आठ वर्षांपूर्वी संक्रांतीनिमित्त मी स्वतःच्या हस्ताक्षरात एक पत्र माझ्या सर्व नातेवाईक व मित्रांना पाठविले होते. ते खाली देत आहे. हातांनी लिहिलेली पत्रे हा जुन्या स्मृतींचा आणि लिहिणा-या व्यक्तीचा ठसा आपण नव्या संदेशवहनाच्या सुविधांनी गमावला आहे.
ंंंं
हे पत्र पाठविल्यानंतर मला आलेला अनुभव मात्र मलाच चकित करणारा होता. माझ्या या प्रयत्नाचे सर्वांकडून स्वागत होईल असे मला वाटले होते. मात्र पोष्टाच्या दिरंगाईमुळे पत्र महिन्याभराच्या उशीराने काहीजणांकडे पोचले.
आपल्या हाताने उत्तर पाठविण्याची मी अपेक्षा केली आहे हे समजून आणि लिहिण्याची सवय व इच्छा नसल्याने माझ्या काही नातेवाईकांना माझ्या या उठाठेवीचा राग आला. त्यातून गैरसमज वाढून काही नाती कायमची तुटली.
इतिहासाची चक्रे उतट फिरविण्याचा हा प्रयत्न माझ्या अंगावर शेकला, आज असा प्रयत्न मी पुन्हा करीत आहे. मात्र माझे हे विचार आता नव्या संदेशवहन सुविधेचा वापर करून आपणापर्यंत पोहोचवत आहे.
जागतिक हस्ताक्षर दिनादिवशी वा स्वाक्षरी करताना हाताने लिहिण्याबरोबर कधीकधी आपल्या डायरीत तरी आपण आपले विचार लिहून ठेवावेत व पुढ्या पिढीसाठी आपल्या स्मृतीचा बहुमोल ठेवा त्यांच्या हाती सोपवावा असे मला वाटते.

No comments:
Post a Comment