Wednesday, January 17, 2024

डिजिटल डायरी

 सध्याच्या नेट कनेक्टेड   युगात  फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इतर सार्वजनिक प्रसार माध्यमांच्याऐवजी, आपले विचार माडण्यासाठी आणि आठवणी जतन करण्यासाठी आपली स्वतःची डिजिटल डायरी असणे आवश्यक झाले आहे.कारण त्यातील कोणताही भाग कोणालाही दाखविण्याचा वा सार्वजनिक करण्याचा आपला अधिकार यामुळे अबाधित राहतो. शिवाय आपले स्वतःचे  एक अद्वितीय स्थान नेटवर निर्माण होते. 

आपल्या  स्वतःच्या मालकीची  वेबसाईट हे त्याचे उत्तर आहे. ज्ञानदीप तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि व्यवसायाला अनुसरून अशी वेबसाईट डिझाईन करू शकेल आणि लेख लिहिणे, फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणे याबाबत आपणास मार्गदर्शन करू शकेल. 

ही वेबसाईट म्हणजे आपली नेटवरील  डिजिटल डायरीचेच काम करेल व ती कोठूनही आणि केव्हाही  उघडता येईल वा त्यात नोंदी करता येतील. या सा-या नोंदी तारखेनुसार वा विषयानुसार जतन करता येतील. यातील कोणताही लेख आपल्या मित्रमंडळीना पाठविता येईल  किंवा सर्वांसाठी प्रसिद्ध करता येईल.  

तुम्‍हाला ऑनलाईन शिक्षण, सल्ला वा काही सेवा पुरवायच्या असतील तर त्यासाठीही अशी वेबसाईट उपयुक्त ठरेल.याबाबतीत अधिक माहितीसाठी कृपया +919422410520 / info@dnyandeep.com वर संपर्क साधावा

No comments:

Post a Comment