस्वस्थ असत. शरयूचे घर इंजिनिअरिंग कॊलेजात असताना तिथून परतायला मला उशीर झाला, तर ते जातीने मला घरी सोडायला येत.

मला काही लहान-मोठे वा मौल्यवन असे खरेदी करायचे असले की मी शरयूबरोबर जायची. पुष्कळदा बाजारहाट करुन यायला बराच उशीर व्हायचा. दुपारची जेवणाची वेळ टळून गेलेली असायची, तरीही बापूसाहेब शरयू आल्याशिवाय कधीही जेवायचे नाहीत. आमच्या उशिरा येण्याबद्दल ते कधी रागावलेलेही मला आठवत नाही. या गोष्टी वरवर पाहता छोट्या वा साध्या दिसतात, पण अशा छोट्याछोट्या आणि भावपूर्ण गोष्टींनीच पती-पत्नींच्या सहजीवनाचा प्रेममय, सुंदर गोफ विणला जात असतो. आयुष्यभर एकात्म मणाने, परस्परांचा आदर करीत, एकमेकांना समजावून घेत जीवन जगणारे शरयू-बापूसाहेब हे जोडपे सर्वांनाच आदरणीय वाटे. या उभयतांनी व त्यांच्या कुटुंबियांनी विश्रामबागेतल्या माझ्या ५० वर्षांच्या आयुष्यात माझ्या सर्व सुखदुःखात माझ्यावर मायेची शाल पांघरली.

 जेव्हा जेव्हा आमची ’नन्नी’ (माझी आई) मला इथे भेटायला येई त्यावेळी शरयूच्या पाठीवर धप्पदिशी थाप मारुन तिला म्हणायची, ’तुम्ही दोघं, तुमचं घर इथे आहे म्हणून मालीची आम्हाला काळजी वाटत नाही हो.’

बापूसाहेबांचा दिनक्रम रेखीव असायचा! प्रातःकाळी उठून घराचे फाटक उघडून ते हौसेने दूध घेत, चहापाणी-स्नान आदी आन्हिक उरकले की नऊ-साडेनऊला व्यवस्थित नास्ता करीत, न चुकता भोजनापूर्वी नवनाथाची पोथी वाचीत व नंतर मोठ्या निगुतीने ती रेशमी रुमालात बांधून ठेवीत. देवावर त्यांची निस्सीम श्रध्दा होती. त्यांच्याकडे गणपती दीड दिवसाचा त्याची दुर्वा-सुपारी-कापूर, उदबत्ती, प्रसादापासून सर्व जय्यत तयारी शरयूने केली असली तरीही त्यांचे सर्वत्र बारीक लक्ष असे. कापर्‍या हातात पुजेचं तबक घेऊन सर्व आरती ते म्हणत. धार्मिक सणांना गडद-लाल कद नेसत. पूजाअर्चेनंतर भोजन-वामकुक्षी-चहा, शनिवारी उभयतांचा उपवास म्हणून साबुदाण्याची खिचडी खाऊन दूरदर्शनवर खेळ, बातम्या जे आवडेल ते दिवसभरात बराच वेळ पाहात. ’वालचंद’ला येण्यापूर्वी ते ’सरस्वती सिने टोन’ साऊंड इंजिनिअरचे काम पाहत. त्यामुळे व्ही. शांताराम, भालजी, सुलोचना बाई आणि अशीच कितीतरी चित्रपटसृष्टीतली मातब्बर मंडळी त्यांच्या चांगल्या परिचयाची ! त्यांचे चित्रपट, नाना आठवणी सांगत, ते आवर्जून पाहात असत.

संध्याकाळी येणार्‍या-जाणार्‍यांबरोबर माफक गप्पा, फार लांब चालवत नसे तेव्हा घरा शेजारच्या दुकानातून भाजी-ब्रेड आणणे, कधी मिरजेला शरयूसह आप्त मंडळींकडे फेरी मारणे, असा दिवस घालवून रात्री हलकेसे जेवण करुन ते झोपायचे. जेवणात ना कसली त्यांना खोड ना जीवनात कसलेही व्यसन! त्यामुळे दीर्घायुष्याचे वरदान त्यांना ईश्वराने दिले. वयोमानानुसार अधून-मधून काही तक्रारी उदभवत. पण त्यांन अतिशय सोशिकपणे व शांतपणाने ते विवेकाने तोंड देत. 

 कै. बापूसाहेब-शरयू यांच्या व माझ्या घरात केवळ काही फुटांचेच अंतर आहे. त्या घरी मी कितींदा जायची. त्याला हिशेबच नाही. कारखान्याच्या डिपॊझिटचे काम असो की नारळ काढणार्‍याला किती रक्कम द्यायची हे ठरवायचे असो, बापूसाहेबांना मी सल्ला विचारत असे. कसलाही कंटाळा न करता ते मला सल्ला देत. आज ते आठवताना माझे मन त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने भरुन येते आहे. एक-दोन दिवस माझी फेरी झाली नाही तर प्रकृती बघायला शरयूबरोबर तेही आस्थेवाईकपणे येऊन चौकशी करीत. म्हणून त्या उभयतांना विश्रामबागमधील माझे ’पालक’ असेच मी मानते.
 
 सुमारे वीस वर्षापूर्वीची गोष्ट! माझ्या ’पसायदान’ बंगलीचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले! वास्तुशांतीची तारीख ठरुन संबंधितांना आमंत्रण पत्रे गेलेली आणि नेमक्या त्याचवेळी आमचे कॊन्ट्रॆक्टरसाहेब पूर्वसूचना न देता काश्मीरला की कुठे प्रवासाल गेलेले ! आता आली का पंचाईत! मी तरी पार गडबडून गेले. कामाचे आता काय होणार म्हणून ! त्यावेळी कै. बापूसाहेब आणि माझ्या घराचे डिझाईन करणारे सुप्रसिध्द स्टक्चरल आर्किटेक्ट आनंदराव साळुंखे माझ्या अंगणात खुर्च्या टाकून आपला बहुमोल वेळ खर्चून बसून राहिले व कामगारांकडून त्यांनी उर्वरित काम करुन घेतले. माझ्या वास्तुशांतीच्या यशात या दोघांचा वाटा सर्वात मोठा आहे, तो मी कधीच विसरणार नाही.

