Friday, October 16, 2020

आजचा विद्यार्थी घडवायची वस्तू नसून ग्राहक आहे

 सध्याची शिक्षणपद्धती विद्यार्थ्याला कच्चा माल समजून त्याचे उपयुक्त विक्रीयोग्य वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या उद्योगाचे अनुकरण आहे.

मात्र इंटरनेटमधील क्रांतीने ज्ञानाची कवाडे आता सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध झाल्याने ठराविक अभ्यासक्रम शिकवून पदवी देण्याचा अधिकार प्राप्त केलेल्या शाळा कॉलेजपुढे एक गंभीर समस्या उभी राहिली आहे.
ज्ञानाच्या कक्षा आणि खोली यात विलक्षण वेगाने वाढ होत आहे. हजारोच नव्हे तर लाखो नवे शोध लागत आहेत आणि जुने ज्ञान रद्दबातल होत आहे. अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकावर अवलंबून असतो. पाठ्यपुस्तके संदर्भ ग्रंथांवरून तयार केली जातात. संदर्भ ग्रंथातील ज्ञान जुने असते.

संशोधन मासिके व जर्नल यातील लेखही तीन चार महिन्यांपूर्वी लिहिलेले असतात. वृत्तपत्रातील माहिती त्रोटक व दिखावू असते. 

 प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक शिक्षक आपापल्या विषयातील ज्ञान देतात पण विद्यार्थ्याला प्रत्यक्षात यातील एखादेच आणि फार खोलातील थोडेच ज्ञान वापरावे लागते. मात्र या ठिकाणी त्याला संशोधन वा बारकावे यांचे ज्ञान पुन्हा घ्यावे लागते.

 इंटरनेटवर बरेचसे ज्ञान बाजारू स्वरुपाचे असते.

प्रत्यक्ष उपयुक्त ज्ञान व्यावसायिकांकडूनच मिळू शकते. गायल, नाट्य, चित्रकला यासारख्या विषयात तर गुरूचे अनुकरण करूनच शिकता येते.

ज्ञानदीप फौंडेशनने याच दृष्टीकोनातून विद्यार्थी हा ग्राहक धरून त्याला शिक्षणाचा अधिकार देऊन उद्यौगक्षम बनविण्याचा ऑनलाईन कोर्स प्रायौजित केला आहे.

अधिक माहितीसाठी ज्ञानदीपच्या dnyandeep.net या वेबसाईटला भेट द्या.

 



No comments:

Post a Comment