Thursday, August 2, 2018

पलु्सकर शाळेमध्ये अटल इनोव्हेशन लॅब

पलूस येथील पंडित विष्णु दिगंबर पलु्सकर शाळेमध्ये अटल इनोव्हेशन लॅबचे उद्‌घाटन प्रसिद्ध उद्योगपती व वालचंद कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री. अरविंद देशपांडे यांचे हस्ते झाले अशी बातमी वाचली. सांगली जिल्ह्यातील अटल लॅब सुरू करण्याचा पहिला मान मिळवणारी शाळा तसेच अटल लॅब पाहण्यासाठी प्रा. भालबा केळकर, श्री. अरविंद यादव आणि मी पलूसला गेलो. इस्लामपूरचे प्रा. प्रशांत देशपांडेही मुद्दाम आमच्यासाठी तेथे आले होते.

तेथे पलुसकर शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट उदय परांजपे आणि शाळेच्या कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी आमचे स्वागत केले. सकाळी १२ वाजता तेथे पोचणार असे आम्ही कळविले होते. मात्र आम्हाला पावसामुळे जवळजवळ एक तास उशीर झाला तरी सर्वजण आमच्यासाठी थांबले होते.  श्री. परांजपे यांनी शाळेच्या प्रगतीची तसेच अटल लॅब उभारण्यासाठी शाळेने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.  ’शिक्षणविचार’ नावाचे महाराष्ट्रातील शिक्षणतज्ञांचे लेख असलेले एक बहुमोल पुस्तक व शाळेची रॊप्य महोत्सवी स्मरणिका  भेट देऊन त्यांनी आमचे स्वागत केले.

अटल लॅबसाठी आवश्यक असणारा अद्ययावत प्र्शस्त हॉल, भिंतीवरीलअटल इनोव्हेशन मिशनचे तक्ते, तसेच प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांची  आकर्षक मांडणी पाहून आम्ही भारावून गेलो. आपण पुन्हा विद्यार्थी होऊन या शाळेत प्रवेश घ्यावा व येथे प्रयोग करावेत असा विचार मनात चमकून गेला.

भारत सरकारने या अटल लॅबसाठी १० लाख रुपयांची ग्रँट दिली आहे. यात प्राथमिक इलेक्ट्रॉनिक सर्किट त्यार करण्यासाठी लागणारे ब्रेडबोर्ड, युएसबी केबल्स, रेझिस्टन्स, कपॅसिटन्स,बॅटरी या साधनांशिवाय विविध सेंसॉर्स, पंप, सोल्डरिंगची साधने, एलसीडी डिस्प्ले बोर्ड, अर्ड्युनो, रासबेरी पाय यासारखे मायक्रो~कॉम्प्युटर्स, थ्रीडी प्रिंटीग मशिन. ड्रोन व रोबोटिक साधने निर्माण करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आहे.


दरवर्षी १० लाख रु. याप्रमाणे पाच वर्षे ही ग्रँट मिळणार असून परिसरातील शाळांना याचा वापर करता येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या प्रायोगिक सोयी उपलब्ध करून देऊन नवसंशोधनासाठी प्र्वृत्त करण्याचा शासनाचा हा प्रयत्न खरोखरीच कॊतुकास्पद आहे.

सर्व उपकरणांची पाहणी करून झाल्यावर एकत्र बसून आम्ही या लॅबच्या कार्याविषयी चर्चा केली. तेव्हा असे आढळून आले की हे प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था शाळेला आपल्या खर्चाने करावी लागणार आहे. शाळेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जोडणीचे ज्ञान शिक्षकांना नाही. बाहेरचे तंत्रज्ञ नेमण्यासाठी ग्रँट नाही. परिणामी ही सर्व प्रयोगशाळा केवळ प्रदर्शनीय म्हणून राहण्याची शक्यता आहे. शाळेला आपल्या शिक्षकांनाच प्रशिक्षित करून ही प्रयोगशाळा चालवावी लागणार आहे. शिवाय इतर शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

 ज्ञानदीप फॊंडेशन अशी सेवा पुरवण्यासाठीच   सर्वांच्या सहकार्याने नवनिर्माण व उद्योजगतेचे केंद्र उभारणार आहे. 

No comments:

Post a Comment