Tuesday, November 30, 2021

वेबसाईट डिझाईन स्पर्धेमागची ज्ञानदीपची भूमिका

 


ज्ञानदीपने मराठीतून वेबसाईट डिझाईन स्पर्धा जाहीर केल्यानंतर अनेकांना शालेय विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती वा कुवतीबाहेरचा विषय  वाटला. प्रत्यक्षात वेबडिझाईन दहावीच्या भौतिक वा गणितापेक्षा कमी क्लिष्ट आणि समजायला अगदी सोपे आहे हे सांगण्याची गरज आहे.

अमेरिकेतील माझ्या माहितीच्या काही लोकांनी आता वेबसाईट डिझाईन आता कालबाह्य तंत्रज्ञान झाले असून फेसबुक, अॅमेझॉन, गुगलसारख्या सर्वव्यापी आणि सोप्या प्रसारमाध्यमांचा उपयोग आपल्या शिक्षण, व्यवसाय वा छंद जोपासण्यासाठी करणे जास्त उपयुक्त आहे असे मत व्यक्त केले. शिवाय वेबडिझाईनसाठी विक्ससारख्या अनेक नो-कोड किंवा ड्रॅग-ड्रॉप सुविधा नेटवर उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले.

मात्र या सुविधा वापरत असताना वेबसाईट म्हणजे काय, तिचे कार्य कसे चालते याची माहिती न झाल्याने एकप्रकारचे परावलंबित्व येते. तसेच या प्रसारमाध्यमांचे तंत्रज्ञान एक अवघड आणि अनाकलनीय असून आपल्याला त्यात काही काम करणे अशक्य  आहे असा ग्रह होतो. या सर्व सुविधात  क्लिष्ट कोडींग वापरून त्यात जादूमय वाटणा-या बदलांची वा माहिती शोधाची यात गुंफण केली असली तरी नेटवरून माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक असणा-या अगदी साध्या ग्रहितांवर आणि इंटरनेटच्या ज्ञानावर     वेबपेज करणे व त्यांच्या समूहाची साधी वेबसाईट बनविणे अगदी सोपे आहे.

वेबडिझाईन हे तंत्रज्ञान शालेय विद्यार्थीही सहज शिकू शकतो. त्याचा वापर करून त्याला हवी तशी वेबसाईट तयार करता येते आणि आपले विचार इंटरनेटवर आपल्या पूर्ण मालकीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करता येतात. हे सप्रमाण सिद्ध करणे हे ज्ञानदीपच्या वेबदिझाईन स्पर्धेचे उद्दीष्ट आहे.

जे विद्यार्थी यात भाग घेतील त्यांना वेबडिझाईनची प्राथमिक सर्व माहिती व्हिडिओ, मराठीतून लेख आणि प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून  देऊन त्यांना या तंत्रज्ञानाविषयी वाटणारी भीती दूर करून एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा ज्ञानदीप प्रयत्न करणार आहे.  शिवाय मराठी भाषेचा वापर करणे आपल्या परिसर व निसर्गसंवर्धनाची माहिती  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी याचा  उपयोग करण्यास प्रोत्साहन देणे व  एकूणच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने सोपे व शालेय विद्यार्थ्यांना सहज समजेल असे प्रशिक्षण साहित्य निर्माण करण्याचे मोठे आव्हानही ज्ञानदीप टीमच्या सर्व सहका-यांपुढे आहे. तरीदेखील अशा प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन   ज्ञानदीपने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

 या अभिनव प्रयोगाचे विद्यार्थी व ज्ञानदीपचे सहकारी स्वागत करतील व व २०२२ च्या नव्या वर्षात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा संकल्प करतील अशी मला आशा आहे.  स्पर्धेविषयी अधिक माहिती - https://tinyurl.com/yeywtped

- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
 

Friday, November 19, 2021

पर्यावरण विषयावर मराठीतून वेब डिझाईन ची अभिनव स्पर्धा

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि.  ही संस्ठा गेली वीस वर्षे वेबडिझाईनच्या क्षेत्रात कार्य करीत असून आतापर्यंत 150 वेबसाईट, 20 सॉफ्टवेअर आणि 20  अँड्रॉईड व आयफोन एप या संस्ठेने विकसित केले आहेत.

माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली. या ज्ञानदीप फौंडेशनचे वेबसाईट डिझाईन कार्य ज्ञानदीप इन्फोटेकतर्फे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून करण्यात येते.   

माध्यमिक शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या   विद्यार्थ्यांना मोबाईल आणि कॉम्प्यटरवर मराठी टाईप करता यावे, आपला परिसर व पर्यावरण यांचा अभ्यास करून तो स्वच्छ आणि निसर्गसेवी करण्याची प्रेरणा मिळावी आणि  वेबसाईट डिझाईनचे प्राथमिक ज्ञान व्हावे या उद्देशाने   ज्ञानदीप फाउंडेशन मराठीतून वेब डिझाईन स्पर्धा जाहीर करीत आहे.

सूचना - स्पर्धेविषयी संपूर्ण अधिकृत माहिती वा नोंदणी फर्म ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटवर (http://dnyandeep.net) प्रसिद्ध केली  जाईल. 

 या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या नावाचा ईमेल तयार करून ज्ञानदीप फौंडेशनच्या संकेतस्थळावर   नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

.
स्पर्धेत भाग घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना  वेब डिझाईन म्हणजे काय ते कसे करायचे  याविषयी सविस्तर माहिती ज्ञानदीपतर्फे  दिली जाईल.  