 गरजू माणसांना मग तो नोकर असो, आप्त असो की अपरिचित निर्धन माणूस असो, बापूसाहेब आपला मदतीचा हात कसलाही गाजावाजा न करता त्यांच्यासाठी पुढे करीत. असे करताना आर्थिक फटका व कटु अनुभवाचे धनीही त्यांना कधीकधी व्हावे लागले, पण त्यामुळे त्यांनी आपले मन कडवट होऊ दिले नाही.

बापूसाहेबांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि राष्टाबद्दलच्या प्रांजळ भक्तीची दोन उदाहरणे माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहेत. त्यांच्या एक वडील बहीण अविवाहित होत्या, अशक्त होत्या. त्या जन्मभर भावाजवळच राहिल्या. आठ-दहा वर्षांपुर्वीच त्या गेल्या. त्यावेळी बापूसाहेबांचे वय ऐंशीच्या घरात होते. म्हणून त्यांनी घरीच रहावे, अशी विनंती आप्तस्वकियांनी करुनही ते बहिणीच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले आणि पुढचे सर्व विधीही यथासांग केले. त्या गंगुताई अधून मधून माझ्या घरी आल्या म्हणजे म्हणायच्या, "मालूताई, माझा भाऊ कोहिनूर हिरा आहे." दुसरी आठवण आहे ती सुमारे ३५-४० वर्षांपुर्वीची ! सांगली-मिरज ही सर्वांना फार उपयोगी असलेली आगगाडी सरकारने तडकाफडकी बंद केली ! त्यामुळे विद्यार्थ्यांपासून व्यापार्‍यांपर्यंत सर्वांनाच फार गैरसोय सोसावी लागली. ती गाडी पुन्हा सुरु व्हावी म्हणून अनेक नामवंत प्रतिष्ठीत नागरिक खटपट करीत होते, पण सरकारच्या आडमुठेपणापुढे कुणाचे काय चालणार? ती खटपट करणार्‍या लोकांना काही महत्वाचे नकाशे तातडीने करुन हवे होते, हातात फार थोडा वेळ असूनही बापूसाहेबांनी ते नकाशाचे काम तत्परतेने करवून घेतले आणि संबंधितांकडे सर्व साहित्य पोहोचविले. एखाद्या कामाची आवश्यकता व निकड त्यांना पटली म्हणजे ते काम होईपर्यंत बापूसाहेबांना चैन पडत नसे. हा गुण आज एकूण दुर्मिळच झालाय.

 बापूसाहेब तसे हौशीही होते. त्यांच्या इंजिनिअरिंग कॊलेजात नवीन कसले यंत्र की काय आणले होते. त्यावर छान आईस्क्रिम होई. एक दिवस त्यांच्या सांगण्यावरुन मी दूध+आंबा+साखर आदी मिश्रण करुन त्यांच्याकडे पाठवले तर काय गंमत! अर्ध्या-पाऊण तासांत रुचकर सुवासिक आईस्क्रिम घेऊन त्यांचा नोकर माझ्या दारात उभा! आनंदाची देवघेव करण्याची ही त्यांची वृत्ती मला खूपच काही शिकवून गेली.

बापूसाहेब हिंदू धर्म, संस्कृती, इतिहास, परंपरा यांचे गाढे अभिमानी होते. आपल्या पडत्या काळात ज्यांनी आपल्याला मदत केली, अशी आपली दिल्लीस राहणारी मोठी बहीण व मेहुणे यांना ते फार मानीत. नाशिक हे त्यांचे मूळ गाव. तिथल्या आठवणी ते खूप सांगत. देशाच्या सध्याच्या दुरवस्थेचे त्यांना अतिशय दुःख वाटे. पण आपण वयाच्या अशा टप्प्यात आहोत की ती स्थिती बदलण्याच्या दृष्टीने फारसे काही आपल्याला करता येत नाही, हे जाणून ते ती उद्विगता गिळून टाकत.

 बापूसाहेबांच्या या जीवनचित्रांत प्रिय शरयूचे स्थान महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती सर्वार्थाने त्यांची नमुनेदार सहचारिणी होती. संसारात तिच्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदार्‍या तिने समर्थपणे पार पाडल्या. तीही मितभाषी, शांत, सोशिक आहे. कष्टाळू, समंजस आहे. अनेक खेळांत पटाईत आहे. तशीच हाडाची कलावंतही आहे. भाज्या आणि फळे यांचे सुंदर देखावे बनविण्याचे तिने महिला मंडळात सांगलीत एकदा सुरेख प्रात्यक्षिक करुन दाखविले होते. ते मला चांगले आठवते. नाटकांत ती छान काम करते. हिंदीच्या परीक्षाही तिने दिल्या आहेत, सुगरण तर ती आहेच, विणकाम-शिवणकाम म्हणजे तिचा जणू श्वासोच्छवासच आहे. इंजिनिअरिंग कॊलेजच्या महिला मंडळात चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाचा थाट मोठा बहारीचा असे. वर्तमानकालीन सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांवर एखादा शोभिवंत देखावा तिथल्या भगिनी उभा करीत. एकजुटीने व तळमळीने करीत. त्यात या प्रतिभाताई कानिटकरांचा सहभाग, सल्ला भरपूर असे. बापूसाहेबांना आपल्या कलावंत पत्नीच्या गुणांचे कौतुक होते. त्या देखाव्यासाठी लागणार्‍या लहानमोठ्या कितीतरी गोष्टी ते हौसेने कॊलेजमार्फत करुन देत. बापूसाहेबांच्या सुखी सहजीवनात शरयूचा वाटा मोठा आहे, असे मी म्हणते ते काय उगीच? संसाराची धुरा तिने जवळजवळ ६०-६५ वर्षे सांभाळल्याने बापूसाहेबांना इतर कामांसाठी वेळ मिळाला! त्यांच्या जाण्याने ती बरीच एकाकी झाली हे खरे, पण ते एकाकीपण आजही काहींना काही कामात, वाचनात, मन गुंतवून ती सह्य करुन घेते!

