Wednesday, July 31, 2019

ज्ञानदीप फौंडेशनची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल



ज्ञानदीप फौंडेशनच्या सदस्यांना आवश्यक ती माहिती पुरविण्यासाठी फौंडेशनच्या सर्व वेबसाईटवरील माहिती अद्ययावत करण्यात येत असून यापुढे केवळ सदस्यांनाच या ज्ञानभांडाराचा लाभ घेता येईल असे बदल करण्यात येत आहेत. या बदलाची पार्श्वभूमी---

ज्ञानदीप फौंडेशनने २००५ पासून मराठी, संस्कृत, विज्ञान, पर्यावरण, सांगली, कोल्हापूर, साहित्यसंमेलन, ग्रीन टेक या वेबसाईटवर माहिती संकलित करून जनसामान्यांपर्यंत ती पोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार्यासाठी तंत्रज्ञ तसेच सर्व आर्थिक मदत ज्ञानदीप इन्फोटेक संस्थेतर्फे करण्यात येत होती. या अतिरिक्त कामामुळे त्या संस्थेसही बराच आर्थिक तोटा सोसावा लागल्याने यापुढे ज्ञानदीप फौंडेशन सदस्य वर्गणीतून ना नफा ना तोटा या तत्वावरच चालविणे भाग पडत आहे.

गेल्या वर्षी (१२ ऑगस्ट २०१९ रोजी) नवनिर्मिती आणि स्वयंउद्योजकता हे शैक्षणिक संस्थांचे ध्येय असावे या दृष्टीकोनातून ज्ञानदीप फौंडेशनने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने एक कार्यसत्र सांगली येथे आयोजित केले होते. तेव्हापासून अनेक प्राध्यापक, उद्योजक तसेच यशस्वी माजी विद्यार्थी यांचेबरोबर चर्चा केल्यानंतर असे ध्यानात आले की हे कार्य करण्यासाठी सुदृढ पायाभूत सुविधा, अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते व भरीव अर्थसाहाय्याची आवश्यकता आहे. शिवाय सर्व शैक्षणिक संस्था आपल्या स्वीकृत कार्यात मग्न असल्याने त्यांच्याकडून हे काम होण्यासारखे नाही.

केवळ या उद्देशासाठी स्वतंत्र संस्था सुरू करणे तसेच त्यासाठी निधी मिळविणे व नियमित कार्यासाठी आर्थिक स्वयंपूर्णता आणणे केवळ मोठ्या उद्योगसंस्थेसच शक्य आहे. माजी निवृत्त प्राध्यापकांनी मांडलेल्या योजनेला उद्योजक वा धनवान फारसे महत्व देत नाहीत. निवृत्त व्यक्तींच्या सर्वसामान्य मानसिकतेची कल्पना असल्याने आदर व सन्मान स्वीकारण्यापेक्षा वेगळे ते करू शकतील असे त्यांना वाटत नाही.

मात्र सध्याच्या शैक्षणिक संस्थांची भरकटलेली दशा पाहून आपणच काहीतरी करायला पाहिजे या आंतरिक तळमळीने ज्ञानदीप फौंडेशनने एक नवे धाडस करायचे ठरविले. नवनिर्मिती वा स्वयंउद्योग करावयाची इच्छा असणा-या पण आवश्यक ते आर्थिक व अन्य पाठबळ नसणा-या अनुभवी व्यक्ती, सुशिक्षित महिला व कोठेतरी नाइलाजाने नोकरी करावी लागणारे बुद्धीमान पदवीधर यांनीच एकत्र येऊन आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते वातावरण व सामायिक सुविधा निर्माण कराव्यात व त्यासाठी आपले तन, मन, धन खर्च करून सर्वांच्या सहकार्याने आपले शिक्षण वा व्यवसाय यात प्रगती करावी व यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने आपल्या संस्थात्मक दर्जा व आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षात केलेल्या कार्याचा आधार द्यावा असे निश्चित केले.

सांगलीचे थोर नेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावदादा पाटील यांनी सहकाराचा वृक्ष लावून गरीब शेतकरी व सर्वसामान्य जनतेला समृद्धीचा मार्ग दाखविला. तोच मार्ग नवसंशोधकांनी आणि स्वयंउद्योगाची आस असणा-या व्यक्तीनी अनुसरावा असे ज्ञानदीपला वाटते. त्यामुळेच सदस्यता वर्गणी वार्षिक ५००० रुपये एवढी भली मोठी मात्र कोणत्याही वस्तूनिर्मितीसाठी वा व्यवसायाच्या मानाने अत्यंत कमी ठेवण्यात आली आहे.

