माझी प्रिय पत्नी आणि ज्ञानदीपची संस्थापक कै. सौ. शुभांगी हिचा जन्मदिवस २ ऑक्टोबर १९४७ असल्याने प्रत्येक भारतीय तो साजरा करतो. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जन्मतारीख २ ऑक्टोबर तर भारताचा स्वातंत्र्यदिन १९४७ साली. या दोहोंचा हृद्य संगम शुभांगीच्या जन्मतारखेत आहे. हा मोठा योगायोग म्हणावा लागेल.
सौ. शुभांगीचे माहेरचे नाव सुमन दत्तात्रय शिंत्रे. सुमन आणि शुभांगी ही नावेही तनमनाची निदर्शक आहेत शेवटचे धन नसले तरी ज्ञानरूपी मौलीक धन ती ज्ञानदीपच्या रूपाने जगाला चिरंतन देणार आहे.
तिने आपल्या आईवरील एका कवितेत म्हटले आहे की
आजच्या तिच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तिचा थोडक्यात परिचय खाली हेत आहे.
कै. सौ. शुभांगी सु. रानडे ( जन्म - २ ऑक्टोबर १९४७, निधन - २२ ऑगस्ट २०१६)
माहेरचे नाव - सुमन दत्तात्रय शिंत्रे
पुण्याच्या सदाशिव पेठेतील पेरुगेटजवळील पेंडसे चाळीत ( सध्याची सप्तश्रृंगी बिल्डिंग) तिस-या मजल्यावरील १० बाय १०च्या एका खोलीत सात माणसांच्या शिंत्रे कुटुंबात जन्म. वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे निधन. तीन भाऊ व एक बहीण असणारी सुमन सर्वात लहान. आई यशोदाबाई शिंत्रे यांनी नर्सची दोन पाळ्यात कामे करून मुलांची शिक्षणे केली. भाऊ बहीण यांचे दुस-या गावी संसार सुरू झाल्यावर दोन भाचे शिक्षणासाठी पुण्यात राहिले. आई कामावर गेल्यावर या भाच्यांची काळजी घेत नेटाने एमए संस्कृत, बीएड शिक्षण पूर्ण केले
१३ जून १०७० साली लग्न झाल्यावर लगेच सांगलीत सिटी हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षिका म्हणून नोकरीस सुरुवात.
२५ मे १९७१ मध्ये सुमेधाचा जन्म. माझ्या पीएचडीसाठी १९७३ ते १९७६ या काळात आयआयटी कानपूर येथे वास्तव्य. नंतर वालचंद कॉलेजच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये वास्तव्य
६ डिसेंबर १९७७ सुशांतचा जन्म
सिटी हायस्कूलची नोकरी सुटल्याने पुढे सांगली मिरजेतील अनेक शाळांत रजेच्या काळात संस्कृत गणित शिक्षिका म्हणून कार्य.
१९८५ मधये वालचंद कॉलेजमध्ये बेसिक प्रोग्रॅमिंगचा शिवाजी विद्यापिठाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण. सावरकर प्रज्ञा प्रशालेतीम मुलांसाठी कॉम्प्युटर प्रशिक्षणाचा एक महिन्याचा कोर्स घेतला.
१९८७मध्ये विजयनगर येथील ज्ञानदीप या स्वतःच्या घरात राहण्यास प्रारंभ.
विश्रामबाग येथे सुयश कॉम्प्युटर्स नावाचे क्लासेस सुहास खांबे आणि विजया कुलकर्णी यांच्या पार्टनरशिपमध्ये पाच वर्षे चालविले.
नोव्हेंबर २००० मध्ये ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ची स्थापना व डायरेक्टर म्हणून कार्य सुरू.
मायमराठी, संस्कृतदीपिका विज्ञान या वेबसाईट तसेच संस्कृत व इतर व्यावसायिक सॉफ्टवेअर आणि वेबसाईट विकसित करण्यात प्रत्यक्ष सहभाग.
काव्यदीप, सांगावा आणि सय हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध.
मराठी साहित्यसंमेलन वेबसाईट निर्मिती
बॅंकॉक, दुबई येथील अभ्यास दौ-यात सहभागी व इतर ग्रीनटेक सेमिनार व वाचनालय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग.
२००१ पासून अमेरिकेत पाच वेळा मुलांकडे दौरा
२०१२ पासून श्वसनाच्या व्याधीने त्रस्त.
२२ ऑगस्ट २०१६ रोजी निधन. शेवटपर्यंत आनंदी आश्वासक व इतरांना मार्गदर्शन करण्यात व्यस्त
निधनानंतर नेत्रदान
१ सप्टेंबर २०१८मध्ये शुभांगी कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रासाठी पुण्याच्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीस एक लाख रुपयांची देणगी. ज्युनिअर कॉलेजच्या कॉम्प्युटर खोलीला तिचे नाव देण्याची ग्वाही.
No comments:
Post a Comment