सांगलीतील नवनिर्मिती चळवळीचे समन्वयक वालचंद कॉलेजचे निवृत्त ज्येष्ठ प्राध्यापक भालबा केळकर यांनी पलूसकर विद्यालयात आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेऊन अनेक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील करायला शिकविले.
दिवाळी आली की मुलांना सुट्टी असते. पूर्वी अशावेळी रोषणाई,आकाशकंदील, किल्ला अशा विविध गोष्टीत मुले रममाण होत. आता या सर्व गोष्टी बाजारात मिळत असल्याने पालकांचा ओढा अशा वस्तू विकत घेण्याकडे असतो. घरात कचरा करायला त्यांना आवडत नाही व मुलांबरोबर अशा कामात सहभागी होण्यास त्यांना वेळ नसतो. साहजिकच मुलांच्या उपक्रमशीलतेला वाव मिळत नाही.
प्रा. केळकरांनी नेमकी हीच गोष्ट ओळखून हा अभिनव उपक्रम केला. मुलांचा उत्साह, कृतीशीलता व आनंद या फोटोत स्पष्ट दिसत आहे.
प्रसारमाध्यमांनी याची दखल घेऊन हा अभिनंदनीय उपक्रम प्रकाशात आणला आहे. पलूसच्या शाळेप्रमाणे इतर शाळांनीही सांगलीत सुरू झालेल्या नवनिर्मिती चळवळीत सहभागी व्हावे असे वाटते.
दिवाळी आली की मुलांना सुट्टी असते. पूर्वी अशावेळी रोषणाई,आकाशकंदील, किल्ला अशा विविध गोष्टीत मुले रममाण होत. आता या सर्व गोष्टी बाजारात मिळत असल्याने पालकांचा ओढा अशा वस्तू विकत घेण्याकडे असतो. घरात कचरा करायला त्यांना आवडत नाही व मुलांबरोबर अशा कामात सहभागी होण्यास त्यांना वेळ नसतो. साहजिकच मुलांच्या उपक्रमशीलतेला वाव मिळत नाही.
प्रा. केळकरांनी नेमकी हीच गोष्ट ओळखून हा अभिनव उपक्रम केला. मुलांचा उत्साह, कृतीशीलता व आनंद या फोटोत स्पष्ट दिसत आहे.
No comments:
Post a Comment