Tuesday, July 3, 2018

शालेय शिक्षणास वाहून घेतलेले नवनिर्माते प्रशांत देशपांडे

वालचंद कॉलेजचे माजी विद्यार्थी व राजारामबापू इंजि. कॉलेजचे माजी प्राध्यापक प्रशांत देशपांडे यांनी पूर्ण वेळ शालेय शिक्षण व्यवस्थापनाचे काम हाती घेतले आहे. हे कळल्यामुळे त्यांचे अनुभव व विचार ऎकण्यासाठी प्रा. भालबा केळकर, अरविंद यादव यांचेबरोबर आम्ही  इस्लामपूर येथील आदर्श बालक मंदिर या शाळेजवळील त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

वाळवा तालुक्यात उरूण इस्लांपूर परिसरातील ग्रामीण भागामध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या, एका क्रांतीकारकाच्या विचारातून साकार झालेले शैक्षणिक संकुल पारतंत्र्याच्या काळात ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ हे सत्य जाणलेल्या रामनामे गुरूजींच्या विचारातून साकार झालेले शिक्षण शिल्प म्हणजे ‘आदर्श बालक मंदिर’. नावातच ज्यांच्या ‘राम’ आहे आणि कर्माने सुध्दा रामरूप असलेल्या आण्णांनी या शैक्षणिक संकुलाची मुहूर्तमेढ रोवली.

 प्रथम पहिली ते चौथी, नंतर ५ वी ते ७ वी व त्यानंतर ८ वी ते १० वी अशी हळूहळू प्रगतीचे एकापेक्षा एक टप्पे पुढे सरकत प्रत्येक वर्गाच्या ६-६ तुकडया पर्यंत पोहोचलेले हे शैक्षणिक संकुल. संकटाला, अडचणीला तोंड देत आज इतक्या विस्तृत स्वरूपात उभे करण्याचे श्रेय़ प्रा. देशपांडेंचे वडील कै.प्रल्हाद हरी देशपांडे यांचेकडे जाते. त्यांचेच कार्य पुढे चालविण्याचे व्रत प्रशांत देशपांडे यांनी घेतलॆ आहे.




तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे सचिव या नात्याने आदर्श बालक मंदिर आणि इतर आठ शाळांमध्ये  आदर्श शिक्षणपद्धती विकसित करण्यासाठी   सुरू केलेल्या  योजनांची त्यांनी माहिती दिली. त्यापॆकी एक म्हणजे दरवर्षी एक विषय घेऊन आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणे. उदाहरणादाखल ’ कडधान्ये’ हा विषय घेतला की त्याची माहिती संकलन, कडधान्यांची शेती करण्यासाठी लागणारी जमीन, हवामान, खते, त्याचे अर्थकारण , प्रत्यक्ष शेतीचे प्रयोग, त्यावरच आधारित नाटक, प्रदर्शन, कडधान्यांच्या खाद्यपदार्थांची स्पर्धा  असे विविध कार्यक्रम वर्षभर  घेतले जातात. दरवर्षी नवा विषय निवडला जातो.  विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व नवनिर्मितीची बीजे रोवण्याचे त्यांचे कार्य पाहून आम्ही प्रभावित झालो.

इंजि. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीमध्ये नवनिर्मिती कशी करता येते याचे प्रशिक्षण दिले. अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू अशा सजीव विकासाच्या पायर्‍या असतात. त्याप्रमाणॆ समस्या जाणून घेण्यापासून ऒद्योगिक दर्जाच्या उपयुक्त साधन निर्मितीपर्यंत असणार्‍या  विविध टप्प्यांची माहिती होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडून नवे तांत्रिक प्रकल्प करवून घेतले. कांदा कापायचे मशीन. दही लावण्याचे उपकरण  इत्यादी पेटंट मिळवून देणारी साधने विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली. त्यांचे याबाबतचे अनुभव त्यांच्याच शब्दात ऎका,



आम्ही सुरू करीत असलेल्या नवनिर्मिती केंद्राची कल्पना त्यांना आवडली. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे व त्यांची शाळा या कार्यात इस्लामपूर परिसरातील स्थानिक  केंद्र म्हणून कार्य करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले.

4 comments:

  1. Great work pro. Prashant Deshpande sir

    ReplyDelete
  2. Great work pro. Prashant Deshpande sir

    ReplyDelete
  3. Great gob pro prashant Deshpande sir

    ReplyDelete
  4. Prashant Best of Luck
    Feeling proud of being friend of you

    ReplyDelete