Saturday, October 30, 2010

धान्यापासून दारु

परवा कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापिठात एम. टेक. पर्यावरण शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणाची परीक्षा घेण्यासाठी गेलो होतो. अनेक उद्योगधंद्यांतून बाहेर पडणार्‍या सांडपाण्याचे कसे शुद्धीकरण केले जाते याविषयी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. प्रदूषण नियंत्रणाचे वास्तव किती विदारक आहे याची विद्यार्थ्यांना कल्पना आली हे पाहून मला समाधान वाटले.

त्यातल्या एका विद्यार्थ्याने धान्यापासून अल्कोहोल( दारू) बनविणार्‍या डिस्टीलरीच्या सांडपाण्यावरील प्रक्रियेविषयी माहिती सांगितली. धान्यापासून दारू बनविणार्‍या कारखान्यांना खास सवलत, गोडाऊनमध्ये लाखो टन धान्य कुजत आहे इत्यादी बातम्या ऎकल्या असल्याने माझे कुतुहल जागृत झाले. मी त्या विद्यार्थ्याला वापरल्या जाणार्‍या धान्याविषयी माहिती विचारली.

मका, तांदूळ व ज्वारी या धान्यांचा उपयोग दारु निर्मितीसाठी केला जातो. रोज असे १२७ टन धान्य वापरले जाते व वर्षातून ३०० दिवस ही डिस्टीलरी चालते हे मला कळल्यावर दरवर्षी एकूण ३८,१०० टन धान्य केवळ एका डिस्टिलरी उद्योगातून दारूत परिवर्तित होते हे लक्षात आले. शेतकर्‍याला प्रति किलो १५ रुपये मिळतात व धान्यबाजारापेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकरी असे धान्य डिस्टिलरीस देतात असे सांगण्यात आले. माझा या गोष्टीवर विश्वास बसेना. साखर निर्मितीसाठी शेतकरी आपला ऊस देतो. त्याच्या सांडपाण्यापासून दारू के्ली जाते व त्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाला जास्त भाव मिळतो हे मला माहीत होते. पण कोणीही शेतकरी वर्षभर घाम गाळून पिकविलेले सोन्यासारखे धान्य दारू निर्मितीसाठी द्यायला तयार होईल हे कसे शक्य आहे असा भाबडा प्रश्न माझ्या मनात आला.पण वस्तुस्थिती माझ्या कल्पनेविरुद्ध होती. आर्थिक फायदा हा एकमेव उद्देश सर्व नीतीतत्वांना पायदळी तुडवितो.हे मला जाणवले.

सामान्य नागरिकाला बाजारात कितीतरी जास्त दराने धान्य खरेदी करावे लागते. १५ रुपये दराने बाजारात धान्य मिळत नाही. मग व्यापार्‍यांच्यामुळे शेतकर्‍याला कमी पैसे मिळतात का ? का सर्व धान्य गोडावूनमध्ये खास कुजवून या कारखान्याला दिले जाते. का स्वस्त धान्य दुकानातून धान्य विकत घेण्याची ऎपत नसल्याने धान्य शिल्लक राहते व ते या कारखान्यांना पुरविले जाते. मला काहीच उलगडा होईना. मी त्या विद्यार्थ्याला गमतीने विचारले ’काय रे ? तू हा कारखाना का निवडलास ? तुझी तेथे शेती आहे का दारू विकण्याचा धंदा आहे?’ त्याच्या दृष्टीने तो फक्त सांडपाणी प्रदूषणाचा प्रश्न होता. माझ्या दृष्टीने त्याच्यामुळे होणार्‍या सर्वदूर प्रदूषणाचा प्रश्न होता.

कोरडवाहू शेतकर्‍यांची गरिबी दूर करण्याच्या उद्दात्त हेतूने हा डिस्टीलरी प्रकल्प सुरू करण्यात आला असे प्रवर्तक सांगत असतील. शासनही अशा दारिद्र्य निर्मूलनास मदत करणा‍र्‍या प्रकल्पास सहानुभूतीने आर्थिक सवलती देत असेल. त्या प्रकल्पापासून भोवतालच्या परिसराचा कसा विकास झाला याचे रम्य चित्रण केले जात असेल. कदाचित महाविद्यालयात अभ्यासण्यात येणारा हा विषय शालेय स्तरावर आल्यावर धान्य बाजारात विकण्याऎवजी धान्यापासून दारू केल्यास किती जास्त फायदा होईल अशी गणिते अभ्यासक्रमात येतील. पण या प्रकल्पाद्वारे किती गरिबाच्या तोंडचा घास काढून त्यांना त्याऎवजी दारूचा ग्लास दिला जाईल व याचा समाजाच्या आर्थिक स्थितीवर व आरोग्यावर काय परिणाम होईल ही गणिते गुलदस्त्यात ठेवली जातील. कदाचित ती प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळावीत असे शासनाला वाटत असेल.

आपल्याला रस्त्यात अनेक भिकारी भेटतात त्यांच्या हातात वाडगा असतो. कोणी कनवाळू गृहस्थ त्यात १ - २ रुपये टाकतो. त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न हवे असते. ब्रेडच्या तुकड्यासाठी देखील १-२ रुपये पुरत नाहीत.जे भीक मागत नाहीत व अर्धपोटी राहतात त्यांचे काय? पूर्वी धान्याची भीक अवश्य घातली जायची ॥ओम भवती भिक्षान्‌ देही ॥ असे म्हणून साधुसंतांनीही अशा कृतीला धार्मिक पुण्याचे स्थान दिले होते. आता अशी भिक्षा मिळणे खेडेगावातही दुरापास्त झाले आहे. धान्याची वाट दारूकडे वळली तर समाजस्वास्थ्याचीही वाट लागल्याशिवाय राहणार नाही.

ही स्थिती फार दूर नाही. गल्लोगल्ली स्वस्त धान्य दुकानांऎवजी स्वस्त दारू दुकाने दिसू लागली आहेत. कोपर्‍याकोपर्‍यावर बेरोजगार तरुणांची टोळकी कोणत्यातरी पक्षाच्या आशीर्वादाने या दारूवर पोसली जात आहे. गुंडगिरी, दहशत या मार्गाने लोकशाहीतील सत्तास्थाने मिळविण्याचा सर्रास प्रयत्न होत आहे. खाजगि सावकारी तेजीत आहे. मटका, जुगार व लॉटरी यांना राजाश्रय लाभला आहे. या धंद्यातील यशस्वी उद्योजक व राजकीय नेते आपली साम्राज्ये उभारीत आहेत. सुजाण सामान्य माणूस मात्र या सर्व बदलांकडे हताश होऊन पहात आहे. त्यात बदल करण्याची शक्ती वा इच्छाच त्याच्यात उरलेली नाही.

Friday, October 29, 2010

कार्पोरेट जगताची ऑक्टोपस संस्कृती

अमेरिकेत मोठे मॉल आल्यावर छोटी द्काने नष्ट झाली. मोठ्या कार्पोरेट कंपन्या आल्यावर त्यांनी प्रचंड भांडवलाच्या जोरावर( शेअरच्या माध्यमातून लोकांकडूनच गोळा करून) छोट्या उद्योगधंद्यांना बाजारपेठेतून हद्दपार केले. भांडवलशाही देश म्हणून अमेरिका ओळखली जाऊ लागली. भारताने लोकशाही समाजवादाचा स्वीकार करून या भांडवलशाहीपासून स्वतःला दूर ठेवले होते. मात्र सध्या ज्या प्रकारे कार्पोरेट क्षेत्राची भलावण शासन करीत आहे. त्यावरून या कार्पोरेट ऑक्टोपसने शासनाला विळखा घालून भांडवलशाहीचा पाश आवळला आहे असे दिसते. राजकीय नेत्यांनी स्वतःच्या वा आपल्या पक्षाच्या स्वार्थासाठी कार्पोरेट संस्कृतीचा वापर करून लोकशाही समाजवादाच्या मूळ संकल्पनेला विकृत स्वरूप दिले आहे.

लोकशाहीनुसार सत्तेचे अधिकार खालच्या थरापर्यंत पोहोचविण्याचा शासनाने प्रयत्न केला. जिल्हा परिषदा, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या हातात प्रकल्प अधिकार आले. त्याठिकाणीही शासकीय विभागांकडे कामे न सोपविता ती कामे बीओटी तत्वावर कार्पोरेट कंपन्यांना देण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे या कंपन्यांचे जाळे सर्वत्र पसरत चालले आहे. शासनाचा अडथळा दूर व्हावा व कामे त्वरित व्हावीत म्हणून या कंपन्यांनी धूर्तपणे उच्चपदस्थ शासकीय निवृत्त अधिकार्‍यांना भरपुर पगार देऊन आपल्या पदरी ठेवले आहे. टीव्ही व इतर सर्व प्रसारमाध्यमांचा वापर करून जनमानसाला आपल्याकडे आकृष्ट करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. मोबाईल, बॅंका, बांधकाम साहित्य, सौंदर्यप्रसाधने व औषध कंपन्या अशा अनेक मॊठ्या देशी परदेशी कंपन्या यात आघाडीवर आहेत.

बीओटी तत्वावर मोठे प्रकल्प चालवावयास देणे हे याचेच एक फसवे रूप आहे. पैसे नाहीत म्हणून बीओटी प्रकल्प करावे लागतात हे विधान साफ चुकीचे आहे. प्रकल्प करणारी कंपनीही स्वताःचे पैसे कधीच प्रकल्पासाठी गुंतवीत नाही. बॅंका त्यांना भांडवल पुरविते ते देखील शासनाच्या वा लोकनियुक्त संस्थेच्या हमीपत्रावरच देते. मग ती जबाबदारी शासकीय संस्थांनी का उचलू नये? शासनाची सर्व खाती (बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा व जल निस्सारण इत्यादी) केवळ प्रकल्प आखणे, मंजुरी व नियंत्रण एवढीच कामे करतात. बाकी प्रत्यक्ष प्रकल्पांची कामे कार्पोरेट कंपन्यांकडे सुपूर्त केली जातात. प्रत्यक्षात या सर्व खात्यांत तज्ज्ञ अधिकारीवर्ग असूनही त्यांना प्रकल्पाच्या बांधणीचे काम दिले जात नाही.

मध्यंतरी जिल्ह्यांतील सर्व शासकीय शाळांच्या इमारतींच्या सर्वेक्षणासाठी टेंडर निघाले होते. शाळेच्या इमारतीची सद्यस्थिती पाहून त्यात काय दुरुस्त्या कराव्या लागतील व त्याला अंदाजे किती खर्च येईल असे साधे काम होते. स्थानिक वा जवळपासच्या शहरातील आर्किटेक्ट वा इंजिनिअर यांनी हे काम केले असते तर ते कमी खर्चात झाले असतेच शिवाय स्थानिक पातळीवरील व्यवसाय वाढला असता. मात्र अनेक जिल्ह्यांचे काम एकत्र करून एकाच कामाचे टेंडर काढले गेले. या टेंडरच्या अटीही अशा ठेवल्या होत्या की फक्त मोठ्या कार्पोरेट कंपन्यानाच त्यात भाग घेता येईल. साहजिकच या कामासाठी कुशल तांत्रिक कर्मचारी नेमणे, त्यांचा प्रत्येक गावापर्यंत जाण्याचा व राहण्याचा खर्च व सर्व कामांचे नियोजनासाठी व्यवस्थापन अधिकारी वर्ग या सर्वांचा खर्च गृहीत धरता या टेंडरसाठी निविदांची रक्कमही अनेक पटींनी वाढणे स्वाभाविक होते.

इकोव्हिलेज डेव्हलपमेंट म्हणजे पर्यावरणपूरक हरित ग्राम निर्मिती ही लोकसहभागातून व्हावयास हवी. प्रत्येक गावाची परिस्थिती भौगोलिक स्थान, स्थानिक पर्यावरण, ग्रामस्थांची सामाजिक जाणीव व आर्थिक क्षमता यावर अवलंबून असते. अशा गावांचा विकास करावयाचा तर विकेंद्रित स्थानिक स्वरुपात अनेक सार्वजनिक संस्था आपापल्या कुवतीनुसार प्रयत्न करीत असतात त्यांना आर्थिक मदत देउन हे कार्य अधिक प्रभावी व चिरस्थायी झाले असते. पर्यावरण क्षेत्रात हे चांगले काम शासन करीत आहे या कल्पनेने मी सर्व पर्यावरण संस्थांना याची माहिती कळविली. प्रत्यक्ष टेंडर अटी पाहिल्यावर माझी निराशा झाली. कोणतीही सार्वजनिक पर्यावरणवादी संस्था या कामाच्या जवळपासही फिरकू नये या दृष्टीने ५० लाख रुपये वार्षिक उलाढालीची अट त्यात खुबीने घालण्यात आली होती. त्याचा मतितार्थ काय हे समजावून सांगण्याची वेगळी गरज नाही. या प्रकल्पाची परिणती म्हणजे एक देखणा पण कुचकामी प्रकल्प अहवाल तयार होण्यात झाली तर आश्चर्य वाटायला नको.