वेबडिझाईन, फौटोशॉप, तसेच वेबसाईटविषयी प्राथमिक माहितीचे ज्ञानदीप टीमने केलेले मराठी माध्यमातील  व्हिडीओही स्पर्धकांना पाठविले  जातील.

याशिवाय मराठीतून वेबडिझाईन शिका या नावाचे ज्ञानदीपचे एक ॲप आहे ते पहावे


स्पर्धेचा विषय आणि व्याप्ती

 
आपला वा आपणास आवडणारा वा महत्वाचा वाटणारा कोणताही परिसर निवडता येईल
उदा.  माझे गाव ( गावाचे नाव असावे), आमची सोसायटी,  माझी शाळा किंवा महाविद्यालय वा माझ्या दृष्टीने प्रदूषित परिसर यासारखा कोणताही विषय घेता येईल.

विद्यार्थ्याने आपल्या वेबसाईट साठी आपले संकेत चिन्ह ( लोगो) फोटोशॉप, पेंट किंवा दुसर्‍या कुठल्याही सुविधेचा वापर करून तयार करावे. तसेच परिसराचे मोबाईल ने स्वतः घेतलेले फोटो संपादन करून  योग्य नाव वा माहितीसह द्यावेत. व्यक्तिगत माहिती किंवा व्यक्तींचे फोटो यात नसावेत.


 गुगल वा इंटरनेटवर मिळालेल्या फोटो व चित्रांत मध्ये आवश्यक ते बदल करून ते या वेबसाईटवर वापरण्यास हरकत नाही. वेबसाईटमध्ये स्वागतकक्ष नावाचे एक  मुख्य पान असावे त्यातून इतर  सर्व पानांना लिंक द्याव्यात आणि कोणत्याही पानावरून परत मुख्य पानावर जाण्यासाठी लिंक असावी.


स्वागतकक्ष किंवा मुख्य पानावर फोटो व वेबसाईट विषयी थोडक्यात माहिती द्यावी

परिसराची माहिती देताना रस्ते, इमारती, झाडे, स्वच्छता व पाणीपुरवठा, सांडपाणी व कचरा संकलन व प्रक्रिया इत्यादी माहिती असावी. परिसराची  सध्याची स्थिती,  त्यावर आपले मत तसेच यात सुधारणा करून हा परिसर अधिक चांगला व पर्यावरणप्रेमी कसा करता येईल याविषयी आपले विचार वेबसाईटच्या माध्यमातून व्यक्त करावेत आणि आपल्या कल्पनेतील भविष्यातीलआपल्या परिसराचे चित्र कल्पनेने रंगवावे.

 स्पर्धेत सादर करण्याच्या वेबसाईटवर किमान दहा पाने व एक फोटोगॅलरी असावी.

स्पर्धेला शिक्षणाची काही अट नाही मात्र स्पर्धकाचे वय 20 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.

पहिले पारितोषिक  - रुपये 5000 /-
दुसरे पारितोषिक - रुपये 3000 /-
तिसरे पारितोषिक - रुपये 2000 /-

नावनोंदणी शुल्क - 100 रुपये

स्पर्धक नोंदणी तपशील

संपूर्ण नाव-

जनमतारीख -

शिक्षण-

पत्ता - 

फोन -

इमेल -  

वेबसाईटसाठी निवडलेला परिसर य स्थान

गुगल मॅपवर परिसर नकाशा

स्पर्धा नाव नोंदणी अंतिम तारीख- 10 डिसेंबर 2021

वेबसाईट ज्ञानदीपकडे पाठविण्याची  अंतिम तारीख 25 डिसेंबर 2021
 

वेबसाईट सादर केल्यानंतर ज्ञानदीप तर्फे स्पर्धकांची एक ऑनलाईन चाचणी घेतली जाईल.

निकाल 31 डिसेंबर 2021 व पारितोषिक वितरण 1 जानेवारी 2022 रोजी होईल.

ही स्पर्धा आयोजित करण्यामागे विद्यार्थ्यांना पर्यावरण व वेबडिझाईन प्रशिक्षण देणे व त्यांना प्रत्यक्ष प्रकल्प करण्यास प्रोत्साहित करणे असा ज्ञानदीपचा हेतू आहे. 

तरी सर्व शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेची माहिती द्यावी ही विनंती.


- डॉ. सु. वि. रानडे,  

Friday, October 29, 2021

Media Dinausores are data grabbing machines destroying separate identity and ownership

I had written a blog one year back against the fight between MNCs to capture customers world over.
I am republishing it as I see new fight between global communication media like Facebook, twitter, Whats app, Instagram, linked in and similar large customer base media giants.
 
Renaming of Facebook to Meta indicates urgency in attracting more customers with lucrative offers. All these so called free to use media is just a tool to capture personal data, it affects web design business which is  a boon for small industries offering more secure, focused and retains individuality
Ease of use and free access to post information attracts people, who share their preferences, likes and personal information.
 
Website on the other hand has full ownership and accessibility can be made specific to any webpage or part of data. All small industries should avoid to get trapped in free offers of advertisement and eCommerce as they loose their separate identity and get chained with hundreds of global competitors.
Just like shops in a mall, their presence will only add option which is neglected before foreign attractive but unreliable products.
 ----
 
My earlier blog dated 24 Oct. 2020
 

Death of Dinosaurs

 
 
 Dinosaurs roamed the earth for 160 million years.  But they got destroyed  some 65.5 million years ago. There is a mystery about the exact cause of their extinction.  Some believe that the extinction was due to a single catastrophic event of  supernova radiation on earth or as an effect of striking of some asteroid. 

