Sunday, June 28, 2020

प्रज्ञा प्रबोधिनीचे शिल्पकार गुरुवर्य नामजोशी सर

नामजोशी सरांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी तासगावला झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही हे काही आप्तेष्टांच्या मदतीने मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत १९३६ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे उच्चशिक्षणाकडे पाठ वळवून नामजोशी सरांना नोकरी करावी लागली. त्यांनी शिकवण्या केल्या. नाईट स्कूलमध्ये शिकवले.

शालेय शिक्षणापासूनच त्यांना कुशाग्र, बुद्धिमत्ता यामुळे ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. हे करीत असताना शिक्षकी पेशात कायम राहण्यासाठी ते एस्टीसी झाले. त्यांना पदवी घेण्याची इच्छा असूनही घरच्या जबाबदारीमचळे प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी १९६४ साल उजाडले. शिक्षकी पेशात आवश्यक असलेली बी.एड्. पदवी त्यांनी १९६६ मध्ये मिळवली. १९७५ साली सर सिटी हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले.

त्यांनी ३८ वर्षे शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सावरकर प्रतिष्ठानची स्थापना केली. सावरकर प्रतिष्ठानमध्ये १९८४ साली प्रथम बालवाडी सुरु केली. त्यानंतर एक एक इयत्ता वाढवीत १० वीची पहिली बॅच बाहेर पडली. पतंगराव कदम आणि सगरे यांच्या मदतीने हायस्कूलला परावानगी मिळवली. नामजोशी सरांनी राष्ट्रीय गुणवत्ता परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी १९८० मध्ये वर्ग सुरु केले.

१९८१ मध्ये दहा विद्यार्थ्यांची पहिली तुकडी परीक्षेस बसली. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने पास झाल्यामुळे मुलाखतीसाठी निमंत्रण आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. बारा वर्षात एकूण ३८ विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता मिळवू शकले. या ३८ विद्यार्थ्यात १० विद्यार्थी मागासवर्गीय आहेत.
नामजोशी सरांचे पुढील प्रमाणे गौरव केले गेले.
  • पटवर्धन हायस्कूल, तासगांव शाळेतर्फे सत्कार
  • दामुआण्णा केळकर समितीतर्फे सत्कार
  • सांगली शिक्षण संस्थेचे मान्यतापत्र
  • कृष्णा व्हॅलीतर्फे सत्कार
  • दक्षिण महाराष्ट्र दै. केसरीतर्फे सत्कार

नामजोशी सरांनी दोन पुस्तके लिहिली आहेत.
  • सुविचार संग्रह व सदाचार संहिता.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित प्रज्ञा प्रबोधिनी बालवाडी ते आय्. ए. एस्. शिक्षण संस्था विश्रामबाग, सांगली. राष्ट्रीय स्तराच्या व प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांसाठी मानवतायुक्त शैक्षणिक गुणवत्ता.
'

No comments:

Post a Comment