उर्जाबचतीसाठी केंद्रीय ऊर्जा विभागाकडून शाळांतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा जाहीर करून ती बातमी टीव्हीवर देऊन स्वतःची प्रसिद्धी केली आहे. कार्पोरेटच्या पवनऊर्जा प्रकल्पांना लगेच मंजुरी मिळते मात्र ऊर्जाबचतीच्या सामान्य लोकांच्या उपकरण सवलतीसाठीच्या अर्जांच्या मंजुरीला वर्ष दोन वर्षे थांबावे लागते यावरून खरे सत्य लोकांना कळून चुकले आहे.

लोकनियुक्त नेत्यांच्या मागे अधिकारी, अधिकार्‍यांच्या मागे कंत्राटदार व कंत्राटदारांच्या मागे पुनः नेते असे दुष्ट चक्र निर्माण झाले आहे. यात सर्वसामान्य माणसाला, उद्योजकाला वा व्यावसायिकाला कोठेच स्थान नाही. दुर्दैवाने नव्या पिढीतील लोकांना या व्यवस्थेबद्दल काही गैर वाटत नाही. नेत्यांच्या मागे लागून सत्ता मिळवायची वा शासन ( अधिकार मिळविण्यासाठी) किंवा कंत्राटदाराकडे नोकरी (केवळ पैसे मिळविण्यासाठी) करायची एवढे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर शासकीय यंत्रणा अनेकप्रकारे त्याची अडवणूक करते. त्यातूनही त्याने चिकाटीने प्रगती केली तर त्याला मोठ्या कार्पोरेट कंपन्या चिरडून टाकायचा प्रयत्न करतात.

एकूणच आपण कोठे जात आहोत याचा सर्वांनी गांभिर्याने विचार करायची वेळ आली आहे. आपल्याही देशाला अमेरिकेसारखे भांडवलशाही देश म्हणून जगाने ओळखले म्हणजेच खरी प्रगती झाली असे जरी गृहीत धरले तरी आपली लोकसंख्या व गरिबी यामुळे प्रत्यक्षात कार्पोरेट हुकुमशाही येऊन त्याचे पर्यवसान निराशा, बेरोजगारी, आत्महत्या, गुन्हेगारी, असुरक्षितता व अस्वास्थ्य यात समाजाला आपण लोटणार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.

Monday, October 25, 2010

Origin of Life - Is it Grand Design?

While coming back from California to India last month, we traveled by Korian Airlines. Generally we find the fashion, travel guide and sale product magazines kept for reading for each seat and there is noting worth reading except good photographs. However, to my surprise I found a magazine devoted to profile and work of philosopher Schopenhauer.

I had developed a liking for western philosophy by reading `Story of Philosophy' by Will Durant in my college days and had read Schopenhauer's pessimistic view of life and chapter on his Will theory. I read the magazine from end to end and learnt about life of that great philosopher. His hypothesis that will to live is the basis of life can be proved by examples but question remains Why and how the will originate in living species.

I had recently read great scientist Hawking's comments that mystery of origin of universe is explainable on scientific grounds and not on Grand Design idea. Schopenhauer's theory coupled with linking of scientific theories set a train of thoughts in my mind on various aspects of it.

Why there is cycle of birth and death for all living species from their time of first formation to present time. Is it because the frail organic body cannot sustain for long in changing environment? Sustainability requires constant input, proper environment and efficient working of every part of living body. Is reproduction a solution found by nature for sustainability?

Why the life itself undergoes changes with time?

I think Newton’s law is applicable everywhere. Resistance to change is inherent in living and nonliving still change occurs continuously. In inanimate bodies, it could be looked upon as the manifestation of randomization. Even living things resist change. They wish to continue on the same path. The will to survive is seen in every living being. What is the reason of this will originating in living object? Or is it present even in non living. Whether it gets separate identity due to rigid and well structured organization. When living becomes dead, what happens to that will? Does it get disintegrated in small separate units. The grand design of life is the handiwork of this will or will is result of grand design? Or this is only effect of complex organic structure to environment?

Tide or wave dissipates its energy in te form of turbulence and displacement of water mass. Still the energy of tide does exist, but now in scattered form. Breaking and recombination of DNA does retain the characteristics in new structure.Form cphanges but energy quantum remains same.

Energy can be provided to living body by mechanical means, but it cannot be kept sustained and active in the body unless it has its own will.

How to introduce will in nonliving material object?

Why life is vulnerable? Is it because the combination of elements in living object is much more intricate than nonliving matter? It seems so as sub-micron size DNA strand also can hold large memory storage and slit change in environmental parameters can destroy or alter its characteristics. Research in biotechnology does not attempt to find the reason for existence of will or consciousness but tries to manipulate DNA structures and observes changes in characteristics. It is totally black box approach, where inner process of transformation remains mystery.

We may never know the answers to these questions as our brain functions only on reason-effect logic and cannot comprehend actions without any reasons. Origin of universe or of living species suggest otherwise.

Tuesday, October 19, 2010

दारू - समाज अधोगतीचे कारण

महात्मा गांधी यांनी भारतीय समाजाचे निरीक्षण करून काही महत्वाच्या चळवळी सुरू केल्या होत्या. त्यातील ‘दारुबंदी’ ही सर्वात महत्वाची चळवळ होती. स्वातंत्र्यलढ्य़ाच्या काळात असहकार, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह, स्वदेशीचा वापर इत्यादी चळवळींचा प्रभाव जनमानसावर पडला. मात्र दारुबंदी हा विषय मात्र गांधी तत्वज्ञानाचा एक भाग बनला व सच्चे गांधीवादी सोडता इतरांनी तो फारसा गांभीर्याने घेतला नाही. आतातर सध्याच्या नव्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या लोंढ्यात दारूला विलक्षन प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.

सरकारनेदेखील दारुबंदी खाते निर्माण केले खरे मात्र त्याच्याकडे उत्पनाची बाब म्हणून पाहिले. दारू दुकानाचा परवाना, दारू पिण्याचा परवाना, विदेशी दारूवर कर इत्यादी मार्गाने पैसे मिळविणे हेच महत्वाचे कार्य या खात्याकडे राहिले.

दारुच्या व्यसनामुळे भ्रामक सुखाची चटक लागते. सर्व दुःखांचा विसर पडतो. पैशाचा व तब्बेतीचा नाश होतो आहे याचे भान रहात नाही. कर्जात दिवसेदिवस अधिकाधिक बुडण्याची पाळी येते. कौटुंबिक स्वास्थ्य संपते.त्याच्या आशा-आकांक्षांचा चक्काचूर होतो. आर्थिक विषमता, जाती धर्माची विषमता, शोषण करणारी सरंजामशाही वृत्ती याविरुद्ध आवाज उठविण्याचे बळ राहत नाही. एवढेच नाही तर पैशाच्या लोभाने याविरुद्ध लढणार्‍या समाजसेवकांना नेस्तनाबूत करण्याच्या कार्यात धनदांडग्यांना मदत करण्यात कमीपणा वाटत नाही.

जग हे गरीब माणसाच्या बाबतीत फार क्रूर असते. श्रीमंताचे हजार गुन्हेही समाज चालवून घेतो. मात्र गरिबाचा एक गुन्हा समाजाच्या रोषाचे कारण बनतो. केवळ श्रीमंतच नव्हे तर त्याच्यासारखे गरीब लोकही अशा गुन्हेगाराला शिक्षा देण्यास अग्रेसर असतात. आपण त्यातले नाही हे त्यांना समाजाला दाखवून द्यायचे असते. या शिक्षेमुळे त्याची गुन्हेगारी संपेल अशी त्यांची कल्पना असते. मात्र गुन्हेगारीचा शिक्का त्याच्यावर बसल्यावर सारे जग त्याचे कडे तुच्छतेने गुन्हेगार म्हणूनच बघते.

यासाठी गरीब माणसाने जास्तीत जास्त संयम व सहनशीलता दाखविण्याची गरज असते. पण एवढी विवेकशक्ती त्यांच्या अंगात नसते. संताप, उलट उत्तर, मारामारी यासारख्या त्याच्या प्रतिक्रिया आगीत तेल ओततात. पूर्वीचा आरोप त्यामुळे अधिक दृढ होतो. पोलीसही हात धुवून मागे लागतात. त्याच्या कडून पैसे उकळण्याचे प्रयत्न होतात. साहजिकच सर्व बाजूने कात्रीत सापडलेली ती व्यक्ती पुन्हा गुन्हा करण्यास प्रवृत्त होते.

गरिबी, दुःख, अगतिकता, नैराश्य यापासून सुटका मिळविण्यासाठी गरीब माणूस दारूला जवळ करतो खरे. पण एकदा दारूची सवय लागली की ती त्याला गुलाम बनवते. अशा दारूच्या नशेत उसने अवसान येऊन गुन्हा घडतो. गुन्हा करणार्‍याला त्याची शुद्ध नसते. नंतर फार उशीर झालेला असतो. गुन्ह्याचे दुष्ट चक्र त्याच्यामागे लागते व तो व त्याचे कुटुंब रसातळाला जाते.

श्रीमंतांनी दारू पिण्यास हरकत नाही असे माझे म्हणणे अजिबात नाही. दारूने सर्वांचेच नुकसान होते. मात्र शिक्षण, नोकरी, पैसा यामुळे त्यांच्यावर गरीबांइतके संकट कोसळत नाही. माझ्या अगदी जवळचे नातेवाईक यांचा सोन्यासारखा संसार दारूमुळे उध्वस्त होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला हे उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आहे. त्याचप्रमाणे प्रतिष्ठेपायी वा बिझिनेसच्यानावाखाली सुरू केलेल्या दारूपार्ट्यांपासून वेळीच सावध होऊन पासून सुटका करून आपला संसार व व्यवसाय सावरल्याचीही उदाहरणे माझ्या माहितीत आहेत.

मात्र गरीब दारूच्या आहारी गेल्यावर परत सुधारला याचे उदाहरण मात्र दुर्दैवाने अजून माझ्या पाहण्यात आलेले नाही. यासाठी गरीब माणसाने तरी दारूपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. कोणी नातेवाईक वा मित्र दारूच्या आहारी गेला असेल तर त्याला वाळीत न टाकता सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.समाजात स्थैर्य व सुबत्ता यायची असेल तर दारूला दूर लोटले पाहिजे.

Office Planning

1.Management
• Company registration
• Minutes of meeting
• Bank accounts
• Organisation structure
• Govt Rules compliance
• Taxes

2. Documentation
a. Procedures and Rules
Elaborate procedures should be developed for handling any job, Design platform, software, storage and backup system, security, logging and comments.
There should be common rules to be followed during documentation of project.
• Naming convention for variables in program, for file and folder names
• File organization on the disc
b. Workflow Diagram
Before the work is started, it is absolutely necessary that overall plan with objectives, inputs, expected outputs, selection of optimum method, check points and main control and quality testing procedure for output be prepared. This should indicate small subsystems, their input out requirements and dependencies. Time and resource allocation can be shown by using Gantt chart or CPM network.
c. Process description
d. Separation of common and specific tasks
e. Storage and accessibility – Type of storage Soft or Print format, Location Local and remote, Copies
f. General maintenance procedures

3. Correspondence
a. Contact Addresses Company and Individuals, Postal address, Phone Landline Mobile E Mail
b. Introduction to prospective clients
c. Bills - Soft and Hard Copy format
d. Receipts
e. Reminders
f. Information News letters
g. Getting feedback

4. Accounts
a. Bank Transactions
b. Daybook
c. Ledger Posting
d. Income – Expenditure statement
e. Profit – loss
f. Balance Sheet
g. Budget

5. Marketing
a. Market Survey
b. Identification and selection of target customers
c. Preparation of Specifications and advertisement material
d. Advertisement media selection – Newspaper, Banners, Brochures, Web, Sponsorship, TV, Exhibition, Lectures, Presentations, Events
e. Response analysis
f. Follow up program

6. Infra structure
a. Office Space, Furniture, Computers, Peripherals
b. Softwares
c. Stationary
d. Library

7. Manpower
a. Manager
b. Team leaders
c. Designers
d. Clerks
e. Salesman

8. Monitoring

a. Attendance Time and Duration Daily/Weekly/Monthly
Office should have fixed office hours, which helps costumers to contact, inform or complain. If it is not possible to have same timings for all workers, their individual time table at least should be fixed. Maximum 10 minutes late may be permitted for valid reason. Leave should be informed in writing preferably in advance. The application of leave should mention the alternative person’s name with necessary instructions and information. Minimum work hours should be Daily 8 hours, Weekly 40 hours and monthly 150 hours. This time is required for productive work. Time required for learning new thing, rest and entertainment should be extra and not countable as work time.

b. Work progress assessment
Team leader should assess the work per person in the team every week as per milestone predefined.

c. Management of resources if needed
If the work progress is not as per time plan, reasons should be investigated and additional workforce or extra facilities should be provided as necessary. Its impact on cost economics should be evaluated and recorded. If there some hurdle in work progress, it should be communicated to the client with revised time and cost estimate.
d. Testing and Quality Control –
i. Copy edit – spelling errors, punctuation errors, grammatical errors, layout errors. This is common type of error in amateur designers having language deficiency. Fortunately spell check facility can correct such type of errors. Applying spell check is a must. If browser does not have that facility, the text can be coped in word and checked.
ii. Jargon check – Valid terms and jargons ( Terms not commonly known or special names), Brand names, trademarks, service marks, acronyms, specification terminology ( units and format) This is more sensitive issue for client, as the mistakes may convey differt meaning or point to different party.
iii.Glossary - Provide Glossary for explaining special names and terms It is necessary sometimes to give footnotes with mark or provide separate glossary, context and explanations
iv. Readability and usability check – Scavenger hunt, Exploration, Graphics limited
v. Validate HTML
vi. Check for resolution on different monitors
vii. Cross browser compatibility
viii. Check for user’s platform ( Linux, Windows, Macintosh)
ix. Verify links, identify orphans ( webpages without links)

e. Feedback from client and corrections
It is necessary to contact the client and get his feedback as regards accuracy, effectiveness and ease of operation. This helps in correcting the product in time and avoiding repetitive or undisclosed complaints. Undisclosed complaints are more dangerous, as they keep you satisfied but create negative advertisement due to unsatisfactory performance or difficulties faced by user. Many users just don’t bother to complain or suggest modification and erroneous process leads finally to stoppage or switch over to competitors option.


f. Scrutiny and accountability –

Critical examination of errors and lapses helps in improving quality of future jobs. Logging system is used to identify the reason of error and if man made, to fix the responsibility. It should be linked with performance evaluation.