बापूसाहेबांनी कृतार्थ मनाने जीवनाचा निरोप घेतला, आपल्या कर्तृत्वाने शैक्षणिक जगात ते नामवंत झाले. सौ. प्रिय शरयूसारखी सद्गुणी, विवेकी पत्नी त्यांना लाभली. डॊ. सौ. शशिकला, इंजिनिअर सौ. नीलप्रभा, एम. ए. झालेली सौ. वासंती यांना अनुरुप सहचर लाभले. मुला-मुलींचे संसार बहरले-फुलले, नातवंडे-परतवंडे पाहिल्याने सोन्याची फुले उधळून घेण्याचे भाग्य त्यांना मिळाले. धाकटा कुशाग्र बुध्दीचा सुपुत्र श्रीराम कानिटकर आज डिप्लोमा इंजिनिअरिंग कॊलेजाचा प्राचार्य झाला आहे. सून डॊ. सौ. संपदा कर्तबगार व कुशल दंतवैद्य म्हणून महाराष्ट्राबाहेरही गाजते आहे. मोठी सून डॊ. सौ. हेमा दामले समाजशास्त्राची डॊक्टर आहे, प्राध्यापिका आहे. नातवंडे-परतवंडे घराण्याच्या सत्किर्तीत खूप भर घालताहेत. या सार्‍यांचा लौकिक ऐकत, त्यांना आशीर्वाद देत, कुणाचीही सेवा न घेता बापूसाहेबांनी देवाघराकडचे प्रस्थान ठेवले. असे भाग्य कितीजणांच्या वाट्याला येते? या सुंदर जीवनचित्रावर नियतीने एक भलामोठा खिळा ठोकला होता तो बापूसाहेबांचा सर्वात हुशार इंजिनिअर मुलगा अरविंद याच्या अकाली मृत्युचा! पण हा वज्राघात बापूसाहेब-शरयूंनी फार विवेकाने-धीराने सोसला! असे त्या उभयतांबद्दल किती लिहावे !

जगद्विख्यात नाटककार शेक्सपिअरनं जगाला रंगभूमीची यथोचित उपमा दिली आहे. कै. बापूसाहेबांनी आपल्या वाटयाला आलेल्या सर्व भूमिका सुविहीतपणे पार पाडल्या. त्यांना आज पुन्हा माझे एकवार नम्र अभिवादन !

ज्ञानदीप मंडळ योजनेचे पुनश्च हरि ओम.

२०१३ मध्ये कोल्हापूर येथे ज्ञानदीप मंडळ योजनेची सुरुवात केल्यानंतर कोरेगाव, अकोता, रत्नागरी अशा विविध ठिकाणांहून योजनेविषयी विचारणा करणेत आली. मात्र संगणक वापरण्याचे ज्ञान तेथील शिक्षकांना नसल्याने तसेच शाळांतील संगणक नादुरूस्त असल्याने याबाबतीत पुडे फारशी प्रगती होऊ शकली नाही.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्कूलची योजना सुरू करून संगणक खरेदीसाठी अनुदान मंजूर केले. तसेच शालेय अभ्यासक्रमात संगणक प्रशिक्षणाचा समावेश केला. त्यामुळे बहतुेक शाळांनी वेगळा संगणक विभाग सुरू केला. शैक्षणिक ध्वनी-चित्रफिती तसेच अभ्यासक्रमावर आधारित सॉफ्टवेअरचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. तरीदेखील संगणकाचा व विशेषकरून इंटरनेटचा वापर नव्या ज्ञानाच्या शोधासाठी व नवील ज्ञान निर्मितीसाठी न झाल्याने ञानदीप मंडळ योजनेची गरज लक्षात आली.

मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने  ज्ञानदीप फौंडेशनने पुन्हा याबाबतीत प्रयत्न करण्याचे ठरविले. संगणकावर मराठी टाईप करण्याचे प्रशिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे या सांगतीच्या माजी जिल्हाधिकारी सौ. लीना मेहेंदळे यांनी सुचविल्यामुळे प्रथम शिक्षक व नंतर विद्यार्थी यांना असे प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले.

१ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र टेक्निकल एज्ज्युकेशन सोसायटीच्या पुणे शाखेत ज्ञानदीप इनोव्हेशन सेंटर सुरू केल्यानंतर सांगली येथे प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे ठरले.

५ सप्टेंबर २०१८ या शिक्षकदिनी सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रशाळेत पहिले ज्ञानदीप मंडळ सुरू करण्यात आले. १९८५ साली ज्ञानदीपच्या संचालिका कै. सौ. शुभांगी रानडे यांनी  येथेच  संगणक प्रशिक्षणाचा एक महिन्याचा वर्ग घेतला होता. ज्ञानदीपतर्फे एक प्रश्नपेटी शाळेस देण्यात आली.



६ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र टेक्निकल एज्ज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ज्ञानदीप मंडळ सुरू करण्यात आले.


यानंतर लगेचच ८ सप्टेंबर २०१८ रोजी पलूस येथील पंडित विष्णु दिगंबर पलुसकर शाळेत ज्ञानदीप मंडळाची स्थापना करण्यात आली.  आता मुख्य गरज आहे ती या शाळांतील शिक्षकांना संगणकाची माहिती करून देऊन मराठी टायपिंग शिकविण्याची.


१० सप्टेंबर २०१८ रोजी मला अमेरिकेला यावे लागले. संबंधित शिक्षकांशी नेटवरून संपर्क साधून मी हे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.  सांगलीतही असे शिक्षण देऊ शकतील अशा  शिक्षकांचा गट करण्याची गरज आहे. पाहू    त्यात कितपत यश येते ते. 
यावेळी मुले मराठीतून संगणकावर आपले लेख टाइप करू लागतील व ते लेख वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचतील तेव्हा आपोआपच या योजनेला नवे बाळसे येईल. 

Sunday, September 30, 2018

अशा शाळा, असे शिक्षक - ६

सांगली हायस्कूल


कृष्णा नदीच्या काठी एका उंचावटयावरील सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे सांगली. १८०१ साली मूळ मिरज जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी वेगळं राज्य बनवलं तेव्हापासून या गावाचा खऱ्या अर्थांनं इतिहास सुरु झाला. शिक्षण हेच आर्थिक, सामाजिक, सांकृतिक विकासाचा पाया असल्याने शिक्षणाचे महत्व ओळखून श्रीमंत धुंडीराज उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांच्या काळात सांगली संस्थानात शिक्षणाला सुरुवात झाली.

