माय सिलिकॉन व्हॅली या संकेतस्थळाचे संकल्पन करताना ज्ञानदीपच्या पूर्वेतिहासाची व अनेक अधुर्या स्वप्नांची आठवण झाली. माय सांगली, माय कोल्हापूर या संकेतस्थळांनंतर सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, मुंबई, बंगलोर अशा शहरांची अशीच संकेतस्थळे करण्याचे स्वप्न आम्ही रंगविले होते, या शहरांची माहिती, संदर्भ पुस्तके यांची जमवाजमव सुरू केली होती. संकेतस्थळांनंतर तेथे ज्ञानदीपच्या शाखा सुरू करण्याची कल्पना होती. सहज जुनी कागदपत्रे चाळताना मायपुणे संकेतस्थळाचे प्रास्तविक असलेला २००३ मधील एक कागद हाती आला. त्यातील मजकूर -
’पुणे तेथे काय उणे’ असे म्हणतात.
विद्येचे माहेरघर असणार्या पुण्यात उणीव तरी कोणती असणार ?
तरीदेखील पुण्याची सर्व माहिती इंटरनेटवर मराठीतून मिळत नव्हती. ही उणीव भरून काढणासाठी सुरू करीत आहोत.
सांगली व कोल्हापूर नंतर पुण्यात होणारे ज्ञानदीपचे पदार्पण हा ’ लहान तोंडी मोठा घास’ आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण आपणा सर्वांच्या सक्रीय सहभागाने यात आम्ही यशस्वी होऊ असे वाटते.
पुण्याविषयी सारी माहिती मराठीतून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मार्गदर्शक नकाशे व माहिती यांचा मिलाफ करून पुणेकरांना उपयुक्त संदर्भ संकेतस्थळ म्हणून या वेबसाईटचा विकास करण्याचे आम्ही योजिले आहे.
आपणाकडून यास योग्य प्रतिसाद मिळेल अशी आम्हास खात्री आहे.
गेल्या काही वर्षांत विद्येबरोबरच पुणे इतर क्षेत्रातही सर्वांगाने बहरून आले आहे.
पॆसा वा राजकीय पाठबल नसताना एका छोट्या संगणक कंपनीने पुण्यावर स्वारी करणे केवळ धाडसाचेच नव्हे तर मूर्खपणाचे ठरविले जाण्याची शक्यता आहे.
तरीही काळाची गरज ओळखून व आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवून ज्ञानदीपने हे कार्य हाती घेतले आहे.
पुण्याच्या संकेतस्थळाची काही पाने तयार झाल्यावर आमची नजर आणखी वर आकाशाकडे गेली व केवळ शहरे नव्हे तर ज्ञानाच्या सर्व शाखा व्यापणार्या मराठी भाषेस वाहिलेले मायमराठी संकेतस्थळ करण्याच्या कामात आम्ही व्यग्र झालो.
माय सिलिकॉन व्हॅलीचे संकेतस्थळ करण्याचे योजिले असताना भविष्यात असेच काही होईल असी भीतीही मनाला चाटून गेली.
पण
’ अनंत अमुचि ध्येयासक्ती,
अनंत अन् आशा,
किनारा तुला पामराला’
असे ’कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेत ्कवी कुसुमाग्रज यांनी म्हटल्याप्रमाणे ज्ञानदीपने सातासमुद्रापार उड्डाण करून ज्ञानदीपचा दिवा विद्या व तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च पातळीवरील नगरीत नेण्याचे ठरविले आहे.
आपणा सर्वांचा ’वरदहस्त’ लाभेल असी आशा आहे.

माय पुणे डॉट नेट

No comments:
Post a Comment