ज्यांना असे काही करावयाचे आहे त्यांनीच सदस्यत्व स्वीकारावे.तसेच त्यातील ५० टक्के रक्कम स्वतःच्या प्रकल्पासाठी खर्च करावी असे नियोजन आहे. राहिलेली ५० टक्के रक्कम पत्रव्यवहार, प्रसार, गटचर्चा वा सामायिक सुविधांसाठी तसेच कार्यविस्तारासाठी वापरण्यात येईल. या कार्यपद्धतीत पूर्ण पारदर्शकता ठेवून खर्चाचा तपशील सर्व सदस्यांना कळविला जाईल.

आजीव सदस्यता वर्गणीचा स्थायी निधी करून फक्त व्याजाची रक्कम सदस्याला आपल्या प्रकल्पासाठी वापरता येईल. जरी या योजनेत सदस्याला स्वतःच्या गुंतवणुकीचा फक्त निम्मा हिस्सा वापरावयास मिळत असला तरी सामायिक सुविधा तसेच इतरांचे सहकार्य मिळणार असल्याने सदस्याला गुंतवणुकीपेक्षा अधिक लाभ होईल.त्याचबरोबर शासकीय वा अन्य वित्तीय संस्थांकडून अनुदान वा सवलत मिळण्याची शक्यता वाढेल.

थोडक्यात म्हणजे, आतापर्यंत ज्ञानदीप फौंडेशन स्वत- वेबसाईट, मोबाईल सुविधा इत्यादी नवनिर्मिती करून लोकांना सादर करीत होते. त्याऐवजी ज्ञानदीपमधील सर्व सदस्य एकत्रितपणे वा स्वतंत्रपणे नवनिर्मितीच्या कार्यात सहभागी होतील अशी आशा आहे.

 ज्यांना या माहितीचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी ज्ञानदीप फौंडेशनचे सदस्यत्व स्वीकारावे आणि ज्ञानदीपच्या नव्या रोजगारनिर्मितीच्या कार्यात आपले योगदान द्यावे ही विनंती. अधिक माहितीसाठी तसेच सभासदत्व स्वीकारण्यासाठी संपर्क दुवा - https://www.dnyandeep.net/membership  डॉ. सु. वि. रानडे, अध्यक्ष, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली

Tuesday, July 30, 2019

Why religion is more powerful than science?

Almost all people are attached to some religion by birth. All religions have same basic aim of promoting ethical values for welfare and progress of their followers. But they have different concepts about nature of God, methods of praying and  set of specific rituals and code of conduct. Each religion proclaims to be most ideal and superior to all other religions and forms a separate social group of its followers.

Religion appeals to emotion. It provides transcendental rewards to consciousness if it follows the rituals and shows full faith in teaching of its leaders and acts accordingly. Religion becomes the sole guide of its followers and provides answers to all questions and worries in life with promise of elevation of self to a level of eternal happiness. Religion also provides simple solutions  like   chanting, devotion, fast and prayers to surmount any difficulty or to achieve success in life. Religion provides opportunities for social gatherings, festivals and other entertaining activities and followers can get great pleasure in it. Religion also provides worship places, interesting stories from history full of sufferings and miracles. Religion provides much needed sense of security, feeling of togetherness and help from their community.

Science on the other hand takes entry into consciousness at a much later stage and builds tools of reasoning in consciousness which oppose blind belief. Science does not have ready answers to most of the questions and requires application of reasoning and objective analysis for the solutions. Fortunately  enough, people realize that development  of human race has become possible only through such efforts to investigate the nature of universe instead of just believing it to be act of God or some supernatural power.

Science appeals to intelligence rather than emotion. Its focus is not the person or social group but the problem itself. Its method is objective to prevent any subjective prejudice. Hence it does not help in building prejudice.  Solution to the problem using scientific reasoning gives intellectual pleasure to individual who pursues it.  However, it involves high learning curve. As it questions belief which is the sole basis of religion, it is ridiculed by true followers of religion as undesirable and against their cherished values.