१८६४ साली सांगली इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. सांगलीत इ.१८६४ मध्ये सुरु झालेल्या इंग्लिश स्कूललाच नंतर इंग्रजी माध्यमांचे स्वरुप आले असावे. तत्कालीन संस्थानाधिपती धुंडिराज तात्यासाहेब पटवर्धन यांच्या कारकिर्दीत सुरु झालेल्या या पहिल्या इंग्लिश स्कूलमध्ये इ.स. १८७८ पर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. या शाळेच्या इ.स. १८८२ मध्ये झालेल्या पुर्नरचनेनंतर सहाव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरावर पोहोचली त्यावेळी ही शाळा राजवाडयातील एका भागात भरत होती. क्रिकेट आणि गायनाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणारी ही सांगलीतील पहिली शाळा म्हणता येईल. त्या काळात इंग्लिश स्कूल ही एकमेव सरकारी शाळा होती. याच शाळेची पुढे १८८४ साली 'सांगली हायस्कूल, सांगली' या नावाने शाळा सुरु झाली. हणमंतराव भोसले या प्रख्यात क्रीडाशिक्षकामुळे क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटन पटू नंदू नाटेकर यांच्यासारखे क्रीडाक्षेत्रातील नामवंत या शाळेला देता आले. चित्रकला, गायन, तालीम, क्रिकेट अशा विषयांसाठी वेगवेगळा शिक्षक नेमण्याची प्रथा एकेकाळी या शाळेत होती.

स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने ही शाळा १ एप्रिल १९५३ साली तंत्रशिक्षण सुरु करण्याच्या अटीवर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत केली. शास्त्र शाखेचा उच्च माध्यमिक विभाग १९७५ मध्ये आणि १९८८ मध्ये व्यावसायिक शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) विभाग सुरु झाला. लठ्ठेतंत्रनिकेतनची सुरवात या शाळेच्या आवारातच झाली. तंत्रशिक्षणासह या शाळेला आधुनिक स्वरुप देण्यात नेमगोंडा दादा पाटील, आमदार कळंत्रेआक्का, अ‍ॅड.केशवराव चौगुले, जी.के. पाटील, टी.के. पाटील, अ‍ॅड एस.एस. पाटील. बापूसाहेब कुंभोजकर आदी मंडळीचा मोठा सहभाग आहे.

सांगली हायस्कूल भूषण - माजी विद्यार्थी
प्रख्यात ज्ञानपीठ परितोषिक विजेते थोर साहित्यिक वि.स.खांडेकर, कविवर्य यशवंत, उदयोगपती आबासाहेब गरवारे, स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, साहित्यिक श्रीनिवास शिंदगी, स्व.आण्णासाहेब लठ्ठे, गुरुनाथ गोंविद तोरो, शीघ्र कवी गोपाळ गोविंद मुजुमदार उर्फ साधुदास, शास्त्रीय संगीताचे गाढे संगीतज्ञ प्रा.ग.ह.रानडे, केशवसुत संप्रदायाचे अध्वर्यु धोंडो वासुदेव गद्रे तथा कवि काव्यविहारी अशी या शाळेची माजी विद्यार्थ्यांची परंपरा आहे.

परदास्याची बेडी होती पायी तव जेधवा
पुत्र शहाणे तुझे दंगले संसारी तेधवा
काही वेडी तयाची भडकुनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे

राष्ट्रयोगिनी माजी आमदार कळंत्रेआक्का, स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची आहुती देणारे हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, देशरक्षणार्थ देशाच्या सरहद्दीवर कर्तव्य बजावताना वीरमरण पावलेल्या हुतात्मा स्कॉड्न लिडर अनिल घाडगे, कवी गिरीश, प्रसिध्द कायदेतज्ञ केशवरावजी चौगुले, स्वातंत्र्य सैनिक स्व. आण्णासाहेब पाटील, सिंहगड एज्यु. संस्थेचे संस्थापक प्राचार्य श्री.एम.एन. नवले तसेच मुंबईचे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. महेंद्र परीख, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, प्रसिध्द ग्रंथतज्ञ डॉ. वसंतराव खाडीलकर, मा.खासदार प्रकाश बापू पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय हजारे, प्रसिध्द बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, कबड्डीपटू शंकर गावडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू राजू भावसार, वेटलिफ्टींग चॅम्पियन अनिल पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आसिफ मुल्ला यांच्या सारखे कीर्तिमान माजी विद्यार्थी याच हायस्कूलचे विद्यार्थी आहेत.

अशा शाळा, असे शिक्षक - ५

डॉ. देशपांडे स्मृतिमंदीरच्या डॉ. लता देशपांडे 

माजी नगराध्यक्ष कै. डॉ. जी. ए. देशपांडे यांच्या कन्या श्रीमती लता व अरूणा देशपांडे या भगिनी डॉ. देशपांडे स्मृतिमंदिराच्या माध्यमातून सांगली परिसरातील मुलामुलींसाठी व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम चालवीत आहेत.
(श्रीमती लता देशपांडे)
        शिशुविकास मंडळ - जिजामाता बालमंदिराला जोडूनच सौ. पुष्पावती देशपांडे शिशुु संगोपन मंदीर हे पाळणाघर चालविले जाते. तसेच सांगलवाडीला ना. खाडिलकर बालमंदीरही चालविले जाते. सांगलीमध्ये डॉ. देशपांडे बाल विद्यामंदीर या नावाने एक प्राथमिक शाळाही काढण्यात आलेली आहे.
        डॉ. देशपांडे स्मृतिमंदीरातर्फे अनेक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेले आहेत.
आरोग्य मंदीर - खरकटवाडी येथे डॉ. देशपांडे यांचा दवाखाना असून तेथे गोरगरिबांना मदत देण्यात येते.
अभ्यास मंदीर - गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून देणे, मार्गदर्शन करणे व पुस्तक पेढी चालविणे. या योजनांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे.
उद्योग मंदीर - लहान वयात स्वावलंबनाची सवय लागावी, स्वकष्टार्जित पैसा मिळविण्याचा आनंद लाभावा, कमवा व शिका योजना राबविता यावी हा या योजनेचा उद्देश.
संस्कार मंदीर - प्रत्येक रविवारी गीतापाठ, संस्कृत श्लोकपाठ याद्वारे किशोर किशोरींचा संस्कार वर्ग घेतला जातो.तसेच खरकटवाडी येथेही संस्कार केंद्र चालविले जाते.
कला मंदीर - होतकरू मुलांच्या चित्रकला, नाट्यकला गायन यासारख्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना जागा, साधने, साहित्य आणि मार्गदर्शन केले जाते.
क्रीडा मंदीर - विविध खेळांसाठी जागा व साधने उपलब्ध करून देणे, स्पर्धा घेणे.
विज्ञान मंदीर - विज्ञानाच्या या युगात मुलामुलींच्या बुद्धीला चालना देण्यासाठी प्रयोगशाळेची व खटपटघराची योजना आहे.   बालमंदीरांसाठी खेळणी व साधनांची बँक - सर्व बालवाड्यांना विविध प्रकारच्या खेळण्यांचा लाभ मिळावा हा यामागील उद्देश आहे.
  स्मृति मंदीर - कै. डॉ. जी.ए. देशपांडे यांच्या विविध स्वरूपातील दुर्मिळ स्मृतींचे जतन करणे.
      एक नाविन्यपूर्ण `बालभवन` उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रीमती लता व अरूणा देशपांडे या दोघीही अहोरात्र झटत आहेत.