One early theory was that small mammals ate dinosaur eggs, thereby reducing the dinosaur population until it became unsustainable. Another theory was that dinosaurs’ bodies became too big to be operated by their small brains.

Considering the growth of large corporate and MNCs who are dominating almost all business in the entire world, I am tempted to compare them with Dinosaurs. These corporate have grown big by destroying local small businesses through their capacity to monopolize the  consumer market using huge capital, big infrastructure and  large workforce. This is more so in the Information technology and practically small software firms just cannot fight with these giants. They are  struggling to get some small local customized jobs for their survival but are always under the threat of retrenchment of their skilled personnel  due to hefty offers from bigwigs.

The development of mobile devices and cloud services however, have changed the scenario. Now it is not necessary to have   to have large computer hardware or to own costly proprietary operating systems and software tools for undertaking software development  projects of any size. Hence small groups and individuals also can undertake projects of any size.


Evolution of Freelance Service Agencies like Elance, O-Desk, Guru, Freelancer, worknhire etc have played a great role in providing  a platform for such groups and individuals to get work with fare competition.




The  theory of small mammals eating  dinosaur eggs, or small brains with big bodies of dinosaurs as the cause of their extinction may become applicable to Big IT companies as the individual freelancers and small groups may provide efficient, more innovative and economical solutions to problems which are generally awarded to big companies.

 It is necessary however to build effective and responsive coordination between many diverse small groups and individual developers. 
 
Dnyandeep Foundation ( https://dnyandeep.net) has started Free Lance Forum for building network of individual free lancers for building their career by co-operating with each other in training and sharing resources. This has a self help program which envisages internship with professionals on one to one basis which will give opportunity to learn practical knowledge from experts and Experts also will get assistance in building new projects and getting help from students in current projects in hand.


 
If this succeeds, it will be a new sustainable growing business  with collective funding and benefits to all based on their contributions in carrying out the work.

The trainer and learner have no eligibility restrictions and it will be a free market where learner will decide what to learn, from whom to learn and at what cost and in what way. Thus  it will be learner or customer driven business.

For those who wish to use this forum only to learn some topic or skill, Dnyandeep Infotech can give experience certificate.

The participants i.e trainers and learners can form groups at will and get large projects from market.

If such centers get developed all over India in various fields through many different agencies, there will be real and permanent Death of Dinosaurs


 

Saturday, July 24, 2021

नवीपिढी - जुनी पिढी

 आटपाट नगर होते. तेथे एका गरीब ब्राह्मणाने आर्थिक ओढगस्तीत पदरमोड करून आपल्या मुलीचे पालन पोषण करून सुशिक्षित बनविले. एका उद्योजक, धनवान व्यक्तीबरोबर विवाह लावून देऊन संतृप्त मनाने त्याने जगाचा निरोप घेतला.
जावई मान्यवर  धनवान आणि  उद्योजक असल्याने त्याच्या मनात आपल्या मुलांनी आपल्याप्रमाणेच उद्योगात यश मिळवावे. मोठ्या शहरात वा परदेशात जाऊन नाव कमवावे आणि त्या द्वारे आपली तसेच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी असे मत होते.
 मुलीच्या आईला मात्र आपल्या नातवांनी आपले घरदार, शेतीवाडी तसेच आपल्या परिसरातील लोकांचे जीवनमान सुधारावे त्यांना नवे तंत्रज्ञान देऊन आर्थिकदृष्ट्या संपन्न व स्वावलंबी करावे असे वाटत होते. मुलीला नव-याचे ऐकावे की आईचे ऐकावे असा प्रश्न पडला. जुन्या पिढीतल्या प्रौढ व्यक्तींना आईचे मत योग्य वाटत होते. पण नव्या पिढीतील  मुलांना बाबांच्या धनकीर्तीचे आकर्षण असल्याने त्यांनी बाबांना साथ दिली. मुलीनेही त्याला मूक संमती दिली. मुलीने माहेरचे संबंध तोडायचे ठरविले. आता मात्र आई हट्टाला पेटली. तुला माझ्या जागेत रहायचे असेल तर माझ्या मताप्रमाणेच वागावे लागेल असे खडसावले व स्थानिक लोकांच्या प्राथमिक शिक्षणासाठी आपल्या जागेचा उपयोग करण्यास सुरुवात केली.


तिकडे आड तर तिकडे विहीर अशी मुलीची पंचाईत झाली. आईवर प्रेम असले तरी नव-याचे ऐकणे भाग होते. काय करावे हे तिला कळेना.


काही लोकांनी एक समन्वयाचा मार्ग सुचवला. आईने मुलीला आपल्या नव-याच्या इच्छेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य द्यावे आणि त्याबदल्यात मुलीच्या नव-याने माहेरच्या जागेत नवे नवे तंत्रज्ञान देऊन माहेरला आर्थिकदृष्ट्या संपन्न करावे.


प्रथम कोणीच हा सल्ला ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. पण कालांतराने त्यांना उमजले की स्थानिक जनतेत दुरावा निर्माण झाला तर सासर माहेर दोहोंचे नुकसान होईल.


मग त्यांनी या पर्यायावर विचार केला. काही चूकभूल झाली असल्यास क्षमा करावी असे एकमेकांना सांगून सासर माहेरातील वाद संपला. सहकार्याचे नवे युग सुरू झाले. सर्वजण सुखी व समाधानी झाले.


आटपाट नगरीतील ही कथा साठाउत्तरी सफल संपूर्ण.


आपल्या आवती भोवती अशा घटना घडत असतील तर आपम या कहाणीपासून योग्य तो बोध घ्यावा.

मराठीतून ध्वनीचित्रफितीद्वारे संगणक शिक्षण

कोणत्याही विषयाचे मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ते लवकर आणि विनासायास समजते. सध्या माहिती तंत्रज्ञान विषयास फार महत्व आल्याने,  गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ध्वनीचित्रफितीद्वारे असे शिक्षण देण्याचा संकल्प ज्ञानदीप करीत आहे.

 या उपक्रमाअंतर्गत खालील व्हिढीओ आतापर्यंत युट्यूबवर प्रसिद्ध केले आहेत.

१. ज्ञानदीप इन्फोटेकची जन्मकथा


२. बायनरी किंवा द्विमान पद्धत - भाग - १

संगणकाला वीज वहाते किंवा नाही एवढेच कळण्याची बुद्धी असते. अशा निर्बुद्ध यंत्राला संख्या वा अक्षरे वाचता याव्यात यासाठी बायनरी किंवा द्विमान पद्धत शोधण्यात आली. तिचा परिचय येथे पहिल्या भागात दिला आहे


३. बायनरी किंवा द्विमान पद्धत - भाग - २

बायनरी किंवा द्विमान पद्धत वापरून संख्या वा अक्षरे कशी लिहितात याची माहिती.

 


४. रंगांची माहिती संगणकाला कशी देतात.


५. बिट, बाईट पासून ते वेबपेजपर्यंत

संगणकाला माहिती देताना शून्यएक या दोन अंकांचा वापर करून संख्या, अक्षरे, मजकूर व इंटरनेटवरील वेबपेजसाठी कसा प्रोग्रॅम करतात त्याची प्राथमिक माहिती येथे दिली आहे. 



 हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने वरील व्हिडीओत काही माहितीची द्विरुक्ती झाली आहे.

अर्थात अशी द्विरुक्ती शिकणा-यासाठी तसेच परस्पर संबंध दाखविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मला वाटते.

आता असेच व्हिडीओ क्रमाक्रमाने प्रसिद्ध करण्याचा विचार आहे.


Monday, June 14, 2021

पुण्यातील एचसीसी प्रोजेक्टचे माझे अनुभव

 १९६८ मध्ये पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी सुरू केल्यानंतर लगेचच मी एमईसाठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी माझ्याबरोबर प्रा. दिवाण, पोतदार, घारपुरे होते. शिकविण्यासाठी प्रा. केतकर, एमवायजोशी, कुंटे, छापखाने होते. दुस-या वर्षी मी सेप्टीक टॅंकच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा विषय निवडला.

त्यावेळी कॉलेजच्या वॉटर सप्लायचे काम मेकॅनिकलचे प्रा. दिवाण यांचेकडे होते तर कॉलेज, होस्टेल व स्टाफ क्वार्टर्सच्या नव्या ड्रेनेज पाईप घालण्याचे काम आमच्याकडे आले. त्याआधी होस्टेलसाठी प्रा बर्वे यांनी सेप्टीक टॅंक बांधले होते मात्र मेसचे पाणी तसेच बाहेर सोडले जाई. हे सर्व पाणी एकत्र करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी परकोलेटिंग फिल्टरचा विषय मी एमईच्या प्रोजेक्टसाठी निवडला. सर्व्हे, ड्रेनेज पाईप, मॅनहोलसहीत सर्व ड्रेनेज व्यवस्था डिझाईनपासून बोँधकामापर्यंतचे काम मला करायला मिळाले.

त्यावेळी मी नवीन व पुस्तकी विद्वान होतो. प्रा. बर्वे, सखदेव, सर्व्हेचे सत्तू, कॉन्ट्रॅक्टर यशवंत कोलप, करंदीकर हे आमचे खरे गुरू होते.  फिल्टर आणि सेटलिंग टॅंक बांधून मला त्या विषयावर एमई करता आली. प्रा. सुब्बाराव हे सांडपाण्याच्या प्रक्रियेत तज्ज्ञ असल्याने मी जलशुद्धीकरणावर लक्ष केंद्रीत करावे असे सुब्बाराव यांनी मला सांगितले. जलशुद्धीकरण यंत्रणेचे डिझाईन आणि बांधणीचा अनुभव घेण्यासाठी १९७२च्या उन्हाळी सुट्टीत पुण्यातील पर्वती वाटरवर्क्सच्या एचसीसी प्रोजेक्टवर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅमखाली तीन महिने अनुभव घेण्याची संधी मला मिळाली.


माझे सासर पुण्यातच होते पण त्यांच्या एका खोलीतील संसारात पाच जण रहात असल्याने मला तेथे राहणे शक्य नव्हते. पुण्यात अलका टॉकिजजवळील एका हॉटेलमध्ये  व नंतर हत्ती गणपती जवळच्या होस्टेलमध्ये या काळात मी रहात होतो.

पर्वतीच्या पायथ्याशी शेल रूफ असणारे चार रॅपिड सॅंड फिल्टर आणि दोन सेटलिंग टॅंक बांधण्याचे काम एचसीसी ला मिळाले होते. त्यांचे इंजिनिअर आणि कर्मचारी तेथेच तट्ट्याच्या कॉलनीत रहात असत. फक्त मुख्य इंजिनिअर कुलकर्णी याना पक्के घर होते.

