Friday, January 19, 2024

गर्जे मराठी - जागतिक स्तरावर मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देणारी संस्था

 कॅलिफोर्नियातील श्री. आनंद गानू यांनी गर्जे मराठी या नावाची एक स्वयंसेवी संस्था सुरू केली असून अनेक देशातील मराठी उद्योजकांना एकत्र आणून त्याच्या व्यवसायवाढीसाठी तसेच महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षण व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी या संस्थेने स्पृहणीय कार्य केले आहे.

 16 जानेवारी 2024 रोजी स्विज्र्लंडमधील दावोस येथे भरलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये या संस्थेचा महाराष्ट्र शासनाबरोबर सामंजस्य करार झाला.  त्याचा थोडक्यात मसुदा

Garje Marathi Global Inc. USA - Government of Maharashtra MOU

 १) उद्दिष्टे :

महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांना आणि जगाच्या अन्य भागांमध्ये, देशांमध्ये राहत असलेल्या मराठी माणसांना पाठबळ देण्यासाठी एकत्रिरीत्या काम करणे :

🔹 उद्यमशील वृत्तीचा विकास आणि नवोपक्रमाची संस्कृती विकसित करणे.

🔹 नवोउद्योग वा उद्यमारंभ (स्टार्टअप), उद्यमी व नवोद्योजक आणि होतकरू तरुण ह्यांना व्यवसायाच्याच्या विकासासाठी सर्वतोपरी साहाय्य, प्रशिक्षण आणि आधार देणे.

🔹 जागतिक स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने नावीन्यपूर्ण परिसंस्था (इको-सिस्टम) तयार करण्यासाठी मदत करणे.

🔹 जगभरातील मराठी/महाराष्ट्रीय उद्योजकांना परस्पर सहकार्य सहजरीत्या व सुरळीतपणे करता यावे, ह्यासाठी पद्धतशीर कृती करणे व मार्ग आखणे.

🔹 महाराष्ट्र राज्यामध्ये थेट परकीय गुंतवणूक सुकरपणे व्हावी, ह्यासाठी आखणी करणे.

🔹 संपूर्ण जगामध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात उपलब्ध करणे.

🔹 महाराष्ट्रातील उद्योजक, उद्योगसमूह, औद्योगिक घराणी ह्यांना भारताबाहेर उद्योग - व्यवसाय सहज प्रक्रियेतून सुरू करता यावा ह्यासाठी आणि तेथे त्यांना व्यावसायिकदृष्ट्या स्थिरावण्यासाठी मदत करणे.

२) परस्पर सहकार्याची क्षेत्रे :

‘जी. एम. जी.’ची भूमिका आणि जबाबदाऱ्या :

We agreed upon many areas of collaboration and in order to have more impactful , well defined and positive results, we agreed to undertake two initiatives in year 2024.

🔹 वर उल्लेख केलेली ‘उद्दिष्टे’ साध्य करण्यासाठी ‘जी. एम. जी.’ जलद गतीने आणि अतिशय नियोजनबद्ध रीतीने काम करील. त्यात प्रामुख्याने दोन उपक्रम आहेत - अ) गर्जे मराठी एकलव्य, ब) गर्जे मराठी व्हेंचर कॅटालिस्ट्स.

🔹 गर्जे मराठी एकलव्य : सुदूर महाराष्ट्रातील, म्हणजे राज्याच्या अंतर्भागातील तरुण आणि महिला ह्यांच्यातील उद्यमशील वृत्तीला चालना देणे.

प्रारूप (मॉडेल) : आभासी कार्यशाळा, ‘प्रशिक्षकांना प्रशिक्षण द्या’ (ट्रेन दे ट्रेनर)ह्या प्रारूपाद्वारे अंमलबजावणी.

ध्येय / लक्ष्य : महाराष्ट्रातील ५० हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरांतील आणि २० हजार ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या मध्यम गावांतील (टू टियर व थ्री टियर सिटी) १० हजार शाळांच्या सहकार्याने लक्ष्य पूर्ण केले जाईल.

🔹 गर्जे मराठी व्हेंचर कॅटालिस्ट्स : व्यवसाय वाढणाऱ्या, प्रगतीच्या टप्प्यावरील महाराष्ट्रातील सक्षम उद्योजकांना भांडवल मिळवून देणे.

प्रारूप (मॉडेल) : सिलिकॉन व्हॅली, अमेरिकेतील इतर राज्ये व प्रदेश, जर्मनी, जपान, सिंगापूर येथील गुंतवणुकदारांचा समूह महाराष्ट्रातील नवोपक्रमांमध्ये (स्टार्टअप्स) १० कोटी अमेरिकी डॉलरची, भारतीय चलनात ८२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

लक्ष्य : यंदा म्हणजे २०२४ ह्या कॅलेंडर वर्षात अडीच कोटी अमेरिकी डॉलरची (भारतीय चलनात २०५ कोटी रुपये) गुंतवणूक करणे.

To guide us Hon’ble Chief Minister Shri. Eknath Shinde ji, , Hon’ble Industry Minister Shri. Uday Samant ji, will be always thers..

The highly respected, top position bureaucrats

  • Shir. Bhushan Gangrani, (I.A.S.) Additional Chief Secretary To Chief Minister.
  • Shri. Harshdeep Kamble, (I.A.S), Principal Secretary (Industries and Mining),
  • Dr. Vipin Sharma, (I.A.S.) CEO, MIDC
  • Dr. Amol Shinde (IAS/IPS/ICLS) P.S. to Chief Minister, Chairman-MD MPREIT Ltd.

गर्जे मराठीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.

ज्ञानदीप फौंडेशन आपल्या https://mymarathi.com या वेबसाईटवर या संस्थेची माहिती देणार असून त्यांच्या कार्यात सहभागी होणार आहे.


No comments:

Post a Comment