ज्ञानदीप फौंडेशनचे प्रमुख आधारस्तंभ आणि ज्ञानदीप इन्फोटेकचे डायरेक्टर श्री अरविंद यादव यांचे अचानक दुःखद निधन झाल्याचे कळल्यावर फार वाईट वाटले.
दोन दिवसांपूर्वीच माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यांची पुण्यातील बहीण गेली म्हणून त्ते पुण्याला गेले होते. मी त्यांना स्कूल फॉर ऑल या वेबसाईटसाठी विषयवार शिक्षकांची माहिती गोळा करण्यास सांगितले होते. सांगली आकाशवाणीचे सुनील कुलकर्णी यांचे नावही त्यांनी मला त्यावेळी सुचविले होते.
पहाटे ज्ञानदीपचे प्रवीण कोकाटे यांचा फोन आल्यावर मला धक्काच बसला. कदाचित बातमी चुकीची असेल या कल्पनेने मी इतरांना फोन केला. दुर्दैवाने बातमी खरी ठरली. माझे एक ज्येष्ठ सहकारी आपल्यातून निघून घेल्याचे मनाला फार दुःख झाले.
जिल्हा परिषदेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी मराठी विज्ञान प्नबोधिनी आणि ज्ञानदीपच्या कार्याला वाहून घेतले होते.
त्यांचा थोडक्यात परिचय
जन्म - ८-५-१९३९
सांगली जिल्हा परिषदेत ३५ वर्षे सेवेनंतर १९९७ मध्ये निवृत्त.
सेवाकाळात माजी जिल्हाधिकारी सौ. लीना मेहेंदळे यांचे विश्वासू अधिकारी म्हणून कार्य
ते जगन् मित्र होते. सांगलीतील तसेच शालेय स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील बहुतेक सर्वांशी त्यांचा घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध होता.
- खेळ, फोटोग्राफी, १७० शास्त्रीय संगीत रागांचे संकलन ( १००० कॅसेटस् व १००० फोनोग्राम रेकॉर्डस् चा संग्रह.
- कै. मधुकर घारगे यांच्या वस्तुसंग्रहासाठी सहकार्य.
- निसर्ग प्रतिष्ठान, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह.
- ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेत २००३ मार्केटींग विभाग प्रमुख
- ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेत २०१३ पासून डायरेक्टर
- ज्ञानदीप फौडेशनचे सुरुवातीपासून म्हणजे २००५ पासून विश्वस्त
- चित्रकला, बॅडमिंटन, कॅरम, क्रिकेट व इतर सर्व खेळांत पारंगत.
- ड्रायव्हिंग उत्तम येत असल्याने ज्ञानदीपच्या तसेच आमच्या घरातील कोणत्याही कामास ते आमची कार चालवत असत.
- सांगलीतील मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आणि इनोव्हेशन सेमिनारचे वेळी तसेच पुणे, कोल्हापूर, इस्लामपूर अशा ठिकाणी अनेकवेळा माझेबरोबर कारने ड्राईव्ह करत येऊन तसेच निष्णात फोटोग्राफर असल्याने फोटो काढत त्यांनी ज्ञानदीपच्या कार्याचा विस्तार केला.
त्यांच्या सर्व कार्याचा परिचय यथावकाश ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
माझ्या पत्नीच्या आजारपणात त्यांची मला फार मदत झाली. आमच्या घरातील सर्वजण त्यांना आपल्या घरातीलच एक व्यक्ती समजत होते.
मी २०१६ साली अमेरिकेत आल्यानंतर तर त्यांनी या दोन्ही संस्थांची जबाबदारी पूर्णपणे सांभाळली होती. त्यांचे कार्य असेच जोमाने करत रहाणे ही जबाबदारी आता आपणा सर्वांची आहे.
त्यांना ज्ञानदीपतर्फे व व्यक्तिशः माझ्या व आमच्या कुटुंबियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. - सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.
.
अतिशय अनपेक्षित आणि दुःखदायक बातमी. त्यांच्या आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.
ReplyDeleteभावपूर्ण आदरांजली!!!