स्त्रीशिक्षणाचे सांगलीतील अग्रगण्य शिल्पकार गुरुवर्य कै. य. द. लिमयेसर



 राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. य. द. लिमये यांच्याशी माझी पहिली ओळख झाली ती १९६८ मध्ये. मला विज्ञानाची आवड असल्याने मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांना आमच्या वालचंद कॉलेजमध्ये भाषण देण्यासाठी सांगलीस मी बोलाविले होते. त्यांनी सांगलीत मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करण्याची कल्पना मांडली. श्री य. द. लिमये व आरवाडे हायस्कूलमधील भूगोल शिक्षक श्री. शंकरराव सोमण यांच्याबरोबर आमची बैठक होऊन श्री. य. द. लिमये यांच्या पुढाकाराने राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेतच अशी संस्था आम्ही सुरू केली.

त्यावेळी संस्थेच्या कामानिमित्त मी अनेकदा त्यांच्या घरी जात असे व आमचा चांगला स्नेह संबंध निर्माण झाला होता. श्री. य. द. लिमये ह्यांची प्रखर विज्ञाननिष्ठा व समाजवादी विचारसरणी यांचे संस्कार त्यावेळी माझ्या मनावर झाले. पुढे ३/४ वर्षातच काही कारणानी ती संस्था बंद पडली तेव्हा लिमये सरांनी माझ्याकडे स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.पुढे अनेक वर्षांनी म्हणजे १९८१ साली त्यांच्याच पेठभाग शाळेत ‘मराठी विज्ञान प्रबोधिनी’ या नावाने संस्था सुरू झाली ती आता नियमितपणे विज्ञान प्रसाराचे कार्य करीत आहे.

य. द. लिमये यांचा जन्म २२-१-१९२४ रोजी सांगलीत झाला. शालेय शिक्षण १९३४ पासून सिटी हायस्कूलमध्ये झाले. शाळेत मित्रमंडळ स्थापन करून चर्चा व वादविवाद मंडळ सुरू करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी बी.ए.बीटी पदवी संपादन केली व ते राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेतच शिक्षक म्हणून रुजू झाले.

य. द. लिमये यांच्या पत्नी सौ. लीलाताई लिमये या बेळगावच्या प्रा. गोविंदराव केळकर यांच्या कन्या. त्याही याच शाळेत शिक्षिका होत्या. दोघांना शिक्षणाची व राष्ट्र सेवा दलाच्या कार्याची आवड असल्याने त्यांनी एकत्र येऊन आपले जीवन मुलींच्या शिक्षणासाठी व्यतीत करण्याचे ठरविले. त्या काळात रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन अत्यंत साधेपणाने लग्न करण्याचे धाडस त्यानी दाखविले.त्यांच्याशी एकदा गप्पा मारताना त्यांनी सहज आपल्या लग्नाची गोष्ट मला सांगितली. हार, एक पेढ्याचा पुडा व फुलाची वेणी एवढ्याच साहित्यानिशी रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी लग्न केले. येताना टांग्याने दोघे घरी आले. हाच त्यांचा लग्न समारंभ.

 त्यानंतर ३६ वर्षे शिक्षक व त्यातील १८ वर्षे मुख्याध्यापक व वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणून कार्य करून संस्था नावारुपाला आणण्यासाठी, तिला जनमानसात प्रतिष्ठा व प्रेमाचे स्थान मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.विविध विषय शिकवणारे, व्यासंगी उत्तम शिक्षक व शिस्तप्रिय प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला.साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा व शिस्तीचे भोक्ते असूनही ते सतत आनंदी व हसतमुख असायचे. मुलींच्यात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी भाऊबीजेला रिमांडहोममधील मुलांना फराळाचे नेऊन देण्याची प्रथा त्यानीच सुरू केली.

मुलींनी खासगी शिकवण्यांना जाऊ नये व गरीब मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कोणतेही मानधन न घेता रोज दोन तीन तास शाळेत जादा शिकविणारे त्यांच्यासारखे शिक्षक विरळाच. मुख्याध्यापक म्हणून मिळणारे अधिक वेतन त्यानी कधीही स्वत:साठी घेतले नाही तर ते संस्थेस सुपूर्त केले. १२-९-१९८२ मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ग. प्र प्रधान यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कै. वि. द. घाटे या शिक्षण तज्ज्ञांचे हस्ते ’गुरुदेव’ सुवर्णपदक अर्पण करण्यात आले.

निवृत्तीनंतरही ते नियमितपणे संस्थेच्या कार्यात मदत करीत असत व अखंडपणे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे त्यांचे कार्य चालू असे.

१४ फेब्रुवारी २००४ रोजी त्याचे दु:खद निधन झाले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शास अनुसरून संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. आता त्यांची कन्या सौ. मेधा भागवत यांचे नेतृत्व संस्थेस लाभल्याने संस्थेचा अधिक गतीने सर्वांगीण उत्कर्ष होईल यात शंका नाही. संस्थेचा विस्तार आता खूपच मोठा झाला असून श्रीमती उषा कुलकर्णी कार्यवाह म्हणून ती जबाबदारी समर्थपणे सांभाळीत आहेत.




Friday, September 28, 2018

अशा शाळा, असे शिक्षक - ४

सांगली परिसरातील गेल्या पिढीतील  काही ध्येयवेड्या आदर्श शिक्षकांची माहिती खाली देत आहे.
१. कै. श्रीकांत विष्णू रानडे, B.Sc B.Ed
जन्मतारीख :- १३ जानेवारी १९४९  मृत्यु - १ फेब्रु. २०१६


माध्यमिक शिक्षण :- न्यू इंग्लिश स्कूल सातारा, सिटी हायस्कूल सांगली
महाविद्यालयीन शिक्षण :- विलिंग्डन कॉलेज, KWC कॉलेज सांगली, पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ़ एज्युकेशन सांगली
शैक्षणिक अनुभव :- ४१ वर्षे - विदुयामंदीर प्रशाला, सध्या वा.रा.खवाटे हायस्कूल अंकली
१९७०-१९७७१ उपशिक्षक शे.रा.वि.गो.हायस्कूल माधवनगर
 ११९७१-२००७ उपशिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक, प्राचार्य



