मराठी विज्ञान परिषदेतर्फे शहरी शेती उपक्रम गेली 25 वर्षे सुरू आहे.
मिरज येथील सौ. मंदाकिनी मराठे यांच्या पुढाकाराने मिरज-सांगली परिसरातील नागरिकांसाठी असा अभ्यासक्रम विश्रामबाग येथील कृषी व्यवस्थापन महाविद्यालयात करण्याची योजना ठरविण्यात आली. स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे नियोजन आणि कार्यवाहीची जबाबदारी मराठी विज्ञान प्रबोधिनी, सागलीचे कार्यवाह श्री अरविंद यादव यांनी स्वीकारली. आता हा उपक्रम येत्या १९ जानेवारीपासून सुरू होत आहे.
यात विजयनगर, सांगली येथील कृषी महाविद्यालयाच्या गच्चीवर शहरी शेती तंत्राने लागवड करून त्याची देखभाल करण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम तीन महिने केले जाणार आहे. शहरी शेतीचे मार्गदर्शन मविप मध्यवर्ती संस्थेचे विषय तज्ज्ञ श्री. दिलीप हेर्लेकर करणार आहेत. स्थानिक व्यवस्थापन मराठी विज्ञान प्रबोधिनी सांगली विभाग सांभाळेल.अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग असून स्थानिक होतकरू तरूणाला प्रशिक्षण देऊन हा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे.
हा उपक्रमाविषयी परस्पर सहकार्य करार आणि प्रकल्पाची आखणी करण्यासाठी २६ डिसेंबर २०१९ रोजी एक प्राथमिक बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुंबईचे श्री हेर्लेकर, सांगली म. वि. प. चे प्रा. मोहन मद्वाण्णा, श्री अरविंद यादव आणि डॉ. रानडे, शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बोरकर व प्रा. वालावलकर मिरजेच्या सौ. मंदाकिनी मराठे उपस्थित होते. श्री. हेर्लेकर यांना यावेळी प्रकल्पाची माहिती दिली डॉ. बोरकर यांनी महाविद्यालयाकडून सर्व साहाय्याचे आश्वासन दिले.
यानंतर विजयनगर येथील नर्सरीला भेट देऊन उपक्रमासाठी लागणा-या वनस्पतींची निवड करण्यात आली. नर्सरी व्यवस्थापक श्री. मंदार गायकवाड यांनी नर्सरी दाखवून याविषयी सविस्तर माहिती दिली. श्री. अरविंद यादव यांनी काढलेला फोचो
नर्सरी पाहून झाल्यावर मान्यवरांनी ज्ञानदीप फौंडेशनला भेट दिली व तेथील कार्याची माहिती घेतली. शहरी शेती प्रकल्पाचा खर्च व इतर बाबींची यावेळी चर्चा झाली. ज्ञानदीपचे डॉ. रानडे यांनी या उपक्रमाचे व्हिडिओ चित्रिकरण करून दूरस्थ पद्धतीने असा अभ्यासक्रम जागतिक पातळीवर उपलब्ध करण्यासाठी ज्ञानदीप फौंडेशन सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
( फोटोत श्री. दिलीप हेर्लेकर, प्रा. मोहन मद्वाण्णा आणि डॉ. रानडे )
शहरी शेती उपक्रमाच्या सुव्यवस्थित कार्यवाहीसाठी मविप, मराठी विज्ञान प्रबोधिनी आणि शाहू महाविद्यालय यात २७ डिसेंबर रोजी परस्पर सहकार्य करार करण्यात आला.
(श्री. राजकुमार पाटील,प्रकल्प संचालक, डॉ. बोरकर प्राचार्य,राजर्षी शाहू कृषी व्यवस्थापन महाविद्यालय, श्री. अरविंद यादव, कार्यवाह, मराठी विज्ञान प्रबोधिनी, श्री. दिलीप हेर्लेकर, मराठी विज्ञान परिषद, मुंबई)
तीन महिने शनिवार, रविवार या दिवशी चालणारा हा उपक्रम सांगलीत पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे. याचे प्रशिक्षण शुल्क प्ति व्यक्ती फक्त २५०० रुपये आहे.
या उपक्रमामुळे घरातील वाया जाणारे अन्नपदार्थ, झाडाची पाने व इतर ओला कचरा यांच्यापासून खत निर्मिती करून सेंद्रीय भाजीपाल्याचे उत्पादन आपल्या गच्चीवर करण्याची व घनकचरा व्यवस्थापनास हातभार लावण्याची प्रेरणा नागरिकांत निर्माण होईल असा विश्वास वाटतो.
मराठी विज्ञान प्रबोधिनी आणि ज्ञानदीप फौंडेशन हा उपक्रम सातत्याने सांगली जित्ह्यातील सर्व मोठ्या गावात राहविण्याचा संकल्प करीत आहे. सर्वांची साथ मिळाल्यास निसर्ग संवर्धन आणि घन कचरा व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याचे श्रेय नागरिकांना मिळेल.

No comments:
Post a Comment