Office Work For a Website Design Company

Our Dnyandeep Infotech Pvt. Ltd. is completing 10 years of business. Though we have designed more than 150 websites,developed more than 10 software projects and now doing foreign assignments, still our progress as a company is far from satisfactory. We concentrated more on research and development rather than financial goals. Many of our experienced software engineers left company to join big IT firms in Pune and Mumbai for better job prospects. We did not do enough marketing. No doubt, these are the reasons for our failure in proper growth of company.

However, the main reason for the ignorance about the situation is according to me the absence of proper planning, documentation, monitoring and control. After introspection of the present status and method of working, I have listed the office work requirements for success in business. I feel that they may be useful to company engaged in similar type of work.

1. Monitoring existing websites

- Data regarding Host server, platform,ASP/PHP/HTML,Memory alloted, Memory consumed, last update, Client contact information
-Renewal of domains
- Sending bills
- payment reminders
- Action for pending payments
- Summary sheet of expiry dates and payments received yearwise
2. Monitoring projects in hand
- List of projects with details as client contact information, NDA and other documents,
-Planning project, job allotment, team leader, Timeframe and milestones, Payment schedule,
-Group meetings – Appraisal, Action plan
3. Accounts –
- Telephone, Mobile, Electricity, Broadband Bills payment
-Bank transactions,
- Cheque and cash payments register, Bills/Receipts/Vouchers
- Daybook and ledger posting,
-Bank statement, , Income expenditure
- Sales tax, Service tax, Vat payments
- Audit report
- Submission to Income tax , Company registrar office

4. Marketing -
- Preparing updated profile of company
- Quotation for website and different modules
-Preparing advertisement material - soft and printd
- Survey of sector wise potential for business
- Contact potential customers by phone, mail, actual visit
- Requirement analysis, Preparation of quotation and agreement documents
- Instruction format for information to be supplied by client, format, time period, contact person with decision making authority
5. Office Resource Planning
- Personnel – List of persons with resume, experience, skills acquired, projects in hand, Future skill training program
- Computers – Configurations, Performance, need of upgradation
- Organisation of data and softwares on computers
- Website and database configurations on local server
- backup

This is first phase of documentation. Now there is a need to evolve detailed procedures for each task and allotment of it to personnel at hand.

Monday, October 18, 2010

स्टॅटिक व डायनॅमिक वेबसाईट

आतापर्यंत आपण जे वेबसाईटचे डिझाईन पाहिले त्यात आपण तयार करून सर्व्हरवर ठेवलेले वेबपेज जसेच्या तसे ब्राउजरकडे पाठविले जाते व ते स्क्रीनवर दिसते. कॉम्प्युटरकडून प्रिंटरकडे छपाईसाठी पाठविण्याप्रमाणेच हे काम असते. अशा वेबसाईटला स्टॅटिक वेबसाईट म्हणतात.

प्रत्येक ग्राहकाच्या इच्छेनुसार त्यात बदल करण्याचे वा आवश्यक ती वेगळी माहिती मिळवून ती देण्याचे काम करण्यासाठी आवश्यक त्या प्रोग्रॅमिंगचे कौशल्य साध्या html वेबपेजमध्ये नसते. dhtml किंवा डायनॅमिक वेबपेजसाठी कोणत्यातरी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचा त्यात समावेश करावा लागतो. जावास्क्रिप्ट(javascript), व्हीबीस्क्रिप्ट (vbscript), asp.net किंवा पीएचपी (php) चा उपयोग करून वेबपेज डिझाईन केले की त्याला डायनॅमिक वेबपेज व अशी वेबपेजेस असनार्‍या वेबसाईटला डायनॅमिक वेबसाईट असे म्हटले जाते.

यातील जावास्क्रिप्ट ग्राहकाच्या कॉम्प्युटरवरील सुविधा वापरून कार्य करते. त्यामुळे ग्राहकाची विशिष्ट मागणी सर्व्हरकडे पाठवावी लागत नाही व वेबपेजमध्ये त्याप्रमाणे चटकन्‌ बदल होतो. यामुळे याला क्लायंट साईड प्रोग्रॅमिंग असे म्हणतात. नेव्हीगेशन मेनूसाठी वा टूल टिप, चित्राचा रंग, आकार बदलणे यासारखी छोटी कामे वा गणिते करून उत्तर देण्याचे काम जावास्क्रिप्ट वापरून करता येते. मात्र ब्राउजरवर जावास्क्रिप्ट कार्यान्वित करणे वा न करणे ग्राहकाच्या मर्जीवर अवलंबून असते. एकदम प्रकट होणार्‍या जाहिराती बहुदा अशा जावास्क्रिप्ट्चा वापर करतात.

आपल्या कॉम्प्युटरवरील माहिती आपल्या न कळत वाचण्याचे, त्यात बदल करण्याचे विघातक प्रोग्रॅम नेटवरून येऊ नयेत म्हणून बर्‍याच ठिकाणी ग्राहकाकडून इंटरनेटच्या सिक्युरिटी सेटींगमध्ये जावास्क्रिप्ट बंद केलेले असते. अशा वेळी असे जावास्क्रिप्टचे प्रोग्रॅम कार्य करू शकत नाहीत. मग डायनॅमिक मेनू दिसत नाही किंवा डायनॅमिक बदल होऊ श्कत नाहीत. वेबसाईटवरून असे विघातक प्रोग्रॅम येणार नाहीत अशी खात्री असल्यास जावास्क्रिप्ट चालू करावे (enable) लागते.

जावास्क्रिप्टचे प्रोग्रॅम क्लायंटच्या कॉम्प्युटरवर चालत असल्याने त्याचे सर्व कोड html वेबपेजमधून द्यावे लागते. त्यामुळे ते कोणासही परत वापरता येते. याउलट व्हीबीस्क्रिप्ट वा पीएचपीचे कोड सर्व्हरवर राहून फक्त तयार झालेले पान क्लायंटकडे जात असल्याने ते सुरक्षित ठेवता येते. या प्रोगॅमना सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंग असे म्हणतात. मुख्य कोडची अशी सुरक्षितता रहावी पण उठसूट सर्व्हरकडे जावे लागू नये यासाठी जावास्क्रिप्ट व सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंग यांचा मिलाफ करून अजॅक्स (Ajax) नावाची प्रोग्रॅमिंगची नवी पद्धत उदयास आली आहे.

व्हीबीस्क्रिप्ट वापरून वेबपेज तयार केले तर ते .htm ऎवजी .asp या दुय्यम नावाने सेव्ह करावे लागते. asp.net वापरल्यास .aspx असे दुय्यम नाव वापरले जाते. पीएचपी पेजसाठी .php असे दुय्यम नाव असते.

सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंगचा मुख्य फायदा म्हणजे सर्व्हरवर ठेवलेल्या डाटाबेसमधून ग्राहकाला हवी असलेली माहिती घेऊन वेबपेज तयार करण्याचे काम सर्व्हरवरच होते. त्यामुळे मुख्य डाटाबेसमधील इतर सर्व माहिती सर्व्हरवरच सुरक्षित राहून सर्व ग्राहकांना त्यातून फक्त देण्यायोग्य माहिती पुरविता येते.

पुष्कळवेळा सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंगचा वापर डाटाबेस सर्व्हिसऎवजी केवळ वेबपेजमधील सीएसेस, बॅनर, मेनू, बॉटम फूटर या वेगवेगळ्या भागांच्या वेगळ्या फाईल करून त्या एकत्र करून वेबपेजेस तयार करण्यासाठी केला जातो. अशा वेबसाईटवरील वेबपेजेस डायनॅमिकली तयार होत असली तरी ती वेबसाइट स्टॅटिकच असते. फक्त अशा वेबसाईटमध्ये फेरबदल करणे सोपे असते. त्यामुळे अनेक पाने असणारी मोठी वेबसाईट नेहमी याप्रकारेच केली जाते.

डायनॅमिक वेबसाईट तयार करण्यासाठी डाटाबेस डिझाईन करणे, सर्व्हरवर तो इन्स्टॉल करणे. डाटाबेसमधून हवी ती माहिती काढून वेबपेजवर दाखविण्यासाठी प्रोग्रॅम लिहावे लागतात. यामुळे अशी वेबसाईट वेळखाऊ व कौशल्याचे काम असते. या वेबसाईतच्या डिझाईनसाठी स्टॅटिक वेबसाईतपेक्षा खर्चही बराच जास्त येतो. यामुळे काही वेळा स्टॅटिक वेबसाईट तयार करून त्यात एखादे डाटाबेसवर आधारित डायनॅमिक वेबपेजेसचे मोड्यूल तयार करून घेतले जाते. अर्थात डायनॅमिक वेबसाईटमुळे स्टॅटिकची अनेक पेजेस करण्याचा वेळ व खर्च यात बचत होते व सर्व दृष्टिने ते किफायतशीर ठरते.

Web Technology Index

Web Design Marathi Lessons

Web technology

Sunday, October 17, 2010

वेबसाईट- क्लास स्टाईल

मागच्या धड्यात आपण div id या टॅगचा वेबपेजच्या लेआउटसाठी कसा वापर केला जातो ते पाहिले. आता क्लास(class) चा वापर स्टाईल शीटमध्ये (css) मध्ये कसा करतात ते पाहू. class हा . या चिन्हाने दर्शविला जातो. शीर्षक, टेबल, पॅरेग्राफ किंवा div सारख्या टॅगला विशिष्ट स्टाईल लावण्यासाठी क्लासचा उपयोग होतो. div id हा एकदाच वापरता येतो तर क्लास हा अनेक ठिकाणी वापरता येतो. उदाहरणार्थ पॆरेग्राफसाठी एक क्लास केला तर सर्व पॅरेग्राफना तो वापरता येतो. मात्र मजकुरातील काही भाग इटालिक वा ठळक अक्षरात दाखवायचा असेल त्या पॅरेग्राफसाठी वेगळा क्लास करावा लागतो. एखादे टेबल साधा मजकूर दाखविण्यासाठी असेल, एखादे चित्रे वा फोटो दाखविण्यासाठी वापरायचे असेल तर टेबल टॅगचे दोन क्लास करता येतात.

वेगवेगळ्य़ा प्रकारच्या मजकूर व चित्रांसाठी एकदा क्लास निश्चित केले की त्यांचा वापर आवश्यकतेनुसार कोठेही व कितीही वेळा करता येतो. क्लास पद्धत वापरल्याने सर्व वेबपेजेसवरील मजकूर मांडणीत एकसारखेपणा आणता येतो. म्हणून प्रत्येक वेबसाईटसाठी सर्व प्रकारच्या स्टाईल तयार करून एक css स्टाईलशीट फाईल तयार केली जाते व ती सर्व वेबपेजेसना लिंक केली जाते. क्वचित प्रसंगी एखाद्या पानाला वा विभागाला वेगळॆपण द्यायचे असेल तर तेवढ्या भागासाठी दुसरी स्टाईलशीट केली जाते.

खाली ज्ञानदीपने डिझाईन केलेल्या एका कॉलेजच्या वेबसाईटच्या स्टाईलशीटची फाईल दाखविली आहे. त्यात Bold, Normal व Subheading यासाठी क्लास केले आहेत. तसेच फॅकल्टीचा बायोडाटा दाखविण्याच्या टेबलसाठी tablemainbiodata व डिपार्टमेंट टेबलसाठी TablemainDepartment त्यातील हेडींग, मजकूर, फोटो या TD टॅगसाठी वेगवेगळे क्लास केले आहेत. टेबल चांगले दिसण्यासाठी एकाडएक ओळीसाठी गडद व फिका रंग देता यावा यासाठी TD dark व TD faint असे क्लास केले आहेत.

