सीआयआय जीबीएस, दक्षिण महाराष्ट्र विभाग, कोल्हापूर
यांचेतर्फे २५ जुलै २०१९ रोजी ग्रीन बिल्डींग व ग्रीन फॅक्टरी तंत्रज्ञान या
विषयावर एक कार्यसत्र आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये सीआयआय जीबीएसचे राष्ट्रीय पातळीवरील विविध
तज्ज्ञ तसेच ज्ञानदीप फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सु. वि. रानडे व विश्वस्त डॉ. गिरीश
कुलकर्णी आणि आर्किटेक्ट सौ. गिरिजा कुलकर्णी यांनी या तंत्रज्ञानाची प्रमुख
वैशिष्ठ्ये, यशस्वी ग्रीन प्रकल्प यांची
माहिती दिली.
त्याचा गोषवारा खाली दिला आहे.
ग्रीन बिल्डिंगची आवश्यकता
- वाढते शहरीकरण
- बिल्डिंग व्यवसायात वाढ
- इमारतीच्या दिखावूपणास जास्त महत्व
- इमारतीतील पर्यावरणाकडे किंवा त्यामुळे शहराच्या सेवासुविधांवर पडणारा ताण वा पर्यावरणावर होणार्या घातक परिणामांकडे दुर्लक्ष
- पर्यावरणास पूरक बांधकामाची गरज
- लोकशिक्षण व जागृती अभियान आवश्य
ग्रीन बिल्डिंग संकल्पना
- निर्मितीसाठी कमी ऊर्जा लागणार्या तसेच पर्यावरणास पूरक ठरणार्या वस्तूंचा बांधकामात वापर
- सौरऊर्जेचा उष्णता व प्रकाश मिळविण्यासाठी वापर,
- नैसर्गिक वायुवीजन,
- पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर,
- घरातील हवेचा दर्जा योग्य राखणे
- पर्जन्य जलसंधारण
- सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर, घन कचर्यापासून खत वा बायोगॅस
सूर्याच्या उष्णतेपासून इमारतीचे संरक्षण
- परावर्तक पांढर्या रंगाचा उपयोग
- शेड नेटचा वापर
- स्लॅबवर हिरवळ
- स्लॅबवर पाण्याचा साठा
- स्लॅबवर पाण्याचा फवारा मारणे
- खिडक्यांवर सावली पडेल अशी व्यवस्था
- पांढरा परावर्तक रंग आणि सावलीत खिडक्या
- व्हरांडा व सावलीत खिडक्या
- दारे खिडक्यांसाठी फेरोसिमेंट पत्रे
- छपरासाठी फेरोसिमेंटच्या पन्हाळी
- फ्लाय अँश ( दगडी कोळशाची राख) , चुना व वाळूपासून केलेल्या विटा आणि बागेतील फरशा
- पोर्टलॆंड पोझोलाना सिमेंट फ्लाय अँश वा भाजलेल्या मातीचा समावेश
- पोर्टलॆंड स्लॅग सिमेंट
- आर. सी. सी. दरवाजे
- तयार सिमेंट कांक्रीटजिप्समचे पत्रे, फरशा, प्लॅस्टर, ज्यूट व काचेच्या धाग्यांचा वापर केलेले पत्रे
- फौंड्रीतील मोल्डींगची वाया जाणारी वाळू वापरून केलेले कांक्रीट
- प्लॅस्टिक आवरण असणारे लाक डी सामान
पुनर्वापर करता येणार्या वस्तू
- स्टील
- अल्युमिनियम
- लाकूड
- काच
- फरशांचे तुकडे
- लाकूड
- माती
- दगड
प्रदूषण नियंत्रण
अंतर्गत हवा प्रदूषण – सेंद्रीय रसायने
वा प्लॅस्टीकसदृश पदार्थांचा वापर असणारे पडदे, फर्निचर, मॅटिंग यातून बाहेर
पडणा-या सेंद्रीय रसायनांच्या वाफा ( VOC) हवेत मिसळून हवा प्रदूषित होते. एअर कंडिशनर असल्यास तीट
हवा न बदलता आतल्याआतच फिरत राहते व या घातक रसायनांचे हवेतील प्रमाण वाढत जाते.
यासाठी प्ल्रॅस्टिक पेंट ऐवजी सिमेंट पेंट, कापडी पडदे, फरशी व लाकडी फर्निचरचा
वापर करावा. तसेच दररोज २० टक्के बाहेरची शुद्ध हवा मिसळण्याची काळजी घ्यावी.
