कै. धोंडुमामा साठे यांच्या आंतरराष्ट्रीय
दर्जाच्या इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याच्या स्वप्नाबरोबर स्थानिक जनतेच्या उन्नतीसाठी असलेल्या सामाजिक बांधिलकीची जपणूक आदर्श प्राथसिक शाळा
सुरू करून म. टे. ए, सोसायटीने समर्थपणे
अंमलात आणली आहे. मराठी न इंग्रजी माध्यमाच्चा शाळांसाठी अद्ययावत इमारत बांधून व
निष्णात शिक्षकांची नेमणूक करून नवा इतिहास रचला आहे.प्राथमिकबरोबर माध्यमिक आणि
उच्च माध्यमिक शाणा सुरू करण्याचे सोसायटीचे नियोजन आहे. हे निश्चितच कौतुकास्पद
आहे.
वालचंद कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि माजी
प्राध्यापक हा म. टे. ए. सोसायटीने समाजाला दिलेला एक मोठा ठेवा आहे. संस्थेच्या भावी प्रगतीच्या दृष्टीने ज्ञान व धन या दोन्ही
बाबतीत हे फार मोलाचे स्रोत आहेत व त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत व विश्रामग़ृह बांधण्यासाठी सोसायटीने
कॉलेजव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली तर या सध्या दुर्लक्षित व
विस्कळीत अवस्थेत असणा-या प्रेरणा व धनस्रोतांना कार्यप्रवण करणे संस्थेच्या भावी कार्यासाठी
उपयुक्त ठरणार आहे.
कॉलेजचा माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक तसेच
माजी विद्यार्थी व प्राध्यापक संघटनांचा सक्रीय कार्यकर्ता या नात्याने आणि म. टे.
ए. सोसायटीचा आजीव सभासद आणि हितचिंतक म्हणून मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला विनस्र
आवाहन करीत आहे. व्यक्तिशः माझ्या ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून यासाठी लागणारे
अर्थसाहाय्य मिळविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करान असे आश्वासन मी सोसायटीस देऊ
इच्छितो. डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.
No comments:
Post a Comment