BODY
{
}
BODY .Table
{
BORDER-RIGHT: #077198 2px solid;
BORDER-TOP: #077198 2px solid;
BORDER-LEFT: #077198 2px solid;
BORDER-BOTTOM: #077198 2px solid
}
.Bold
{
BORDER-RIGHT: medium none;
BORDER-TOP: medium none;
PADDING-LEFT: 10px;
FONT-WEIGHT: bold;
FONT-SIZE: 11.5pt;
MARGIN-LEFT: 10px;
BORDER-LEFT: medium none;
COLOR: #0c3545;
BORDER-BOTTOM: medium none;
FONT-FAMILY: Georgia, Verdana
}
.Normal
{
PADDING-RIGHT: 20px;
PADDING-LEFT: 20px;
FONT-SIZE: 8.5pt;
PADDING-BOTTOM: 2px;
MARGIN: 2px 20px;
COLOR: #003366;
PADDING-TOP: 2px;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-ALIGN: justify
}
.subheading
{
MARGIN-TOP: 5px;
PADDING-LEFT: 20px;
FONT-WEIGHT: bold;
FONT-SIZE: 10pt;
MARGIN-BOTTOM: 5px;
PADDING-BOTTOM: 5px;
MARGIN-LEFT: 20px;
COLOR: #096e98;
PADDING-TOP: 5px;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-DECORATION: underline
}
.Tablemainbiodata
{
BORDER-RIGHT: slategray 1px;
PADDING-RIGHT: 2px;
BORDER-TOP: slategray 1px;
PADDING-LEFT: 2px;
PADDING-BOTTOM: 2px;
MARGIN: 2px;
BORDER-LEFT: slategray 1px;
PADDING-TOP: 2px;
BORDER-BOTTOM: slategray 1px
}
.Tablemainbiodata TD.Dark
{
MARGIN-TOP: 5px;
FONT-WEIGHT: 600;
FONT-SIZE: 8pt;
MARGIN-BOTTOM: 5px;
PADDING-BOTTOM: 5px;
COLOR: #003366;
PADDING-TOP: 5px;
FONT-FAMILY: Verdana
}
.Tablemainbiodata TD.Light
{
MARGIN-TOP: 5px;
FONT-WEIGHT: lighter;
FONT-SIZE: 10pt;
MARGIN-BOTTOM: 5px;
PADDING-BOTTOM: 5px;
COLOR: #003366;
PADDING-TOP: 5px;
FONT-FAMILY: Verdana
}
.Tablemainbiodata TD.Background
{
PADDING-RIGHT: 10px;
PADDING-LEFT: 10px;
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 10pt;
PADDING-BOTTOM: 5px;
MARGIN: 5px 10px;
COLOR: #096e98;
PADDING-TOP: 5px;
FONT-FAMILY: Verdana;
BACKGROUND-COLOR: #eef5fb
}
.Tablemainbiodata TD.Headinggray
{
BORDER-RIGHT: white 1pt solid;
PADDING-RIGHT: 4px;
BORDER-TOP: white 1pt solid;
PADDING-LEFT: 4px;
FONT-WEIGHT: 600;
FONT-SIZE: 8pt;
PADDING-BOTTOM: 4px;
MARGIN: 4px;
BORDER-LEFT: white 1pt solid;
COLOR: #003366;
PADDING-TOP: 4px;
BORDER-BOTTOM: white 1pt solid;
FONT-FAMILY: Verdana;
BACKGROUND-COLOR: #ebebeb;
TEXT-ALIGN: center
}
.Tablemainbiodata TD.Border
{
BORDER-RIGHT: white 1pt solid;
BORDER-TOP: white 1pt solid;
FONT-SIZE: 10pt;
BORDER-LEFT: white 1pt solid;
COLOR: #003366;
BORDER-BOTTOM: white 1pt solid;
FONT-FAMILY: Verdana;
BACKGROUND-COLOR: #f5f5f5
}
.Tablemainbiodata TD.ImageFrame
{
BORDER-RIGHT: #096e98 2pt double;
BORDER-TOP: #096e98 2pt double;
MARGIN-TOP: 0px;
BORDER-LEFT: #096e98 2pt double;
PADDING-TOP: 0px;
BORDER-BOTTOM: #096e98 2pt double
}
.TablemainDepartment
{
PADDING-RIGHT: 10px;
PADDING-LEFT: 10px;
PADDING-BOTTOM: 10px;
MARGIN: 10px;
PADDING-TOP: 10px
}
.TablemainDepartment TD.Headingbold
{
BORDER-RIGHT: 0pt;
PADDING-RIGHT: 3px;
BORDER-TOP: 0pt;
PADDING-LEFT: 3px;
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 9pt;
PADDING-BOTTOM: 3px;
MARGIN: 3px;
BORDER-LEFT: 0pt;
COLOR: #003366;
PADDING-TOP: 3px;
BORDER-BOTTOM: 0pt;
FONT-FAMILY: Arial;
BACKGROUND-COLOR: #f2f2f2
}
.TablemainDepartment TD.DeptNormal
{
PADDING-RIGHT: 20px;
PADDING-LEFT: 10px;
FONT-SIZE: 8.5pt;
PADDING-BOTTOM: 15px;
MARGIN: 15px 20px 15px 10px;
COLOR: black;
PADDING-TOP: 15px;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-ALIGN: justify
}
.Tablemainbiodata TD.pageListItem
{
PADDING-RIGHT: 5px;
PADDING-LEFT: 5px;
FONT-SIZE: 8.5pt;
PADDING-BOTTOM: 5px;
MARGIN: 5px;
COLOR: black;
PADDING-TOP: 5px;
FONT-FAMILY: Verdana
}
.Tablemainbiodata .PageLinkBio
{
}
.Tablemainbiodata .PageLinkBio A
{
PADDING-RIGHT: 5px;
PADDING-LEFT: 5px;
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 10pt;
MARGIN-LEFT: 5px;
COLOR: gray;
MARGIN-RIGHT: 5px;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-DECORATION: none
}
.Tablemainbiodata .PageLinkBio A:hover
{
PADDING-RIGHT: 5px;
PADDING-LEFT: 5px;
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 10pt;
MARGIN-LEFT: 5px;
COLOR: #003366;
MARGIN-RIGHT: 5px;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-DECORATION: underline
}
.TablemainDepartment TD.deptPageList
{
PADDING-RIGHT: 5px;
PADDING-LEFT: 5px;
FONT-SIZE: 8.5pt;
PADDING-BOTTOM: 5px;
MARGIN: 5px;
COLOR: black;
PADDING-TOP: 5px;
FONT-FAMILY: Verdana
}
.TablemainDepartment TD.TableHeading
{
BORDER-RIGHT: #eeeeee 1pt solid;
BORDER-TOP: #eeeeee 1pt solid;
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 8.5pt;
BORDER-LEFT: #eeeeee 1pt solid;
COLOR: black;
BORDER-BOTTOM: #eeeeee 1pt solid;
FONT-FAMILY: Arial, Verdana;
BACKGROUND-COLOR: #e9e9e9;
TEXT-ALIGN: center
}
.TablemainDepartment TD.TableMatter
{
BORDER-RIGHT: #eeeeee 1pt solid;
PADDING-RIGHT: 5px;
BORDER-TOP: #eeeeee 1pt solid;
PADDING-LEFT: 5px;
FONT-SIZE: 8.5pt;
PADDING-BOTTOM: 5px;
MARGIN: 5px;
BORDER-LEFT: #eeeeee 1pt solid;
COLOR: black;
PADDING-TOP: 5px;
BORDER-BOTTOM: #eeeeee 1pt solid;
FONT-FAMILY: Verdana
}
.TablemainDepartment .DeptPageLink
{
}
.TablemainDepartment .DeptPageLink A
{
PADDING-RIGHT: 5px;
PADDING-LEFT: 5px;
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 10pt;
MARGIN-LEFT: 5px;
COLOR: gray;
MARGIN-RIGHT: 5px;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-DECORATION: none
}
.TablemainDepartment .DeptPageLink A:hover
{
PADDING-RIGHT: 5px;
PADDING-LEFT: 5px;
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 10pt;
MARGIN-LEFT: 5px;
COLOR: #003366;
MARGIN-RIGHT: 5px;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-DECORATION: underline
}
.Tablemainbiodata TD.BackgroundSubheading
{
MARGIN-TOP: 5px;
FONT-WEIGHT: 500;
FONT-SIZE: 8.5pt;
MARGIN-BOTTOM: 5px;
PADDING-BOTTOM: 5px;
COLOR: #003366;
PADDING-TOP: 5px;
FONT-FAMILY: Verdana, Arial;
BACKGROUND-COLOR: #eef5fb
}
.TablemainDepartment TD.FacultyLink
{
BORDER-RIGHT: #dedede 1pt solid;
PADDING-RIGHT: 7px;
BORDER-TOP: #dedede 1pt solid;
PADDING-LEFT: 7px;
FONT-SIZE: 8.5pt;
PADDING-BOTTOM: 7px;
MARGIN: 7px;
BORDER-LEFT: #dedede 1pt solid;
COLOR: #003366;
PADDING-TOP: 7px;
BORDER-BOTTOM: #dedede 1pt solid;
FONT-FAMILY: Verdana
}
.TablemainDepartment TD.FacultyLink A
{
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 8.5pt;
COLOR: #1372a3;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-DECORATION: none
}
.TablemainDepartment TD.FacultyLink A:hover
{
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 8.5pt;
COLOR: #4aa4d3;
FONT-FAMILY: Verdana;
TEXT-DECORATION: none
}
.TablemainDepartment TD.FacutyTableHeading
{
BORDER-RIGHT: #dedede 1pt solid;
PADDING-RIGHT: 7px;
BORDER-TOP: #dedede 1pt solid;
PADDING-LEFT: 7px;
FONT-WEIGHT: bolder;
FONT-SIZE: 9pt;
PADDING-BOTTOM: 7px;
MARGIN: 7px;
BORDER-LEFT: #dedede 1pt solid;
COLOR: #003366;
PADDING-TOP: 7px;
BORDER-BOTTOM: #dedede 1pt solid;
FONT-FAMILY: Arial;
BACKGROUND-COLOR: #f2f2f2;
TEXT-ALIGN: center
}

वरील स्टाईलशीटवरून प्रत्येक टॅगसाठी वेगवेगळी स्टाईल कशी सविस्तरपणे लिहावी लागते हे दिसून येईल. अनेक वेबसाईटचा अभ्यास करून व ग्राहकाच्या वेबसाईटविषयी असणार्‍या अपेक्षांचा व आवडीचा विचार करून आकर्षक वेबपेज दिसण्यासाठी प्रत्येक क्लासचे डिझाईन करावे लागते.

वेबसाईट - टेबललेस लेआउट

स्टाईलचा उपयोग करून html प्रोग्रॅम पासून css स्टाईल कशी वेगळी करायची हे आपण पाहिले. शोधयंत्राच्या दृष्टीने वेबपेज प्रोग्रॅममधील ही सुधारणा फार उपयुक्त ठरते. याच्या पुढची पायरी म्हणजे प्रचलित टेबल लेआउटच्या ऎवजी आधुनिक div टॅगवर आधारित लेआउट तयार करणे.

टेबल लेआउटमध्ये एकात एक टेबल घालावी लागत असल्याने tr व td या टॅगचा बराच मोठा गुंता तयार होतो व कोणता टॅग कोणत्या टेबलचा हे समजण्यात अडचण येते. शिवाय शोधयंत्रे अगदी थोड्या अवधीत वेबपेजवरील माहिती गोळा करीत असल्याने टेबलच्या आतील माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल की नाही याची खात्री नसते. याचा वेबसाईटच्या पेजरँकवर (प्राधान्य क्रम) अनिष्ट परिणाम होतो व वेबसाइटचे नाव गुगल, याहू यासारख्या शोधयंत्राने केलेल्या यादीत फार खाली जाते. माहिती शोधणारा ग्राहक सहसा पहिल्या एक दोन पानावरिल वेबसाईटच पाहत असल्याने आपलि वेबसाईट त्याला न सापडण्याची शक्यता असते.

सुदैवाने div टॅगचा उपयोग करून आपण टेबल वापरून केलेल्या कोणत्याही लेआउटसारखा वेबपेजचा लेआउट बनवू शकतो. त्यामुळे आता बहुतेक सर्व वेबसाईट या टेबल ऎवजी div टॅगचा उपयोग करून तयार केल्या जातात. मात्र div टॅगची वैशिष्ठ्ये नीट समजली नाहीत तर लेआउटमध्ये फार घोटाळे होतात व अपेक्षेप्रमाणे सर्व ब्राउजरवर व वेगवेगळ्या मॉनिटरवर वेबपेज एकसारखे दिसेल याची खात्री देता येत नाही.

तसे पाहिले तर div टॅगची तुलना टेबलमधील एका सेल वा कप्प्याशी करता येईल. अनेक ऒळी व रकाने असणार्‍या टेबलऎवजी एकच कप्पा असणार्‍या div टॅगचा एकात एक पुनःपुन्हा वापर करून पाहिजे तसा लेआऊट करता येतो.

div टॅगचा कप्पा म्हणजे ठराविक लांबी(width) व उंची (height) असणारा एक चौकोन असतो व त्याचे स्क्रीनवरील स्थान ( चौकोनाच्या वरच्या डाव्या कोपर्‍याचे स्थान) स्क्रीनच्या वरच्या कडेपासूनचे अंतर (top) व डाव्या कडेपासूनचे अंतर (left) देऊन निश्चित केले जाते.


यापूर्वी आपण टेबल, पॅरेग्राफ यासारख्या टॅगसाठी स्टाईल कशी लिहायची हे पाहिले होते. परंतु वेगवेगळ्या प्रकारे टेबल वा पॅरेग्राप दाखवायचा असेल तर काय करायचे हा प्रश्न पडतो. यावर उपाय म्हणून id व क्लास या दोन अतिरिक्त स्टाईल टॅगचा वापर केला जातो. style id हा # चिन्हाने दर्शविला जातो तर style class स्टाइल क्लास हा . या चिन्हाने दर्शविला जातो. आता style id चा वापर div टॅगसाठी करून टेबललेस लेआउट कसा करायचा ते पाहू.

आपल्याला पूर्वीप्रमाणेच वरच्या बाजूला बॅनर ( हेडर) त्याच्याखाली डाव्या बाजूला मेनू व उजव्या बाजूला
मेन कंटेंट्स आणि सर्वात खाली तळटीप ( बॉटम किंवा फूटर) ठेवायची आहे. यासाठी वेगवेगळे div टॅग वापरावे लागतील. एका मुख्य div टॅगच्या( id="wrapper") आत बॅनरसाठी div id="wrapper", मेनू व कंटेंट्सचे div एकत्र मधल्या भागात रहावेत यासाठी div id="content" , मेनूसाठी div id="content-left",कंटेंट्ससाठी div id="content-left" व तळटीपेसाठी div id="footer" असे div id वापरून व त्यात तात्पुरती नावे टाकून खालीलप्रकारे html प्रोग्रॅम लिहिता येईल.
आता मुख्य भाग राहिला तो स्टाईलशीट तयार करायचा. आपल्याला वेबपेजची व प्रत्येक div id साठी जेवढी लांबी,उंची हवी असेल, मार्जिन व पॅडींग ठेवायचे असेल व त्यातील मजकूर वा चित्रांसाठी जी स्टाईल आपल्याला वापरायची असेल ती लिहून स्टाईलशीट तयार करावा लागेल व तो हेड टॅगमध्ये ठेवता येईल वा वेगळी css फाईल करून ती हेड टॅगमध्ये लिंक करावी लागेल. उदाहरणादाखल येथे फक्त ४५० पिक्सेल रुंदीच्या वेबपेजसाठी खालीलप्रमाणे स्टाइल लिहिली आहे.

body {
font-family:arial,helvetica,sans-serif;
font-size:12px;
}
#wrapper {
width:450px;
margin:0px auto;
border:1px solid #bbb;
padding:5px;
}
#header {
border:1px solid #bbb;
height:40px;
padding:5px;
}
#content {
margin-top:5px;
padding-bottom:5px;
}
#content div {
padding:5px;
border:1px solid #bbb;
float:left;
}
#content-left {
width:90px;
}
#content-main {
margin-left:5px;
width:331px;
}

#footer {
float:left;
margin-top:5px;
margin-bottom:5px;
padding:5px;
border:1px solid #bbb;
width:438px;
}
#bottom {
clear:both;
text-align:right;
}

प्रत्येक div ची रुंदी व उंची ठरविताना बॉर्डरची जाडी, पॅडींग व मार्जिन विचारात घ्यावे लागते. वरील उदाहरणात फूटरची रुंदी (४५०-५-१-५-१=४३८) व मेन कंटेंट्ची रुंदी ( ४३८-१२-९०-५=३३१) कशी आली ते नीट समजाऊन घेणे आवश्यक आहे. अन्यथा सर्व मांडणी फिसकटण्याची शक्यता असते. मधल्या भागासाठी उंची निश्चित दिलेली नाही कारण मजकुराप्रमाणे ती लहान मोठी होऊ शकते.
बॉर्डरची जाडी, पॅडींग व मार्जिनविषयी माहिती खालील नमुन्याच्या उदाहरणात पहा.


वरील स्टाईलची माहिती style "text/css" या टॅगमध्ये घालून css फाईल करावी. वर दिलेल्या html प्रोग्रॅमला ती हेड टॅगमध्ये लिंक केली की पूर्ण प्रोग्रॅम तयार होईल. ब्राउजरमध्ये हे वेबपेज खालीलप्रमाणे दिसेल.

Friday, October 15, 2010

वेबसाईटचे नाव - डोमेन नेम

ब्राउजर व सर्व्हरची माहिती घेताना वेबसाईटच्या डोमेन नेमचा उल्लेख केला नव्हता. मात्र स्थानिक इंट्रानेट असो की बाहेरचे विश्वव्यापी इंटरनेट असो वेबसाईटला काहीतरी विशिष्ट नाव असावे लागते. विश्वव्यापी इंटरनेटला वेबसाईट जोडली असेल तर ते एकमेवाद्वितीय असणे आवश्यक ठरते अन्यथा एकाच नावाच्या दोन वेबसाईट असल्या तर सर्व्हर वा ब्राउजर या दोहोंसाठी ते अडचणीचे ठरेल. स्थानिक इंट्रानेटच्या बाबतीतही एका इंट्रानेटमध्ये प्रत्येक वेबसाइटचे नाव वेगळे असावेच लागते.भले तसेच नाव दुसर्‍या स्वतंत्र इंट्रानेटमधे वापरले असले तरी फारसे बिघडत नाही. कारण ते फक्त अंतर्गत वापरासाठी असते.

वेबसाईटचे नाव कसे असावे
डोमेन नेम किंवा वेबसाईटचे नाव हे सुटसुटीत, अर्थवाही व लक्षात ठेवण्याजोगे असावे. नाव लिहिताना स्पेलिंग चुकेल असे शब्द वापरू नयेत. खुद्द आमच्या संस्थांच्या वेबसाइटची नावे www.dnyandeep.com व www.dnyandeep.net ही स्पेलिंग खास चुकणारी असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. यापेक्षा आद्याक्षरे वापरून dipl व derf अशी ठेवली असती तर जास्त बरे झाले असते. काही वेळा ग्राहकाच्या इच्छेनुसार व आग्रहानुसार मोठे नाव ठेवले जाते. उदाहरणार्थ www.patwardhanhighschoolsangli.org मात्र या लाबलचक नावामुळे फारच थोडे लोक या वेबसाईटकडे वळतात. www.mymarathi.com या नावातील com या दुय्यम नावामुळे वेबसाईट व्यावसायिक असल्याचे भासते. tata.com,godaddy.com, yahoo.com ही नावे अधिक चांगली आहेत. काहीवेळा अर्थवाही अंक वा अक्षरे वापरून नाव सुटसुटीत करता येते. उदा. school4all.org,esakal.com,net4.in,way2sms.com. एखादी संस्था दरवर्षी एक कार्यक्रम वा सेमिनार करीत असेल तर त्या नावाने (वर्षाचा उल्लेख न करता) वेबसाईट करणे योग्य असते. उदा. habitat2010.org ऎवजी habitat.org कारण यामध्ये पूर्वीच्या कार्यक्रमांची नोंद ठेवता येते. पूर्वीच्या चुका होऊ नयेत म्हणून ज्ञानदीपतर्फे आता ग्राहकांचे प्रबोधन करून योग्य नाव सुचविले जाते.


इंट्रानेटमध्ये सहसा प्रत्येक कॉम्प्युटर वेगळ्या नावाने ओळखला जातो. व त्याला खाजगी IP - Internet Protocol (पत्ता) दिला जातो. मात्र बाह्य इंटरनेटसाठी वेबसाईटला निश्चित असा पूर्ण पत्ता (FQDNs - Fuuly qualified domain name) व सार्वजनिक पत्ता (public IP address) देणे आवश्यक असते. इंन्ट्रानेट व इंटरनेट सर्व्हरच्या नावाचा (host header name) वापर करुन एकमेकांशी संपर्क ठेवू शकतात या व्यवस्थेद्वारे एकच IP address अनेक वेबसाईटसाठी वापरणे शक्य होते.

कॉम्प्युटरचे नाव चार संख्यांच्या समूहाने दर्शविले जाते. त्यातील प्रत्येक संख्या 0 ते 255 या दरम्यान असावी लागते. सहसा ही नावे एका सबनेटमधील दि्ली जातात. उदाहरणार्थ 192.168.10.0 या सबनेटमध्ये 192.168.10.1 ते 192.168.10.254 पर्यंत नावे देता येतात. जरी चार संख्यांचे नाव वेबसाईटला दिले तरी ते लक्षात ठेवणे अवघड जाते यासाठी वेबसाईटच्या विषयाशी वा संस्थेशी संबधित असे शब्द वापरून पर्यायी नाव तयार केले जाते यालाच डोमेन नेम (Domain Name) असे म्हणतात. या नावात दोन भाग असतात. पहिल्या भागात वेबसाईटसंबंधित नावतर दुसर्‍या भागात वेबसाईटचा प्रकार ओळखता यावा यासाठी प्रचलित असे com, gov,org, net,in यासारखे दुय्यम नाव घेऊन व एका बिंदूने ते भाग जोडून पूर्ण डोमेन नेम तयार करतात. जसे dnyandeep.net. www ही अक्षरे या नावाआधी बिंदूने जोडली की बाह्य इंटरनेटसाठी पूर्ण नाव www.dnyandeep.net असे तयार होते.

दुय्यम नाव com असेल तर वेबसाईट व्यावसायिक आहे gov असेल तर शासकीय आहे व org असेल तर धर्मादाय संस्थेची वेबसाईट आहे असे ऒळखता येते. देश व प्रदेशाप्रमाणेही दुय्यम नाव देता येते जसे in ( India), au ( Australia), uk( United Kingdom),asia इत्यादी. आता net,tv,biz इत्यादी बरीच नवी दुय्यम नावे वापरली जाऊ लागली आहेत व केवळ दुय्यम नावाने वेबसाईटचा प्रकार निश्चित करता येत नाही.

इंट्रानेट( स्थानिक खाजगी नेटवर्क) साठी खालील सबनेट राखीव ठेवण्यात आले आहेत.
10.0.0.0 - 10.255.255.255
172.16.0.0 - 172.31.255.255
192.168.0.0 - 192.168.255.255
इंट्रानेटमध्ये कॉम्प्युटरच्या नेटबायॉस नावाशी अक्षरी नाव जॊडले जाते.

बाह्य इंटरनेटवर संदेश पाठविणे व ग्रहण करणे यासाठी (TCP/IP - Transmission Control Protocol/Internet Protocol) या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीनुसार नाव जोडणीसाठी डोमेन नेम सिस्टीम (DNS - Domain Name System) वापरली जाते. ISP (Internet Service Provider) कंपन्या अमेरिकन रजिस्ट्री फॉर इंटरनेट नंबर्स या संस्थेकडून IP address चे ब्लॊक्स ( सबनेट्स) विकत घेतात. त्यातील एक पत्ता वेबसाईटच्या नावाशी (डोमेन नेम) जोडून ते नाव जागतिक रजिस्टरमध्ये नोंदले जाते. यालाच डोमेन रजिस्ट्रेशन असे म्हणतात. हे नाव उपलब्ध आहे की नाही हे IANA - Internet Assigned Numbers Authority यांच्या मध्यवर्ती रजिस्टरमध्ये पडताळून पाहूनच हे रजिस्ट्रेशन केले जाते. या कामासाठी व IP address साठी ISP कंपनीकडून दरवर्षी भाडे आकारले जाते. दुय्यम नावानुसार व मागणीनुसार या भाड्यात फेरबदल केले जातात.

वेबसाईटचा पत्ता ओळखण्यास खालील गोष्टींची आवश्यकता असते.
१. ज्या कॉम्प्युटरवर वेबसाईट ठेवली आहे त्या कॉम्प्युटर(सर्व्हेर)चे नाव
२. IP address
३. पोर्ट नंबर (कॉम्प्युटरवरील वेबसाईटच्या मेमरी लोकेशनचा पत्ता)
४. सर्व्हरचे पर्यायी नाव ( Host header name)

इंटरनेटवर वेबसाईट शोधण्यासाठी URL(Universal Resource Locator) लिंकचा वापर करता येतो. उदा हरणार्थ http://www.microsoft.com (शाब्दिक नाव) किंवा http://207.46.230.210( IP address - सांकेतिक मूळ नाव) या नावाला जोडून पोर्ट नंबरही देता येतो. उदा.http://www.microsoft.com.80/ किंवा http://207.46.230.210.80

कॉम्प्युटरचा IP address व TCP/IP सेटींग शोधणे
कॉम्प्युटरच्या कंट्रोल पॅनेलमध्ये नेटवर्क कनेक्शन पर्याय निवडून त्यावर डबल क्लिक केले की लोकल एरिया नेटवर्कचा पर्याय दिसतो. त्यावर राईटक्लिक करून प्रॉपर्टीज हा पर्याय निवडावा. येणार्य़ा डायलॉग बॉक्समधील TCP/IP वर क्लिक करावे. म्हणजे IP address व TCP/IP ची सेटींग दिसतील.

