Sunday, October 25, 2020

विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 राक्षसांचा राजा दुर्गासूर यानं तप करून ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला की, `त्रिभुवनात तुला कोणीही वीर पुरूष जिंकू शकणार नाही. या वरामुळे दुर्गासुर एवढा प्रबल झाला की, त्याने इंद्र, चंद्र, वरूण, व यम यांना बंदी केले.' अखेर दुर्गासुराच्या वधासाठी पार्वतीने वेगळे रूप घेतलं व त्या रूपाला `विजया' असे नांव दिले. तिला विविध शस्त्रांनी सज्ज केले. शंकराने आपला त्रिशुळ दिला. विष्णुने आपले सुदर्शन चक्र व कवच दिले. अशाप्रकारे प्रत्येक देवाने आपली वेगवेगळी शस्त्रे दिली.

 ही सर्व शस्त्रे पेलण्यासाठी पार्वतीने आठ बाहू धारण केले. या अष्टभुजा धारण केलेल्या पार्वतीने नऊ दिवस लढून दहाव्या दिवशी दुर्गासूराचा नाश केला. सगळीकडे आनंद झाला. तो आनंद प्रकट करण्याकरिता नवरात्र व दसरा साजरा करतात.

आपणही एकत्रितपणे आयटी क्षेत्रातील आधुनिक शस्त्रे  प्राप्त करून परकीय आक्रमणावर विजय मिळविण्याचा संकल्प करूया. 

सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून ज्ञान व धन लाभाच्या या ज्ञानदीप फौंडेशनच्या नव्या योजनेत सामील व्हावे ही विनंती.
-डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment