कोरोना नामक विषाणू किंवा भयाणुचा झालेला विश्व्यव्यापी प्रादुर्भाव आज आपण सारेच अनुभवत आहोत.
‘हे विश्वची माझे घर’
इतका व्यापक विचार मांडण्याची मानसिकता आणि ताकद असणाऱ्या संस्कृतीचे वारसदार असणाऱ्या आपणा सर्वांवर आज
‘हे घरची माझे विश्व’ म्हणून स्वत:ला घरातच कोंडून घेण्याची वेळ आली आहे.असो. यालाच इष्टापत्ती समजून व या कम्पल्सरी एकांताचा सदुपयोग करून थोडेसे लाउड थिंकिंग करूया असा विचार मनात आला आणि म्हणूनच ही मांडणी....
सध्याच्या या GLOBAL LOCKDOWN ची व्यापकता,तीव्रता वर्तमानात महाप्रचंड,सर्वव्यापी आहेच पण त्याशिवाय भाविष्यातही या संकटाचा दीर्घकालीन ‘चटका’ विश्वाला बसणार आहे हे निश्चित.तो परिणाम इतका चिरस्मरणीय असू शकतो की यापुढे काळाची मांडणी BC म्हणजेच ‘बिफोर करोना’ आणि AC म्हणजेच ‘आफ्टर करोना’ अशी बहुधा होऊ शकते.एकूण जागतिक स्तरावर मानवी व्यवहारांच्या सर्व आयमांमध्ये अमुलाग्र बदल करण्याची ताकद या ‘करोनासुरात’आहे असेच म्हणावे लागेल.
भाषणातील काही महत्वाचे मुद्दे -
आधुनिक मानवाला निसर्गाने ‘शहाणे’ होण्यासाठी दिलेली एक संधी..
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्
॥
हा विचार प्रकट झाला तो काळ भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळ होता
आणि अश्यावेळी हा भाव भारतीयांनी प्रकट केला होता हे विशेष
आज संपूर्ण जगाला काही मुठभर विकसित राष्ट्रांनी वेठीस धरले आहे.
विकासाच्या पाश्चात्य संकल्पना सर्वांच्या माथी मारल्या आहेत
आणि त्या आधारे विकसित..विकसनशील..अविकसित अशी अपरिवर्तनीय कायमस्वरूपी मांडणी केली आहे.
इतिहासात सर्वार्थाने विकसित असणारा आपला देश खरेतर जन्मजात उद्योजक आहे.
वैयक्तिक दैनंदिन जीवनशैली परिवर्तन..
स्वच्छता/सामाजिक आरोग्य संकेत/आरोग्य कीट बाळगण्याची सवय
वैयक्तिक आरोग्य संबंधी परिवर्तन...आयुर्वेद/योग
वैयक्तिक उद्योग निवड परिवर्तन
वैयक्तिक उद्योग/नोकरी....EXIT POLICY
आहार निवड परिवर्तन
समुपदेशन व्यवस्था
भविष्य निर्वाह योजना परिवर्तन (Short Term/Long Term)/आरोग्य विमा
भविष्यातील योजना निर्णय परिवर्तन
उदयोग व्यवस्था परिवर्तन..कारखाने/बँक/व्यापार/पर्यटन/रिअल इस्टेट
परिवहन व्यवस्था परिवर्तन...सार्वजनिक/खाजगी (प्रदूषण)
JUST IN TIME .....IN HOUSE PRODUCTION.....INVENTARY
आरोग्य व्यवस्था परिवर्तन ...खाजगी/सरकारी
सुरक्षा परिवर्तन....देशांतर्गत/अंतररार्ष्ट्रीय
सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने..NRC , चा आग्रह
ONLINE व्यवहार/व्यापार काळाची गरज
ONLINE शिक्षण व्यवस्था काळाची गरज
स्वयंपूर्ण छोट्यात छोटे SOCIAL युनिट निर्मितीचे ध्येय (बाराबलुतेदार) पंचक्रोशी
शेतीमाल वितरण व्यवस्था परिवर्तन
सर्वच बाबतीत विकेंद्रीकरण विचार
स्वदेशीचे पुनरागमन
नवीन उद्योग संधी
त्यांचे हे विचार खरोखरच भारतीयांना आपल्या स्वसामर्थ्याची जाणीव करून देणारे, आश्वासक आणि वैयक्तिक जीवनशैलीत काय बदल करणे आवश्यक आहे याचे मार्गदर्शन करणारे आहेत.
No comments:
Post a Comment