सकाळी ९ पासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत काम चाले. मी  डिझाईन ऑफिस व कन्स्ट्रक्शन साईट दोन्ही कडे जाऊन काम पहात असे. मी फिटींग कामातील प्रगती, सळई, सिमेंट बॅग, सिमेंट वाळूचे प्रमाण यांच्या नोंदी ठेवी.नोट्स काढून त्या कुलकर्णी इंजिनिअरना दाखवे. जर्मन फर्मच्या ड्राईंग्जवरून नवी ड्राईंग बनविली जात. मुंबईहून मदन नावाचे चीफ इंजिनिअर येऊन मार्गदर्शन करीत. डिझाईन आणि प्रत्यक्ष काम य़ात ब-याच वेळा अनेक बदल करावे लागत. तेथील अनुभवी मेकॅनिक व गवंडी यांना असे बदल करायला मुभा असे. त्यांचा काम करण्याचा झपाटा वाखाणण्यासारखा होता. अनेक वेळा त्यांनी डिझाईनमध्ये सुचविलेले बदल सुपरवायजरलाही मान्य करावे लागत.

म्युनिसिपालिटीचे इंजिनिअर येऊन कामाची पाहणी करून जात. कुलकर्णीसर अगत्याने माझी ओळख करून देत.   ते मला ब-याच गोष्टी कोदून खोदून विचारत. मीही माझ्या नोट्सवरून सर्वकाही त्यांना सांगत असे. यामुळे नियमावर बोट ठेवून एचसीसीच्या कामात चुका काढायला त्यांना संधी मिळे. एचसीसीच्या अधिका-यांनी मग मला मी त्यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे याची जाणीव करून दिली. त्यामुळे मला अशावेळी काय सांगायचे आणि काय नाही हे समजले.

त्यावेळी शेलरूफचे डिझाईन व उभारणी  अवघड आणि नाविन्यपूर्ण होती. अनेक लोक ते काम पहायला येत.  फिल्टरखालील पाईप जोडणी, वाळू चाळून थर करणे, सेटलिंग टॅंकमध्ये ग्राऊंडवाटर अपफ्लो प्रेशर कमी करण्यासाठी रिलीफ व्हाल्व, फ्लॉक्युलेटर व स्क्रॅपरची जोडणी, ओव्हरफ्लो वीअरसाठी व्ही नॉच पट्ट्या बसविणे अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात पहायला मिळाल्याने मला या ट्रेनिंगचा फार फायदा झाला. शिवाय कर्मचा-यांबरोबर दिवस घालविल्याने त्यांचे जीवन, अडचणी, आकांक्षा याचीही कल्पना आली. म्युनिसिपातलिटीचे फिल्टर ऑपरेटर आणि इंजिनिअर मला फार मान देत. त्यांच्याकडून मला इतर अनेक गोष्टींचे ज्ञान झाले.



फिल्टर प्लॅंट प्रत्यक्ष बांधणीचा एक समृद्ध अनुभव मला एचसीसीच्या या प्रोजेक्टमधून मिळाला. १९७३ ता १९७६ या काळात  आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी साठी   कानपूर वाटरवर्क्समध्ये काम करताना  मला या अनुभवाचा फार फायदा झाला.

नीरी, नागपूरमधील माझे अनुभव

 

१९६६ साली सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई सिव्हील पास झाल्यानंतर लगेच मी त्या कॉलेजमध्ये सिव्हील डिपार्टमेंटमध्ये नोकरीस प्रारंभ केला. माझ्या सुदैवाने त्याच वर्षी अमेरिकेतील ओक्लाहोमा युनिव्हर्सिटीतून एमएस झालेले सुब्बाराव वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आमच्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. अमेरिकेतील त्यांचे पर्यावरणविषयक नवे ज्ञान आमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याची मनीषा बाळगून मी त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांच्या पर्यावरण अभियांत्रिकी विषयात एम.ई. करण्याचे ठरविले.


त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये पब्लिक हेल्थ हा विषय शिकविला जात असला तरी त्याची प्रयोगशाळा नव्हती. नीरी, नागपूरमधील डायरेक्टर डॉ. जी. जे. मोहनराव हे सुब्बाराव यांच्या परिचयाचे होते. त्यांच्या ओळखीने नीरीत पर्यावरण प्रयोगशाळेत तीन महिने प्रशिक्षण घेण्याचे मी ठरविले. जागतिक संशोधकांच्या गोष्टी वाचल्या असल्याने भारतातील महत्वाच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेत मला काम करायला मिळणार या कल्पनेने मी हुरळून गेलो. पण मला नागपूर नवखे होते आणि इतक्या दूर परक्या शहरात कसे रहायचे हा माझ्यापुढे प्रश्न पडला. पण माझे जेष्ठ सहकारी प्रा. श्रीधर करंदीकर नागपूरचे असल्याने त्यांनी आपल्या घरी माझ्या राहण्याची सोय केली. युजीसीची शिष्यवृत्ती मिळवून १९६७ साली मी नागपूरला गेलो. त्यांच्या तीन भाऊ व आईवडील असणा-या कुटुंबात त्यांनी आपलेपणाने मला सामावून घेतले. त्यांचे घर सीताबर्डीत होते. तेथून नीरी ३ किलोमीटर दूर होली. आमच्या घराशेजारी राहणारे देशमुख नीरीमध्ये काम करीत असल्याने त्यांचेबरोबर मी बसने नीरीत जाई.


