Tuesday, October 3, 2023

झेन ऑफ पायथॉन – अजगराचे ध्यान

 

पायथॉन म्हणजे अजगर. पायथॉन या संगणक भाषेचे नाव आणि लोगो हे अजगराच्य मुकाट्याने सर्व गिळून टाकण्याच्या क्षमतेचे प्रतिक आहे. झेन हा शब्द मध्य चिनी शब्द 禪 (chán), 禪那 (chánnà) चा संक्षेप, जो संस्कृत शब्द ध्यान (“ध्यान”) चे चीनी लिप्यंतरण आहे, या जपानी उच्चारावरून आला आहे. त्यामुळे Zen of Python (झेन ऑफ पायथॉन) म्हणजे अजगराचे ध्यान. एकाजागी स्वस्थ पडून राहिलेला अजगर काय विचार करीत असेल या कल्पनेवर आधारित पीटर्सची झेन ऑफ पायथॉन ही कविता पायथॉन भाषेचे सामर्थ्य आणि क्षमतेचे यथायोग्य वर्णन करीत असल्याने अधिकृत पायथॉन भाषेमध्ये तिचा समावेश केलाआहे.

पायथॉन >>>या चिन्हावर वर खालील प्रमाणे टाईप केल्यास ही कविता दिसू लागते.

import this

वरील इंग्रजी कवितेचे मराठी रुपांतर मी खालीलप्रमाणे केले आहे.

    कुरुपापेक्षा सुंदर चांगले 
    अस्पष्ट पेक्षा स्पष्ट चांगले 
    साधे हे क्लिष्टपेक्षा चांगले 
    गुंतागुंतीपेक्षा क्लिष्ट चांगले 

    आतल्या गाठीपेक्षा सरळ सूत  चांगले 
    दाट पेक्षा पातळ चांगले 
    सहज समजण्यासारखे चांगले

    विशेष प्रकारचे लिखाण नियम मोडण्यासाठी पुरेसे विशेष नसतात

    जरी व्यावहारिकता शुद्धतेपेक्षा उपयुक्त असते
    तरी चुका कधीही नकळत्या राहू  नयेत.
    त्यांचे स्पष्टपणे निरसन करणे आवश्यक आहे

    अस्पष्टता असेल तरी अंदाज करण्याचा मोह करू नका
    ते करण्याचा एक- आणि प्राधान्याने फक्त एकच-स्पष्ट मार्ग असतो.

    जोपर्यंत तुम्ही  प्रयत्न करीत नाही तोपर्यंत तो मार्ग प्रथम स्पष्ट नसेल.

    जरी आता करणे कधीही न करण्यापेक्षा चांगले वाटत नसले 
    तरी कधीही न करण्यापेक्षा आता करणे श्रेयस्कर असते

    कार्य करण्यात स्पष्टता नसणे वाईट
    कार्यपद्धती सोपी केल्यास  स्पष्ट करणे सोपे असेल, 
    तर ती चांगली कल्पना असू शकते.

    संकल्पनेला नाव असणे ही एक चांगली कल्पना आहे 
    – चला त्यापैकी आणखी काही करूया!

No comments:

Post a Comment