( Ref: https://en.wikipedia.org/wiki/San_Francisco_Bay_Area)
अमेरिकेच्या पश्चिम कडेला कॅलिफोर्निया स्टेट आहे. तेथे सॅन फ्रान्सिस्को शहराच्या दक्षिणेला असलेल्या बे एरिया ( खाडीमुळे तयार झालेले खोरे) प्रदेशाला सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. कारण येथे सिलिकॉन चिपवर आधारित संगणक क्रांतीला प्रारंभ झाला. इ. स. २००० च्या सुमारास येथे अनेक संगणक कंपन्या उदयास आल्या. एच. पी,, इंटेल, य़ाहू, गुगल, फेसबुक, आय.बी.एम., मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अडोब, ओरॅकल या व अशा कंपन्यांचे आश्रयस्थान असणारी ही सिलिकॉन व्हॅली आजही संपूर्ण जगभरातील तरुण आयटी कर्मचारी आणि व्यावसायिक उद्योजकांचे स्वप्नस्थान बनले आहे. परंतु बहुतेक लोकांना या स्थानाबद्दल फारच त्रोटक माहिती असते.
ज्ञानदीप फाऊंडेशनने www.mysangli.com आणि www.mykolhapur.net यासारख्या स्थानिक माहिती मराठीतून देण्यासाठी वेबसाईट डिझाईन केल्या. त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मी स्वत: आता या सिलिकॉन व्हॅलीत कायमचा राहण्यास आलो असल्याने या भागासाठीही अशी बहुभाषिक वेबसाईठ करण्याचे ज्ञानदीपने ठरविले आहे.
वेबसाईटच्या नावाला my हा प्रत्यय जोडण्यामागे एक विशेष अर्थ अभिप्रेत आहे जे सिलिकॉन व्हॅलीचे रहिवासी झाले आहेत वा होणार आहेत त्यांना स्थानिक रहिवाशांप्रमाणेच या जागेबद्दल आत्मियता निर्माण व्हावी अभिमान वाटावा असा उद्देश मायसिलिकॉनव्हॅली या नावात आहे.
बे एरियाबद्दलची माहिती संकलित करणे ही कल्पना आहे. येथे लोकप्रिय असलेल्या बहुतेक वेबसाईट आयटी आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित आहेत. त्यांच्याकडे व्यवसाय आणि व्यावसायिक उपक्रम आणि संस्थांची भरपूर माहिती आहे. काही साईट धार्मिक किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक गटांमध्ये विभाजित असलेल्या वा विशिष्ट देशांसाठी आहेत.
व्याप्ती - आयटी आणि व्यवसाय यांच्या माहितीशिवाय येथील पर्यावरण आणि संस्कृतीची ओळख येथे येणार्या वा येऊ इच्छिणार्या लोकांना होण्यासाठी स्थलांतरित लोकसंख्येवर विशेष लक्ष देऊन बे एरियाच्या सर्व बाह्य रहिवाशांना आवश्यक माहिती त्यांच्या भाषेतून नेटद्वारे मिळविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे. सुरवातीच्या काळात इंग्रजी भाषेत सर्व माहिती दिली जाईल . नंतर टप्याटप्याने प्रतिसाद पाहून इतर भाषातून माहिती दिली जाईल .
उद्देश -
१. बे एरियामधील सर्व स्थलांतरितांचा जलद गतीने स्थानिक रहिवाशांमध्ये समावेश व्हावा यासाठी पोषक वातावरण तयार करणे. जेणेकरुन त्यांना स्थानिक रहिवाशांचा दर्जा मिळेल,
2. स्थलांतरितांना रोजच्या जीवनात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे. तसेच इतिहास, भूगोल, पर्यावरण, प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या सुविधांबद्दल त्यांना माहिती देणे.
वेबसाइटचे प्रस्तावित मुख्य विभाग
1. अमेरिका, कॅलिफोर्निया, बे क्षेत्र आणि त्याची सिलिकॉन व्हॅली ओळख इतिहास आणि भौगोलिक माहिती - स्थान, आकारमान, लोकसंख्या इत्यादी
2. भूगर्भ रचना, पाणी, माती, हवामान, पर्यावरण आणि बदलणारे ऋतू
3. वनस्पती आणि झाडे, वन्य प्राणी
4. रस्ते आणि इमारती, वाहतूक व्यवस्था
5. काउंटी (शहरसमूह) आणि त्यांचे प्रशासन
6. पाणी पुरवठा, घनकचरा, विद्युतपुरवठा
7. रुग्णालये, शाळा, ग्रंथालये, शासकीय. कार्यालये, मनोरंजन केंद्रे, दुकाने आणि मॉल
8. स्थानिक आणि क्षेत्रीय समस्या.
9. अभिप्राय आणि अभ्यागत मंच
मी वरील मुद्द्यांविषयी काही मूलभूत माहिती संकलित केली आहे, (त्यावर येथे इंग्रजी भाषेत ब्लॉगही पूर्वी प्रसिद्ध केले आहेत.) परंतु प्रस्तावित वेबसाईटच्या व्याप्ती आणि उपयुक्ततेबद्दल सूचना आणि माहिती अवश्य कळवावी.
मला आशा आहे की या वेबसाईटने ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फाऊंडेशनच्या प्रगती आणि सहकार्यासाठी नवीन कार्यक्षेत्र खुले होईल.
No comments:
Post a Comment