तेथील प्रत्यक्ष पाणी, मलजल, घनकचरा, हवाप्रदूषण या वेगवेगळ्या विभागात प्रत्येकी १५ दिवस प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला मिळाली. तेथील अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांची माझी ओळख झाली. डॉ. एस. एन. कौल, डॉ. अलगरस्वामी, डॉ. लक्ष्मीनारायण, डॉ. देशपांडे इत्यादींनी मला बहुमोल मार्गदर्शन केले.


 


त्यावेळी मी जरा धीट व स्पष्टवक्ता होतो. कोणाचीही तमा न बाळगता मी प्रश्न विचारत असे. माझे मतही मांडत असे. नीरीबद्दल माझ्या मनात असलेल्या कल्पनांना मात्र मोठा तडा गेला. तेथे घड्याळाच्या वेळेनुसार व नियमाप्रमाणे चाललेले काम मला आवडले नाही. कर्मचारी, अधिकारी यांच्या संघटना कायदेशीर बाबींचा अतिरेक, विभागाविभागातील दुरावा यामुळे माझे मन खिन्न झाले. संशोधन वा नवनिर्मितीसाठी भूक तहान विसरून व काळवेळाची पर्वा न करता धडपडणा-या शास्त्रज्ञांऐवजी मला चाकोरीबद्ध काम करणारे व पगार आणि बढती आणि अधिकार यात मशगुल असणा-या लोकांचेच तेथे प्राबल्य असल्याचे जाणवले. संशोधनासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत असूनदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन येथे का होत नाही असे मी डॉ. मोहनराव यांना विचारले. तेव्हा त्यांनी सरकारी निर्देशांप्रमाणे संशोधन प्राथमिकता बदलत राहिल्याने आणि व्यवस्थापनाला मर्यादित अधिकार असल्याचे कारण सांगितले आणि आपली हतबलता व्यक्त केली. अर्थात माझा हा अनुभव १९६८ सालातील आहे. आणि आता त्यात बरेच चांगले बदल झाले असतील असे मला वाटते.

नागपूरचा उन्हाळा, तेथील व-हाडी भाषा, लोकांची आदरातिथ्य व मदत करण्याची वृत्ती आणि करंदीकरांच्या घरातील खेळीमेळीचे प्रसंग आजही माझ्या मनात ताजे आहेत.

नागपूरला पर्यावरण अभियांत्रिकी प्रयोगशाळेत प्रदीर्घ काळ अनुभव घेतल्याने वालचंद कॉलेजमध्ये परतल्यानंतर आम्ही पब्लिक हेल्थ लॅब उभी करायचे मनावर घेतले. कॉलेजचे प्राचार्य श्री. कानिटकर यांनी यासाठी पूर्ण सहकार्य दिले. बीईच्या क्लासरूममध्येच लाकडी पार्टिशन घालून आम्ही प्रयोगशाळा उभारली. सुब्बाराव कॉलेज कॅंम्पसमध्येच रहात असल्याने कॉलेज सुटल्यानंतर रात्रीपर्यंत आणि शनिवारी रविवारी पूर्ण दिवस आम्ही प्रयोगशाळेत काम करीत असू. प्राचार्य कानिटकरही रविवारी प्रयाोगशाळेत येऊन आम्हाला प्रोत्साहन देत.
आज वालचंद कॉलेजमधील सुसज्ज प्रयोगशाळा बघताना नागपूरच्या नीरीमधून आणलेल्या बीजाचा वटवृक्ष झाल्याचे समाधान वाटते.


या जाणिवेतूनच नागपूरला ज्ञानदीपची शाखा काढण्याचे स्वप्न मी पाहू लागलो.


डॉ. एन. एस. रमण यांनी जेव्हा यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले तेव्हा मला मनस्वी आनंद झाला. ज्या नीरीत मी प्रयोगशाळेचे पहिले धडे गिरविले. त्याच नीरीतील अत्युच्च पदावर असणारी व्यक्ती ज्ञानदीपची पर्यावरण शाखा तयार झाली हे मी माझे परमभाग्य समजतो.

Saturday, May 22, 2021

तृणमूल क्रांती - शोध आणि बोध

आपल्या शासन काळात  पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीं यांनी  आपली सत्ता टिकविण्यासाठी ज्या गोष्टी केल्या वा समाजविघातक घटकांना पाठिशी घातले यामुळे त्यांच्याविषयी मी मांडलेले मत वाचकांना आवडणार नाही हे मला माहीत होते. त्यांच्या या वागण्याचे मी समर्थन करीत नाही. मात्र बंगालमधील ग्रामीण भागात अजूनही त्यांची  लोकप्रियता कशी कायम राहिली आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

 
शहरी भागात नवे विचार रुजविणे सोपे असते. ग्रामीण भागात वैचारिक क्रांती करण्यास त्यांच्या बरोबरीने प्रदीर्घ काळ काम करावे लागते.एवढाच याचा अर्थ.


नवसंशोधन, प्रशिक्षण वा नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार शहरात ज्या गतीने होतो तसा ग्रामीण भागात होत नाही. रूढ पद्धती आणि चालिरितींची बंधने यास अटकाव करतात.


