ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ही संस्ठा गेली वीस वर्षे वेबडिझाईनच्या क्षेत्रात कार्य करीत असून आतापर्यंत 150 वेबसाईट, 20 सॉफ्टवेअर आणि 20 अँड्रॉईड व आयफोन एप या संस्ठेने विकसित केले आहेत.
माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली. या ज्ञानदीप फौंडेशनचे वेबसाईट डिझाईन कार्य ज्ञानदीप इन्फोटेकतर्फे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून करण्यात येते.
माध्यमिक शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल आणि कॉम्प्यटरवर मराठी टाईप करता यावे, आपला परिसर व पर्यावरण यांचा अभ्यास करून तो स्वच्छ आणि निसर्गसेवी करण्याची प्रेरणा मिळावी आणि वेबसाईट डिझाईनचे प्राथमिक ज्ञान व्हावे या उद्देशाने ज्ञानदीप फाउंडेशन मराठीतून वेब डिझाईन स्पर्धा जाहीर करीत आहे.
सूचना - स्पर्धेविषयी संपूर्ण अधिकृत माहिती वा नोंदणी फर्म ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटवर (http://dnyandeep.net) प्रसिद्ध केली जाईल.
या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या नावाचा ईमेल तयार करून ज्ञानदीप फौंडेशनच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
.
स्पर्धेत भाग घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना वेब डिझाईन म्हणजे काय ते कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती ज्ञानदीपतर्फे दिली जाईल.
वेबडिझाईन, फौटोशॉप, तसेच वेबसाईटविषयी प्राथमिक माहितीचे ज्ञानदीप टीमने केलेले मराठी माध्यमातील व्हिडीओही स्पर्धकांना पाठविले जातील.
याशिवाय मराठीतून वेबडिझाईन शिका या नावाचे ज्ञानदीपचे एक ॲप आहे ते पहावे
स्पर्धेचा विषय आणि व्याप्ती
आपला वा आपणास आवडणारा वा महत्वाचा वाटणारा कोणताही परिसर निवडता येईल
उदा. माझे गाव ( गावाचे नाव असावे), आमची सोसायटी, माझी शाळा किंवा महाविद्यालय वा माझ्या दृष्टीने प्रदूषित परिसर यासारखा कोणताही विषय घेता येईल.
विद्यार्थ्याने आपल्या वेबसाईट साठी आपले संकेत चिन्ह ( लोगो) फोटोशॉप, पेंट किंवा दुसर्या कुठल्याही सुविधेचा वापर करून तयार करावे. तसेच परिसराचे मोबाईल ने स्वतः घेतलेले फोटो संपादन करून योग्य नाव वा माहितीसह द्यावेत. व्यक्तिगत माहिती किंवा व्यक्तींचे फोटो यात नसावेत.
गुगल वा इंटरनेटवर मिळालेल्या फोटो व चित्रांत मध्ये आवश्यक ते बदल करून ते या वेबसाईटवर वापरण्यास हरकत नाही. वेबसाईटमध्ये स्वागतकक्ष नावाचे एक मुख्य पान असावे त्यातून इतर सर्व पानांना लिंक द्याव्यात आणि कोणत्याही पानावरून परत मुख्य पानावर जाण्यासाठी लिंक असावी.
स्वागतकक्ष किंवा मुख्य पानावर फोटो व वेबसाईट विषयी थोडक्यात माहिती द्यावी
परिसराची माहिती देताना रस्ते, इमारती, झाडे, स्वच्छता व पाणीपुरवठा, सांडपाणी व कचरा संकलन व प्रक्रिया इत्यादी माहिती असावी. परिसराची सध्याची स्थिती, त्यावर आपले मत तसेच यात सुधारणा करून हा परिसर अधिक चांगला व पर्यावरणप्रेमी कसा करता येईल याविषयी आपले विचार वेबसाईटच्या माध्यमातून व्यक्त करावेत आणि आपल्या कल्पनेतील भविष्यातीलआपल्या परिसराचे चित्र कल्पनेने रंगवावे.
स्पर्धेत सादर करण्याच्या वेबसाईटवर किमान दहा पाने व एक फोटोगॅलरी असावी.
स्पर्धेला शिक्षणाची काही अट नाही मात्र स्पर्धकाचे वय 20 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.
पहिले पारितोषिक - रुपये 5000 /-
दुसरे पारितोषिक - रुपये 3000 /-
तिसरे पारितोषिक - रुपये 2000 /-
नावनोंदणी शुल्क - 100 रुपये
स्पर्धक नोंदणी तपशील
संपूर्ण नाव-
जनमतारीख -
शिक्षण-
पत्ता -
फोन -
इमेल -
वेबसाईटसाठी निवडलेला परिसर य स्थान
गुगल मॅपवर परिसर नकाशा
स्पर्धा नाव नोंदणी अंतिम तारीख- 10 डिसेंबर 2021
वेबसाईट ज्ञानदीपकडे पाठविण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2021
वेबसाईट सादर केल्यानंतर ज्ञानदीप तर्फे स्पर्धकांची एक ऑनलाईन चाचणी घेतली जाईल.
निकाल 31 डिसेंबर 2021 व पारितोषिक वितरण 1 जानेवारी 2022 रोजी होईल.
ही स्पर्धा आयोजित करण्यामागे विद्यार्थ्यांना पर्यावरण व वेबडिझाईन प्रशिक्षण देणे व त्यांना प्रत्यक्ष प्रकल्प करण्यास प्रोत्साहित करणे असा ज्ञानदीपचा हेतू आहे.
तरी सर्व शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेची माहिती द्यावी ही विनंती.
- डॉ. सु. वि. रानडे,
No comments:
Post a Comment