Wednesday, September 23, 2020

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये घरबसल्या वेबमास्टर कोर्स करा.




शहरामध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने ग्रामीण भागातील अनेक तरूण आपली शेतीवाडी सोडून शहरात नोकरी शोधण्यासाठी येतात.  मात्र त्यातील फारच थोड्यांना यात यश मिळते. मग ते शहरातील  करियर डेव्हलपमेंटच्या नावाखाली व नोकरीचे आमिष दाखविणा-या महागड्या प्रशिक्षण संस्थात दाखल होतात. इतर शहरात राहण्याचा खर्च परवडत नसल्याने  परत स्वगृही परततात.  
 
कोरोना लॉकडाऊनमुळे  महानगरातील असे तरूण मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत आहेत व बेरोजगारी वाढत आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळू शकतात. पण तेथेही इंजिनिअर वा पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना प्राधान्य दिले गेल्यामुळे आर्टस, सायन्स, कॉमर्स व इतर कलाशाखांतील व्यक्तींना नोकरीची संधी मिळू शकत नाही.

माहिती तंत्रज्ञानातील वेबसाईट डिझाईन या महत्वाच्या व्यवसाय कौशल्यासाठी अशा उच्च शिक्षणाची आवश्यकता नसते हे बर्‍याच लोकांना माहीत नसते. संगणक वापरण्याचे प्राथमिक ज्ञान असणार्‍या कोणत्याही  व्यक्तीला या व्यवसायात प्राविण्य मिळविता येते. साध्या नोटपॅडचा वापर करून वेबपेज करण्यापासून चित्रे, ध्वनी व व्हिडिओ सहीत अनेक पानांची आकर्षक वेबसाईट बनविण्यासाठी वापरले जाणारे प्रोग्रॅम,  फोटोशॉप, ड्रीमव्हीव्हर सारख्या सुविधा वापरण्याचे ज्ञान व  सर्व्हरवर वेबसाईट ठेवून  त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते याची शास्त्रोक्त माहिती प्रात्यक्षिकासह दिल्यास हे तंत्रज्ञान सहज आत्मसात करता येते.



सध्याच्या इंटरनेट युगात प्रत्येक उद्योग वा व्यवसायाला आपली वेबसाईट तयार करणे व त्याचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक बनले आहे. ज्ञानदीप फौंडेशनने उद्योगांची भविष्यातील ही गरज ओळखून  वेब डिझाईन व त्याचे व्यवस्थापन यांचे शिक्षण देणारा  वेबमास्टर हा व्यवसायाभिमुख कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणारी व्यक्ती वेबडिझाईनचा स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकते. 

आपले गाव व कामधंदा न सोडता कोणत्याही सुशिक्षित व्यक्तीस घरबसल्या आपल्या फावल्या वेळात हा कोर्स करता यावा यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून हे शिक्षण देण्याची व्यवस्था ज्ञानदीप फौंडेशनने केली आहे. इंटरनेटवर असे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत मात्र वेबडिझाईनच्या क्षेत्रात गेली वीस वर्षे कार्य करणार्‍या व १५० पेक्षा जास्त वेबसाईट डिझाईनचा अनुभव असणार्‍या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या व्यावसायिक संस्थेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर्स या  कोर्सचे शिक्षण देणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभवाचा फायदा होणार आहे.


ज्ञानदीप फौंडेशनने अनेक शैक्षणिक वेबसाईट मराठी माध्यमात तयार केल्या असून वेबमास्टर कोर्ससाठी आवश्यकता भासल्यास अगदी सोप्या भाषेत मराठीतून विषय शिकविण्याची सोय या कोर्समध्ये करण्यात आली आहे. हा कोर्स शिकविणारे उच्च दर्जाचे प्राध्यापक नसून प्रत्यक्ष बेबडिझाईनची कामे करणारे ग्रामीण परिसरातील अनुभवी वेबमास्टर आहेत. 
 
कोरोनाच्या काळात  घराबाहेर पडू न शकणार्‍या सर्वांसाठी हा कोर्स रोजगाराची नवी संधी देणारा असल्याने एक वरदानच ठरणार आहे.  कोर्स यशस्वी पूर्ण केल्यावर ज्ञानदीपच्या फ्री लान्स प्रकल्पातून वेबडिझाईनचे काम करून पैसे मिळविण्याचा मार्ग उपलब्ध असून स्वतंत्र व्यवसाय वा मान्यवर कंपनीत नोकरी मिळण्यासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव उपयोगी पडणार आहे.

No comments:

Post a Comment