संगणक शिकणे, लिहिण्याऐवजी संगणकावर टाईप करणे सोपे असले तरी त्यासाठी लागणारी मानसिकता आज शहरातल्या मध्यम वर्गातही अभावानेच आढळते. मग ग्रामीण भागात तर असे कार्य कसे रुजविता येईल असा प्रश्न पडतो. आर्थिक लाभ मिळण्याबाबत   तेथील लोकांची खात्री पटली तरच ते अशा उपक्रमात सहभागी होतील. असा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शासन तसेच इतर उद्योगांकडून असे काम मिळवून वितरित करण्याची यंत्रणा उभारावी लागेल. झोहो या जागतिक सॉफ्टवेअर कंपनीने चेन्नईमध्ये असा यशस्वी प्रकल्प सुरू केला असून अनेक खेड्यातील तरुणांना  शिष्यवृत्तीसह प्रशिक्षण आणि नोकरी देऊ केली आहे.


सांगायचा मुद्दा हा की आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी मोठ्या शहरांत आपला व्यवसाय न करता  आपले प्रकल्प ग्रामीण भागात वितरित करून त्यांचे व्यवस्थापन विकसित करण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच आयटी क्षेत्रात यशस्वी व चिरस्थायी तृणमूल क्रांती होऊ शकेल, - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.   

आयटी क्षेत्रात तृणमूल क्रांतीची गरज

राजकीय मतभेद बाजूला ठेवल्यास, डाव्या कम्युनिस्टांचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जी तृणमूल क्रांती करून सत्ता स्थापन केली. हे त्यांचे कार्य निश्चितच स्पृहणीय आहे. मला आठवते की १९७०-७५ च्या काळात आयआयटी कानपूरमध्ये कट्टर डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे खूप व प्राबल्य होते.  संप आणि व्यसनाधीनता या माध्यमातून  विद्यार्थी वर्गाला आक्रमक बनवून प्रस्थापित व्यवस्थापनास विरोध करण्यात तो यशस्वी झाला होता. प्रा. सुब्रह्मण्यम स्वामी, प्रा. धनागरे, डॉ. जी. डी. आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विधायक  कार्य  करत होता पण अशा विद्यार्थी व प्राध्यापकांची संख्या फार थोडी होती. ममता बॅनर्जींनी जशास तसे या न्यायाने कम्युनिस्टांची आक्रमक शैली उचलून त्यांना नामोहरम केले. समाजवादी व कॉंग्रेस पक्षाने  तळागाळातून संघटना बांधण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते पक्ष केवळ नेत्यांचे पक्ष बनले. तळागाळात जेव्हा क्रांती होते त्यावेळीच इच्छित कार्यात यश मिळते हे आता सर्वांना कळून चुकले आहे.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात किर्लोस्करांनी उद्योग क्षेत्रात, धोंडो केशव कर्वे, भाउराव पाटील आणि साने गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात, एसएम जोशी,विनोबा भावे,अण्णाभाऊ साठे, शाहूमहाराज यांनी सामाजिक क्षेत्रात, नाना पाटील, सेनापती बापट व लोकमान्य टिळक  यांनी राजकीय क्षेत्रात अशीच तृणमूल क्रांती केली.

 गरीबी आणि बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे धाव घेत आहेत. त्याचा शेती आणि छोटे स्थानिक उद्योग यावर फार मोठा अनिष्ट परिणाम झाला आहे. सध्या कोरोनाच्या दहशतीमुळे पुन्हा शहरातील युवक आपल्या घरी परतत आहेत. सुदैवाने मोबाईल व इंटरनेटमुळे ऑनलाईन शिक्षण वा व्यवसाय करण्याची सोय उपलब्ध झाल्याने हे चित्र पालटेल आणि ग्रामीण भागात सुबत्ता येईल अशी चिन्हे दिसत आहेत.

मात्र ग्रामीण भागातील  बहुसंख्य लोकांना इंग्रजी येत नसल्याने  आयटी क्षेत्रातील काम करणे त्यांना दुरापास्त वाटत आहे. ज्ञानदीप फौंडेशनने यासाठी स्थानिक भारतीय भाषांत वेबसाईट, मोबाईल सुविधा आणि सॉफ्टवेअर विकसित करण्याचे ठरविले आहे. भारतीय लोकांचा बुद्ध्यांक सर्वसाधारणपणे उच्च प्रतीचा असल्याने आणि जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने सर्वांना घरबसल्या प्रशिक्षण व व्यवसाय करणे शक्य होणार आहे.

अर्थात यासाठी निमशहरे आणि ग्रामीण भागात स्थानिक भारतीय भाषेत संगणक प्रशिक्षण देण्यासाठी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. ज्ञानदीप फौडेशनला हे शक्य नसले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्र उभारणीच्या कार्यास वाहून घेतलेल्या संस्थांनी असा उपक्रम हाती घेतला तर अशी तृणमूल क्रांती निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे. असे झाले तर परदेशी बलाढ्य कंपन्यांच्या आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू आणि आपल्या छोट्या उद्योगधंद्यांचे रक्षण व संवर्धन करू शकू. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

 

Friday, April 2, 2021

The Rock Story - Part 1

Draft to be modified and developed through interaction between Asmi (5) in USA and Aba (77)  in India

( Imaginary story on the lines of Toy Story and similar TV movies) 

In America, there are patches of woodchips and stone gravel in gardens. . The story assumes two  such  of stones and woodchips animated kingdoms  separated by a river. Woodchips have birds on their side whereas stones have insects and ants, Stones protect insects from birds. Ants have fire as weapon to fight birds and chips, whereas birds have water  tor defence. Wood chips are masters in ship and can use ships for attack. Stones can build big towers and throw stones on ships.

