कोणत्याही विषयाचे मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ते लवकर आणि विनासायास समजते. सध्या माहिती तंत्रज्ञान विषयास फार महत्व आल्याने, गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ध्वनीचित्रफितीद्वारे असे शिक्षण देण्याचा संकल्प ज्ञानदीप करीत आहे.
या उपक्रमाअंतर्गत खालील व्हिढीओ आतापर्यंत युट्यूबवर प्रसिद्ध केले आहेत.
१. ज्ञानदीप इन्फोटेकची जन्मकथा
२. बायनरी किंवा द्विमान पद्धत - भाग - १
संगणकाला वीज वहाते किंवा नाही एवढेच कळण्याची बुद्धी असते. अशा निर्बुद्ध यंत्राला संख्या वा अक्षरे वाचता याव्यात यासाठी बायनरी किंवा द्विमान पद्धत शोधण्यात आली. तिचा परिचय येथे पहिल्या भागात दिला आहे
३. बायनरी किंवा द्विमान पद्धत - भाग - २
बायनरी किंवा द्विमान पद्धत वापरून संख्या वा अक्षरे कशी लिहितात याची माहिती.
४. रंगांची माहिती संगणकाला कशी देतात.
५. बिट, बाईट पासून ते वेबपेजपर्यंत
संगणकाला माहिती देताना शून्यएक या दोन अंकांचा वापर करून संख्या, अक्षरे, मजकूर व इंटरनेटवरील वेबपेजसाठी कसा प्रोग्रॅम करतात त्याची प्राथमिक माहिती येथे दिली आहे.
हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने वरील व्हिडीओत काही माहितीची द्विरुक्ती झाली आहे.
अर्थात अशी द्विरुक्ती शिकणा-यासाठी तसेच परस्पर संबंध दाखविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मला वाटते.
आता असेच व्हिडीओ क्रमाक्रमाने प्रसिद्ध करण्याचा विचार आहे.
No comments:
Post a Comment