बांधकाम क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय होलसिम पारितोषिके

पर्यावरणपूरक बांधकामासाठी होलसिम फौंडेशन फॉर सस्टेनेबल कंन्स्ट्रक्शन या कंपनीतर्फे "होलसिम पारितोषिके" या नावाची एक अभिनव व प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत जागतिक स्तरावरील भविष्यकाळास अनुसरून, व्यवहार्य व पर्यावरणपूरक अशा बांधकाम क्षेत्रातील कल्पक प्रोजेक्ट्सची निवड करून त्यांना गौरविले जाते व दोन दशलक्ष डॉलर किमतीची बक्षिसे दर तीन वर्षांनी होणार्‍या या स्पर्धेत दिली जातात. प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावर घेतल्या जाणार्‍या या स्पर्धा मुख्य स्पर्धा व नवोदित विद्यार्थ्यांसाठी अशा दोन गटात घेतल्या जातात.

महाराष्ट्रातील हरित गृहरचना (ग्रीन बिल्डींग) करणारे आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक यांना आपल्या कौशल्याचे व प्रोजेक्टचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करण्यास ही चांगली संधी आहे. या पूर्वीच्या स्पर्धेत सांगलीतील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. प्रमोद चौगुले व नवोदित गटात ज्ञानदीप फौंडेशनतर्फे दोन विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. मात्र पुरेशी पूर्व तयारी व व्यवस्थित प्रेझेंटेशन न होऊ शकल्यामुळे त्यावेळी निवड झाली नाही. आता यावेळच्या स्पर्धेत जास्तीत जास्त आर्किटेक्टनी यात भाग घ्यावा व ही स्पर्धा गांभिर्याने घेऊन सर्व नियम व अटींची पूर्तता योग्यप्रकारे करावी असे वाटते.

१ जुलै २०१० रोजी स्पर्धकांची नोंदणी सुरू झाली असून २३ मार्च २०११ पर्यंत ती खुली राहणार आहे. ही नोंदणी ऑनलाईन करावी लागणार असून प्रोजेक्टच्या प्रगतीनुसार वेळोवेळी माहितीत बदल व सुधारणा करण्यास वाव राहणार आहे. ज्ञानदीप फौंडेशन याबाबतीत सर्व ते सहकार्य करायला तयार आहे.

स्पर्धेचे दोन गट
१. मुख्य स्पर्धा - सर्वसाधारण गटातील ही स्पर्धा आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या यांच्यासाठी असून तंत्रविज्ञान, पर्यावरण तसेच सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक संदर्भात सुयोग्य व सद्यस्थितीस अनुरूप अशा बिल्डींग व बांधकाम प्रोजेक्ट्सचा यात समावेश करता येईल. डिझाइन पूर्ण झालेल्या परंतु १ जुलै २०१० पूर्वी प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात न झालेल्या ( किंवा बांधकाम वस्तू निर्मितीच्या बाबतीत व्यावसायिक उत्पादन सुरू न झालेल्या) प्रोजेक्टनाच या स्पर्धेसाठी प्रस्तुत करता येईल.

२. विद्यार्थ्यांच्या नव्या पिढीसाठी ( नेक्स्ट जनरेशन) स्पर्धा - ही स्पर्धा विद्यापीठ स्तरावरील पदवी परिक्षेच्या अंतिम वर्षातील (पदव्युत्तर व पीएचडीसहित) विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. त्यांना आपले या क्षेत्रातील संशोधन प्रकल्प स्पर्धेसाठी सादर करता येतील.

भविष्यकालीन गरजांचा शोध घेणारे प्रकल्प
या स्पर्धेचा मुख्य उद्देश प्रचलित बांधकाम क्षेत्रातील ज्ञानापलिकडे भविष्यकालीन गरजांचा शोध घेऊन सामाजिक आर्थिक तसेच पर्यावरणीय निकषांवर उत्कृष्ट ठरणार्‍या व अन्य ठिकाणी वापरात येऊ शकणार्‍या बांधकाम प्रकल्पांचा शोध घेणॆ हा आहे. प्रत्येक प्रवेशिकेची याच महत्वाच्या निकषांवर परिक्षा केली जाणार आहे. बिल्डींग वा स्थापत्य क्षेत्रातील बांधकाम प्रकल्प, लँडस्केप, अर्बन प्लॅनिंग व इन्फ्रास्ट्र्क्चर तसेच बांधकाम वस्तू व बांधकाम पद्धती यांचा या स्पर्धेसाठी समावेश करता येईल.

दोन टप्प्यांतील जागतिक स्पर्धा
युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मध्यपूर्व देश, व आशिया-पॅसिफिक या जगातील प्रमुख भागांत प्रादेशिक स्तरावर पहिल्या टप्प्यात स्पर्धा जाते. होलसिम फौंडेशनच्या सहयोगी विद्यापिठातील निष्पक्ष तज्ज्ञ परिक्षकांकडून पर्यावरणपूरक बांधकामाच्या वरील मुद्द्यांवर आलेल्या प्रकल्पांचे परीक्षण केले जाते. यात यशस्वी ठरणार्‍या स्पर्धकांना होलसिमतर्फे सुवर्ण, रौप्य व ब्रॉंझ पदके दिली जातात. हे यशस्वी स्पर्धकच दुसर्‍या टप्प्यातील जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

२३ मार्च २०१० पर्यंत स्पर्धा प्रवेश खुला
होलसिम स्पर्धेचे तिसरे सत्र १ जुलै २०१० रोजी सुरू झाले असून २३ मार्च २०११ पर्यंत यात स्पर्धेसाठी नाव नोंदणी करता येईल. ऑनलाईन पद्धतीने इंग्रजीत अगदी सोपा फॉर्म भरुन यात आपल्या सहभागाची व प्रकल्पाची नोंदणी करता येते. या स्पर्धेचे नियम, अटी व प्रवेश फार्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती होलसिम फौंडेशनच्या www.holcimawards.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतात एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपन्यांनी संयुक्तपणे होलसिम फौंडेशनच्या वतीने सर्वांना यात भाग घेण्याचे आवाहन केले आहे.

Thursday, October 14, 2010

वेबसाईट स्टाईलशीट

आपण वेबपेजमधील टॅगना गुणविशेष (attributes) कसे द्यायचे ते पाहिले. html 4 या html च्या सुधारित आवृत्तीप्रमाणे हेच गुणविशेष आता स्टाईल (style) या एकाच पद्धतीने दिले जातात. उदाहरणार्थ

body style="background-color:yellow"

h2 style="text-align:center"

p style="font-family:courier new; color:blue; font-size:20px"

भविष्यकाळात attributes चा वापर न करता स्टाईल पद्धतच वापरावी लागणार आहे. html प्रोग्रॅममध्ये टॅगबरोबर attributes दिले तर प्रोग्रॅम वाचण्यात अडचण येते. तसेच त्याचप्रकारचे अनेक टॅग असले तर प्रत्येक ठिकाणी असे
attributes द्यावे लागतात. यावर उपाय म्हणून स्टाईल हेड(head) टॅगमध्येच लिहून ठेवायची व body टॅगमध्ये attributes न देता केवळ साधॆ टॅग वापरायचे अशी सुधारणा करण्यात आली. त्याचे उदाहरण खाली दिले आहे.
या प्रोग्रॅमचे वेबपेज खाली दाखविले आहे.
वरिल उदाहरणात body style चा रंग वेबपेजला आला आहे. h2 आणि p या टॅगच्या स्टाईल हेडमध्ये दिल्यामुळे प्रोग्रॅममध्ये त्याची पुनरावृत्ती टळली असून सर्व ठिकाणी त्याचा योग्य वापर झाला आहे. स्टाईल टॅगमुळे प्रोग्रॅम व प्रेझेंटेशन एकमेकापासून वेगळे झाल्याने प्रोग्रॅम अधिक सुलभतेने वाचणे शक्य झाले आहे.

याच्या पुढची पायरी म्हणजे हेड टॅगमधील स्टाईलचा कोड वेगळ्या फाईलमध्ये (style.css) सेव्ह करायचा व हेड टॅगमध्ये खालीलप्रमाणे त्याची लिंक द्यायची.

link rel="stylesheet" type="text/css" href="style.css"

आता style.htm व style.css दोन वेगळ्या फाईल झाल्यामुळे प्रोग्रॅमपासून स्टाईलशीट पूर्णपणे वेगळा झाला. ज्यावेळी style.htm हे वेबपेज ब्राउजरमध्ये उघडले जाते त्यावेळी style.css हा स्टाईलशीट प्रोग्रॅमला जोडला जातो व त्या स्टाईलचा उपयोग करून वर दाखविल्याप्रमाणेच वेबपेज दिसते.

वेबसाईट टेबल टॅग्स

वेबपेजवर टेबलचा वापर करून माहिती वा चित्रे घातली तर ती व्यवस्थित दिसण्यासाठी टेबलमधील attributesचा योग्य वापर करणे आवश्यक असते. टेबलमधील प्रत्येक आडवी ऒळ(tr) व उभा रकाना (td) यामुळे जो कप्पा किंवा सेल (cell) तयार होतो त्यासाठी cellpadding व cellspacing हे दोन महत्वाचे attributes आहेत.cellpadding हे सेलच्या आतल्या बाजूस मजकूर वा चित्राच्या भोवताली ठेवायची मोकळी जागा दर्शविते. तर cellspacing हे टेबल व सेल किंवा दोन सेलमधील मोकळी जागा दर्शविते. खालील उदाहरणात ४०० पिक्सेल रुंदीचे व २ पिक्सेल जाडीच्या बॉर्डरचे टेबल करण्यासाठी खालील कोड वापरले आहे. ( < व > या खुणा वगळल्या आहेत.)

table width="400" border="2" cellpadding="10" cellspacing="20" bgcolor="#003366"

येथे cellspacing वेगळे कळण्यासाठी table या टॅगला निळा रंग bgcolor="#003366" दिला आहे. cellpadding वेगळे कळण्यासाठी tr व td साठी तपकिरी रंग (bgcolor="#993300") वापरला आहे व
या सेलमध्ये वेबसाईटचे छोटे चित्र दाखविण्यासाठी खालीलप्रमाणे img टॅगला attributes दिले आहेत. ( < व > या खुणा वगळल्या आहेत.)

img src="debonair.jpg" width="150" height="100" alt="Debonair equipments" longdesc="http://www.debonairequipments.com"

खालील वेबपेजवरून आपल्याला सेल पॅडींग ( तपकिरी १० पिक्सेल रुंदी) व सेल स्पेसिंग (निळे २० पिक्सेल रुंदी) यातील फरक समजून येईल.

सेल पॅडींग नसेल तर मजकूर सेलबॉर्डरला चिकटून दिसतो. म्हणून सेल पॅडींगचा उपयोग लिखित मजकुराला मार्जिन देण्यासाठी केला जातो. तसेच चित्रासाठी हव्या त्या प्रकारची बॉर्डर दाखविण्यासाठी त्याचा उअपयोग होतो. सेल स्पेसिंगचा वापर बहुदा केला जात नाही. अर्थात त्याचा वापर करून खाली दाखविल्य़ाप्रमाणे चित्रांना उठावदारपणा येण्यासाठी योग्य बॅकग्राउंड देता येते.

वेबसाईट फ्रेम्स

एकाच टीव्ही स्क्रीनवर निरनिराळ्या भागांत वेगवेगळे कार्यक्रम दाखविता येतात. त्याप्रमाणे कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर निरनिराळ्या भागांत वेगवेगळी वेबपेजेस दाखविण्यासाठी फ्रेम्सचा वापर केला जातो. पूर्वी फ्रेम्सचा वापर करून वेबसाईट बनविली जायची. मात्र ज्या ब्राउजरला फ्रेम्स दाखविता येत नाहीत त्याच्यासाठी नो फ्रेम्स चा पर्याय ठेवला जायचा. सध्या फ्रेम्सच्या ऎवजी अन्य प्रभावी सुविधा उपलब्ध झाल्याने फ्रेम्सचा वापर फारसा होत नाही. गुगलवर इमेज पाहताना एका छोट्या फ्रेममध्ये गुगलचा संदर्भ व दुसर्‍या मोठ्या फ्रेममध्ये इमेज असणारे वेबपेज आजही आपल्याला पहायला मिळते.

फ्रेम्सचा वापर करून वेबसाईट बनवायची झाल्यास एका टेबलमध्ये जसे दुसरे टेबल घालता येते त्याप्रमाणे एका मुख्य फ्रेममध्ये बॅनर, डावीकडील मेनू व उजवीकडील वेबपेजसाठी आणि तळटीपेसाठी वेगवेगळ्या फ्रेम्स घातल्या जातात.
खालील उदाहरणामध्ये एक ३ पानाची वेबसाईट, फ्रेम्स वापरून कशी करता येईल ते दाखविले आहे.