Both the stones and woodies habve their own kingdom with castle , houses, roads, gardens and carry on many activities like shopping, playing training etc. 

The story has evolved many scenes and events, where Asmi (age 5) took active role and drew sketches, paited stones, and did coding also. The story has a happy end after fierce fighting between the two armies.



 It was midnight dark with raining outside. The sudden  lightening with roaring sound frightened Asmi as she woke from deep sleep and saw the flaskhing lights on window. Her sister was fast asleep. Asmi scrambled up from bed and went to next room where her grandpa sleeps. To her surprise, Aba was not there, she remembered suddenly that he has gone to India. With disappointment she walked back to bed with lingering memory of the rock story, she and Aba had planned.



She felt herself to be flying in air sitting on a dragon over the Rocks and Woodies islands with live fierce war between stone and woodchip characters. She remembered the plot and various scenes they had created for the story over many days and she was glad that she herself is participating in the actual movie.

 



 
Keep reading to get the idea of movie which is still in process of developing -- Waiting to get more ideas from Asmi.

Wednesday, January 13, 2021

कोरोनाच्या अंधारात ज्ञानदीपचा इंटरनेट प्रकाश


नमस्कार मंडळी,

या कोरोनाने सारे जग उलटे पालटे करून टाकले आहे. इतके दिवस आपण श्रोत्यात बसून नेत्यांची भाषणे ऐकत होतो. आता आपण स्टेजवर आणि इतर सारे श्रोते बनण्याची वेळ आली आहे. टीव्ही, सिनेमा, नाटक आपण अंधारात बसून पाहण्याची सवय झालेल्या सा-या प्रेक्षकांनाच कॉम्प्युटरच्या पडद्यावर आणून कलाकार बनावे लागत आहे.



सभेत भाषण करण्यास धैर्य लागते. आचार्य अत्रे यांनी शाळेत पहिले भाषण करताना आपली कशी फजिती झाली याचा किस्सा त्यांच्या मी  वक्ता कसा झालो या लेखात  विनोदी शैलीत सांगितला आहे. शिक्षक होणा-या प्रत्येकाला अशा प्रसंगातून जावे लागते. सभाधीटपणा नसल्याने आजही बहुतेक लोक श्रोते वा प्रेक्षक म्हणून राहण्यास पसंती देतात. लेखनाच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार आहे. पण त्यामुळे होते काय की अधिक हुषार, अनुभवी व ज्ञानी व्यक्तीही कायम अंधारात राहतात. त्यांचे विचार, मते व मार्गदर्शन तसेच मौनात विरून जाते. खाजगीत बोलताना मग ते टीका वा स्तुती करण्यात समाधान मानतात.

कोरोनाने सर्वांनाच एकमेकांपासून दूर केल्याने इंटरनेटच्या एकमेव माध्यमाशिवाय प्रत्यक्ष भेट अशक्य झाल्याने, इतके दिवस कधीही प्रकाशात न आलेली माणसे एकदम सा-या जगापुढे येत आहेत. नव्हे त्यांना येणे भाग पडले आहे.


 याचा एक फायदा म्हणजे सभाधीटपणा असण्याची आता गरज उरलेली नाही. कारण आपल्याला घरात बसून व कोणत्याही वेषभूषेत जगातील कोणाशीही संवाद साधणे शक्य झाले आहे. शिवाय आपल्यासा प्रेक्षक दिसत नसल्याने ते दडपणही नाहिसे झाले आहे.

त्यामुळे आता विद्यार्थीही शिक्षक बनू शकतो आणि प्रेक्षकालाही कलाकार बनता येते.

इंटरनेटचा हा उपयोग पाश्चात्य राष्ट्रात व मोठ्या शहरांतील उच्च शिक्षितांना पूर्वीपासून माहिती असला तरी आता लहानांपासून थोरांपर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत आणि महानगरातील बंगल्यापासून ते दुर्गम भागातील झोपडीपर्यंत सर्वांना याचा साक्षात्कार झाला आहे.

आज माझ्या लग्नाचा ५० वा वाढदिवस. माझ्या प्रिय पत्नीच्या कै. सौ. शुभांगीच्या ' मराठी माऊली ' या कवितेतील शब्दांत सांगायचे तर

                            स्थलकालाचे बंधन नुरले

                           अखिल विश्वही तुझे जाहले


अशी स्थिती आज प्रत्येक व्यक्तीची झाली आहे.


याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे वय, पैसा, शिक्षण, धर्म, जात किंवा देश  यामुळे मागे पडलेल्या सर्वांना आपले  कौशल्य, श्रम व बुद्धीमत्ता यांचा उपयोग करून आपली प्रगती करण्याचा व इतरांशी समान पातळीवर स्पर्धा करण्याचा मार्ग खुला झाला आहे.


सा-या जगात खरी लोकशाही येण्याची शक्यता कोरोना संकटाने दृष्टीपथात आणली आहे.

आता आपले काम एवढेच आहे की इंटरनेटने प्रकाशित केलेल्या या प्रगतीच्या रस्त्यावर  निःसंकोचपणे, निर्धाराने आणि जलद वाटचाल करणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.

Add caption



ज्ञानदीपने गेली वीस वर्षे जे स्वप्न उराशी बाळगले त्याची प्रतिपूर्ती  अशी अचानक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वयंपूर्ण, समर्थ आणि सधन झाली तर सारा देश सशक्त होईल व जगाचे नेतृत्व करू शकेल.