सध्या वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडिओ व सोशल मिडियावर शैक्षणिक संस्थांच्या पानपानभर जाहिराती दिसत आहेत. त्यात मुख्यत्वे आकर्षक इमारती व इतर सुखसोयी आणि य़शस्वी विद्यार्थ्यांचे फोटो दिसतात. मात्र शिक्षकांचा कोठेच उल्लेख दिसत नाही. शिक्षणासाठी इमारती आणि इतर सुविधा यांची आवश्यकता असली तरी शिक्षकांचे महत्व सर्वोच्च आहे हे सोयीस्करपणे विसरले जाते. यशस्वी विद्यार्थ्यांच्या नावावर जाहिरात करताना हे विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये जात असल्याने त्याचे श्रेय शिक्षणसंस्था घेऊ शकत नाहीत.
प्रत्यक्षात स्थिती फार निराशाजनक आहे. जाहिरातीत अग्रेसर असणा-या शिक्षणसंस्थात शिक्षकांना अगदी गौण स्थान आहे. पगार संस्थाचालकांच्या मर्जीवर केव्हातरी मिळणार. कामाचा प्रचंड ताण आणि शिक्षणाबाबत शिक्षकांचीच उदासीनता व पाट्या टाकण्याकडे प्रवृत्ती. साहजिकच चांगल्या शिक्षकांची कमतरता.
जाहिरात करायचीच तर शिक्षकांची करा. तुमच्या दिखाऊ परिसराची नको. अर्थात लोकांना हे सर्व माहीत असतेच. नाईलाज म्हणून प्रवेश घेणे आणि खाजगी क्लासेसची कास धरणे आता सर्वमान्य झाले आहे.
चांगले शिक्षक आहेत हे कळले तर ही जाहिरातबाजी आणि विद्यार्थ्यांची क्लासेसमध्ये होणारी लूट थांबेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षणाचे पावित्र्य राहून उत्तम विद्यार्थी घडतील.
सुदैवाने आजही अशा काही शिक्षणसंस्था आहेत की त्यांना जाहिरात लागत नाही. शिक्षक आणि पूर्वीची गौरवशाली शैक्षणिक परंपरा हीच त्यांची जाहिरात असते. सांगली या अर्थाने फार भाग्यवान आहे. राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा, सांगली शिक्षण संस्था, लठ्ठे एज्युकेशन, विलिंग्डन व वालचंद ही यातली काही ठळक उदाहरणे आहेत.

No comments:
Post a Comment