Friday, October 30, 2020

छोट्या डबीत मावणारे सूक्ष्म गीतरामायण

 सांगलीतील कै. रा. ग आपटे यांनी छोट्या डबीत मावेल एवढ्या सूक्ष्म आकारात स्वहस्ते  गीतरामायणाचे पुस्तक लिहून आपले नाव कलाक्षेत्रात अजरामर केले आहे.

श्री. रा. ग. आपटे माझ्या आत्तेबहिणीचे पती. घरीबामुळे कोकणातून  सांगलीत येऊन  गाडगीळ सराफ यांचे घरी आश्रित म्हणून रहावयास आले. शिक्षण पूर्ण करून गाडगीळ यांच्या सराफी दुकानात विक्री आणि जमाखर्च करीत आपले आयुष्याची उमेदीची वर्षे त्यांनी व्यतीत केली. सचोटी, सालस आणि सात्विक स्वभावामुळे त्यांनी  दुकानात मालक आणि ग्राहक दोहोंचा विश्वास संपादन केला होता. 

त्यांचे अक्षर सुवाच्च होते. घरी कलाकुसरीच्या वस्तू आणि चित्रे काढण्याचा त्याना छंद होता. गीतरामायणाची लोकप्रियता पाहून त्याना याची सूक्ष्म अक्षरांत हस्तलिखित प्रत करण्याची कल्पना सुचली. तग प्रत्यक्षात आणल्यावर ज्ञानदीपने आपल्या मायमराठी वेबसाईटवर त्याची बातमी प्रसिद्ध  केली आणि आपटे प्रसिद्धीच्या झोतात आले. 

 

 
वरील फोटोत या गीतरामायणातील एक पान मोठे करून दाखविले आहे. त्यावरून त्यांच्या हस्ताक्षराची आणि इतक्या लहान आकारात आपली लिहिण्याची पद्धत कायम ठेवलेली दिसते.

पुढे ते पुण्यातील सराफी दुकानात कामास लागले. गाडगीळ सराफांनी त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त चांदीची गीतरामायणासाठी डबी देऊन त्यांचा सत्कार केला. दोन वर्षांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. आता त्यांच्यामागे त्यांचा मुलगा राजेंद्र पुण्यात संगणक क्षेत्रात काम करीत आहे. त्याचेकडे हे गीतरामायण आपणास पहावयास मिळेल.

No comments:

Post a Comment