Saturday, January 13, 2024

बहुगुणी व शिकायला सोपी पायथॉन भाषा शिका व संगणकतज्ज्ञ बना.

ज्ञानदीपमध्ये वेबसाईट, सॉफ्टवेअर आणि एपसाठी लागणा-या सर्व भाषा शिकण्याची सोय असली तरी आता लहानांपासून थोरांपर्यंत, कोणालाही सहज शिकता येणा-या पायथॉन या आधुनिक भाषेचे अद्ययावत शिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे.


 पायथॉनची वैशिष्ठ्ये


१. पायथॉन सध्या सर्वात जास्त वापरली जाणारी आणि C प्रमाणे कॉम्प्युटर हार्डवेअरशी निगडीत असणारी प्रोग्रॅमिंग भाषा आहे.

२. पायथॉनमध्ये आपण C# वा जावाप्रमाणे  ऑब्जेक्ट-ओरिएंटेड किंवा C प्रमाणे प्रोसीजर पद्धतीने  प्रोग्रामिंग करू शकतो.

३. पायथॉन प्रोग्राम्स जावासारख्या इतर प्रोग्रामिंग भाषांपेक्षा कितीतरी लहान असतात. सहज वाचता येतात.

४.  गुगल, अमेझॉन, फेसबुक, इन्स्टाग्राम, ड्रॉपबॉक्स, उबर… इत्यादी जवळजवळ सर्व तंत्रज्ञ कंपन्या  आपल्या वेबसाईटसाठी प्रामुख्याने पायथॉन भाषा वापरतात.

५.  पायथॉनमध्ये  सर्वात मोठी सुविधा म्हणजे तयार प्रोग्रॅम्सची लायब्ररी. त्यांचा वापर करून अगदी थोड्या ओळीत अवघड क्लिष्ट गणिती प्रक्रिया, भौमितिक आकृत्या वा ग्राफ काढता येतात.

६. लहान मुलांसाठी छोटे मनोरंजक खेळ व व्हिडिओ बनविण्यासाठी लागणारी स्क्रॅच, टर्टल ग्राफिक्स व इतर अशीच सॉफ्टवेअर पायथॉन भाषाच वापरतात.

७. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून ते यंत्रमानवापर्यंत साधनांना संचालित करण्यासाठी पायथॉनमध्येच प्रोग्रॅम लिहावे पागतात.

८. कॅमेराद्वारे चित्र वा प्रतिमा ओळखणे, फिंगर प्रिंटींग, बार कोड स्कॅनिंग, छापील पानावरून टेक्स्ट तयार करणे इत्यादी सरव गोष्टींसाठी पायथॉनचाच वापर केला जातो.



स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी आणि  डिजिटल भारताच्या उभारणीत सक्रीय सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने पायथॉन शिकणे आवश्यक आहे.

ज्ञानदीपने लहान मुलांपासून ते उच्चशिक्षित विद्यार्थ्यांपर्यंत पायथॉनचे विविध स्तरावरील शिक्षण देण्यासाठी अध्यासक्रम तयार केले असून अनेक शिक्षकांमार्फत सर्वांपर्यंत ते पोहोचविण्याचे उद्धीष्ट ठेवले आहे. लवकरच

ऑनलाईन पद्धतीनेहीया भाषेचे समग्र शिक्षण ज्ञानदीपतर्फे दिले जाणार आहे,

शिक्षणसंस्थांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन ज्ञानदीप सर्वांना करीत आहे.

No comments:

Post a Comment