मोठा मोसा लहान माशांना गिळून मोठा होतो तसे व्यापारातही प्रतिस्पर्धी कंपनी विकत घेऊन मोठ्या कंपन्या आपले वर्चस्व कायम राखतात.फोटोशॉप, फ्लॅश, ग्राफिक डिझईन आणि इलस्ट्रेटर तंत्रज्ञानात आघाडीवर असणारी अडोब संगणक कंपनी जागतिक बाजारात सर्वात जुनी, महत्वाची व मोठी कंपनी असूनही युरोपमधील फिग्मीच्या यशामुळे त्यांच्या ग्राहक वर्गात प पर्यायाने फायद्यात घट होत होती.
यावर उपाय म्हणून अडोबने नुकताच युरोपमधील फिग्मा ही याच क्षेत्रातील छोटी कंपनी 20 बिलियन डॉलरला विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला होता.फिग्मा कंपनीचा ताळेबंद 400 मिलियन डॉलर इतका कमी असूनही एवढी मोठी किंमत अडोबने देऊ केली होती. साहजिकच फिग्माने या विलिनीकरणास आनंदाने मान्यता दिली होती.
Ref:https://www.wsj.com/tech/adobes-20b-purchase-of-figma-would-harm-innovation-u-k-regulator-provisionally-finds-19f28b72?mod=WTRN_pos7&cx_testId=3&cx_testVariant=cx_164&cx_artPos=6
मात्र युरोपियन स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाला असे लक्षात आले की फिग्मा हे कमी किंमतीचे सॉफ्टवेअर युरोपमधील अनेक डिजिटल डिझायनर्स व छोट्या कंपन्या वापरत आहेत. त्याना अडोबच्या अटी व किमती स्वीकारायला लागतील शिवाय फिग्माच्या नवनिर्मितीच्या व प्रगतीच्या प्रयत्नांना खीळ बसेल.त्यामुळे युरोपियन कायदेतज्ज्ञांनी त्यास अटकाव केला. त्यामुळे फिग्माचे निलिनीकरण थांबले.
माझ्या मनात आले की यावर एक कल्पनारम्य गोष्ट रचता येईल ---- अमेरिकेतील अडोब राजाने युरोपमधील रूपसुंदरी फिग्मा हिला मागणी घातली. अडोबची संपत्ती पाहून फिग्माने या मागणीला होकार दिला. पम युरोपच्या जनतेला फिग्मा आपल्यातून जाण्याची भिती वाटली. फिग्माबद्दलचे त्यांचे प्रेम उफाळून आले त्यांनी तिला राजकन्या म्हणून मान देण्याचे ठरविले, मग फिग्मानेही युरोपची राजकन्या म्हणून राहण्याचे मान्य केले व अडोबला नकार दिला.
भारतानेही आपल्या छोट्या स्वदेशी कंपन्यांना संरक्षण देऊन त्यांच्या प्रगतीसाठी आर्थिक मदत आणि प्रकल्प दिले तरच त्या प्रबल आंतरराष्ट्रीय संस्थांपुढे तग
धरू शकतील.
No comments:
Post a Comment