खाली frames.htm चे कोड पहा. यात मुख्य फ्रेमसेटमध्ये बॅनरसाठी एक फ्रेम,डावीकडील मेनू (menu.htm)व उजवीकडील वेबपेजसाठी(contents.htm) एक फ्रेमसेट ( दोन फ्रेम्स असणारा) आणि खाली तळटीपेसाठी (bottom.htm) एक फ्रेम वापरली आहे. मेनू व कंटेन्ट फ्रेम्सना menu व contents अशी नावे दिली आहेत. त्याचा उपयोग मेनूमधील लिंकसाठी होतो.
आता banner.htm, menu.htm, contents.htm,bottom.htm अशी वेगवेगळी वेबपेजेस केली आहेत. त्यात contents.htm हे वेबपेज मेनूतील aboutus.htm सारखेच ठेवले आहे.
मेनूमधील प्रत्येक पर्यायाची वेबपेजेस(aboutus.htm,activities.htm,contact.htm) खाली दिली आहेत.
frames.htm हे वेबसाईटचे मुख्य पान आहे. ते ब्राउजरमध्ये पाहिल्यास खालील प्रमाणे पहिले पान दिसेल.Activities या पर्यायावर क्लिक केल्यास contents भागात activities.htm हे वेबपेज दिसेल.Contact या पर्यायावर क्लिक केल्यास contents भागात contact.htm हे वेबपेज दिसेल.
वरील उदाहरणाचा उपयोग करून तुम्हाला फ्रेम बेस्ड वेबसाइट तयार करता येईल.

Wednesday, October 13, 2010

टॅग उदाहरणे

१. body, div,span, align, li टॅग आणि attributes चे उदाहरण

२. body background आणि img टॅग आणि attributes चे उदाहरण

वेबसाईट टॅग गुणविशेष

वेबपेजसाठी लागणारे बहुतेक महत्वाचे टॅग आपण पाहिले. परंतु या टॅगना आवश्यक ते गुणविशेष (atrributes) दिल्याशिवाय वेबपेजची मांडणी आपल्याला हवी तशी करता येत नाही. या आधीच्या उदाहरणांमध्येही आपण body टॅगसाठी bgcolor,फॉंटसाठी size व color आणि टेबलसाठी border व width हे atrributes वापरले होते. attribute हे टॅगसंबंधी असल्याने टॅगच्या आत द्यावे लागतात.

आता असे कोणकोणते वापरता येतात त्याची माहिती खाली दिली आहे.( टॅगच्या < व > या खुणा व संपल्याचा टॅग दाखविलेला नाही याची नोंद घ्यावी.)
Body(body)
background="filename"
bgcolor="color value"
text="color value"
link="color value"
vlink="color value"

Division(div)
align="right/left/center"
style="property:value;"
class="classname"

Span (inline)(span)
style="property:value;"
class="classname"

Line Break
(br)
clear="left/right/all"


Paragraph
(p)
align="center/right"

Headline(h1,h2,h3,h4,h5,h6)
align="center/right"

Font(font)
face="name, name"
size="+/-value/fixed size"
color="color value"
Note: the font tag is being phased out in favor of CSS styles.

Horizontal Rule(hr)
size="XX"
width="XX/XX%"
noshade

Division(div)
align="left/center/right"

List Tags
1.Unordered List(ul)
type="disc/circle/square"
2.Ordered List(ol)
type="I/A/1/a/i"
start="value to start counting at"

List Item(li)
type=all ul and ol options

Anchor Link Tag(a)
href="filename"
target="windowname"

Image Tags (img)
src="filename"
align="left/right"
width="XXX"
height="XXX"
alt="text that desribes image"

ISMAP
USEMAP="#mapname"
Client-side Imagemap Tags

Define Map(map)
name="mapname"

Area Definition(area)
shape="rect/circle/poly/point"
coords="X,Y,X,Y"
href="imagename"

Table(table)
border="X"
width="XX/X%"
cellspacing="XX"
cellpadding="XX"
bgcolor="color value" background="filename"

Table Row(tr)
align="left/center/right"
valign="top/middle/bottom"
bgcolor="color value"

Table Data(td)
align="left/center/right"
valign="top/middle/bottom"
width=X
nowrap
colspan="X"
rowspan="X"
bgcolor="color value"

Table Header(th)
align="left/center/right"
valign="top/middle/bottom"
width=X
nowrap
colspan="X"
rowspan="X"
bgcolor="color value"

Caption(caption)
align="left/center/right"
valign="top/middle/bottom"

Frame Tags
Set Frames(frameset)
cols="XX/XX%/*"
rows="XX/XX%/*"

Frame Definition(frame)
src="filename"
name="framename"
noresize
scroll=auto/yes/no
marginwidth="XX"
marginheight="XX"

Base(base)
target="framename"/
"_self"/
"_top"/
"_parent"
(Note the underscores)

No Frames(noframes)
Between start and end tags, place the content that appears when a non-frames browser loads this page.

Form Tag (form)
method=get/put
action="programname"

Input Field(input)
name="variablename"
type=text/password/
checkbox/radio/submit/
reset/image

Selection List(select)
name="variablename"
size=XX
multiple

Scrolling Text Field(textarea)
name="variablename"
rows=XX
cols=XX
वरील सर्व टॅगचा त्यांच्या गुणविशेषासह वापर करून पहा. याची काही उदाहरणे पुढील लेखात दिली जातील.

वेबसाईट - मेटा टॅग

वेबपेजच्या हेड(head)मध्ये वेबपेजविषयी सर्व माहिती असते. आपण मागे title व author हे दोन टॅग पाहिले. वेबपेजचे शीर्षक व लेखक यांची माहिती या टॅगमधून देता येते. ब्राउजरला वेबपेज दाखविण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, तसेच शोधयंत्राला (Search Engine) मजकुरातील माहितीचा त्वरित शोध घेता यावा यासाठी description व key words हे मेटा टॅग वापरले जातात. description ही माहिती शोधयंत्राला मजकुराविषयी माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरते तर key words म्हणजे मजकूर कशासंबंधी आहे हे शोधयंत्राला कळावे यासाठी दिलेले महत्वाचे शब्द होत. मात्र आता आधुनिक शोधयंत्रे केवळ कीवर्ड्सवर अवलंबून राहत नाहीत. त्यामुळे याचे महत्व कमी झाले आहे.
आता वेबपेजविषयी माहिती (metadata) देण्यासाठी मेटा टॅगचा कसा वापर करतात ते खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल.


REFRESH
ब्राउजरला वेबपेज उघडण्यास वेळ लागत असेल तर आपण रिफ्रेश बटन दाबून पुनः पेज लोड करतो. हे कार्य १० सेकंदानी आपोआप व्हावे यासाठी खालील मेटाटॅग वापरतात.
meta http-equiv="refresh" content="5; url=http://www.dnyandeep.net"
ताज्या बातम्या, शेअरचे भाव इत्यादी सतत बदलती माहिती वेबपेजवर लोड केली जात असेल तरी नवी माहिती लगेच दिसण्यासाठी या टॅगचा वापर करून पेज रिफ्रेश केले जाते.

REDIRECT
काही वेळा वेबसाईट वा वेबपेजचे नाव व जागा बदलली असल्यास जुन्या वेबपेजवर जाणार्‍या ग्राहकाला वेबपेज दिसत नाही. अशावेळी या वेबपेजवरून नव्या वेबपेज वा वेबसाईटकडे ग्राहकाला रिडायरेक्ट करण्यासाठी (आपोआप नेण्यासाठी) वरीलप्रमाणेच रिफ्रेश मेटाटॅग वापरतात. मात्र वेबपेजचे नाव वेगळे नवे देतात.
meta http-equiv="refresh" content="5; url=http://www.mymarathi.com"
याचा अर्थ ब्राउजरने ५ सेकंदानी http://www.mymarathi.com हे नवे वेबपेज उघडावे.

NOINDEX
काहीवेळा शोधयंत्राने हे पान शोधू नये असे आपणास वाटत असेल तर meta name="ROBOTS" CONTENT="NOINDEX" असा मेटा टॅग वापरावा.

आपण इतरही काही माहिती मेटा टॅगने देऊ शकता मात्र त्याची दखल शोधयंत्राद्वारे घेतली जात नाही.

इंटरनेट,ब्राउजर व सर्व्हर

इंटरनेटविषयी माझा याआधीचा लेख वाचावा. ब्राउजर व सर्व्हर

वेबसाईट व वेबपेजेस पाहण्यासाठी वापरला जाणारा प्रोग्रॅम म्हणजे ब्राउजर. ज्या कॉम्प्युटरवर वेबसाईट व वेबपेजेस ठेवलेली असतात त्याला सर्व्हर असे म्हणतात. असा सर्व्हर बारा महिने चोवीस तास ( देखभाल व दुरुस्तीचा थोडा काळ वगळता) कार्यरत ठेवावा लागतो. साहजिकच सर्व्हर धुळविरहित जागेत व कमी तापमानाला ठेवणे आवश्यक असते. शिवाय त्यावरील सर्व्हर प्रोग्रॅम व्यवस्थित चालू ठेवणे, व्हायरस वा हॅकिंगपासून तो सुरक्षित ठेवण्यासाठी सुयोग्य संरक्षण यंत्रणा ( फायरवाल) त्यात बसवावी लागते. सर्व्हरला विनाखंड वीजपुरवठा करावा लागतो. यासाठी बॅटरी बॅक अप व व्होल्टेज व करंटनियंत्रक बसवावे लागतात. सर्व्हरपासून वेबपेजेसची माहिती सर्वदूर पाठविण्यासाठी डिश प्रक्षेपक बसवावे लागतात. सर्व्हरपासून डिशपर्यंत इलेक्ट्रिक केबल जोडली जाते. डिशमधून प्रक्षेपित केलेली माहिती सॅटेलाईटवरून सर्वदूर परावर्तित केली जाते. टेलिफोन वा इंटरनेट सेवा देणार्‍या कंपन्यांच्या ग्राहक यंत्रणेद्वारे त्याचे ग्रहण होते व नंतर केबलमधून वितरण केले जाते. ती कॉम्प्युटर सर्व्हरकडून ग्राहकाच्या ब्राउजरपर्यंत जाईपर्यंत इंटरनेटच्या जाळ्यातील अनेक टप्प्यांवर मार्गदर्शक कॉम्प्युटर (रूटर) मधून सर्वात जवळच्या मार्गाने छोट्या छोट्या तुकड्यात (पॅकेट्समधून) पाठविली जाते. ग्राहकाच्या ब्राउजरद्वारे त्याचे संकलन करून ती माहिती मॉनिटरवर दाखविली जाते. यासाठी TCP/IP नावाची प्रणाली वापरली जाते.

या सर्व यंत्रणेला खर्च बराच येतो व कुशल तंत्रज्ञांची व्यवस्था करावी लागते. वेबसाईट करू पाहणार्‍या छॊट्या कंपनीला वा व्यक्तीला हा खर्च पेलणे अशक्य असते. यासाठी इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडर कंपन्यांचे साहाय्य घ्यावे लागते. त्यांच्या सर्व्हरवर आपली वेबसाईट ठेवली (वेबसाईट होस्ट करणे असे म्हणतात) की त्यांच्याकडून सर्व व्यवस्था केली जाते या सेवेबद्दल दरवर्षाला काही रक्कम भाडे म्हणून आकारले जाते. भाड्याची रक्कम वेबसाईट कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे, त्याला किती जागा(मेमरी) लागते व किती बँडविड्थ पुरविली जाते यावर अवलंबून असते.

मेमरी - माहिती साठविण्यासाठी लागणार्‍या हार्डडिस्कवरील जागेला मेमरी म्हणतात. मेमरीचा सर्वात लहान भाग म्हणजे बिट(bit) याची किंमत ० किंवा १ असते (द्विमान पद्धती). एका अक्षरासाठी ८ बिटचा संच वापरला जातो. त्याला बाईट (byte)असे म्हणतात. १०२४ बाईट म्हणजे १ किलोबाईट (1kb) , असे १०२४ किलोबाईट म्हणजे १ एमबी (1mb - megabyte), असे १०२४ एमबी म्हणजे १ जीबी तर असे १०२४ जीबी म्हणजे १ टिबी (1tb - terrabyte) अशा चढत्या क्रमाने मेमरी मोजली जाते. एक पानाचा मजकूर साठविण्यासाठी फक्त २ केबी जागा पुरेशी होते. मात्र फोटोसाठी बरीच जास्त जागा लागते.( विशेष संस्कार करून ती १०० केबीपेक्षा कमी करता येते.) एका मिनिटाच्या ध्वनीफितीसाठी १ एमबी तर व्हिडिओसाठी सुमारे ५ एमबी जागा लागते. सर्वसाधारण वेबसाईटला ( १५ ते २० पाने व प्रत्येक पानावर २ फोटो) सुमारे १० एमबी जागा पुरेशी होते. फोटोगॅलरी व ग्राफिक जास्त रिझोल्युशनचे असेल तर ५० एमबी जागा आवश्यक असते. ISP सेवा देणार्‍या कंपन्या सहसा ५० एमबी जागा देतात.

