( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली त्यातील चॊथा भाग)
पेशवे बाग
सारसबागेशेजारी पेशवे बाग आहे. त्याचि कथा अशी सांगितली जाते. पेशवे काळात सारसबागेतील तळ्याचा जीर्णोद्धार चालू असताना उकरलेली माती शेजारच्या रिकाम्या जागेवर टाकली. तेथे झाडे झुडपे लावून मोठी बाग तयार केली. तिलाच पेशवे बाग वा पेशवे पार्क असे नाव पडले. तेथे सध्या प्राणीसंग्रहालय पण केलेले आहे. लहान मोठे वेगवेगळे पक्षी तसेच वाघ, सिंह, हत्ती अशी जंगली श्वापदेही तेथे बघावयास मिळतात. या उद्यानात नॊकाविहाराची पण सोय आहे. मुलांच्या खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंड्या वगॆरे अनेक खेळांची सोय आहे. तसेच फुलराणी नावाची छोटी रेल्वेपण आहे. त्यात बसून फेरी मारणे हे लहानांप्रमाणे मोठ्यांनाही आवडते.
कात्रज सर्पोद्यान
लहान मुलांना खेळण्यासाठी बागा या सर्वत्र दिसतात. पण वेगवेगळ्या प्रकारच्या सापांचे प्रदर्शन बघायला मिळते ते फक्त या सर्पोद्यानात. पुणे- सातारा रस्त्यावर कात्रज येथे हे उद्यान आहे. तेथे विषारी, बिनविषारी असे सर्व प्रकारचे साप ठेवले आहेत. तेसुद्धा थोडेथोडके नव्हेत तर तब्बल १७० प्रकारचे. न्हणजे आहे नाही कमाल ? सापांना राहण्यासाठीसर्व नॆसर्गिक वातावरण तेथे तयार केले आहे.
सापांबद्दलचे अनेक गॆरसमज दूर करण्याच्या उद्देशाने हे सर्व प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. दिसला साप की मारून टाक अशी आपली भूमिका असते. त्यामागे सापाची भीती हे प्रमुख कारण असते. मात्र साप स्वत:हून कोणाला त्रास देत नाही. हे येथे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले जाते. तो शेतकर्यांचा मित्र आहे. पिकाची मुळे कुरतडणार्या व धान्य खाणार्या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी सापाची शेतकर्याला फार मदत होते.
विषारी व बिनविषारी साप कसा ऒळखायचा, सर्पदंश झाल्यावर काय उपाययोजना करायची याचीही येथे माहिती मिळते.
कोथरूडच्या बागा
कोथरुड परिसर अत्यंत वेगाने बदलत आहे. मोठमोठ्या इमारती व बंगले यांनी गजबजून गेलेला हा भाग. याचा विस्तार एवढ्या झपाट्याने होत आहे की त्याची नोंद गिनीज बुकमध्ये केली गेल्यास नवल नाही. मुलांना खेळण्यासाठी जागा मिळणे कठीण झालॆ आहे. कॆ. राजामंत्री उद्यान , कोथरुडची बाग, कमला नेहरू उद्यान ही मुलांच्या दृष्टीने आकर्षक ठिकाणे बनली आहेत. सुट्टी कधी लागते व या बागात जाऊन खेळायला कधी मिळते असे मुलांना होऊन जाते. दर सुट्टिच्या दिवशी या बागा मानसांनी अगदी फुलून गेलेल्या असतात.बागेची आकर्षक रचना खेळायला भरपूर मोकळी जागा, कारंजी, लहान पूल या गोष्टींमुळे राजामंत्री उद्यान हे लहान मुलांचे फार आवडते बनले आहे. भरपूर खेळा, मजा करा, खूप खा असा मंत्र देणार्या या बागा म्हणजे लहान मुलांच्या परिकथेतील टुमदार गावे बनली आहेत.
संभाजी उद्यान
जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व मंदिराशेजारचे संभाजी उद्यान ही सर्वांची मध्यवर्ती आवडती जागा. येथील शांत थंड वातावरण मन मोहून टाकते.
या उद्यानाचे वॆशिष्ठ्य म्हणजे मत्स्यालय.
रंगीबेरंगी माशांचा पाण्यातील विहार अगदी जवळून काचेतून पाहता येत असल्याने मुलांप्रमाणे मोठ्यांनाही याची भुरळ पडते.
याशिवाय पुणे स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर उद्यान, मुळा-मुठा संगमावरील बंडगार्डन, एक्स्प्रेस गार्डन, घोरपडे उद्यान ही व अशी अनेक लहान मोठी उद्याने महानगरपालिकेने लोकांच्या सोईसाठी ठिकठिकाणी तयार केली आहेत.
या व अशा अनेक बागांमुळे पुण्याच्या सॊंदर्यात मोलाची भर पडली आहे. पेशवेकालीन प्राचीन बागांपासून अत्याधुनिक बागांचा यात समावेश होतो.

No comments:
Post a Comment