शैक्षणिक कार्य 
(१) नवीन अभ्यासक्रमावर आधारीत गणित विज्ञान पर्यावरण प्रशिक्षण घेतले व तज्ञ मार्गदर्शक म्हणुन काम केले.
(२) पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) व SSC Board प्रकाशीत शालेय पुस्तकांचे परीक्षण
(३) संशोधन प्रकल्प
 (१) वेळापत्रकाची पुर्नरचना - जिल्हास्तरीय पारितोषिक
 (२) शालेय दिनदर्शिका पुर्नरचना - जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
 विस्तारसेवा केंद्र B.Ed  College संचलित
 (३) ग्रामीण निमशहरी, शहरी शाळांतील अभ्यासक्रम व अभ्यासेत्तर उपक्रम यांचा प्रकल्प - SSC Board - १०००० रूपये अनुदान
(१९९८-१९९९-२०००) तीन वर्षे संशोधित कार्य २००० साली
(४) इ.३री ते ८वी विज्ञान पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व संशोधन प्रकल्प ५००० रू. अनुदान - पाठ्यपुस्तक मंडळ
 (५) SSC Board - गुणवत्ता यादीत ६० विद्यार्थ्यांचा सहभाग
 HSC Board - गुणवत्ता यादीत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग
 १९९९ HSC Board राज्यात शाळेचा प्रथम क्रमांक
अभ्यासेतर उपक्रम -
 (१) डॉ.भाभा विज्ञान मंडळ - संचलन व मार्गदर्शन
 तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षीसे संचालक १० वर्षे,  नागपूर मुंबई बेंगलोर कलकत्ता विज्ञान प्रदर्शनात सहभाग
 (२) डॉ.बोस सृष्टीनिरीक्षक मंडळ(निसर्ग मंडळ) WWF संचलीत World Wild Fund of India जागतिक वन्य जीवन निधी संचालक १० वर्षे
 सामाजिक कार्य 
(१) मराठी विज्ञान प्रबोधिनी - आजीव सदस्य
(२) भारतीय शिक्षण मंडळ - आजीव सदस्य
(३) बालविज्ञान प्रबोधिनी - कार्यवाह
 (४) निसर्ग मित्र संस्था - कार्यवाह
(५) MTSE - महाराष्ट्र टॅलन्ट सर्च एक्झाम - समन्वयक गेली १२ वर्षे उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार - डॉ.आनंद कर्वे(शास्त्रज्ञ) व डॉ.रा.ग.जाधव - मराठी साहीत्य महामंडळ अध्यक्ष यांचे   हस्ते
(६) राष्ट्रीय बालविज्ञान परीषद नवी दिल्ली

जिल्हा समन्वयक १० वर्षे विभागीय समन्वयक ३ वर्षे
राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पांना मार्गदर्शन सांगली सातारा कोल्हापूर
 (७) दैनिक लोकमत व Air India यांच्यातर्फे संयुक्तपणे दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार नागपूर येथे
(८) सहली निसर्ग शिबीरे चर्चासत्रे व्याख्याने परीसंवाद सहभाग गेली २० वर्षे
(९) आजी व सदस्य MTE Society - महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे

२. गुरुवर्य कै.  नागेश व्यं. धोलबा

सांगली शहर आणि जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रावर ज्या काही निवडक गुरुजनांचा ठसा उमटला आहे. जवळ जवळ गेली चार तपे या परिसरातील विध्यार्थ्यात अत्यंत आदराने ज्यांचा आवर्जून नामोल्लेख होतो आहे अशा आदरणीय आणि विद्यार्थीप्रिय बोटावर मोजता येतील अशापैकीच एक सकल कलागुण संपन्न, अत्यंत शिस्तबध्द करडे परंतु विद्यार्थ्यावर मायेची पाखर घालणारे, त्यांच्यावर पुत्रवेत प्रेम करुन त्यांना सुसंस्कारित करण्याकरिता निरनिराळ्या उपक्रमांची परिसीमा गाठणारे. वर्गात खडू-फळा, दृक्‌-श्राव्य शिक्षण साहित्य, प्रयोगशाळेतील उपकरणे, भूगोल, नकाशे, भाषाशास्त्र, विज्ञान विषयात तल्लीन होणारे, आणि आपल्याबरोबरच आपले विद्यार्थी आणि सहपाठी, सहकारी शिक्षक सर्वाना त्यांत एकरुप करुन घेणारे आणि तितकेच वर्गाबाहेर क्रीडा मैवानावर, लाठी, काठी, फरीगदगा, लेझीम, क्रिकेट, टेबलटेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केट्बॉल, वगैरे सारख्या देशी-विदेशी खेळात नुसते उत्कृष्ट खेळाडू म्हणूनच नव्हे तर, पहिल्या आशियाई सामन्यात १९५१ साली अथॅलेटिक्ससाठी एक पंच, मुं.शालेय सामन्यात संचालक, शिवाजी विद्य़ापिठाचे झोनल इंटर झोनल प्रमुख निवडसमिती सभासद, आफ्तर विद्यापीठ टे.टे. साठी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापक, कर्नाटक विद्यापीठ सामन्यात कप्तान. विज्ञान प्रदर्शने भरविणे पेपर सेटर परीक्षक, मॉडेटर, जवळ जवळ दोन तपात २२ शिक्षक मार्गदर्शक शिबिरे शास्त्र शिक्षक संघटन, एवढेच नव्हे तर शालेय आणि विद्यापिठिय रंगभूमिवर एक उत्कृष्ठ कलाकार दिग्दर्शक, अशा अनेक पैलू मधून आपल्या सर्वगुण संपन्न्तेचा लाभ शिक्षण संस्था आणि शिक्षण क्षेत्राला देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व गुरुवर्य नागेश व्यं. धोलबा(सर).

