Wednesday, December 19, 2018

ज्ञानदीपचे नवे आयफोन अॅप - संस्कृत-व्याकरण iOS App ज्ञानदीपचे नवे आयफोन अॅप -   संस्कृत-व्याकरण सौ. सुमेधा गोगटे (अमेरिका) यांनी विकसित केले असून त्यात ज्ञानदीपच्या माजी संचालिका  व संस्कृत शिक्षिका कै. सौ. शुभांगी रानडे यांच्या आवाजातील ध्वनीफितीँचा समावेश केला आहे.

   ज्ञानदीपचे नवे आयफोन अॅप -   संस्कृत-व्याकरण iOS App


संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी नाम, सर्वनाम यांची विभक्तीरूपे आणि धातूंची कालार्थ रुपे यांचा अभ्यास आवश्यक असतो. प्रत्येक नाम विभक्तीत एकवचन, द्विवचन व बहुवचन अशी प्रथमा ते संबोधन पर्यंत २४ रुपे असतात. नामांचे स्वरान्त व व्यंजनान्त असे अनेक प्रकार असून पुंलिंगी, स्त्रीलिंगी व नपु. लिंगी रुपे वेगवेगळीआहेत. सर्वनामांच्या बाबतीत प्रथमा पासून सप्तमीपर्यंत २१ रुपे असतात.

संस्कृत धातू दहा गणात विभागले असून त्यांची एकूण संख्या सुमारे २००० आहे, या धातूंची वर्तमानकाळ, प्रथम भूतकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थ अशी कालार्थ रुपे तीन वचनात व प्रथम पुरूष, द्वितीय पुरूष व तृतीय पुरूष अशा प्रकारात वेगवेगळी असतात.

शब्दरूपे करण्याचे नियम असले तरी अ्शी रुपे पाठ करणे अधिक सोयीस्कर असते. त्यांचे उच्चार समजणेही गरजेचे असते. या ऍपमध्ये सर्व प्रमुख नामे, सर्वनामे व धातू यांची रूपे ध्वनीफितींसह दिलेली आहेत,
हवा तो शब्द वा धातू निवडण्याची सोय यात केली आहे.
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, निवडण्याची सोय यात केली आहे.
Other_iOS_apps_of_Dnyandeep


No comments:

Post a Comment