Saturday, November 7, 2020

ज्ञानदीपच्या वर्क फ्रॉम होम संकल्पनेला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन

 भारताच्या दूरसंचार विभागाने आयटी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीपीओ आणि वर्क फ्रॉम होम बाबत कोरोनाकाळात देण्यात आलेली सूट आता कायमस्वरुपी लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग तसंच आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी काही नियमांमधून सूट दिली आहे. यामुळे उद्योगाला प्रोत्साहन मिळेल आणि वर्क फ्रॉम होमसाठी मदत होईल असं म्हटलं आहे.नव्या नियमांनुसार सेवा देणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम एनीव्हेअर करता येईल. या कंपन्यांना वेळेवर रिपोर्ट करणं आणि इतर बंधनांतून मुक्त करण्यात आलं आहे.

ज्या कंपन्या दूरसंचार साधनांचा वापर करून अॅप्लिकेशन सेवा, आयटीशी संबंधित सेवा किंवा इतर प्रकारच्या आउटसोर्सिंग सेवा पुरवते. अशा कंपन्यांना बीपीओ, नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग, आयटीइएस आणि कॉल सेंटर म्हटलं जातं. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार वर्क फ्रॉम होम संकल्पनेला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे आणि याचा विस्तार वर्क फ्रॉम एनीव्हेअर असा करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.यात घरातून काम करत असलेल्या एजंटला ओएसपी केंद्राचा रिमोट एजंट मानलं जाईल आणि इंटरकनेक्शनची परवानगी असेल. रिमोट एजंटला देशातील कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची मुभा असेल.नव्या नियमांचा उद्देश उद्योगाला प्रोत्साहन देणे हा आहे. 


भारताला आयटी क्षेत्रात सहकारी तत्वावर अनेक छोट्या संस्था वा व्यक्तीगत सल्लागार यांना एकत्र आणून मोठा उद्योग उभा करण्याच्या ज्ञानदीप फौंडेशनच्या प्रकल्पाला या निर्णयाने मोठे पाठबळ मिळणार आहे. नव्या नियमांमुळे ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीला वर्क फ्रॉम होमशी संबंधित व्यवस्था उभारण्यास आणि  अर्धवेळ कर्मचा-यांच्या नेमणुकीस वाव मिळाला असून  ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींना ज्ञानदीप फौडेशनच्या माध्यमातून नवा सेवा व सल्लागार व्यवसाय सुरू करणे शक्य झाले असून ज्ञानदीप इन्फोटेकशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे शक्य होणार आहे.

सध्या व्यक्तीगत पातळीवर मानद सल्लागार म्हणून कार्य करत असणा-या भारतातील अशा तज्ज्ञ  व्यक्तींना नवयुवकांना आर्थिक साहाय्य देऊन ग्रामीण भागातही स्वतःच्या मालकीचा  उद्योग करता येईल. ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सक्रीय सभासद बनून (https://dnyandeep.net)आपला परिचय व  स्वतःचे सल्लादालन सुरू करा. 


ज्ञानपीपतर्फे केंद्र सरकारच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन. सहकारी संस्थेसाठीही भांडवली व पायाभूत विकासासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची योजना सुरू व्हावी असे वाटते. 


No comments:

Post a Comment