कार्पोरेट गव्हर्नन्स या विषयावर ट्रेनिंगचा एक व्हिडिओ पाहिला. स्लाईड शो अगदी छान व आकर्षक केल्याने मला तो आवडला आणि तसा करायला शिकण्यालाठी मी तो डाऊनलोडही केला.
पण त्या पहिल्याच स्लाईड शोमध्ये सत्यम् कंपनीतील गैरव्यवहाराचे उदाहरण पाहून मनस्वी खेद वाटला. आपली जागतिक बाजारपेठेत पत निर्माण करायच्याऐवजी आपल्या उद्योजकांच्या चुका आणि गैरव्यवहार यांना जे जागतिक प्रचाराचे स्वरूप दिले जात आहे. त्याचा जागतिक गुंतवणूकदारांवर आणि भारतीय उद्योगजगताबाबत विपरीत परिणाम होत आहे असे मला वाटते.
अर्थात आपल्या प्रसारमाध्यमांना आणि राजकीय पक्षांना आवडणारी राजू, मल्या, मोदी, डीएसके इत्यादी उद्योजकांच्या गैरव्यवहारांची उदाहरणे आपल्याला नियमितपणे वाचायला मिळतात. चांगल्या उद्योगांबाबत मात्र फारशी आपल्याला माहिती नसते.
परकीय कंपन्यांनी भारतातील बाजारपेठ काबीज केली हे पाहून भारतातील सामाजिक आणि राजकीय संघटना परदेशी मालावर बहिष्काराचे आवाहन करीत आहेत सत्तधा-यांना कोंडीत पकडण्यासाठी विदोधकांनाही एक आयते हत्यार मिळाले आहे. परदेशी वस्तूंची विक्री कमी होण्यात याचा प्रत्यक्ष परिणाम फारच कमी होत असताना दिसत आहे. याचे कारण पर्यायी भारतीय वस्तू एकतर उपलब्ध नाहीत वा महाग व तेवढ्या गुणवत्तेच्या नाहीत. याचा अर्थ आपल्याकडे गुणवत्ता नाही असे नाही पण भारतीयांची निवड गुणवत्तेपेक्षा किंमतीवर अवलंबून असते. काटकसरीच्या दृष्टीने हे स्वाभाविकच आहे. शिवाय उत्तम गुणवत्तेच्या वस्तू बनविण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि जबाबदेही व्यवस्थापन प्रणाली यांची सोय करणे भारतीय उद्योजकांना भांडवलाच्या कमतरतेमुळे शक्य होत नाही.
संपन्न परदेशात आपला माल विकला व प्रकल्प केले तरच भारतीय उद्योगाची खरी प्रगती होऊ शकेल. यासाठी कमी व्याज दराने बॅंकांकडून पतपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र भारतात बॅंकांचे व्याजदर खूप जास्त आहेत. येथील ठेवीदारही कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार होत नाहीत. व्याजावर व्याज वाढत जाऊन उद्योग फायद्याकडून तोट्याकडे वेगाने जात असतो. शेअरचे भाव मात्र इतर अनेक कारणांनी वरखाली होत अमतात. शेअरचा भाव कमी होण्यात परदेशी स्पर्धक कंपन्या आणि राजकीय विरोधही कारणीभूत ठरू शकतो. परदेशी अनेक कंपन्या कमी व्याजदराचे आमिष दाखवून भारतीय उद्योगांचा कबजा घेतात. राजकीय पक्ष उद्योगांकडे मिळकतीचे साधन म्हणून पाहतात. उद्योग सांभाळण्याच्या कसरतीत काही उद्योजक कायदेशीर पळवाटा, भ्रष्टाचार आणि जमाखर्चात हेराफेरीसारख्या अवैध मार्गांचा उपयोग करतात. पण त्याचे हे क़त्य लपून रहात नाही व सर्व उद्योगच विनाशाच्या खाईत लोटला जातो.
परदेशी बहुराष्ट्रीय कंपम्यांचा सर्व कारभार लोरांच्या पैशावर चालसेला असतो. शेअर कोसळला तरी उद्योगाच्या क्रमुखाला लोरांच्या रोषाला सामोरो जावे लागत नाही अनेक इतर देश व गुंतवणूकदार त्यात पैसा गुंतवितात. उद्योगाचा प्रमुख दुस-या एखाद्या कंपनीत जॉईन होतो. एकूण हा सर्व व्यवहार एखाद्या जुगारी खेळासारखा असतो. यात भारतीय उद्योदकांना भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यामागे भक्कम पैसा, शासकीय पाठिंबा आणि भारतीयांचा त्यांच्यावर असणारा विश्वास यांची गरज आहे.
आपल्याकडे परदेशात उद्योग काढण्याचा प्रयत्न करणारे बहुतेक सर्व अपराधी ठरले आहेत. त्यामुळे नवीन कोणी यासाठी पुढाकार घेत नाही. शासनाने भांडवलाची हमी घेऊन चांगल्या उद्योजकांना आपले पाठबळ दिले आणि चीनसारख्या विस्तारवादी तंत्राचा अवलंब केला तरच हे शक्य होईल. मग परदेशी सुटा माल घेऊन तयार वस्तू जास्त किंमतीत जगभर विकता येतील. परदेशातील कंपन्यांनी भारतीयांना नोकरी द्यावी असा प्रयत्न न करता परदेशात आपले उद्योग उभे करून तेथील लोकांना आपले कर्मचारी म्हणून नेमायची ताकत भारतीय कंपन्यांत तेव्हाच येऊ शकेल.
No comments:
Post a Comment