स्लॅबमध्ये गळती वा भिंतीवर ओल येत असली तर बुरशी वाढून हवा
प्रदूषित होऊ शकते. यासाठी जलावरोधक वस्तूंचा वापर करून यास प्रतिबंध करावा.
वाया गेलेले बांधकाम साहित्य- उदा. फुटक्या काचा, फरशीचे
तुकडे, वीट व कॉंक्रीटचे ब्लॉक, लाकडी फळ्या यांचा कल्पकतापूर्ण वापर तसेच
कारखान्यातील राख(फ्लायअश) , घनकचरा यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे
ज्या वस्तूंच्या निर्मितीसाठी कमी उर्जा लागते ( उदा.
प्रीकास्ट स्लॅब) त्या वस्तूंचा बांधकामात उपयोग करणे.
ज्या वस्तूंमुळे शीतकरणाच्या उर्जेत घट होते अशा वस्तू (
हवामिश्रित कॉंक्रीट ब्लॉक) वापरणे
ज्यांच्या वापरासाठी कमी उर्जा लागते अशा वस्तू ( सीएफएल
दिवे) वापरणे
ज्या उपकरणे वा यंत्रणांमुळे पाण्याची बचत होते अशांचा वापर
करणे.
उदा. ड्युअल फ्लश ( ६ किंवा ३ लिटर) तीन माणसांच्या कुटुंबासाठी पाण्याची बचत दररोज सुमारे ३२ लिटर
उदा. ड्युअल फ्लश ( ६ किंवा ३ लिटर) तीन माणसांच्या कुटुंबासाठी पाण्याची बचत दररोज सुमारे ३२ लिटर
वाटरलेस ( पाणी न लागणा-या) युरिनलचा उपयोग,
लीड गुणांकन पद्धत
- २६-३२ गुण लीड प्रमाणित बिल्डिंग
- ३३- ३८ गुण सिल्व्हर दर्जाची बिल्डिंग
- ३९- ५१ गुण गोल्ड दर्जाची बिल्डिंग
- ५५-६९ गुण प्लॅटिनम दर्जाची बिल्डिंग
हरित तंत्रज्ञान वापरून आपल्या इमारती, कारखाने व शहरे
प्रदूषणमुक्त, निसर्गप्रेमी व सौख्यकर करण्यासाठी प्रसार, प्रशिक्षण व प्रत्यक्ष
कार्याची चळवळ सुरू करून सर्व घटकांना त्यात सामील करण्याची गरज या कार्यसत्रातून
अधोरेखित झाली.
ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनच्या कार्यात पर्यावरण, स्थापत्य व आर्किटेक्ट या विषयातील
अनेक तज्ज्ञ सल्लागार, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी असल्याने संस्थेने याबाबतीत पुढाकार घेण्याचे ठरविले असून सीआयआय
जीबीएस, कोल्हापूरच्या सहकार्याने एक कार्यगट स्थापन करण्याचे ठरविले आहे.
नगरपालिका, संस्था व उद्योगांना कमी खर्चात स्थानिक पातळीवर विश्वसनीय व प्रभावी सेवा देण्याचे कार्य या संयुक्त कार्यगटातर्फे करण्यात येईल. ग्रीन बिल्डींग, उर्जाबचत तसेच प्रदूषण नियंत्रण याबाबत तांत्रिक सल्ला व प्रकल्प अहवाल, व प्रत्यक्ष देखभाल यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल. या संधीचा फायदा कोल्हापूर, सांगली परिसरातील कारखाने आणि नगरपालिका यांनी घ्यावा व ग्रीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यावरण संरक्षण व उर्जाबचत साधावी ही विनंती.
नगरपालिका, संस्था व उद्योगांना कमी खर्चात स्थानिक पातळीवर विश्वसनीय व प्रभावी सेवा देण्याचे कार्य या संयुक्त कार्यगटातर्फे करण्यात येईल. ग्रीन बिल्डींग, उर्जाबचत तसेच प्रदूषण नियंत्रण याबाबत तांत्रिक सल्ला व प्रकल्प अहवाल, व प्रत्यक्ष देखभाल यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल. या संधीचा फायदा कोल्हापूर, सांगली परिसरातील कारखाने आणि नगरपालिका यांनी घ्यावा व ग्रीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यावरण संरक्षण व उर्जाबचत साधावी ही विनंती.
No comments:
Post a Comment