बँडविड्थ - सर्व्हरकडून माहिती पाठविण्याचा तसेच ग्राहक कॉम्प्युटरवर माहिती ग्रहण करण्याचा वेग बँडविड्थवर अवलंबून असतो. सर्व्हरकडून अनेक वेबसाईटला सेवा पुरविल्या जात असल्याने ग्राहक संख्येत व माहितीच्या एकूण मागणीत वाढ झाली की माहिती देण्याचा व घेण्याचा वेग मंदावतो. जास्त बँडविड्थ असेल तर असा परिणाम होत नाही. छोट्या रस्त्यावरील वाहतूक व मोठ्या रुंद रस्त्यावरील वाहतुकीत जसा फरक पदतो. तसेच येथेही होते.

Monday, October 11, 2010

वेबपेजचा टेबल लेआउट

कोणतेही वॆबपेज पाहिले तर त्यात बहुतेकवेळा वरच्या बाजूला बॅनर, डाव्या बाजूला मेनूलिंक, उजव्या बाजूस माहिती व अगदी तळाशी वेबसाईट डिझाईनरचे नाव व कॉपीराईट मजकूर असतो. आपल्याला तसा टेबल लेआउट तयार करून वेबपेज तयार करता येईल.

यासाठी एक तीन ओळी व एक रकाना असलेले टेबल करून त्यातील मधल्या कप्प्यात दुसरे, एक ओळ व दोन रकाने असलेले टेबल तयार करायचे.

वेबपेजची रुंदी मॉनिटरच्या स्क्रीनच्या रुंदीवर ठरवावी लागते. ८०० x ६०० आकाराच्या स्क्रीनसाठी साधारणपणे ७७९ पिक्सेल एवढी टेबलची रुंदी ठेवावी. हाय रिझोल्युशनच्या (१०२४ x ६००) मोठ्या स्क्रीन साठी lcd वा लॅपटॉपसाठी १००२ पिक्सेल रुंदी ठेवली जाते. मात्र ग्राहक कोणता मॉनिटर वापरतो हे निश्चित नसल्याने ही रुंदी पिक्सेल ऎवजी परसेंटेजमध्ये ठेवणे अधिक श्रेयस्कर असते.

टेबलची रुंदी १००% ठेवली की स्क्रीनच्या रुंदीप्रमाणे मग ते टेबल कमीजास्त रुंद होते. उंचीला त्याप्रमाने बंधन नसते कारण जास्त माहिती असल्यास वेबपेजवर आपोआप स्क्रोल बार येतो. व तो वापरून आपल्याला वेबपेज खाली वर करता येते.
वरीलप्रमाणे वेबपेज ले आउटचा प्रोग्रॅम खाली दिला आहे.
हे वेबपेज प्रत्यक्षात असे दिसेल.
मोठ्या पूर्ण रुंदीच्या वेबपेजचे उदाहरण प्रत्यक्ष दाखविता येत नसल्याने अशा टेबल लेआउटचा नमुना व त्याप्रमाणे लेआउट असणार्‍या वेबपेजचे चित्र खाली दिले आहे.
आपणही आता असे आपले स्वतःचे वेबपेज स्वतः फक्त नोतपॅदच्या साहाय्याने बनवू शकाल.

वेबसाईट - टेबल

हिशोब लिहिण्यासाठी, बिल करताना, मार्कलिस्ट तयार करताना व अशाच कामासाठी तक्ता किंवा कोष्टक (table) वापरणे सोयीस्कर ठरते.

वेबपेजवर टेबल घालण्यासाठी table व /table हे टॅग वापरले जातात. टेबलची बॉर्डर दिसावयास हवी असेल तर बॉर्डर साठी १,२ वा आवश्यक त्या जाडीसाठी वाढता आकडा लिहिला जातो. मात्र नको असल्यास त्याचे मूल्य ० लिहावे लागते.

प्रत्येक टेबलमध्ये आडव्या ओळी (rows) व उभे रकाने (columns) असतात. टेबलमध्ये पहिल्यांदा आडवी ओळ tr व /tr ने तयार करून जितके रकाने असतील तितक्या वेळा td व /td हे टॅग घालून त्याच्या आत माहिती लिहावी लागते.

वरील टेबलमध्ये प्रत्येक ओळ व रकाना यामुळे जो कप्पा बनतो त्याला cell म्हणतात. टेबल फक्त एका कप्प्याचे असले तरी त्यात एक tr td /td /tr असे टॅग द्यावे लागतात.

टेबलमध्ये सहसा पहिल्या ओळीत रकान्याचे शीर्षक असते. त्यातील माहिती ठळक दिसावी म्हणून पहिल्या ओळीतील रकान्यांसाठी th व /th हे टॅग वापरता येतात.खाली एक टेबलचा प्रोग्रॅम दिला आहे.
त्याचे आउटपुट वेबपेजवर खालीलप्रमाणे येते.

अशा टेबलचा वापर करून एका कप्प्यात माहिती तर दुसर्‍या कप्प्यात चित्र वा फॊटो ठेवून चांगले वेबपेज करता येते. यात योग्य कप्पे निवडून माहिती चित्राच्या वर बाजूला वा खाली घालता येते.

वेबसाईट - बुलेटेड लिस्ट

आपल्याला पुष्कळ्वेळा काही नावांची यादी करायची असते. एकतर क्रमांक घालून वा काही खूण(bullet) काढून प्रत्येक ओळीवर आपण ती नावे लिहितो.
वेबसाईटवर अशी नावे लिहिण्यासाठी बुलेटेड लिस्ट वापरतात. क्रमांक यादी दाखविण्यासाठी ol (orderly list) तर बुलेटसाठी ul (unorderly list) हे टॅग वापरतात. अर्थात टॅग संपला हे दर्शविण्यासाठी /ol किंवा /ul हे टॅग लिहावे लागतात. नावाची प्रत्येक ओळ वेगळी दाखविण्यासाठी li व /li या टॅगचा वापर करावा लागतो. ज्ञानदीप फौंडेशनची संकेतस्थळे दाखविण्यासाठी खालील प्रोग्रॅम लिहून दाखविला आहे. (मराठी कसे लिहायचे याची माहिती नंतर देणार आहे. सध्या आपण त्याऎवजी इंग्रजी शब्द लिहून बघावेत.)

वेबसाईटवर ही माहिती खालीलप्रमाणे दिसेल.

आता हीच माहिती क्रमांकासहित येण्यासाठी प्रोग्रॅममध्ये फक्त ul च्या जागी ol व /ul च्या जागी /ol लिहिले की खालीलप्रमाणे यादी दिसेल. एका यादीतील एका नावाखाली त्या नावाविषयी दुसरी यादीदेखील करता येते.
ती खालीलप्रमाणे दिसेल.हेडींग, पॅरेग्राफ, चित्र व बुलेटेड लिस्टचा वापर करून तुम्हाला आता आकर्षक माहिती लिहिता येईल.

Saturday, October 9, 2010

वेबसाईट - रंगांची दुनिया

निसर्गात असणार्‍या विविध रंगांमुळे जग आपल्याला सुंदर दिसते. त्याचप्रमाणे रंग वेबसाईटचे सौंदर्य खुलवितात. ब्लॅक अँड व्हाईट छपाईपेक्षा रंगीत जाहिराती व मासिके कितीतरी जास्त आकर्षक दिसतात. रंगांचा सुयोग्य वापर केल्यास वेबपेजही आकर्षक बनविता येते. सिनेमा, टीव्ही पाहत असताना ज्याप्रमाणॆ आपल्याला प्रत्यक्षाचा भास होतो तोच अनुभव आपण वेबसाईट पाहणार्‍याला देऊ शकतो.

color code ( रंग दर्शविण्याच्या पद्धती) वेबसाईटवर रंग दर्शविताना रंगाचे नाव, विशिष्ठ रंगातील लाल,हिरव्या व निळ्या रंगांचे प्रमाणदर्शक आकडे ( r,g,b) वा हेक्झाडेसिबल पद्धतीची एक संख्या अशा वेगवेगळ्या पद्धती वापरता येतात.

रंगांची नावे red,blue,yellow,gray,black यासारखी असतात.

दशमान पद्धती - आपण नेहमी दशमान पद्धती वापरून संख्या लिहितो. म्हणजे संख्येतील कोणत्याही स्थानाचा अंक ० पासून ९ पर्यंत असतो. ९ पेक्षा मोठी संख्या लिहायची झाल्यास स्थान वाढविले जाते उदा १० या संख्येत दोन अंक आहेत (एकम्‌ स्थानाला ० तर दशम्‌ स्थानाला १) याप्रमाणे स्थानांची नावे एकम्‌, दशम्‌ ,शतम्‌, सहस्र, दशसहस्र अशी दिली जातात.

rgb पद्धत - कोणताही रंग लाल, हिरवा व निळा या प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून बनविता येतो. रंगाची छटा ० ते २५५ अशा एकूण २५६ अंकांत दर्शविता येते. सर्व रंगांच्या छटा शून्य असतील तर काळा रंग rgb( ०,०,०) तयार होतो. सर्व रंग पूर्णपणे गडद असतील तर पांढरा रंग rgb(२५५,२५५,२५५) तयार होतो. याप्रमाणे लाल रंगासाठी rgb(२५५,०,०),हिरव्या रंगासाठी rgb(०,२५५,०) व निळ्या रंगासाठी rgb(०,०,२५५) हा (R,G,B) कोड वापरला जातो. या रंगांच्या कमीजास्त मिश्रणाने इतर अनेक रंग बनविता येतात. उदा. जांभळा रंग rgb(२५५,०,२५५), पिवळा रंग rgb(२५५,२५५,०)

हेक्झाडेसिबल पद्धत - हेक्झा म्हणजे सोळा. हेक्झाडेसिबल पद्धतीत ० ते ९ या अंकांनंतर १०,११,१२,१३,१४,१५ दर्शविण्यासाठी A(१०),B(११),C(१२),D(१३),E(१४),F(१५) अशी अक्षरे वापरली जातात. याप्रमाणे एका स्थानाची किंमत ० पासून १५ (एकूण १६) अशी बदलू शकते. दशमान पद्धतीतील २५५ या संख्या हेक्झाडेसिबल पद्धतीत FF अशी लिहावी लागते. रंग दर्शविण्यासाठी rgb मधील तीन संख्या एकत्र करून एक संख्या लिहिली जाते व हेक्झाडेसिबल पद्धतीसाठी # या चिन्हाचा उपयोग करतात. याप्रमाणे पांढरा रंग #FFFFFF , काळा रंग #000000, जांभळा रंग (लाल +निळा) #FF00FF, पिवळा रंग (लाल+हिरवा) #FFFF00 असे लिहिले जातात.

यातील रंगांच्या छटा ० ते २५५ वा 00 ते FF यादरम्यान बद्लून अनेक रंग बनविता येतात. अशा प्रकारे असंख्य ( २५६ गुणिले २५६ गुणिले २५६) रंग बनविणे शक्य असले तरी सर्व मॉनिटरवरील रिझोल्युशनच्या मर्यादांमुळे हे रंग आहे तसे दिसू शकत नाहीत. यामुळे वेबसाईटच्या माध्यमासाठी काही रंग सुरखित मानले जातात व त्यांचाच सहसा वापर करण्यात येतो.

वेबसाईटसाठी सुरक्षित रंग - रंगछ्टा ० पासून २५५ पर्यंत असल्या तरी त्यातील सहा टप्प्यांवरील (0%,20%,40%,60%,80%,100%) रंगछटा वापरून सुरक्षित रंग बनविले जातात हे टप्पे असे

RGB साठी ०,५१,१०२,१५३,२०४,२५५ व हेक्झाडेसिबल पद्धतीसाठी 00,33,66,99,CC,FF. उदा. निळ्या रंगातील छटा

सुरक्षित रंगछटा उदाहरणे

आता नवे लॅपटॉप व LCD मॉनिटर यांचे रिझोल्युशन जास्त असल्याने सुरक्षित रंगांव्यतिरिक्त इतर रंगही त्यावर नीट दिसू शकतात. मात्र साध्या मॉनिटरवर ते जसेच्या तसे दिसणार नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे.

लेखनामध्ये अक्षरांचा व शब्दांचा रंग कसा दाखविता येतो हे आपण धडा ३ मध्ये पाहिले. fontcolor="white" किंवा font color=#CC6699" किंवा fontcolor="rgb(153,100,85)" वरील उदाहरणात फॉंट कोडच्या दोन्ही बाजूस < व > ही चिन्हे द्यावी लागतात. मगच तो टॅग पूर्ण होतो.(या वेबपेजमध्ये प्रत्यक्ष टॅग दाखविणे शक्य नसल्याने हे भाग सुटे केले आहेत.

आता वेबपेजचाच रंग बदलावयाचा असेल तर BODY टॅगमध्ये BGCOLOR खालीलप्रमाणे लिहिता येतो.
body bgcolor="#BBE6FA"
किंवा
body bgcolor=rgb(51,153,102)
बर्‍याच वेळा rgb पद्धतीने लिहिलेला रंग फायरफॉक्ससारख्या ब्राउजरमध्ये नीट दिसत नाही. यासाठी शक्यतो हेक्झाडेसिबल पद्धतीत रंग दर्शवावा.
आता तुम्ही पहिल्या तीन धड्यात body चा bgcolor व font चा color बदलून त्यांचा वेबपेजवर काय परिणाम होतो ते पहा व आकर्षक रंगसंगती तयार करा.