 Science does not provide any incentive for social action and cannot in itself be a source of pleasure or entertainment. It also admits ignorance about creation and the true nature of universe and real cause behind many  perceptions and events.

Hence science cannot compete with religion to give guidance to human behavior or actions. Human being wishes to get pleasure with minimum efforts and it naturally likes stories of magic and miracles described in religious literature.  Popularity of ancient stories involving fight between God and Demons, biographies of saints, pure fiction stories like Arabian Nights, Harry Potter, Alice in Wonderland, present day video games show human desire for such pleasure.

In order to cash on such emotional pleasure many science fiction stories and movies have been developed giving modern technological look to show future possibilities of science progress. But they create a false impression about science to be  only a new miracle maker.

 Consciousness has emotion as a main active force and often overpowers intelligence instead of intelligence guiding emotion. This is the reason for failure of science to create mass movement for intelligent progress of mankind.

Saturday, July 27, 2019

हरित नगरीचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानदीपचा पुढाकार


असावे सुंदर आपुले गाव असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु आता खेडेगाव काय किंवा शहर काय, दोन्ही ठिकाणी राहणाया लोकांच्या दृष्टीने हे एक दुरापास्त स्वप्न बनले आहे.

वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे. शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. 

एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक पटीनी वाढते. साहजिकच त्यांची पाण्याची गरज त्याचप्रमाणात वाढते. मात्र पाणीपुरवठ्याचा नळ मोठा करता येत नाही. कारण तो शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील एक छोटा भाग असतो. त्यामुळे मोठ्या व्यासाचा नळ बसविला तरी पाणीपुरवठा वाढू शकत नाही. जी गोष्ट पाण्याची तीच सांडपाणी वाहून नेणाया गटारांची वा नळांची. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी व पंपाची व्यवस्था करता येते मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलजल व्यवस्थेत सोडणे बहुधा शक्य होत नाही. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. नव्या इमारतींच्या किंमती अधिक असल्याने त्यात राहणाया लोकांचे जीवनमानही उच्च असते. त्यांच्याकडे स्कूटर व मोटार वाहने असतात. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करावी लागते. रस्त्यावरील वाहतुकही वाढते. रस्ता अधिक रुंद व जास्त टिकावू करावा लागतो. अधिक विजेची गरज भागविण्यासाठी उच्च दाबाच्या तारा व ट्रॅन्स्फ़ार्मर बसवावे लागतात.

एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरात ठिकठिकाणी अनेक इमारतींचे असे रुपांतर झाल्यास शहराची सर्व सुविधा यंत्राणाच कोलमडून पडते. याशिवाय अनेक जुन्या इमारती पाडण्याचे वा नवीन बांधण्याचे काम चालू असल्याने ट्रकांची वाहतूक, जुने नवे बांधकाम साहित्य व कामगारवस्ती यांचाही ताण शहर व्यवस्थेवर पडतो. शहरातील लोकसंख्या वाढते तशी जीवनावश्यक वस्तूची गरजही वाढते. ती पुरविण्यासाठी मोठी दुकाने, मॉल यांचीही त्यात भर पडते. करमणूक व इतर सुखसोयीही आहे त्या जागेत निर्माण केल्या जातात. परिणामी शहराचे मुळचे रूप नष्ट होऊन त्याला कांक्रीटच्या जंगलाचे रूप येते. 

पूर्वीचे खेडेगाव म्हणजे एक रम्य,  निसर्गाच्या सान्निध्यात असणारे वसतीस्थान असायचे. गावाच्या प्रवेशद्वाराशी कमान, गावाच्या मध्यभागी एक देऊळ, वड, चिंच वा पिंपळाच्या झाडाखाली असणारा कट्टा,  चार गल्ल्या वस्ती, बाजूला एक ओढा, आणि सभोवताली पसरलेली शेती आणि मळे. रस्ते साधेच असले तरी आपले वाटायचे. साध्या दगडा-मातीची वा कुडाची घरेदेखील विलक्षण सुखद असायची. गावातील माणसे, त्यांचे विचार व व्यवहार एका घट्ट विणीत गुंफ़ल्यासारखी एकसंध वाटायची. पारंपारिक जत्रा हे गावाचे आकर्षण असायचे. आता या खेडेगावाचे रूप पार पालटले आहे. शहरी संस्कृतीचे आघात त्यावर झाले आहेत.

