Monday, January 8, 2024

अटल ज्ञानदीप प्रयोगसंच - प्रत्येक शाळेसाठी परवडेल अशी अटललॅब

 महाराष्ट्रात ज्या शाळांना अटल लॅबची ग्रॅंट मिळालेली नाही अशा शाळांसाठी रासबेरी पाय या मायक्रोकॉम्प्युटरच्या साहाय्याने छोटा अटल ज्ञानदीप प्रयोगसंच आम्ही विकसित केला असून त्याची माहिती, खालील व्हिडीओत दिली आहे.

१. अटल ज्ञानदीप प्रयोग संच - रासबेरी पाय - भाग - १


२. अटल ज्ञानदीप प्रयोग संच - रासबेरी पाय - भाग - २


३. अटल ज्ञानदीप प्रयोग संच - - भाग - ३


 

अत्याधुनिक रोबोटिक किट प्रयोगशाळा

ज्या शाळांना अत्याधुनिक रोबोटिक किट सह इलेक्ट्रॉनिक सर्किट प्रयोगशाळा स्वखर्चाने उभारावयाची असल्यास ज्ञानदीप अशी प्रयोगशाळा व प्रशिक्षणाची सोय करणार आहे. त्यासाठी  ज्ञानदीपने पुण्यातील रोबोटीक किट बनविणा-या इनलर्न या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. 

यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने भारतातील विविध कंपन्यांचे  इलेक्ट्रॉनिक सर्किट कॉम्पोनंट्स, सरोबोटिक किट,  ड्रोन विकत घेतले असून त्याचे प्रशिक्षण शालेय शिक्षकांना देण्याची योजना आखली आहे.

सांगलीतील प्रभाकर खाडिलकर या योजनेचे संचालक असून अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधावा. 


No comments:

Post a Comment