 सांगली पासून ते पलूस, पुणे,अलिबाग पर्यत ज्यांचे विद्यार्थी नमवंत डॉक्टर्स म्हणून प्रसिध्द आहेत. शिक्षण क्षेत्रात ज्यांचे विद्यार्थी आज अनेक ठिकाणी मुख्याध्यापक, प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्द आहेत. बॅंक्स, इलेक्ट्रोनिक्स, शिल्पशास्त्र, इंजिनिअरिंग, औषध उत्पादन, केमिकल इंजिनिअरिंग, कॉस्ट अकौंटन्सी आणि वकिली व्यवसायात अनेक ठिकाणी अनेक लोक आपल्या पद आणि पदवी इतकाच आमचे घोलबा सर म्हणून ज्यांचा आदर पूर्व उल्लेख करतात आणि सुधीर मोघ्यांसारखा कलाकार आपल्या कलांकार घडणीत घोलबासरांचा महत्वाचा वाटा आहे. म्हणून अभिमानाने सांगतो त्या नेरुरला जन्मलेल्या घोलबासरांनी शिक्षण कालांत वडिलांच्या रेल्वेतील फिरत्या नोकरीमुळे मद्रास, विजवाडा येथे ५ वी पर्यंत तेलगू भाषेत शिक्षण घेण्यात व्यतीत केले व बेळगांव येथे बी.एस्‌.सी. नंतर १० वी पर्यंत कानडी माध्यमातून अध्यापन केले. म्हणून सांगितले तर एखाध्याला खरेही वाटणार नाही. जरंतु तेलगू भाषेतून शिक्षणाची सुरुवात झालेली असतांना देखील  नंतर मराठी माध्यमातून त्यांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक, भौतिक विषय घेऊन बी.एस्‌.सी. पुढे शास्त्र शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात असतांनाच डी.पी.एड्‌, बी.एड्‌ च्या पदव्याही वरच्या क्रमांकाने मिळवल्या. युनिव्हर्सिटी ग्रॅंट्स्‌ कमिशनच्या उन्हाळी वर्गात केमिस्ट्री उपमुख्यापकात पहिल्या पाचात नंबर मिळवला. निरनिराळ्या शिक्षण संस्थांतून अध्यापक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक पदे भूषविली. एवढेच नव्हेतर एस्‍.टी.सी. चे प्राचार्य पद, बी.एड्‌. कॉलेज मध्ये गणीत, शास्त्र, भूगोल, शा. शिक्षक. दृक-श्राव्य शिक्षणाच्या लेक्चरर पदाबरोबरच मेथड मास्टर म्हणूनही कारर्किर्द गाजविली. ८१ साली नोकरीतील नियमानुसार उपमुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्ती स्विकारली. तरी शिक्षण क्षेत्र मात्र त्यांना पुन्हा साद घालीत असतेच                आणि शिक्षण क्षेत्रातला असामान्य असा ह गुरुवर्य भावी पिढीसाठी बहुमोल असे आपले शैक्षणिक योगदान पहिल्याच उमेदीने हसत मुखाने करीत आहे. त्यांचे सर्वक्षेत्रातील गेल्या चार तपातील शिष्य आपली भावी पिढीही घोलबासरांकडून घडावी म्हणून त्यांना साकडे घालीतच असते. आणि आपल्या आई-वडीलांच्या अत्यंत आवडत्या घोलबासरांकडे नवीन पिढी आदरणीय भावनेने धडे घेत असते. आपापल्या शिक्षण संस्थात प्राविण्य संपादित असते.
३. कै. गोविंद पांडुरंग कंटक - MA B.Ed
 निवृत्त उपमुख्याध्यापक विद्यामंदीर प्रशाला, मिरज
 गोविंद पांडुरंग कंटक यांचा सांगली जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची. वडील मिरजेच्या भारतभूषण शाळेत शिक्षक होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण F.Y B.Sc पर्यंत केल्यानंतर शिक्षक म्हणून कामास सुरवात. पूर्वी शिक्षक जून ते एप्रिल पर्यंत नोकरीस असत. एप्रिलला शिक्षकाची नोकरी खंडीत होत असे. पगार १० ते १२ रूपये होता. कोणत्याही प्रकारचे स्थैर्य नोकरीत नव्हते. स्वाभिमानी स्वभावामुळे संस्थाचालकाकडे नोकरीची लाचारी न केल्यामूळे ११ शाळात नोकरी करावी लागली. उत्तम अध्यापन, प्रचंड बुध्दीमत्ता व कल्पकता, सतत धडपडण्याची वॄत्ती परंतू स्वभाव थोडा तापट. यामुळे असंख्य अडचणीतून प्रवास. विद्यामंदीर प्रशाला, मिरज येथे नोकरीस आल्यानंतर संस्थेने त्यांची कायम पदावर नियुक्ती केली. उपशिक्षक, पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक म्हणून कार्य केले. नोकरीच्या काळात BA, MA मराठी ह्या पदव्यांचे शिक्षण बाहेरून केले व उच्च श्रेणी मिळवली. सांगलीच्या B.Ed कॉलेजमधून B.Ed कोर्स पूर्ण केला व प्रथम क्रमांकाने पास झाले. ह्या वेळेस देखील ते नोकरी करत होते. मराठी विषयाचे उत्तम अध्यापन करीत असत. परंतू खरी आवड विज्ञानाची.

 त्यामुळे सतत वाचन चिंतन मनन व प्रयोग करण्याची धडपड यांतूनच ते उत्तम विज्ञान शिक्षक बनले. दिवसातील १८ तास ते शाळेत रमत. प्रयोगशाळा हेच त्यांचे घर. ५ वी ते १२ वी पर्यंत सर्व वर्गांना आवडीने ते अध्यापन करीत असत. शाळेमध्ये डॉ. भाभा विज्ञान मंडळाची स्थापना केली व मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांना विज्ञान संशोधक घडविले. तालुका, जिल्हा, राज्य राष्ट्रीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनात अनेक पुरस्कार त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून दिले. त्यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते. शाळेतील शिक्षकांना ते विविध विषयाचे मार्गदर्शन करीत. शैक्षणिक संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन करीत. वेळापत्रकाची पुनर्रचना, शालेय दिनदर्शिका, गुणवत्ता प्रकल्प पाठ्यपुस्तकांचे परीक्षण, ९ वी भूमिती पाठ्यपुस्तकांचे परीक्षण, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांच्या माध्यंमातून विज्ञानाचे अध्यापन अशा शिक्षकांनी सादर केलेल्या प्रबंधास त्यांनी मार्गदर्शन केले. हे प्रबंध राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत निवडले गेले व शिक्षकांना पुरस्कार मिळाले.

 विज्ञान कथा, वैज्ञानिक प्रयोग, वैज्ञानिक उपकरणे यासंबंधीचे मार्गदर्शन  महाराष्ट्रातील असंख्य शाळेत कंटक सरांनी केले. मिरजेत बालबिद्यार्थ्यांची आषाढी दिंडी काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्वाध्याय प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना त्यांनी गुणवान बनविले. मराठी विज्ञान प्रबोधिनीचे ते अध्यक्ष होते. या संस्थेचा आदर्श वैज्ञानिक चा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. निवृत्तीनंतर सावरकर प्रतिष्ठान संचालीत प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केले. स्कॉलरशिप MTS (महाराष्ट्र प्रज्ञाशोध) NTS (राष्ट्रीय प्रज्ञाशोध) या परीक्षांचे ते उत्तम मार्गदर्शक आहेत. विज्ञान प्रदर्शनाचे संयोजक व परीक्षक त्यांनी काम पाहिले. ते अविवाहीत होते.