पूर्वीचे शहर म्हणजे खेडेगावातल्या लोकांना आकर्षण असायचे. मोठ्या आकर्षक इमारती, रुंद व स्वच्छ रस्ते, बागा, क्रीडांगणे, सरकारी कचेया, वाचनालय व शाळा- कॉलेजच्या देखण्या इमारती, नदी असेल तर रुंद बांधीव घाट, घाटावरील देवळे, सार्वजनिक सभांसाठी खास पटांगणे, एक ना दोन. आठ्वड्याच्या बाजारासाठी वा नाटक- सिनेमा पाह्ण्यासाठी खेडेगावातील लोक शहरात यायचे.

पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत दिवसाच्या विविध कालखंडांत निसर्ग विविध रुपे धारण करीत असतो. पहाटेचे दंव, उष:कालची लाली, पक्षांचे कूजन, उमलत्या फ़ुलांचे ताटवे, दुपारचे ऊन, संध्याकाळचा गार वारा आणि रात्री आकाशातील नक्षत्रांचा मनमोहक नजारा या गोष्टींना शहरातील माणूस पारखा झाला आहे. या नैसर्गिक सुखकारक गोष्टीऎवजी दूरदर्शनवरील आभासी दृश्यांवर त्याला समाधान मानावे लागत आहे. 

कृत्रिम वायुवीजन व प्रकाशयोजना तसेच अयोग्य घरबांधणी व अंतर्गत सजावट यामुळे घरातील प्रदूषण्ही वाढले आहे. रस्त्यावरून पायी चालणायाला  गर्दी, गोंगाट, प्रदूषित हवा, सांडपाण्याची दलदल, कचयाचे ढीग यातून  मार्ग काढावा लागत आहे. तर वाहन वापरणायाला ट्रॅफ़िक जॅम, वेगात चालणारी वाहने व धोकादायक खाचखळग्यांचे रस्ते व पार्कींग समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वृद्ध व्यक्तींना सुरक्षितपणे हिंडण्यासाठी रस्ते नाहीत. विरंगुळ्यासाठी बागा नाहीत. मुलांना खेळण्यासाठी मोक्ळ्या जागा वा क्रीडांगणे नाहीत.

यावर काहीच उपाय नाही का? सर्वसामान्य माणसाचे सुंदर शहराचे स्वप्न हे स्वप्नच राहणार का? पर्यावरणाची आपण काळजी घेतली व त्या प्रमाणे गृहरचना व शहररचना करण्याचा निश्चय केला तर हे स्वप्नही सत्य ठरू शकेल. आपल्या सुखी जीवनासाठी व आपल्या भावी पिढ्यांसाठी हे अत्यावश्यक आहे.

ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनच्या कार्यात  पर्यावरण, स्थापत्य व आर्किटेक्ट या विषयातील अनेक तज्ज्ञ सल्लागार, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी असल्याने संस्थेने  याबाबतीत पुढाकार घेण्याचे ठरविले असून सीआयआय जीबीएस, कोल्हापूरच्या सहकार्याने नगरपालिका, संस्था व उद्योगांना कमी खर्चात स्थानिक पातळीवर विश्वसनीय व प्रभावी सेवा देण्याचे कार्य करण्यात येणार आहे

ग्रीन बिल्डींग, उर्जाबचत तसेच प्रदूषण नियंत्रण याबाबत तांत्रिक सल्ला व प्रकल्प अहवाल, व प्रत्यक्ष देखभाल यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर संस्थेच्या नोंदणीकृत अधिकृत सदस्यांतर्फे  तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा पुरवली जाईल. या संधीचा फायदा कोल्हापूर, सांगली परिसरातील कारखाने आणि नगरपालिका यांनी घ्यावा व ग्रीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने  पर्यावरण संरक्षण व उर्जाबचत साधावी ही विनंती.

Implimentation Green Concepts in Existing Industries

An example of Green Factory - Construction of new manufacturing unit on green concepts is easy as we can plan and execute the project without any restrictions based on local conditions.

You can see such a factory installed in Gazipur which follows major norms and requirements of Green Factory.




However, to implement green concepts in existing manufacturing unit is a formidable task as has many limitations and challenges like confined space, difficulty in change of layout, lighting and infrastructural facilities, old machinery and inefficient processes and unskilled labour.

