Thursday, September 10, 2020

सर्वात्मका सर्वेश्वरा- जगन्नाथाचा रथ ओढण्याची जबाबदारी सर्वांची

 कोरोनाच्या विश्वव्यापी संकटामुळे सारी मानवजात घाबरून गेली आहे. भारतात तर गरिबी, बेरोजगारी या समस्यांत  कोरोनाच्या स्थानबद्धतेमुळे एकूण अर्थव्यवस्था धोक्यात आली असून, शिक्षण, उद्योग, शेती, व्यापार सर्वच क्षेत्रात काम ठप्प झाले आहे.

अशावेळी हताश होऊन घरात ऐषारामात वेळ घालविण्याऐवजी प्रत्येकाने अंग झटकून  वाचन, लेखन, अभ्यास, शिक्षण वा शक्य त्या सामाजिक कार्यात सहभागी व्हावयास हवे.  इंद्राने अस्मानी संकट आणले तरी गोपाळांनी गोवर्धन पर्वत आपल्या संघशक्तीने उचलून सर्वांचे रक्षण केले  त्याप्रमाणे आज प्रत्येकाने आपले तन, मन, धन यांची पर्वा न करता या संकटातून भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे.

एक तुतारी द्या मज आणून
फुंकीन मी ती स्वप्राणाने
भेदून टाकीन सारी गगने

 अशी ईर्षा उराशी बाळगून या संग्रामात उडी घेतली आहे. या काव्यपंक्तीतील तुतारी म्हणजे आता इंटरनेट मानून ज्ञानदीप फौंडेशनने

आता उभवू सारे रान...

dnyandeep.net या वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांना कार्यप्रवृत्त करण्याचे ठरविले आहे.

चला, उठा, राष्ट्रवीर हो

आपणही या कार्यात स्वयंस्फूर्तीने व आपल्या सर्व तालतीनिशी सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करीत आहे. - सु. वि. रानडे.

No comments:

Post a Comment