ज्ञानदीप फौंडेशनच्या मायमराठी डॉट कॉम या लोकप्रिय मराठी वेबसाईटचे संवर्धन व आधुनिकीकरण करून त्यातील माहिती सर्व मराठी बांधवांपर्यंत पोचविण्यासाठी स्वतंत्र संपादक मंडळ कार्य करणार असून त्याचे प्रमुख संपादकपद स्वीकारण्याची विनंती डॉ. नितीन देशपांडे यांनी स्वीकारली आहे.
डॉ. नितीन देशपांडे हे वालचंद कॉलेज, सांगलीचे माजी विद्यार्थी असून कराड इंजि. कॉलेजचे मानद प्रध्यापक आहेत शिवाय अनेक मोठ्या पदांवर त्यांनी कार्य केले असून मराठी साहित्य आणि संस्कृती यात त्याचे मोठे योगदान आहे.
त्यांचा थोडक्यात परिचय खाली देत आहे.
डॉ नितीन देशपांडे, पुणे
परिचय -
शिक्षणाने अभियंता , व्यवसायाने सल्लागार , आवडीने लेखक !
आजवर सात पुस्तके प्रकाशित -
१) माणूस नावाचे निगेटीव्ह वर्तुळ (एकांकिका संग्रह)
२) "त्रि " धारा (लघुकादंबरी संग्रह)
३) दोहा (कथासंग्रह)
४) हृदय ओतलेली वाणी (संपादन)
५) योग समन्वय (अनुवाद)
६) Humanising Work Place - Pathway to HR Management (संत साहित्यावरील प्रबंधाचे संपादित इंग्रजी पुस्तक)
७) मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क (स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमावर लेखन)
* आगामी १) " गुलज़ार समजून घेताना " (त्रैभाषिक लेखसंग्रह)
२) " ए ,चला रे .... " (महाविद्यालयीन जीवनाचा पुनः प्रत्यय)
* बारा एकांकिकांचे लेखन (महाराष्ट्र राज्य प्रयोग परिनिरीक्षण मंडळ संमत)
* एकांकिका -लेखन, दिग्दर्शन, अभिनय
* एकांकिका -लेखन स्पर्धांमध्ये पारितोषिके
* “तुझे आहे तुजपाशी ", “दिवा जळू दे सारी रात " नाटकांमध्ये प्रमुख भूमिका
* चित्र -नाटय विषयक लेखन / परीक्षण
* कथा-कथन, काव्यवाचन, वादविवाद -वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग आणि सध्या आयोजन!
* मानव -संसाधन विकास (Human Resource Development) हा आवडीचा विषय! या विषयावर संशोधन, लेखन, व्याख्याने!
संपर्क -डॉ नितीन देशपांडे
"ईशावास्य", ४९/सायंतारा कॉलनी, D.S.K. विश्व, धायरी, पुणे -४१०१६८
भ्रमणध्वनी -९८५०८ २६९९०, मेल आय -डी deshpandenh@gmail.com
वेबसाईट - www. dnyanapeethacademy.com
ज्ञानदीपच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांच्या अनुभवी व कुशल नेतृत्वाखाली मायमराठी वेबसाईटचे कार्य अधिक वृद्धींगत होऊन ते सर्व मराठी बांधवाचे एक हक्काचे व विचारविनिमयाचे व्यासपीठ बन्ल असा ज्ञानदीपला विश्वास वाटतो. त्यांच्या कार्यास शुभेच्छा
No comments:
Post a Comment