Thursday, January 2, 2020

नववर्षानिमित्त ज्ञानदीप फौंडेशनतर्फे स्वयंरोजगाराविषयी नवे व्यासपीठ



गेली २० वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पायाभूत कार्य करून ज्ञानदीपने सांगलीचे नाव जागतिक नकाशावर कोरले आहे. येथे शिकलेले विद्यार्थी आज पुणे, बंगलोर सारख्या भारतातील महानगरांपासून ते अमेरिकेतील विविध राज्यात मानाच्या पदांवर कार्य करीत आहेत.

ज्ञानदीपने स्वतः मोठे न होता आपल्या कर्मचा-यांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. शिवाय परदेशी तंत्रज्ञानाचे अनुकरण न करता मराठी व संस्कृत भाषा, सांगली कोल्हापूर सारख्या स्थानिक भागावर आणि शालेय शिक्षणात माहिती तंत्ररज्ञान रुजविण्यावर लक्ष केंद्रीत केले, संस्थेच्या माजी संचालिका स्व. सौ. शुभांगी रानडे यांनी या कार्यात मोलाचे योगदान दिले,

त्याचीच परिणती म्हणून आज अमेरिकेतील माहिती तंत्ररज्ञानाचे केंद्र असणा-या सिलिकॉन व्हॅलीमध्ये ज्ञानदीप परिवार स्थायिक झाला असून आता मायसिलिकॉनव्हॅली नावाची वेबसाईट करून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अभिमानाने पाऊल टाकले आहे.



नववर्षानिमित्त  दूरस्थ शिक्षण आणि स्वयंरोजगाराविषयी नवे व्यासपीठ सुरू करण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प  ज्ञानदीपने हाती घेतला असून आपल्या सर्वांच्या सक्रीय सहभागातून तो यशस्वी होईल अशी आशा आहे,


No comments:

Post a Comment