Friday, July 13, 2018

संस्कृत व्याकरण - आयफोनसाठी ज्ञानदीपचे नवे ऍप

ज्ञानदीपचे आयफोनसाठी विकसित केलेले नवे संस्कृत व्याकरण ऍप मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.


संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी नाम, सर्वनाम यांची विभक्तीरूपे आणि धातूंची कालार्थ रुपे यांचा अभ्यास आवश्यक असतो. प्रत्येक नाम विभक्तीत एकवचन, द्विवचन व बहुवचन अशी प्रथमा ते संबोधन पर्यंत २४ रुपे असतात.

नामांचे स्वरान्त व व्यंजनान्त असे अनेक प्रकार असून पुंलिंगी, स्त्रीलिंगी व नपु. लिंगी रुपे वेगवेगळीआहेत. सर्वनामांच्या बाबतीत प्रथमा पासून सप्तमीपर्यंत २१ रुपे असतात.



संस्कृत धातू दहा गणात विभागले असून त्यांची एकूण संख्या सुमारे २००० आहे, या धातूंची  वर्तमानकाळ, प्रथम भूतकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थ अशी कालार्थ रुपे तीन वचनात व प्रथम पुरूष, द्वितीय पुरूष व तृतीय पुरूष अशा प्रकारात वेगवेगळी असतात.


शब्दरूपे करण्याचे नियम असले तरी अ्शी रुपे पाठ करणे अधिक सोयीस्कर असते. त्यांचे उच्चार समजणेही गरजेचे असते. या ऍपमध्ये महत्वाची  नामे, सर्वनामे व धातू यांची रूपे ध्वनीफितींसह दिलेली आहेत,
हवा तो शब्द वा धातू निवडण्याची तसेच त्याची रुपे संगणकावर डाऊनलोड करण्याची वा संदेशाद्वारे पाठविण्याची सोय यात केली आहे.

सॊ. सुमेधा गोगटे ( कॅलिफोर्निया) यांनी ज्ञानदीपसाठी हे ऍप विकसित केले असून संस्कृत शिक्षिका व ज्ञानदीपच्या माजी संचालिका कॆ. सॊ. शुभांगी रानडे यांच्या आवाजात सर्व ध्वनीफिती बनविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment