Sunday, July 7, 2019

ज्ञानदीपची भावी गरुडझेप


ज्ञानदीप फौंडेशन केवळ नवनिर्मितीसाठी इतरांना मदत करण्यात व्यस्त राहणार नसून स्वतः-च्या अशा काही महत्वाकांक्षी योजना हाती घेणार आहे.
१.       वालचंद इनोव्हेशन व हेरिटेज प्रकल्प - वालचंद कॉलेजला सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणातून मुक्त करून परस्पर सहकार्याने पूर्ववत स्वयंसिद्ध व गौरवशाली बनविण्यासाठी माजी विद्यार्थी संघटना सशक्त करणे.

२.       आधुनिक संगणक प्रशिक्षण मराठी माध्यमातील शाळांत रुजवून तेथे नवनिर्मितीसाठी ज्ञानदीप मंडळे सुरू करणे व तेथील ज्ञानभांडाराला जागतिक स्तरावर नेणे.

३.       अमेरिकेत मायसिलिकॉनव्हॅली डॉट नेट या नावाची वेबसाईट कार्यान्वित करून ज्ञानदीपच्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न करणे

४.       माहिती तंत्रज्ञान व पर्यावरण अभियांत्रिकी या क्षेत्रात नेटद्वारे प्रशिक्षण व प्रत्यक्ष तांत्रिक सल्ला देण्यासाठी आपल्या सदस्यांचे तज्ज्ञ गट स्थापन करणे.
आता मरणपंथाला लागलेल्या अशक्त ज्ञानदीप फौंडेशनला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे गरुडझेप घेण्यासाठी सज्ज करण्याचा हा प्रयत्न अनेकांय्या दृष्टीने म्हातारचळ वाटण्याचीच जास्त शक्यता आहे. कदाचित फौंडेशनच्या  म्रृत्यपूर्वीची ती भडकलेली ज्वाला ठरेल.

पण तरीही ज्ञानदीपच्या बोधचिन्हात (लोगोमध्ये) दर्शविल्याप्रमाणे सा-या जगाला गवसणी घालण्याचे स्वप्न ज्ञानदीपने उराशी बाळगले आहे.
ज्ञानदीप लावू जगी हे बोधवाक्य स्वीकारून वीस वर्षापूर्वी सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ सर्वांच्या सहकार्याने अखंड चालू राहो हीच जनताजनार्दनाकडे प्रार्थना. - .डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली  

No comments:

Post a Comment