४. प्रज्ञा प्रबोधिनीचे शिल्पकार गुरुवर्य कै. नामजोशी सर 

नामजोशी सरांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी तासगावला झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही हे काही आप्तेष्टांच्या मदतीने मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत १९३६ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे उच्चशिक्षणाकडे पाठ वळवून नामजोशी सरांना नोकरी करावी लागली. त्यांनी शिकवण्या केल्या. नाईट स्कूलमध्ये शिकवले. शालेय शिक्षणापासूनच त्यांना कुशाग्र, बुद्धिमत्ता यामुळे ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. हे करीत असताना शिक्षकी पेशात कायम राहण्यासाठी ते एस्टीसी झाले. त्यांना पदवी घेण्याची इच्छा असूनही घरच्या जबाबदारीमचळे प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी १९६४ साल उजाडले. शिक्षकी पेशात आवश्यक असलेली बी.एड्. पदवी त्यांनी १९६६ मध्ये मिळवली. १९७५ साली सर सिटी हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी ३८ वर्षे शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सावरकर प्रतिष्ठानची स्थापना केली. सावरकर प्रतिष्ठानमध्ये १९८४ साली प्रथम बालवाडी सुरु केली. त्यानंतर एक एक इयत्ता वाढवीत १० वीची पहिली बॅच बाहेर पडली. पतंगराव कदम आणि सगरे यांच्या मदतीने हायस्कूलला परावानगी मिळवली. नामजोशी सरांनी राष्ट्रीय गुणवत्ता परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी १९८० मध्ये वर्ग सुरु केले. १९८१ मध्ये दहा विद्यार्थ्यांची पहिली तुकडी परीक्षेस बसली. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने पास झाल्यामुळे मुलाखतीसाठी निमंत्रण आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. बारा वर्षात एकूण ३८ विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता मिळवू शकले. या ३८ विद्यार्थ्यात १० विद्यार्थी मागासवर्गीय आहेत.
नामजोशी सरांचे पुढील प्रमाणे गौरव केले गेले.

पटवर्धन हायस्कूल, तासगांव शाळेतर्फे सत्कार

दामुआण्णा केळकर समितीतर्फे सत्कार

सांगली शिक्षण संस्थेचे मान्यतापत्र

कृष्णा व्हॅलीतर्फे सत्कार

दक्षिण महाराष्ट्र दै. केसरीतर्फे सत्कार

नामजोशी सरांनी दोन पुस्तके लिहिली आहेत.

सुविचार संग्रह व सदाचार संहिता.


स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित प्रज्ञा प्रबोधिनी बालवाडी ते आय्. ए. एस्. शिक्षण संस्था विश्रामबाग, सांगली. राष्ट्रीय स्तराच्या व प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांसाठी मानवतायुक्त शैक्षणिक गुणवत्ता.

५. आदर्श समाजसेविका- श्रीमती सुमतीबाई फडके

(मी, श्रीमती सुमतीबाई फडके आणि त्यांच्या वहिनी)
सांगलीतील स्त्रीशिक्षण संस्था, मराठी विज्ञान प्रबोधिनी, निसर्ग प्रतिष्ठान या आणि अशाच सार्वजनिक संस्थांच्या जडणघडणीत ज्यांनी आपले सारे आयुष्य झोकून दिले त्या श्रीमती सुमतीबाई फडके यांचे जीवनचरीत्र सर्वानाच प्रेरणादायी ठरेल. आज आयुष्याची पंचाहत्तरी गाठूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.पुण्याच्या प्रतिष्ठित एस्. पी. कॉलेज आणि टिळक बी. एड. कॉलेज यांतून सन्मानपूर्वक पदवी घेतल्यानंतर सुमतीबाइंनी शिक्षण हेच आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. प्राचार्य सोनोपंत दांडेकर, श्री. म. माटे, के. ना. वाटवे, पु. ग. सहस्त्रबुध्दे इत्यादी दिग्गज बुध्दीवंतांकडून मिळालेली शिकवण आणि प्रा. नरहर कुरुंदकर, ग. प्र. प्रधान, साने गुरुजी, एस्. एम्., नानासाहेब गोरे यांच्या सामाजिक विचारांनी भारून राष्ट्रदलाच्या सच्च्या सेविकेचे व्रत त्यांनी आयुष्यभर स्वत:हून स्वीकारले आहे. विवाहबंधनात न अडकता आईची सेवा, सामाजिक संस्थांचे कार्य आणि मुलांवर चांगले संस्कार हेच त्यांनी आपले सर्वस्व मानले.


साधेपणा, नीटनेटकेपणा, इंग्रजी वाचनाची प्रचंड आवड, भाषांतर तसेच संस्थांच्या कार्याची रेखीव टिपणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. पहाटे पाचला उठल्यापासून विविध इयत्तांतील मुलांच्या अभ्यासातील शंका सोडविणे, घरकाम, बागकाम, वाचन, गीतादर्शन, विज्ञानविषयक लेखांची टिपणे काढणे, वसंत बापट, शांता शेळके, सरोजिनी बाबर यांच्या कविता व श्री. म. माटे यांचे लेख वाचणे यात दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. या वयाच्या लोकांचा सहसा देवाधर्मात वेळ जातो. पण सुमतीबाइंर्ना देवधर्म संस्कारांत कधीच रस वाटला नाही. सूर्य हा एकच देव त्या मानतात व सर्वांना शक्ती व प्रकाश देणे हीच त्याची पूजा अशी त्यांची श्रध्दा आहे. समतेसाठी व न्यायासाठी आंदोलनात कार्यरत राहावे असे त्यांना वाटते.मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, सर्वांनी सामाजिक जाणीव ठेवून व आपली जबाबदारी ओळखून व्यवस्थितपणे काम करावे यावर त्यांचा कटाक्ष असतो.

त्यांचे जीवन म्हणजे सांगलीतील एक ज्ञानदीपच आहे. त्यांचे कार्य असेच चालू राहो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नवे कार्यकर्ते तयार होवोत ही शुभेच्छा !