Architects, civil engineers and environmental experts have to work together for evolving economical, effective and ecoresponsive plan for progressive implementation of green concepts and improving green rating leading to energy and resource conservation without affecting the current manufacturing activity.

There is also a need for periodic supervision and training of staff and workers for environment, health and safety issues and awareness about pollution control.

Dnyandeep Foundation shall be developing a comprehensive task force to address these issues faced by the small scale industries in Kolhapur and Sangli Districts. With support and collaboration of CII GBS, it hopes to provide a feasible solution and continued service support to all industries.


Friday, July 26, 2019

ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स


सीआयआय जीबीएस, दक्षिण महाराष्ट्र विभाग, कोल्हापूर यांचेतर्फे २५ जुलै २०१९ रोजी ग्रीन बिल्डींग व ग्रीन फॅक्टरी तंत्रज्ञान या विषयावर एक कार्यसत्र आयोजित करण्यात आले होते.

त्यामध्ये सीआयआय जीबीएसचे राष्ट्रीय पातळीवरील विविध तज्ज्ञ तसेच ज्ञानदीप फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सु. वि. रानडे व विश्वस्त डॉ. गिरीश कुलकर्णी आणि आर्किटेक्ट सौ. गिरिजा कुलकर्णी यांनी या तंत्रज्ञानाची प्रमुख वैशिष्ठ्ये,  यशस्वी ग्रीन प्रकल्प यांची माहिती दिली. 
त्याचा गोषवारा खाली दिला आहे.

ग्रीन बिल्डिंगची आवश्यकता
  • वाढते शहरीकरण
  • बिल्डिंग व्यवसायात वाढ
  • इमारतीच्या दिखावूपणास जास्त महत्व
  • इमारतीतील पर्यावरणाकडे किंवा त्यामुळे शहराच्या सेवासुविधांवर पडणारा ताण वा पर्यावरणावर होणार्या घातक परिणामांकडे दुर्लक्ष
  • पर्यावरणास पूरक बांधकामाची गरज
  • लोकशिक्षण जागृती अभियान आवश्य
ग्रीन बिल्डिंग संकल्पना
  • निर्मितीसाठी  कमी ऊर्जा लागणार्या तसेच पर्यावरणास पूरक ठरणार्या वस्तूंचा बांधकामात वापर
  • सौरऊर्जेचा उष्णता प्रकाश मिळविण्यासाठी वापर,
  • नैसर्गिक वायुवीजन,
  • पाण्याच्या ऊर्जेच्या वापरात काटकसर,
  • घरातील हवेचा दर्जा योग्य राखणे
  • पर्जन्य जलसंधारण
  • सांडपाण्याचे शुद्धीकरण पुनर्वापर, घन कचर्यापासून खत वा बायोगॅस
सूर्याच्या उष्णतेपासून इमारतीचे संरक्षण
  • परावर्तक पांढर्या रंगाचा उपयोग
  • शेड नेटचा वापर
  • स्लॅबवर हिरवळ
  • स्लॅबवर पाण्याचा  साठा
  • स्लॅबवर पाण्याचा फवारा मारणे
  • खिडक्यांवर सावली पडेल अशी व्यवस्था
  • पांढरा परावर्तक रंग आणि सावलीत खिडक्या
  • व्हरांडा सावलीत खिडक्या
पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य
  • दारे खिडक्यांसाठी फेरोसिमेंट पत्रे
  • छपरासाठी फेरोसिमेंटच्या पन्हाळी
  • फ्लाय अँश ( दगडी कोळशाची राख) , चुना वाळूपासून केलेल्या विटा आणि बागेतील फरशा
  • पोर्टलॆंड पोझोलाना सिमेंट फ्लाय अँश वा भाजलेल्या मातीचा समावेश
  • पोर्टलॆंड स्लॅग सिमेंट
  • आर. सी. सी. दरवाजे
  • तयार सिमेंट कांक्रीटजिप्समचे पत्रे, फरशा, प्लॅस्टर, ज्यूट काचेच्या धाग्यांचा वापर केलेले पत्रे
  • फौंड्रीतील मोल्डींगची वाया जाणारी वाळू वापरून केलेले कांक्रीट
  • प्लॅस्टिक आवरण असणारे लाक डी सामान
पुनर्वापर करता येणार्या वस्तू
  • स्टील
  • अल्युमिनियम
  • लाकूड
  • काच
  • फरशांचे तुकडे
  • लाकूड
  • माती
  • दगड
प्रदूषण नियंत्रण
अंतर्गत हवा प्रदूषण – सेंद्रीय रसायने वा प्लॅस्टीकसदृश पदार्थांचा वापर असणारे पडदे, फर्निचर, मॅटिंग यातून बाहेर पडणा-या सेंद्रीय रसायनांच्या वाफा ( VOC) हवेत मिसळून हवा प्रदूषित होते. एअर कंडिशनर असल्यास तीट हवा न बदलता आतल्याआतच फिरत राहते व या घातक रसायनांचे हवेतील प्रमाण वाढत जाते. यासाठी प्ल्रॅस्टिक पेंट ऐवजी सिमेंट पेंट, कापडी पडदे, फरशी व लाकडी फर्निचरचा वापर करावा. तसेच दररोज २० टक्के बाहेरची शुद्ध हवा मिसळण्याची काळजी घ्यावी.

