शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
हाताने लिहिण्याचे दिवस संपले. संगणकाचे युग सुरू झाले. पण आता लिहिणेच बंद होऊ लागले आहे. लिहिण्याची जागा बोलण्याने घेतली आहे. वाचण्याऐवजी आता पाहणे लोक पसंत करू लागले आहेत. अगदी लिहायची वेळ आलीच तर इमोजी सारखी चित्रे मदतीला धावत आहेत. बोललेलेच आपोआप लिहिले जाईल अशा सुविधा संगणक व इंटरनेटवर उपलब्ध झाल्या आहेत.
याचा एक दृष्य परिणाम म्हणजे एकूणच सर्व लोक नवनिर्मितीच्या बाबतीत निरक्षर झाले आहेत. लिहिणे वाचणे संपले आणि बोलणे व पाहणे एवढ्याच क्रिया झाल्या तर नवी साहित्यनिर्मिती होणारच नाही. इतिहास लिहिला जाणार नाही. आपला सर्व अनुभव विस्मृतीत नाहिसा होईल.
संगणकाच्या या सर्व सुविधा इंग्रजीत असल्याने आपल्या भारतीय भाषांचे फार नुकसान होईल. त्यांचे महत्व फक्त बोली भाषा एवढेच राहील. परदेशातील वस्तू आणि सेवा यांच्यासाठी भारतातील आपला प्रचंड ग्राहक वर्ग खुला होईल पण आपल्या स्वदेशी उद्योगांना त्यांच्याबरोबर स्पर्धा करता येणार नाही. यामुळे आपण आपला व्यवसाय, उद्योग गमावून त्यांचे ताब्यात जाऊ.
यासाठी भारतीय भाषांतून संगणक वापरण्यास शिका. ज्ञानदीप गेली वीस वर्षे यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र परदेशी जाण्याच्या वा त्यांच्या कंपन्यांत नोक-या मिळविण्याच्या धडपडीत सर्वजण असल्याने ज्ञानदीपची स्थिती प्राथमिक शाळेसारखी स्टेपिंग स्टोन सारखी राहिलेली आहे.
तरीही ज्ञानदीपने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवर मराठी आणि संस्कृतमध्ये वेबसाईट, मोबाईल एप बनवले आहेत.
शिक्षकदिनाच्या निमित्ताने भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांनी त्यांचा इतिहास आपल्या भारतीय भाषेत वेबसाईट व मोबाईलच्या माध्यमातून जगापुढे आणावा. त्याद्वारे आपल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा या हेतूने विशेष योजना सुरू करीत आहे.
महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था, डेक्कन एज्युकेशन संस्था, मराठी नावाची अनेक विद्यापिठे आहेत पण त्यांचा इतिहास मराठीत इंटरनेटवर उपलब्ध नाही. प्रत्येक गावात आणि शहरात अशा कितीतरी शिक्षणसंस्था शिक्षकांच्या स्वार्थत्त्यागातून उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांची स्थिती आज इंग्रजीने विलायती करून टाकली आहे.
ज्ञानदीप फौंडेशन अशा सर्व संस्थांच्या संचालकांना आवाहन करीत आहे की त्यांनी आपल्या संस्थेचा उज्वल इतिहास मराठी माध्यमातून इंटरनेटवर प्रसिद्ध करावा. ज्ञानदीपतर्फे या संस्थांतील शिक्षक, प्राध्यापकांना मराठीतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेबसाईट तयार करण्याचे सर्व प्रशिक्षण देईल.
चला... हातात संगणक घ्या...
आणि ज्ञानदीपशी संपर्क साधा ( 9422410520 / 9422592956), इमेल ( info@dnyandeep.net) पाठवा. आम्ही आपल्याला संगणक साक्षर करण्याची हमी देतो.
आपण एकदा मराठीत वेबसाईट करण्यात पारंगत झालात की इतर स्थानिक उद्योग आणि व्यावसायिक यांच्या जाहिराती व वेबसाईट मराठीतून आपण करू शकता. एवढेच नव्हे तर त्यांच्या उद्योगाला लागणारे सॉफ्टवेअरही मराठीत आपणास करता येईल. मग ख-या अर्थाने आपली संस्था स्थानिक प्रगतीला हातभार लावू शकेल,
मी स्वतः अमेरिकेत असल्याने येथील मराठी लोकांच्या साहित्य व संस्कृतीविषयक कार्यक्रमांत आपण आपल्या गावातील वा संस्थेतील व्यक्तींशी संपर्क साधण्यास मी व्यक्तिश- मदत करू शकेन. त्यासाठी मला drsvranade@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. - डॉ. सु.वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.
No comments:
Post a Comment