Saturday, November 11, 2023

ज्ञानदीपच्या सहकार्याने इंटर्नशिप प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करा.

 ज्ञानदीप फाऊंडेशनने उद्योग व व्यवसाय प्रकल्पांमध्ये प्रशिक्षण आणि अनुभव प्रदान करण्यासाठी  शैक्षणिक संस्थांच्या सक्रीय सहभागातून इंटर्नशिप प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची  योजना आखली आहे. यात सहभागी होणा-या संस्थांना आपल्या खोल्या, प्रयोगशाळा व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साहाय्याने आपल्याच संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडणा-या माजी विद्यार्थ्यांना   असे व्यवसायोपयोगी प्रशिक्षण देऊ शकतात.

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि.ही सांगलीतील कंपनी वेबडिझाईन, सॉफ्टवेअर व मोबाईल एप डेव्हलपमेंट क्षेत्रात गेली 22 वर्षे कार्यरत आहे. या संस्थेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन अनेक विद्यार्थी भारत व परदेशात उच्च पदावर काम करीत आहेत. ज्ञानदीप फौंडेशन पर्यावरण अभियांत्रिकी, हरित तंत्रज्ञान आणि संगणक प्रशिक्षण या क्षेत्रात गेली 15 वर्षे कार्य करीत असून महाराष्ट्रात तसेच परदेशांत अनेक सेमिनार व प्रशिक्षण वर्ग संस्थेने आयोजित केले आहेत. अनेक शिक्षण संस्थांतील सध्या कार्यरत असणारे व निवृत्त अनुभवी प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिक ज्ञानदीपच्या या योजनेत सहभागी होऊ शकतील.

अमेरिकेतील हॉरवर्ड विद्यापिठाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या स्टार्ट अप उपक्रमात पार्टनर होऊन  त्यांच्या व्यवसायवाढीस मदत व प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढे आले पाहिजे. तरच माजी विद्यार्थ्यांतून  उद्योजक निर्माण होण्यास वा  खाजगी क्षेत्रात त्याना चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.

मला असे वाटते की  शिक्षणसंस्थांनी  व्यवसाय वाढीचे मुख्य भागधारक बनले पाहिजे. ज्ञानदीप याबाबतीत उद्योग व शिक्षणसंस्था यातील समन्वयाचे काम करेल. तसेच ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून परिक्षा घेऊन  प्रत्यक्ष अनुभवाचे  शिफारसपत्र देऊ शकेल.

या योजनेत सहभागी होण्याची इच्छा असणा-या व्यक्ती व संस्थांनी   info@dnyandeep.com किंवा info@dnyandeep.net वर ज्ञानदीपशी संपर्क साधावा आणि  योजनेचे प्रारूप ठरवावे ही विनंती.

या प्रस्तावित योजनेबाबत आपली मते वा मार्गदर्शक सूचना  कळवाव्यात  ही विनंती. कारण सर्वांच्या सक्रीय सहभागाशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही.
 
आभारी आहे.

- डॉ. एस. व्ही. रानडे ( निवृत्त प्राध्यापक, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली) , ज्ञानदीप, सांगली
- फोन -- + 919422410520 / +01 4083387672
व्हॉट्सअॅप मेसेजसाठी तुम्ही यापैकी कोणताही नंबर वापरू शकता.

No comments:

Post a Comment