स्लॅबमध्ये गळती वा भिंतीवर ओल येत असली तर बुरशी वाढून हवा प्रदूषित होऊ शकते. यासाठी जलावरोधक वस्तूंचा वापर करून यास प्रतिबंध करावा.

वाया गेलेले बांधकाम साहित्य- उदा. फुटक्या काचा, फरशीचे तुकडे, वीट व कॉंक्रीटचे ब्लॉक, लाकडी फळ्या यांचा कल्पकतापूर्ण वापर तसेच कारखान्यातील राख(फ्लायअश) , घनकचरा यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे
ज्या वस्तूंच्या निर्मितीसाठी कमी उर्जा लागते ( उदा. प्रीकास्ट स्लॅब) त्या वस्तूंचा बांधकामात उपयोग करणे.
ज्या वस्तूंमुळे शीतकरणाच्या उर्जेत घट होते अशा वस्तू ( हवामिश्रित कॉंक्रीट ब्लॉक) वापरणे
ज्यांच्या वापरासाठी कमी उर्जा लागते अशा वस्तू ( सीएफएल दिवे) वापरणे
ज्या उपकरणे वा यंत्रणांमुळे पाण्याची बचत होते अशांचा वापर करणे.
उदा. ड्युअल फ्लश ( ६ किंवा ३ लिटर) तीन माणसांच्या कुटुंबासाठी पाण्याची बचत दररोज सुमारे ३२ लिटर 
वाटरलेस ( पाणी न लागणा-या) युरिनलचा उपयोग,  

लीड गुणांकन पद्धत

  • २६-३२ गुण लीड प्रमाणित बिल्डिंग
  • ३३- ३८ गुण सिल्व्हर दर्जाची बिल्डिंग
  • ३९- ५१ गुण गोल्ड दर्जाची बिल्डिंग
  • ५५-६९ गुण प्लॅटिनम दर्जाची बिल्डिंग

हरित तंत्रज्ञान वापरून आपल्या इमारती, कारखाने व शहरे प्रदूषणमुक्त, निसर्गप्रेमी व सौख्यकर करण्यासाठी प्रसार, प्रशिक्षण व प्रत्यक्ष कार्याची चळवळ सुरू करून सर्व घटकांना त्यात सामील करण्याची गरज या कार्यसत्रातून अधोरेखित झाली. 

ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनच्या कार्यात  पर्यावरण, स्थापत्य व आर्किटेक्ट या विषयातील अनेक तज्ज्ञ सल्लागार, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी असल्याने संस्थेने  याबाबतीत पुढाकार घेण्याचे ठरविले असून सीआयआय जीबीएस, कोल्हापूरच्या सहकार्याने एक कार्यगट स्थापन करण्याचे ठरविले आहे.

नगरपालिका, संस्था व उद्योगांना कमी खर्चात स्थानिक पातळीवर विश्वसनीय व प्रभावी सेवा देण्याचे कार्य या संयुक्त कार्यगटातर्फे करण्यात येईल. ग्रीन बिल्डींग, उर्जाबचत तसेच प्रदूषण नियंत्रण याबाबत तांत्रिक सल्ला व प्रकल्प अहवाल, व प्रत्यक्ष देखभाल यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल. या संधीचा फायदा कोल्हापूर, सांगली परिसरातील कारखाने आणि नगरपालिका यांनी घ्यावा व ग्रीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने  पर्यावरण संरक्षण व उर्जाबचत साधावी ही विनंती.