भारताचे महान वॆज्ञानिक डॉ. विजय भटकर यांच्या मल्टीवर्सिटीचा महत्वाकांक्षी प्रकल्प -
(माहितीपत्रकाचे मराठी रुपांतर)
आविष्कार प्रयोगशाळा (कृतीसत्र)
आविष्कार कृतीसत्राची आखणी प्राचीन गुरुकुल पद्धतीवर आधारलेली आहे.
१. उपयुक्ततेच्या दृष्टीकोनातून शिक्षण
२. सर्वांगीण व समन्वित शिक्षण
३. नेहमीच्या जीवनातील प्रश्नांची उकल
४. परस्पर संवादातून सांघिक शिक्षण
५. वॆयक्तिक मार्गदर्शन
आविष्कार कृतीसत्रासाठी खर्च हा तुमच्या मुलांसाठी केलेली गुंतवणूक आहे.
कोणासाठी?
- इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलामुलींसाठी
केव्हा?
- शाळेच्या वेळात.
कोठे ?
-शाळेमध्येच.
मुले काय शिकतील?
. विविध विषयांच्या अभ्यासक्रमातील ज्ञानाचा उपयोग नेहमीच्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी करतील.
. प्रश्न वा समस्या ओळखणे - त्यावर उपाय शोधणे.
या उपक्रमात का भाग घ्यावा ?
विद्यार्थ्यांना होणारा फायदा
. प्रकल्प आधारित शिक्षण
. चॊकटीबाहेरचा विचार करण्यास उद्युक्त केले जाते.
. नेहमीच्या व्यवहारातील प्रत्यक्ष समस्या ऒळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्याची सवय लागते.
. आत्मविश्वास वाढून प्रदर्शनात प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे शिक्षण मिळते.
. प्रत्यक्ष कृतीचा अनुभव येतो.
. शाळेमध्ये तथा बोर्डाच्या परिक्षेत चांगलॆ यश मिळते.
. तंत्रज्ञानाची गरज व ते क्से वापरायचे याचे ज्ञान होते.
.नवनिर्मिती वा संशोधन करण्याची प्रेरणा मिळते.
.व्यक्तिमत्वात लक्षणीय सुधारणा होते.
कसे?
विचार करायला लावणारे शिक्षण
प्रत्यक्ष कृती करताना होणारे प्रभावी शिक्षण
उपयुक्त साधन बनविण्याचे शिक्षण
e- Electronics इलेक्ट्रॉनिक्स
S- Science विज्ञान
T – Technology तंत्रज्ञान
E- Engineering अभियांत्रिकी
E- Environment पर्यावरण
M-Mathematics गणित
STEM ( विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण व गणित) या जागतिक प्रयोगसंचापेक्षा मोठा आवाका असणारे आविष्कार प्रयोगशाळेचे e-STEEM
एक ते सहा टप्प्यांचा प्रवास व त्याची फलश्रुती
e-STEEM आविष्कार प्रयोगसंचाची माहिती
. इलेक्ट्रॉनिक्स साधनपेटी - १००पेक्षा जास्त प्रकारची साधने
.१०० पेक्षा जास्त उपकरणे तयार करण्यास लागणारी सामुग्री
. पहिली पायरी - चार साधनसंच
. दुसरा पायरी - चार साधनसंच
. तिसरी पायरी - चार साधनसंच
. शिकण्यासाठी लागणारी सर्व माहिती, चित्रे व चलचित्रांचा संच
. पहिली पायरी - इलेक्ट्रॉनिक्सची ऒळख व साधनांची माहिती व त्यांचा नेहमीच्या व्यवहारातील उपयोग
. दुसरी पायरी - व्यवहारातील समस्येतील मूलभूत गोष्टी समजून घेऊन समस्या सोडविणारे उपयुक्त साधन तयार करणे.
. तिसरी पायरी - इलेक्ट्रॉनिक सर्कीटचे डिझाईन, सर्कीट जोडणे व कार्यान्वित करणे
. चॊथी पायरी - डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची ऒळख, स्वयंचलित कार्यपद्धती, जोडणी व स्वयंचलित साधन निर्मिती
. पाचवी पायरी - इंटरनेट संदेशाद्वारे साधनाचे कार्य, आभासी परिसर व त्यात कार्य करणार्या साधनांची निर्मिती
. सहावी पायरी - रॉकेट व उपग्रह तंत्रज्ञान
वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटरतर्फे हे कोर्सेस शालेयस्तरावर आयोजित करण्याचे नियोजन असून सांगली - कोल्हापूर परिसरातील सर्व शाळांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. अधिक माहितीसाठी info@dnyandeep.net या मेलवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment