Tuesday, October 20, 2020

भडक बातम्यांच्या आतषबाजीत भावी संकटाकडे दुर्लक्ष

 भारतात कोरोना, राजकारण आणि वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी चढाओढीत भविष्यात येऊ घातलेल्या बेरोजगारीच्या महासंकटाकडे सध्या कोणाचेच लक्ष नाही.

 शिक्षण थांबल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. छोटे उद्योगधंदे व दुकाने अनेक दिवस बंद असल्याने कामगारांना आणि वाहतूक व्यवस्था बंद असल्याने इतर सर्व क्षेत्रातील व्यवसाय ठप्प झाले आहेत.


यावर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग  या उक्तीनुसार दिवसरात्र संघर्षाची गरज असताना प्रत्यक्षात करमणूक व  आभासी स्वप्नरंजनात सारी जनता आपला अमूल्य वेळ घालवीत आहे असे दृष्टोत्पत्तीस येते.

पुढील संकटाची जाणीव झालेल्या विचारवंतांनी आणि समाजधुरिणांनी याबाबतीत समाजाचे प्रबोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे.

मी स्वतः अमेरिकेत रहात असलो तरी कायम भारतातील वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनल वरून भारतातील परिस्थितीचा मागोवा घेत असतो व सामूहित बेरोजगारीतून पुढे उदभवू शकणा-या दंगली, गुन्हेगारी वा अराजकतेच्या कल्पनेने अस्वस्थ होतो.

मात्र याही परिस्थितीत  सा-या  जनमानसात स्वयंस्फूर्तीने काही करण्याबाबत असणारी कमालीची उदासीनता पाहून मन विषण्ण होते.

परदेशात राहणारे भारतीयही केवळ आपल्या  नातेवाईकांच्या हितसंबंधांची काळजी करण्यात गुंतले असून ढासळणा-या समाजस्वास्थ्याविषयी अनभिज्ञ असल्याचे जाणवल्याने ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून उद्योग निर्मिती आणि दूरस्थ शिक्षण योजना सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी  उद्योग भांडवलात सहभाग या नात्याने तासदोनतासाच्या येथल्या मानधनाएवढी वार्षिक वर्गणी ठेवली तरी  त्यास मिळणारा थंडा प्रतिसाद अत्यंत निराशादायक आहे.

अर्थात काहीही झाले तरी   हा संकल्प तडीला नेण्यासाठी ज्ञानदीप आपली सर्व शक्ती पणाला लावणार आहे. कदाचित काही कालावधीनंतर इतरांची या उपक्रमास साथ मिळू शकेल असे वाटते.

No comments:

Post a Comment