१. कागदी दोन पट्ट्या कापून चित्रात दाखविल्याप्रमाणे उलट सुलट घड्या घालून कागदाची छोटी स्प्रिंग बनविता येते.
२. कोलगेट वा अन्य ट्यूबच्या रिकाम्या बॉक्सच्या पट्ट्या कापून अधिक चांगली स्प्रिंग तयार करता येते.
चित्रात दाखविल्याप्रमाणे कापलेल्या पट्ट्या मध्य्भागी दुमडाव्यात. नंतर एका दुमडलेल्या पट्टीच्या दोन्ही बाजूतून दुसर्या पट्टीच्या बाजू घालून कोन करावा. या जोडाची एक बाजू बंद असून दुसर्या बाजूस दोन पट्ट्य़ा मोकळ्या राहतात. त्यातून तिसर्या पट्टीच्या बाजू घालून ही साखळी वाढवावी. अशीच क्रिया पुनःपुन्हा करीत सर्व पट्ट्या जोडून स्प्रिंग तयार करावी ही आता कमी जास्त लांबीची करता येते. या साखळीचा उपयोग करून आणखीही चांगली डिझाईन करता येतील.
कागदाचे भिरभिरे.
केवळ तीन पट्ट्या मध्ये दुमडून व एकमेकीत अडकवून भिरभिरे तयार करता येते. काडीच्या टोकावर ते उभे धरले तर वारा असेल तर ते फिरू लागते. असे भिर्भिरे करून पंख्याखाली धरल्यास सुदर्शन चक्रासारखे ते दिसते.
हेच भिरभिरे उलट धरून उंचावरून खाली टाकले तर फिरत फिरत खाली येते.
No comments:
Post a Comment