शिक्षणसंस्था आणि माजी विद्यार्थी
प्रत्येक शिक्षणसंस्थेसाठी माजी विद्यार्थी हा एक हक्काचा मदतनीस व निधीसंकलनासाठी योग्य दाता वाटतो. मात्र माजी विद्यार्थ्यांचे संस्थेवर असणारे प्रेम हे तेथे मिळालेल्या शिक्षणामुळे, शिक्षकांमुळे आणि मित्रपरिवारामुळे असतो. हे संस्थेने लक्षात घेतले पाहिजे.
विद्यार्थी शिक्षणसंस्थेतून बाहेर पडला की आपला संबंध संपला असे न मानता आईवडिलांप्रमाणे जी संस्था त्यांच्या पुढील प्रगतीविषयी जागरूक असते, त्यांना मदत करते त्यांच्याशी सतत संबंध ठेवते त्या संस्थेला न मागताही विद्यार्थी मदत करण्यास तयार होतात व संस्थेची भरभराट होते.
सशक्त, समृद्ध आणि स्वायत्त माजी विद्यार्थी संघटना करण्यात शिक्षणसंस्थेने पुढाकार घेणे यासाठीच आवश्यक आहे.
वालचंद कॉलेज माजी विद्यार्थी संघटना
आमच्या वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य गेली कित्येक वर्षे अत्यंत सुव्वस्थित आणि जोमाने चालू होते. मात्र काही कारणाने त्यात खंड पडला. वालचंद कॉलेज स्वायत्त झाल्यामुळे असेल कदाचित, पण कॉलेजने माजी विद्यार्थ्यांसाठी संस्थेतर्फे एक स्वतंत्र वेबसाईट तयार केली. स्वाभाविकच पूर्वीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वेबसाईटचे काहीच प्रयोजन उरले नाही.
कॉलेजचेया नव्या वेबसाईटचे स्वागत करून त्यात कॉलेजला सर्वतोपरी मदत करण्याचे ज्ञानदीप फौंडेशनने ठरविले. मात्र कॉलेजचा स्थापनेपासूनचा इतिहास, माजी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती कॉलेजच्या मासिकात प्रसिदिध झालेले विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांचे वृत्त असे माजी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याची वाटणारी माहिती या नव्या वेबसाईटमध्ये घालणे शक्य नसल्याने ज्ञानदीप फौंडेशनने माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी walchandalumni.com या वेबसाईटचे पालकत्व स्वीकारले
वालचंद हेरिटेज प्रकल्प
वालचंदच्या प्रगतीचा सर्व इतिहास आणि जुन्या शिक्षकांबद्दलचा माहिती संकलित करण्याचे कार्य वालचंद हेरिटेज या प्रकल्पात केले आहे. इतर शिक्षणसंस्थांसाठी हा एक पथदर्शी प्रकल्प ठरावा अशी आशा आहे.
No comments:
Post a Comment