ज्ञानदीप संगणक हाताळणी, इंग्रजी - मराठी टंकलेखन, फोटोशॉप, ब्लॉग लिहिणे, वेबडिझाईन, तसेच पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण या विषयांवर नेटद्वारे प्रशिक्षण वर्ग सुरू करीत आहे. घरबसल्या आपल्या फावल्या वेळात हे कोर्सेस करून स्वत:च्या नव्या व्यवसायाची सुरुवात करा वा ज्ञानदीपच्या परिवारात सामील होऊन उद्योगी बना.
हे प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याचा उद्देश ज्यांना या क्षेत्रात नोकरी वा स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे अशांसाठीच आहेत. त्यामुळे हे प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देण्याची तयारी असणार्यांनीच या कोर्ससाठी नावे नोंदवावीत.
विषयातील धड्यांची आखणी क्रमवार केलेली असून धड्यातील माहितीचे पूर्ण आकलन झाले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी पूरक प्रश्नावली व गृहपाठ पूर्ण करणे अनिवार्य राहील.
गृहपाठासाठी दिलेली सर्व उदाहरणे स्वतः सोडवून ज्ञानदीपकडे तपासण्यासाठी पाठवावी लागतील. अर्थात त्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही. आपल्या फुरसतीच्या वेळेत कोर्स करणार्या विद्यार्थ्यास आपल्या सवडीप्रमाणे गृहपाठ पूर्ण करता येतील मात्र सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आल्यानंतरच पुढील धडा देण्यात येईल. साहजिकच कोर्ससाठी शेवटी वेगळी परीक्षा असणार नाही.
कोर्स समाप्तीनंतर ज्ञानदीप फौंडेशन तर्फे कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीचे सर्टिफिकेट आवश्यक असल्यास वेगळे परीक्षाशुल्क भरून त्यांच्या ऑनलाईन परिक्षेत पास व्हावे लागेल.
प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतःचा ब्लॉग, ट्विटर अकौंट सुरू करून आपली प्रगती व स्वतःचे लेख प्रसिद्ध करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच सार्वत्रिक उपयोगाच्या लेखांना ज्ञानदीपच्या वेबसाईटवर प्रसिद्धी देण्यात येईल.
या ऑनलाईन कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी इमेलने.(info@dnyandeep.net) संपर्क साधा.- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
No comments:
Post a Comment