Sunday, December 3, 2017

जुमला वेबसाईटचे डिझाईन - १

जुमला वेबसाईटचे डिझाईन इतके गुंतागुंतीचे व जटील आहे की भल्या भल्या काॅम्प्युटर तज्ञांना ते अगम्य वाटते.असंख्य प्रोग्रॅम फाईल्स, त्यातील वरवर साधे दिसणारे पण प्रत्यक्ष कार्याचा थांगपत्ता लागू न देणारे पीएचपी कोड, अनेक फोल्डर्स व त्यात एकसारखी नावे असणा-या फाईल्स वैशिष्ठ्यपूर्ण क्लासेस आणि चिन्हांचा वापर. या सर्व प्रोग्रॅम प्रणालीत नुसते नियम, अटी आणि मार्ग. मुख्य माहिती वेगळ्याच डाटाबेसमध्ये.

एवढी अवाढच्य यंत्रणा असली तरी युजरने बटन दाबल्याबरोबर युजरची ओळख पटवून घैऊन तसेच त्याला काय दाखवायचे काय नाही त्याला वेबसाईटवरील माहिती वा सुविधा बदलायचे काय अधिकार द्यायचेत हे लक्षात घेऊन योग्य ती माहिती, युजरच्या डिव्हाईस व ब्राऊजरला साजेशी   मांडणी करून क्षणार्धात त्याच्यासमोर हजर करण्याची तत्परता. वेबपेजचे सारे रूप, रंग, अक्षरे,मांडणी हवी तशी बदलण्याची सुविधा. नवी यंत्रणा बांधण्यासाठी, या यंत्रणेत नवनवे बदल करण्यासाठी वा सुविधा जोडण्यासाठी अगदी सोप्या पद्धती. एक ना दोन.


या जादूमय चक्रव्यूहात शिरणेच अशक्य वाटते. जुमला प्रणाली एखाद्या आभासी यंत्रमानवासारखेच काम करते.  त्यातील छोट्या भागाचे डिझाईनही सर्व कार्यपद्धत समजल्याशिवाय करता येत नाही.यामुळे स्वत: डिझाईन करण्याच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाही व बाजारात उपलब्ध असणा-या सुविधांचाच उपयोग केला जातो. साहजिकच अशा सुविधा तयार करण्याचा व्यवसाय वाढत असून त्यात रोजगाराच्या अनेक आकर्षक संधी निर्माण होत आहेत.


आता या जुमला प्रणालीकडे केवळ अशक्य व अजिंक्य किल्ल्यासारखे न पाहता शिवाजी महाराजांप्रमाणे असा किल्ला बांधण्याचे धाडस करण्याची गरज आहे. प्रयत्न केला तर ते नक्की जमेल मात्र त्याचा ध्यास घेतला पाहिजे. आपली बुद्धी पणाला लावली पाहिजे.प्राचीन काळी आपल्या ऋषीनमुनींनी जे आकाशातील ग्रह ता-यांचे शोध लावले, सर्वांगसुंदर संस्कृत व्याकरण आणि अनमोल साहित्य निर्माण केले त्यांचे आपण वंशज आहोत हा सार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे  पण त्याबरोबर आपले दायित्वही लक्षात घेतले पाहिजे.

 बुद्धीबळाचा खेळ खेळून जगात अजिंक्यपद मिळविणा-रा विश्वनाथन् आनंद, गणितातील गूढ सूत्रे शोधणारे रामानुजन् यांचे आदर्श आपंण घेतले पाहिजेत. कॉंप्युटर क्षेत्रातील मानाच्या संस्थाचे प्रमुखपद आपले भारतीय भूषवीत आहेत. त्यांच्यासारखे बनण्याचे किंबहुना तशा संस्था उभारण्याचे ध्येय आपण मनाशी ठरविले पाहिजे. एकदा निश्र्चय पक्का झाला की मग काही अशक्य नाही. जुमलासारखी यंत्रणा मग एक बौद्धिक कसरतीचा खेळ वाटू लागेल.



बौद्धिक खेळ सर्वांनाच आवडथात. बुद्धिबळाचा खेळ खेळण्यात तासन् तास गेले तरी आपल्याला कंटाळा येत नाही. अगदी साधे पत्त्यांचा खेळ घेतला तरी त्यात किती विविधता असते. किती नियम असतात. सध्या कठीणतेच्या अनेक पाय-या असणारे व्हिडिओ गेम खेळण्यात मुले तासन् तास घालवतात. जुमला प्रणाली हा एक असाच खेळ समजून त्याची उकल करण्याचा प्रयत्न केला तर एक वेगळाच बौद्धिक आनंद आपल्याला होईल. पण त्याचबरोबर आपले बौद्धिक कौशल्यही वाढेल तसेच ते कॉंप्युटर क्षेत्रातील आपल्या भावी प्रगतीस हातभार लावेल.

याच दृष्टीकोनातून आपण आता या
जुमला प्रणालीचा खेळ शिकून घेऊया.



No comments:

Post a Comment